Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user मराठी कथालेखक
Submitted by मराठी कथालेखक on Fri, 07/25/2014 - 16:48
मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत. काही उदाहरणे देत आहे. १) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्‍याची 'कीव' कराविशी वाटते. २) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट' ३) Bicycle करिता 'सायकल' ४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. ५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !! ६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं. ७) Cinema/Movie साठी 'पिक्चर' तुम्हाला अजून असे कोणते शब्द आठवतात ? शब्दांचा हा चुकीचा वापर टाळावा निदान कमी व्हावा म्हणून काय करता येईल ?तुम्ही काही करता का ? तुम्ही निदान पुढच्या पिढीला अशा चुकीच्या वापरापासून परावृत्त करता का ?
  • Log in or register to post comments
  • 96516 views

प्रतिक्रिया

Submitted by बॅटमॅन on Fri, 07/25/2014 - 19:33

In reply to बाकीचे युरोपियन्स लावतात की by कवितानागेश

Permalink

+१

सहमत. या पवित्र कार्यास आपणही हातभार लावावा इतकेच सुचवावयाचे आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 07/26/2014 - 10:47

In reply to बाकीचे युरोपियन्स लावतात की by कवितानागेश

Permalink

+१११११११११११११११११११

+१११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Wed, 07/30/2014 - 13:57

In reply to काही चूक नाही त्यात. आपल्या by बॅटमॅन

Permalink

आपल्या भाषांची वाट लावणार्‍या

आपल्या भाषांची वाट लावणार्‍या त्या इंग्रजीची आपणही शक्य तितकी वाट लावलीच पाहिजे
हरकत नाही , पण सध्या आपण नेमकी कशाची वाट लावत आहोत ? इंग्रजीची की मराठीचीच ? कारण इंग्रजीत लिहताना आपण 1) She is my wife 2) There was a huge queue at Cinema 3) The movie was damn good असं बरोबरच लिहतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/30/2014 - 14:06

In reply to आपल्या भाषांची वाट लावणार्‍या by मराठी कथालेखक

Permalink

इंग्रजीही इंडियनिझम आणून आपण

इंग्रजीही इंडियनिझम आणून आपण बिघडवत आहोतच की. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by केदार-मिसळपाव on Wed, 07/30/2014 - 14:14

In reply to इंग्रजीही इंडियनिझम आणून आपण by बॅटमॅन

Permalink

सायबा

इंग्रजी ही मुळातच अशुद्ध भाषा आहे. त्यात खुप्श खुपशे फ्रेंच, दॉईच आणि इतर बरेच शब्द आहेत. आपण एक एका अर्थाने ती भाषा अजुन समृद्धच करत आहोत. लै लिहिण्यासारखे आहे ह्या विषयावर.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/30/2014 - 14:19

In reply to सायबा by केदार-मिसळपाव

Permalink

अर्थातच सहमत आहे.

अर्थातच सहमत आहे. मला इंग्रजीच्या तथाकथित शुद्धतेबद्दल आग्रही अन मातृभाषेबद्दल अनाग्रही लोक पाहिले की मजा वाटते त्यामुळे मजेने म्हटलो इतकेच.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 07/30/2014 - 18:59

In reply to इंग्रजीही इंडियनिझम आणून आपण by बॅटमॅन

Permalink

इंग्रज नविन शब्दांबद्दल किंवा

इंग्रज नविन शब्दांबद्दल किंवा एक/अनेक जुने शब्द वापरून बनवलेल्या शब्दांकडे "भाषा बिघडवली" या दृष्टीने बघतात असे वाटत नाही... ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मोठ्या अभिमानाने दर वर्षी "न्यू वर्ड लिस्ट <वर्ष>" जाहीर करते / छापते... ही आहे २०१२ ची नविन शब्दसूची अती सोवळेपणा न करता चपखल अर्थांचे नविन शब्द आत्मसात करणे हे इंग्लिश भाषा संपन्न बनण्याचे एक महत्वाचे कारण आहे असे वाटते. मुख्य म्हणजे असे करताना जगातल्या कोणत्याही भाषेतली आवक त्यांना निषिद्ध नाही असे दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 07/30/2014 - 19:02

In reply to इंग्रज नविन शब्दांबद्दल किंवा by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

अती सोवळेपणा न करता चपखल

अती सोवळेपणा न करता चपखल अर्थांचे नविन शब्द आत्मसात करणे हे इंग्लिश भाषा संपन्न बनण्याचे एक महत्वाचे कारण आहे असे वाटते. सहमत. पूर्वीही अशाच विषयाच्या धाग्यावर शांताबाई शेळके यांनी सांगितलेले विचार टंकले होते. जी भाषा काळाप्रमाणे बदलत जाते तीच टिकते अशा अर्थाने त्या म्हणाल्या होत्या.
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on Wed, 07/30/2014 - 19:24

In reply to अती सोवळेपणा न करता चपखल by रेवती

Permalink

भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार

भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार आहे, एखाद्या नदीला जसे ओढे ओहोळ येऊन येऊन त्या नदीला समृद्ध करतात ,जर ओढे बंद केले तर नदीचे प्रवाहीपण बंद पडेल व डबके होऊन ती वास मारायला लागेल.तसेच भाषेचे आहे ,उदा- संस्कृत व पाली भाषा या असल्या खुळचटगिरीमुळे मरणासन्न झाल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/30/2014 - 19:33

In reply to भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार by नानासाहेब नेफळे

Permalink

आयला, म्हणजे गेल्या अडीच हजार

आयला, म्हणजे गेल्या अडीच हजार वर्षांपासून संस्कृत मरणासन्न आहे होय? नवीनच शोध लागला, धन्यवाद बरं का नेफळेसाहेब.
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on Wed, 07/30/2014 - 20:49

In reply to आयला, म्हणजे गेल्या अडीच हजार by बॅटमॅन

Permalink

मागच्या अडीचहजार वर्षात

मागच्या अडीचहजार वर्षात कोणत्या कालखंडात लोक संस्कृतातून सर्रास बोलत होते, केव्हा ती बोलीभाषा होती ? एखाद्या भाषेचे डॉक्युमेंटेशन आहे म्हणजे ती प्रचलीत भाषा आहे असा गैरसमज झाला आहे काय? (माझा हा प्रतिसाद संस्कृतातून खरडून दावल्यास संस्कृतात अजूनही धुगधुगी आहे हे मान्य करु)
  • Log in or register to post comments

Submitted by पिशी अबोली on Fri, 08/01/2014 - 19:09

In reply to मागच्या अडीचहजार वर्षात by नानासाहेब नेफळे

Permalink

गत द्विसहस्रवर्षेषु कस्मिन्

गत द्विसहस्रवर्षेषु कस्मिन् काले जना: सर्वथा संस्कृतेन वार्तां कुर्वन्ति स्म, अपि च कदा सा लोकभाषा आसीत्? कस्याश्चित् भाषाया: केवलम् आलेखनं उपलब्धम्, अतः सा प्रचलिता भाषा, इत्येषा मिथ्यामति: किम्? (ममेतद् प्रत्युत्तरं संस्कृतेन लिख्यते चेत् 'संस्कृतम् अद्यापि ऊर्जयते' इति अंगीकुर्मः|)
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 08/01/2014 - 19:19

In reply to गत द्विसहस्रवर्षेषु कस्मिन् by पिशी अबोली

Permalink

पिशी आनी बॅटमॅन असताना (माइंड

पिशी आनी बॅटमॅन असताना (माइंड इट - बॅट्मॅन - काव्य वगैरे करतो तो संस्कृत मध्ये...) त्यांना असले भुक्कड चॅलेंजेस देणे म्हणजे... जौ दे... अजुन बॅटमॅनाचे एखादे काव्य कसे आले नाही इथे..???
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on Fri, 08/01/2014 - 19:22

In reply to गत द्विसहस्रवर्षेषु कस्मिन् by पिशी अबोली

Permalink

ब्याट्या,म्याडमचे उत्तर

ब्याट्या,म्याडमचे उत्तर क्रॉसचेक कर आणि सांग बरोबर आहे का.
  • Log in or register to post comments

Submitted by पिशी अबोली on Fri, 08/01/2014 - 19:31

In reply to ब्याट्या,म्याडमचे उत्तर by नानासाहेब नेफळे

Permalink

ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय

ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय क्रॉसचेक करायला म्हणजे त्याला संस्कृत नक्की चांगलं येतं हे तुम्हीच मान्य करताय की.. म्हणजे संस्कृत उत्तम जाणणारी एक व्यक्ती इथे नक्कीच आहे हे तुम्हाला मान्यच आहे. आता माझा अनुवाद अगदी शून्य मार्क मिळवण्याजोगा असला, तरीही ते क्रॉसचेक करु शकणारा बॅटमॅन उत्तम संस्कृत जाणणारा आहे हे तुम्हाला मान्य असल्यामुळे संस्कृतमधे धुगधुगी आहे हेही तुम्हाला मान्य करावंच लागेल, हो ना नेफळेसाहेब?
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 08/01/2014 - 19:34

In reply to ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय by पिशी अबोली

Permalink

एकच मारा लेकीन सॉल्लीट मारा.

एकच मारा लेकीन सॉल्लीट मारा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on Fri, 08/01/2014 - 19:49

In reply to ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय by पिशी अबोली

Permalink

ब्याटम्यानभाऊ फारच विश्लेषण

ब्याटम्यानभाऊ फारच विश्लेषण करतात भाषेचं, लँग्वेज सिम्यानटीक्स ,फोनेटीक्स ,मॉर्फोलॉजी वगैरे वगैरे! खरे तर त्यांनाच आव्हान केले होते पण त्यांनी सोईस्कर पळ का काढला ते समजले नाही, आता क्रॉस चेक करुन खरे खोटं सांगा, बघू जमते का त्यांना!!
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Fri, 08/01/2014 - 20:47

In reply to ब्याटम्यानभाऊ फारच विश्लेषण by नानासाहेब नेफळे

Permalink

सोईस्कर पळ का काढला ते समजले

सोईस्कर पळ का काढला ते समजले नाही
हा हा हा :D ब्याट्या, पळ का काढला का च्यालेंज फाट्यावर मारलं बे ??
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Fri, 08/01/2014 - 21:05

In reply to ब्याटम्यानभाऊ फारच विश्लेषण by नानासाहेब नेफळे

Permalink

आव्हान

नेफळे, तुम्ही बॅटमॅन साहेबांना परत आव्हान द्या आणि यावेळी तुम्ही हरले तर काय करणार हे पण लिहा - जसं हरलो तर नेफळे पुन्हा मिसळपाव वर दिसणार नाही :) आणि अजून एक, फक्त "नानासाहेब" नाही सगळेच "साहेब". इथे बाकीचे पण काही "साहेब" आहेत आणि ते सगळे नेफळेच आहेत हि आतली खबर माहित आहे सगळ्यांना.
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on Fri, 08/01/2014 - 21:32

In reply to आव्हान by नाव आडनाव

Permalink

ब्याटोबाला आव्हान दिले तेव्हा

ब्याटोबाला आव्हान दिले तेव्हा ते बर्याच वेळ ऑनलाईन होते,दुसर्या दिवशीही याच धाग्यावर होते, परंतु फिरकले नाहीत ,बहुधा बराच खटाटोप करुनही जमले नसावे ,मग अबोलीताईंना धाडले असावे. असो ,चार भुक्कड ओळीच्या संस्कृत भाषांतराला मिपासारख्या अग्रेसर संस्थळावर तीन दिवस लागतात यावरुन आम्ही काय समजायचे ते समजलो. (तरीही उपरोक्त भाषांतर ग्राह्य मानतो व संस्कृतात धुगधुगी आहे हे मान्य करतो )
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Sat, 08/02/2014 - 11:17

In reply to ब्याटोबाला आव्हान दिले तेव्हा by नानासाहेब नेफळे

Permalink

बॅट्ञा आंजावर असताना सतत

बॅट्ञा आंजावर असताना सतत काकदृष्टीने तुमचे प्रतिसाद शोधत असतो आणि त्यामुळे तुम्ही प्रतिसाद टाकल्यावर त्याने लगेच उत्तर द्यावे असा गैरसमज झाला की काय तुमचा? चार भुक्कड ओळीच्या संस्कृत भाषांतराला तुम्ही भुक्कड लिहिले होते हे तुम्ही मान्य केले हे एक बरे झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 08/01/2014 - 20:54

In reply to ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय by पिशी अबोली

Permalink

आता "मी पडलो, पण मुद्दामच

आता "मी पडलो, पण मुद्दामच पडलो" असे दिव्य लॉजीक ऐकायची तयारी ठेवा ;) *lol*
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on Fri, 08/01/2014 - 21:37

In reply to आता "मी पडलो, पण मुद्दामच by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

दिव्य लॉजीक ऐकायची तयारी ठेवा

दिव्य लॉजीक ऐकायची तयारी ठेवा म्हणजे मी लॉजीकने बोलतो हे तरी तुम्हास मान्य आहे, हे ही नसे थोडके.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 08/02/2014 - 11:54

In reply to दिव्य लॉजीक ऐकायची तयारी ठेवा by नानासाहेब नेफळे

Permalink

वा, वा ! तुमचे मराठीपण कच्चे

वा, वा ! तुमचे मराठीपण कच्चे असल्याचा पुरावा किती सहजपणे दिलात ! *lol* *lol* *lol* असेच तुमच्या "दिव्य" प्रतिभेचे दर्शन देत आमचे मणोरंजण क्रत र्‍हा *dance4* *biggrin*
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Sat, 08/02/2014 - 11:14

In reply to ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय by पिशी अबोली

Permalink

कड्डक ठोकला आहे.

कड्डक ठोकला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 08/03/2014 - 01:37

In reply to ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय by पिशी अबोली

Permalink

हाण तेच्या मारी.

कडक!!!! (मायला ह्यो धागा लैच पेटल्याला दिसतोय. जरा दुर्लक्षच झालं खरं.)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 08/03/2014 - 00:35

In reply to गत द्विसहस्रवर्षेषु कस्मिन् by पिशी अबोली

Permalink

साधु साधु पिशीमहोदये,

साधु साधु पिशीमहोदये, गद्योत्तरं खलु सम्यक् एव वर्तते!! अनवान्तरम् - किन्तु विषयेऽस्मिन् जनै: यत्किञ्चिदपि लिखितं तत्तु महिषपृष्ठे प्रावृडिव व्यर्थमिति मन्ये |
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 08/03/2014 - 01:01

In reply to मागच्या अडीचहजार वर्षात by नानासाहेब नेफळे

Permalink

पाणिनिकाले तु जना: संस्कृते

पाणिनिकाले तु जना: संस्कृते वदन्ति स्म, गालिप्रदानमपि कुर्वन्ति स्म | अर्थात् पाणिनिकाळात कैक ठिकाणी त्याने व्याकरण रचलेली संस्कृत भाषा प्रचलित होती हे अष्टाध्यायी न वाचता त्या ग्रंथाबद्दलचे इतरांचे जुजबी विकीस्टाईल लेख वाचूनही समजते. ते एक असोच. अन पिशी अबोली यांचे भाषांतर अगदी अचूक अन नेमके आहे. अन बाकी प्रतिसाद खालीलप्रमाणे. पिशीमहोदया तु बहु सम्यक् उत्तरं दत्तवती, किन्तु नेफलेमहोदयस्तु ( पाणिनिप्रणीते संस्कृते 'ळ' कारो नास्ति चेत् ल-कारो एव प्रयुक्तोऽत्र |) केवलं संस्कृतद्वेषात् एव विगतबुद्धि: हतविवेकः इव प्रजल्पते | तस्मादेषः पद्योपहारः स्वीकरोतु भवान् | संस्कृतं नाम वै किञ्चित् नास्ति, नासीत् कदाप्यहो | नैषा नैसर्गिकी भाषा, यन्त्रवद् रचिता खलु ||१|| अधुना त्वेति जल्पन्ति येऽपि सर्वे मुहुर्मुहु: | संस्कृतं ते न जानन्ति, न चापि प्राकृतादयः ||२|| यस्य कस्यापि जल्पोऽयं, येन केनापि मण्डितः| यस्मै कस्मै कथित्वा तु, यद्वा तद्वा भवेत् खलु ||३|| एते सर्वे जनाश्चात्र वर्तन्ते ज्ञानिनो इव | परं मनसि तेषां वै, सदैवात्र स्थितं खलु ||४|| " व्याकरणं न जानामि , नैव जानाम्यहं ध्वनीन् | छन्दःशास्त्रं न जानामि, तथापि शृणुयु: जना: ||५|| ज्ञानहीनं द्वेषपूर्णं जल्पाम्यहमहो सदा | मिथ्या वक्तुं सदा ह्यत्र तत्परोऽस्मि शुको इव ||६||" कठोरोऽयं वाक्प्रहारो जनान् हि खलु बाधति | इत्युक्ते "वाक्प्रहारो न, यथा बाधति बाधते" ||७|| एते संस्कृतद्वेष्टारः दयनीया: हि सर्वथा | व्यासोक्तिस्तु दशां तेषां सम्यक्दर्शयते अहो!! (ऊर्ध्वबाहुर्विरोम्येष न कश्चिच्छृणोति माम् ;) ) ||८||
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 07/30/2014 - 19:45

In reply to भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार by नानासाहेब नेफळे

Permalink

संस्कृत व पाली भाषा या असल्या

संस्कृत व पाली भाषा या असल्या खुळचटगिरीमुळे मरणासन्न झाल्या. मग ल्याटिन कशामुळे मरण पावली?
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 07/30/2014 - 20:43

In reply to भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार by नानासाहेब नेफळे

Permalink

अंशत: सहमत नानासाहेब!

अंशत: सहमत नानासाहेब!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on गुरुवार, 07/31/2014 - 12:38

In reply to भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार by नानासाहेब नेफळे

Permalink

संस्कृत मरणासन्न झाली

संस्कृत मरणासन्न झाली याच्याशी असहमत. संस्कृत ही लॅब मधल्या प्रमाणित उपकरणे/मानकांप्रमाणे आहे. लॅब मधली प्रमाणित उपकरणे रोज वापरली जात नाहीत पण त्यांच्या मदतीने रोजच्या वापरातील उपकरणे तपासली /सुधारली जातात. संस्कृतच्या संदर्भाने मराठीचे(व कदाचित हिंदी आणि इतर मराठी भाषादेखील) शुध्दीकरण /प्रमाणीकरण सोपे होत असावे असे मला वाटते. (अर्थात मी या विषयातला तज्ञ नाही. )
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/30/2014 - 19:08

In reply to इंग्रज नविन शब्दांबद्दल किंवा by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

अगदी बरोबरे ओ...जरा मजेने

अगदी बरोबरे ओ...जरा मजेने म्हटले होते, परमार्थेण न गृह्यतां वचः :)
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Fri, 07/25/2014 - 17:10

Permalink

इंग्रजी

मी तर इथे लोकांना चुकीची मराठी इंग्रजी वाक्ये बोलताना पाहते; शेजारणीला विचारलं मुलगी काय करते तर म्हणे ती स्लीप झाली. मी विचारलं कशी, लागलं नाही ना तर म्हणे स्लीप झाली म्हणजे झोपली, ह्या बाई एका झोपडपटटीत इंग्रजी शाळेत शिकवतात , त्या बिचार्‍या मुलांची दया आली हे ऐकुन.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 04/30/2015 - 02:57

In reply to इंग्रजी by कविता१९७८

Permalink

घसरणे = स्लिप होणे हे चालते

घसरणे = स्लिप होणे हे चालते तर झोपणे = स्लीप होणे हे न चालायला काय कारण?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 07/25/2014 - 17:11

Permalink

>>सरळसोट "ते माझे पती" म्हणा

>>सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. न पेक्षा एजमान म्हणावें, कसें? बाकी आम्हीही फॉर अ चेंज लायनी, मेंबरं असं म्हणत असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on Fri, 07/25/2014 - 17:32

In reply to >>सरळसोट "ते माझे पती" म्हणा by सूड

Permalink

एजमान

एजमान अहो, "एज-मान" असे म्हणून तुम्ही यजमानांच्या "वयमाना"चा सूड घेताहात का?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 07/25/2014 - 17:18

Permalink

शुद्ध मराठी बोला म्हटलं तर

शुद्ध मराठी बोला म्हटलं तर लोक अंगावर येतात, तेच शुद्ध इंग्लिश बोला म्हटलं तर कशी हांजी हांजी करतात ते पाहणं रोचक आहे. बरं हे फक्त रोजीरोटीमुळंच होतं असंही नाही. इंग्लिश=हुच्चभ्रू हे समीकरण तूर्तास असल्याने लोक हुच्चभ्रू दिसण्यासाठी कायपण म्हणून इंग्रजी बोलायचा प्रयत्न करतात. याच लोकांना मराठीच्या मुद्यावर हाड थू करताना पाहून बाकी चिकार करमणूक होते मात्र.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 07/25/2014 - 17:30

In reply to शुद्ध मराठी बोला म्हटलं तर by बॅटमॅन

Permalink

सत्यवचन!

सत्यवचन! अक्कल काढावी अंगावर आल्यास.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 07/25/2014 - 18:53

In reply to शुद्ध मराठी बोला म्हटलं तर by बॅटमॅन

Permalink

क्या बात...क्या बात!!

>>शुद्ध मराठी बोला म्हटलं तर लोक अंगावर येतात लै वाईट अनुभव येतात राव. आणि अनास्था पाहून तर आणखी वाईट वाटतं. अवांतरः ह्यावरुन आठवलं, पुर्वी एकदा बाबासाहेब पुरंदर्‍यांसोबत फोटू काढला होता तो हापिसातल्या मित्रांना दाखवत होतो, त्यातलीच एक अतिशहाणी बया चित्कारली.."आयल्ला! एम.एफ.हुसेन? कुठे भेटले होते?" मी जागेवर फ्लॅट! कोण, काय वगैरे सविस्तर इस्काटून सांगितल्यावर म्हणे, "आमच्याकडं मराठीचं फार काही नसतं. त्यामुळं मला ठाऊक नाही बॉ!" हेच इंग्रजीबाबत नेमकं उलटं. थोडक्यात केवळ बोलणंच नव्हे, एकुणातच इंग्रजी=हुच्चभ्रू हे समीकरण भयंकर रुजलेलं आहे. धाग्यासंदर्भात: माझी कवटी सरकवणारा असाच एक प्रकार म्हणजे - "अमुक अमुक एक्सपायर झाला." का? वारला/ देवाघरी गेला/मेला/मृत झाला/ निवर्तला/चचला/खपला/खेळ आटोपला असे सभ्य ते टवाळ सगळ्या मापात बसणारे इतके प्रतिशब्द आहेत मराठीत, ते वापरले तर हा वापरणारा काय खपतो का?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 07/25/2014 - 19:00

In reply to क्या बात...क्या बात!! by धमाल मुलगा

Permalink

संताप!

बाबासाहेब पुरंदर्‍यांना एमेफ हुसेन समजणारी बया मराठी असेल तर तिला असांसदीय भाषेत सुनावायची आणि शेलक्या शब्दांत आहेर द्यायची इच्छा अनावर होतेय हे वाचून!!!!!!!!!!!!!!!!!!!! बाकी एक्सपायरशी सहमत. जाणीवपूर्वक मराठीत काही बोललो तर अंगावर पाल पडल्यागत, काहीतरी अन्यदेशीय किंवा अन्यग्रहीय ऐकल्यागत चेहरा करतात ***चे. यांच्या ***ला *** करून *** *** ***********************!!!!!!!! बरं हे प्रमाणभाषेबद्दलच असं, बोलीभाषा तर याहूनच जास्ती पाण्यात पाहिल्या जातात. आता मी मिरजेचा आहे, थोडा तिकडचा अ‍ॅक्सेंट येणारच की बोलण्यालिहिण्यात. तीच गोष्ट इतरांचीही त्यांच्या त्यांच्या बोलीभाषेबद्दल. पण बोलीभाषा म्हणजे काय एखादा आफ्रिकेतील जिराफ पहावा तसे पाहिल्यागत करतात-जणू आयुष्यात पैल्यांदा ऐकल्यागत. खरेच ऐकली नसेल तर ठीके ओ, पण असं काय नसतं. बोलीभाषा=गावंढळ आणि तो ट्याग त्यागायची अहमहमिका लागलेले हे रूटलेस***चे लोक, यांच्या ****************!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 07/25/2014 - 19:52

In reply to संताप! by बॅटमॅन

Permalink

मराठी असेल तर?

बाई भागवत हे आडनाव धारण करीत असत.
बरं हे प्रमाणभाषेबद्दलच असं, बोलीभाषा तर याहूनच जास्ती पाण्यात पाहिल्या जातात. आता मी मिरजेचा आहे, थोडा तिकडचा अ‍ॅक्सेंट येणारच की बोलण्यालिहिण्यात.
अगदी अगदी! दूर कशाला? मिपावरच 'दिल्या जाईल', 'केल्या जाईल' वगैरे वैदर्भीय बोलीबद्दल कितीतरी तोंडसुख घेतलं गेलंच की. >>बोलीभाषा=गावंढळ आणि तो ट्याग त्यागायची अहमहमिका लागलेले हे रूटलेस***चे लोक क्या बात! क्या बात! तोडलंस भावा. जन्तेला चढत्या भाजणीत लाज वाटते; आपल्या गावाची, आपल्या प्रदेशातल्या बोलीची, मग महाराष्ट्राच्या मराठीची, मग भारताची.... मज्जाय सगळी. :)
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 04/30/2015 - 03:01

In reply to संताप! by बॅटमॅन

Permalink

इंग्रजीच्या ॲक्सेंट्सचं मात्र

इंग्रजीच्या ॲक्सेंट्सचं मात्र फार कौतुक. दोन-चार वर्षं ऑस्ट्रेलियात काढली की माइट (मेट), डाय (डे) असं बोलायला लागतात लगेच. अशा लोकांच्या बौद्धिक पांगळेपणाचं मला आश्चर्य वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Fri, 07/25/2014 - 19:38

In reply to क्या बात...क्या बात!! by धमाल मुलगा

Permalink

कित्ती आयरॉनिक!

मी जागेवर फ्लॅट!
;)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 07/25/2014 - 19:48

In reply to कित्ती आयरॉनिक! by लंबूटांग

Permalink

च्यायला!!!

=)) =)) लंब्या... हालकटैस. ह्या छिद्रान्वेषीपणाचे आभार मानतो आणि फ्लॅट हा उधारीचा शब्द मागे घेऊन उताणा हा शब्द वाचावा अशी नम्र इनंती करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 07/25/2014 - 19:48

In reply to क्या बात...क्या बात!! by धमाल मुलगा

Permalink

कठीण आहे. परवा ऑफिसमध्येही एक

कठीण आहे. परवा ऑफिसमध्येही एक जण म्हणे "वैसे तो कुछ लॅंग्वेजेस ऑड होती हैं, पर ये मराठी तो एकदम ही ऑड हैं, मुझे बोलना भी अच्छा नहीं लगता, यू नो!" आता हे ऐकल्यावर तिला शांतपणे विचारलं की तुला मराठी येते का बायो, कामचलाऊ तरी? समजते का? थोडीतरी? तर अर्थातच नाही असं उत्तर आलं. मग तिला सांगितलं की आधी भाषा शिक, मग त्यात प्रावीण्य मिळव आणि मग भाषेला ऑड वगैरे नावं ठेव. भाषाच येत नाही तर भाषा "ऑड" आहे हे क्सं काय ठरवलंस? त्यानंतर काही काळ भयाण शांतता पसरली!
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Sat, 07/26/2014 - 10:16

In reply to कठीण आहे. परवा ऑफिसमध्येही एक by यशोधरा

Permalink

एकदा माझा म्यानेजर, जो कानपूर

एकदा माझा म्यानेजर, जो कानपूर चा आहे, म्हणाला "मेरी बेटी भी मराठी बोल लेती है लेकिन मै नही सिखता हुं मराठी ". मला माहित होतं तरिही मी त्याला विचारलं - "आपकी बेटीकी उम्र क्या है." तो म्हणाला "६ महिने" तेंव्हा माझ्या मोठ्या मुलीचं वय होतं १० महिने आणि तिची मातृभाषा मराठी असूनही तिला ती बोलता येत नव्हती. खरंतर १ वर्ष पर्यंत बर्याच मुलांना कोणतीच भाषा येत नही. मग जर साहेबांच्या घरी मराठी बोलली जातंच नसेल तर साहेब कन्येला मराठी येते कशी आणि तेही ६ महिन्यनची असताना? असा प्रश्न विचारल्यानंतर साहेब दुसरा विषय घेऊन बोलू लागले. हीच फेकायची सवय बर्याच लोकांना असते, माझ्या म्यानेजर सारखी - आणि त्यांना तिथेच प्रश्न विचारून उताण पाडता येतं आणि मला तर असं करायला लई मज्जा वाटते :)
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Fri, 07/25/2014 - 17:35

Permalink

पूर्वी

'येथे पंचर काढून मिळेल' पाटी पूर्वी अनेकदा दिसायची.'थंड कोल्ड्रिंग येथे मिळेल'पाटी पूर्वी दिसायची.
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Fri, 07/25/2014 - 17:40

In reply to पूर्वी by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

मीसुद्धा 'येथे थंडगार

मीसुद्धा 'येथे थंडगार कोल्ड्रींक मिळेल' अशा पाट्या वाचल्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 07/25/2014 - 20:32

In reply to पूर्वी by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

पँटची चेन.

मी तर पुण्यात 'येथे पँटची चेन लावून मिळेल' असा फलक पाहिला आहे. तेंव्हा सकाळ सकाळ कचेरीत निघालेले अनेक पुरुष तिथे, पँटची चेन लावून घ्यायला, रांगेत उभे असतील असे विनोदी चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. कदाचित त्या शिंप्याला 'पँटला चेन लावून मिळेल' असे म्हणायचे असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Fri, 07/25/2014 - 20:40

In reply to पँटची चेन. by प्रभाकर पेठकर

Permalink

भारीच की..! काय कल्पना!!

भारीच की..! काय कल्पना!! :-))
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com