रोझे और रोटी!
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील अनागोंदी कारभाराला कावलेल्या शिवसेना खासदारांनी राडा केला आणि त्यांच्या न्याय्य आणि उचित मागण्या मागे पडल्या आणि एका सच्चा रोझेदार मुस्लिमाला त्याचा रोजा भंग करायला लावण्याचे महामहामहापाप त्यांच्या डोक्यावर बसले. मूळ समस्या साफ मागे पडली आणि नसते लचांड गळ्यात पडले. आता दादापुता करुन आपण मुस्लिमांचे तारणहार कसे आहोत. सर्व धर्मांचा आपण कसा आदर करतो वगैरे फालतू आणि खोटारडी बडबड शिवसेनेच्या विविध नेत्यांच्या तोंडून ऐकावी लागत आहे.
महाराष्ट्र सदनाच्या प्रशासनाची जबाबदारी असणारा हरामखोर मराठीद्वेष्टा कुणी मलिक नामक महाभाग ज्याच्या पार्श्वावर लाथ मारुन त्याला त्या पदावरुन हाकलून द्यायची गरज आहे तो आता पार विसरला गेला आहे.
शिवसेना आणि तिचे खासदार मूर्ख आहेत असे वाटते. राजकीय मुत्सद्दीपणा जो खासदार माणसाकडे असायला हवा त्याचा पूर्ण अभाव दिसतो आहे. पत्रकार, छायाचित्रकार यांचा गोतावळा घेऊन हे खासदार म. सदनात गेले. हा सूर्य आणि हा जयद्रथ असे पुराव्यानिशी शाबित करण्याची सुवर्णसंधी ह्या खासदारांना मिळाली होती पण राडेबाजीच्या सोसामुळे ह्या संधीची त्यांनी अगदी माती केली. आता भीक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ ह्या पुंगवांवर आली आहे.
असल्या बिनडोक पक्षाबरोबर युती केल्याचा बहुधा भाजपालाही पश्चात्ताप होत असावा. पण आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून मूग गिळून बसण्यापलीकडे ते काही करु शकत नाहीत.
वाचने
14212
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
वाहवत जातात
कशाला असल्या रटाळ विषयावर
In reply to कशाला असल्या रटाळ विषयावर by प्रमोद देर्देकर
दर्दुकाका, विषय रटाळ नाही
नेम चुकला
जिथे तिथे "शिवसेना स्टाईल"
दिल्लीत मराठी माणसे राडा
अवघड आहे
In reply to अवघड आहे by प्रसाद गोडबोले
आंदोलन करण्यात काहिच चूक नाही
In reply to आंदोलन करण्यात काहिच चूक नाही by मृत्युन्जय
+१
In reply to आंदोलन करण्यात काहिच चूक नाही by मृत्युन्जय
+१११११११११११११११११११
In reply to +१११११११११११११११११११ by बॅटमॅन
पूर्वी मराठे युद्धात जिंकून
In reply to +१११११११११११११११११११ by बॅटमॅन
सहमत.
In reply to आंदोलन करण्यात काहिच चूक नाही by मृत्युन्जय
+१.
In reply to आंदोलन करण्यात काहिच चूक नाही by मृत्युन्जय
+१११
In reply to +१११ by मैत्र
बळंच काँस्पिरसी (थोडं तथ्य
In reply to बळंच काँस्पिरसी (थोडं तथ्य by प्यारे१
कॉन्स्पिरसी थेरी सत्य मानली
In reply to बळंच काँस्पिरसी (थोडं तथ्य by प्यारे१
हम्म
In reply to आंदोलन करण्यात काहिच चूक नाही by मृत्युन्जय
फारच रे अपेक्षा तुझ्या
.
In reply to . by पोटे
+१००
नसानसात
लेख
मलिक ची कॉलर पकडण्याची हिंमत आहे का ह्या लो़कांमधे?
धर्मनिरपेक्ष राष्ट्र
महाराष्ट्र सदनात आता अस्सल मराठी जेवण!
In reply to महाराष्ट्र सदनात आता अस्सल मराठी जेवण! by हुप्प्या
सामान्य माणसाला २ वेळच्या
In reply to सामान्य माणसाला २ वेळच्या by शिद
वा वा...चान चान.
In reply to महाराष्ट्र सदनात आता अस्सल मराठी जेवण! by हुप्प्या
सहिये !
भले शाबास !
...
तिकडे
खासदारांना कोल्हापुरी चिकन,
...