ते दोघे टू रॉनीज
सत्तर अंशीच्या दशकातला बीबीसीवरचा कॉमेडी शो, तोही सलग सतरा वर्षे आणि करनारे फक्त दोघे, कमाल आहे ना, कमलाच आहे आणि त्या दोघांनी ही कमाल करुन दाखविली होती. १९७१ ते १९८७ या सतरा वर्षाच्या कालावधीत त्यांनी लोकांना खळखळून हसविले. ते दोघे होते टू रॉनीज, रॉनी बार्कर आणि रॉनी कॉर्बेट. या शोचे मुख्य वैशिष्ट म्हणजे दोघांचे विरुद्ध व्यक्तीमत्व, एक उंच, बऱ्यापैकी अंगात तर दुसरा बुटका, असे व्यक्तिमत्व असल्यावर त्यावर विनोद होनारच He can't think deeper किंवा I am the same person but TVs got wider. टू रॉनीज शोच्या १२ मालिका आणि ९३ एपिसोड झाले.