मिपा दिवाळी अंक २०१९- अनुक्रमणिका

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* हेडिंग */
.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

/* जनरल */
.city a:link {
text-decoration: none;
}
.city li {
border-bottom: 1px solid #ccc;
margin-bottom:10px;
margin-right:10px;
padding-bottom:2px;
}
h1, h2, h3, h4 {font-family: 'Laila', serif;}
p {font-family:'Noto Sans',serif}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
h5:hover {
background-color: #ffd9b3;
text-decoration:none;
}
.majkur {padding:10px;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


रसग्रहण


लेख


कथा


कविता


पाककृती


संकीर्ण

अंकविशेष: रसग्रहण

लेख

कथा

कविता

पाककृती

संकीर्ण

श्रेयनिर्देश: अनुक्रमणिका आणि संपूर्ण अंकातील मोटिफ्स - यशोधरा

function openCity(cityName) {
var i;
var x = document.getElementsByClassName("city");
for (i = 0; i < x.length; i++) {
x[i].style.display = "none";
}
document.getElementById(cityName).style.display = "block";
}

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2019 - 3:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाच्या दिवाळी अंकात नेहमीच प्रयोग करण्यात आले. नवनवीन मिपाकर नेहमीच आगळं वेगळं देण्याचा प्रयत्न करतात. अनुक्रमाणिका अशीच सुंदर आणि हटके झालीय. अनुक्रमाणिका आणि अंकाची उत्तम सजावट करणारे टर्मिनेटर यांचं मन:पूर्वक अभिनंदन. खुपच आवडलं काम. _/\_

-दिलीप बिरुटे

कुमार१'s picture

25 Oct 2019 - 3:15 pm | कुमार१

असेच म्हणतो,
हार्दिक अभिनंदन !

जेम्स वांड's picture

25 Oct 2019 - 3:51 pm | जेम्स वांड

वाढलात होय फराळ! एकच नंबर संयोजन बघा अभ्या, संजुभाऊ, यशोताई, आणि ज्यांची नावे कळली नाही पण अंकात मेहनत घेतली आहे अश्या सगळ्यांचे असंख्य आभार मानतो मी ह्याप्रसंगी.

बाकी साहित्यरत्ने इथं पेश ए खिदमत करणाऱ्या लेखकू मंडळींचे घाऊक कौतुक, प्रत्येक लेख लिहून त्यावर सेपरेट प्रतिक्रिया देईनच, हे फक्त फराळ मिळाल्याचा अत्यानंद व्यक्त करणे झाले.

गुल्लू दादा's picture

25 Oct 2019 - 4:26 pm | गुल्लू दादा

मेहनत दिसून येतेय..... अभिनंदन....सगळा अंक वाचून झाला की सविस्तर प्रतिक्रिया देतो.

स्वाती दिनेश's picture

25 Oct 2019 - 4:46 pm | स्वाती दिनेश

अनुक्रमणिका पाहून उत्सुकता वाढली आहे,
सवडीने अंक वाचतेच.
(ह्यावेळी वैयक्तिक कारणांमुळे लिहायला जमले नाही.. :( )
स्वाती

मुखपृष्ठ भारीच झाले आहे. लेख एक एक वाचतोय.

तुषार काळभोर's picture

25 Oct 2019 - 5:30 pm | तुषार काळभोर

मिपाच्या इतिहासातील सर्वात देखणा दिवाळी अंक!

चॅट्सवूड's picture

25 Oct 2019 - 5:42 pm | चॅट्सवूड

हायला कसलं भारी ए

अनिंद्य's picture

25 Oct 2019 - 6:19 pm | अनिंद्य

अंक देखणा झाला आहे आणि अनुक्रमणिकेवरून वैविध्याचा अंदाज येतो आहे. अनुक्रमणिकेत वापरलेले सहा बहुरंगी मोटिफ्स विशेषच आवडले आहेत.

लेख आता सावकाशीने वाचणार.

अंकासाठी राबणाऱ्या सर्वांचे खूप कौतुक आणि मंगलमय शुभेच्छा !

अनिंद्य

अंकसजावट आवडली. टर्मिनेटर यांचे आभार.
HTML CSS code पाहिला. हे शिकून घेणार. युजर / साईट वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे.

ज्योति अळवणी's picture

25 Oct 2019 - 9:19 pm | ज्योति अळवणी

झक्कास.... नक्की वाचणार

अनुक्रमणिका मस्तच टर्मिनेटरजी

ज्योति अळवणी's picture

25 Oct 2019 - 9:19 pm | ज्योति अळवणी

झक्कास.... नक्की वाचणार

अनुक्रमणिका मस्तच टर्मिनेटरजी

पद्मावति's picture

25 Oct 2019 - 10:15 pm | पद्मावति

टर्मिनेटर, अतिशय सुंदर काम. आधी श्रीगणेश लेखमाला आणि आता दिवाळी अंक...तुमच्यामुळे आपल्या उपक्रमांची शोभा कैकपटीने वाढली आहे. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन.

एमी's picture

25 Oct 2019 - 10:38 pm | एमी

छानेय!

विजुभाऊ's picture

26 Oct 2019 - 12:37 am | विजुभाऊ

३ डायमेन्शनल अंक आहे.
प्रेक्षणीय , वाचनीय आणि श्रवणीय सुद्धा.

@टर्मीनेटर - अरे काय देखणी अनुक्रमणिका आहे! अतिशय निगुतीने आणि सुबकतेने बनवली आहे. सगळेच मोटिफ्स फार सुरेख आणि उत्सवी आहेत - बनवणार्‍याला साष्टांग नमस्कार.

एक विनंती/सुचना आहे - लिन्क्स आणि लेखनाचा रंग एकच असल्यामुळे लेखातल्या माहितीपुर्ण लिन्क्स दिसत/जाणवत नाही आणि त्या अजाणता दुर्लक्षिल्या जातात. लिन्क्सला वेगळा रंग देता येईल का? CSS मधे बदल करून हे सहज जमेल असे वाटते. कृपया हा बदल करावा ही विनंती.

सगळेच मोटिफ्स फार सुरेख आणि उत्सवी आहेत - बनवणार्‍याला साष्टांग नमस्कार.

धन्यवाद :) वर अनिंद्य ह्यांनीही उल्लेख केला आहे, दखल घेतल्याबद्दल अनेक आभार!

श्रेयनिर्देश: अनुक्रमणिका आणि संपूर्ण अंकातील मोटिफ्स - यशोधरा

तुला आता किती वेळा नमस्कार करणार ना?? खरंच फार सुरेख आहे सगळं - मी पाहिलेला आजवरचा सर्वात देखणा अंक. व्यावसायिक अंकही एवढा देखणा होऊ शकत नाही, हे श्रेय तुमच्या टीमच्या labour of love चं आहे. जियो!!!!

अंक आवडल्याचं वाचताना खूप आनंद वाटतो आहे. धन्यवाद.

अंकाच्या रुपड्याबद्दल म्हणशील, तर विशेषतः अंक सजावट ठरवताना आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी टर्मिनेटरनी खूप मदत आणि मुख्य काम केलंय. खूप मजा आली हे काम करताना.

सगळेच मोटिफ्स फार सुरेख आणि उत्सवी आहेत - बनवणार्‍याला साष्टांग नमस्कार.

धन्यवाद :) वर अनिंद्य ह्यांनीही उल्लेख केला आहे, दखल घेतल्याबद्दल अनेक आभार!

टर्मीनेटर's picture

26 Oct 2019 - 2:38 pm | टर्मीनेटर

मनीषजी,
वास्तविक तुमचाच लेख संपादित करत असताना हा मुद्दा माझ्या लक्षात आला, आणि त्या आणि त्या पुढच्या सर्व लेखनातला मजकूर आणि लिंक्स चा रंग वेगळा वेगळा करण्यात आला होता.
त्या आधी संपादित केलेल्या लेखांमध्ये सर्व अक्षरांचा रंग सारखा राहिला असणार, जसे जसे लक्षात येईल तसे आवश्यक तिथे सुधारणा अवश्य करण्यात येईल, तसेच आणखीन काही त्रुटी आढळल्यास निदर्शनास आणून द्याव्या ही विनंती!
प्रतिसाद आणि सूचनेसाठी आभार &#x1F64F;

मला असं दिसतंय - लेखनाचा आणि लिंक्सचा रंग एकच आहे (#333333), लिंक्स चा रंग (#900) कुठेतरी ओव्हरराईड होतोय. माझ्या डीबगर तो स्ट्राईकआउट असा दिसतोय - color: "900",

MiPa links

टर्मीनेटर's picture

26 Oct 2019 - 11:22 pm | टर्मीनेटर

.
कृपया एकदा दुसऱ्या browser मध्ये उघडून बघता का?

मनिष's picture

27 Oct 2019 - 12:24 pm | मनिष

Cache उडवली, झाला ठीक! :-)

टर्मीनेटर's picture

27 Oct 2019 - 1:02 pm | टर्मीनेटर

अभिनंदन !
एकटे तुम्ही सोडून बाकी सर्वांना लिंक्स लाल रंगात दिसत होत्या...अनेकांनी तसे कळविले होते &#x1F600;

पाषाणभेद's picture

26 Oct 2019 - 12:54 pm | पाषाणभेद

मिपाच्या दिवाळी अंकाच्या हाटेलीत काय काय पदार्थ आहेत ते या अनुक्रमणिकेच्या शोकेस मध्ये लावून ठेवले आहेत.
आधाशी वाचक गिर्‍हाईकांच्या तोंपासू नाही तरच नवल.

मला लेख पदार्थांचा दरवळ, सुगंध पदार्थ तयार होत असतांनाच जाणवला होता.

अनुक्रमणिका पाहून एक एक पदार्थांचा आस्वाद घेतो आहे अन प्रतिक्रिया देवून पैसे चुकते करतो आहे.

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार... &#x1F64F;
तमाम मिपाकर लेखक, वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Oct 2019 - 5:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

अत्यन्त देखणा अंक आणि सजावट अनुक्रमणिका पाहूनच मन तृप्त झाले असा फराळ मिळणार असेल तर दिवाळी दर महिन्याला येवो

हा अंक आमच्या पर्यंत पोचवण्या साठी मेहनत घेणार्या सर्वं हातांचे अनेक आभार

पैजारबुवा

नंदन's picture

26 Oct 2019 - 11:50 pm | नंदन

अंक देखणा आणि भरगच्च झालाय - छापील, डिजिटल आणि दृक-श्राव्य अशा विविध माध्यमांचा समन्वय साधणारा. अनुक्रमणिकेत, अनेक जुनी नावं आणि नव्याने लिहिते झालेले लेखक, ह्या दोघांचीही उपस्थिती आनंददायक आहे. आता सवडीने अंक वाचून काढेन.

यशोधरा, अभ्या, टर्मीनेटर आणि अन्य सहभागी सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

जुइ's picture

27 Oct 2019 - 3:46 am | जुइ

या वेळेस दिवाळी अंक जणू काही मौल्यवान रत्नांचा खजिना आहे! अंक सवडीने वाचते आहे. अंकासाठी कष्ट घेणार्‍या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!

प्रचेतस's picture

27 Oct 2019 - 6:42 am | प्रचेतस

काय सुंदर अनुक्रमणिका आहे.
अतीव देखणी.
टर्मिनेटर ह्यांचे मनःपूर्वक आभार.

नाखु's picture

27 Oct 2019 - 8:28 am | नाखु

वाचन

वाचन

पाषाणभेद's picture

27 Oct 2019 - 12:05 pm | पाषाणभेद

फोटोला कॅप्शन हवेचः "भावी आमदार मॅडम मिपाच्या दिवाळी अंकाचे सखोल वाचन करतांना."

:-)

कुठं मिळाला? आम्ही आपले वाट पाहतोय ना....

गड्डा झब्बू's picture

27 Oct 2019 - 10:50 am | गड्डा झब्बू

काल मोबाईल वर अनुक्रमणिका पाहिली, तीच्यावरचे प्रतिसाद वाचले तेव्हा एक प्रश्न पडला की यात एवढे कौतुक करण्यासारखे काय आहे?
आज डेस्कटॉप वर पाहिली तेव्हा प्रश्नाचे उत्तर मिळाले.आपसूक तोंडातून शीळ व एक शब्द बाहेर पडला "स्प्लेंडीड".
मोठ्या पडद्यावर पाहायचा बाहुबली सारखा भव्य चित्रपट मोबाईलच्या छोट्या पडद्यावर वर पाहिल्यसारखा खजील झालो.
कसली सुंदर जमली आहे राव खूप आवडली!!!

सर्वसाक्षी's picture

27 Oct 2019 - 11:56 am | सर्वसाक्षी

अनुक्रमणिका, मुखपृष्ठ, मांडणी सर्वच अप्र्तिम

स्मिताके's picture

27 Oct 2019 - 11:31 pm | स्मिताके

देखणा आणि वाचनीय अंक! संपादक मंडळाने केलेल्या लाजवाब कामगिरीबद्दल अभिनंदन आणि अनेकोनेक आभार. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. अंक पुरवून पुरवून बरेच दिवस वाचणार आहे!

कंजूस's picture

28 Oct 2019 - 1:55 pm | कंजूस

नाsssssही. ज्युसरचे मुठपृष्टवाला दिवाळी अंकच पाहिजे. नाखुचाचांनी काही चालबाजी केलीय. फोटोशॉपकरून तेच चित्र लावा.

यशोधरा's picture

28 Oct 2019 - 2:00 pm | यशोधरा

=))

विजुभाऊ's picture

28 Oct 2019 - 5:27 pm | विजुभाऊ

दिवाळी अंक खूप छान झालाय.
मोबाईलवर वाचलाच पण त्यापेक्षाही लॅपटॉपवर वाचायला मजा येते.
वाचताना अंकाचे डिझाईन एका वेगळ्याच दुनियेत घेवून जाते.

दिवाळी अंक अतिशय देखणा झालाय. कंटेंट, सादरीकरण, विभागवार मांडणी - सगळंच अगदी अप्रतिम ! लोड ही होतोय फार वेळ न घेता. यशो आणि तिच्या पूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन. सगळ्यांना थोड्या उशिराने दिवाळीच्या शुभेच्छा !

मित्रहो's picture

28 Oct 2019 - 9:20 pm | मित्रहो

दिवाळी अंक २०१९ मस्त जमलाय. यावेळेला हे अनुक्रमणिकेचे पान फार आवडले. हेच पान सांगते अंकात अगदी बारीक सारीक गोष्टींची छान दखल घेतली आहे. काही लेख वाचले. काही फक्त बघितले. छान आहेत.

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 12:00 am | मीअपर्णा

अतिशय देखणा अंक. संपादक मंडळींनी मेहनत घेतली आहे. निवांतपणे वाचणार. :)

मला एकंदरित चित्रे दिसत नाहीत. मोबाईल आणि आता लॅपटॉपवरुन सुद्धा.

टर्मीनेटर's picture

29 Oct 2019 - 12:17 pm | टर्मीनेटर

मला एकंदरित चित्रे दिसत नाहीत. मोबाईल आणि आता लॅपटॉपवरुन सुद्धा.

भारता बाहेरून बघत असाल तर असे होण्याची शक्यता आहे! IP address बद्दल प्रत्येक देशाच्या वा काही प्रसंगी राज्यांच्या काहीतरी तिकडम पॉलीसीज असतात. अंकातल्या ९०% इमेजेस https://i.postimg.cc/ ह्या संस्थळावर होस्टेड असून तुमच्या प्रांतात जर सदर संस्थळाचे IP pool ब्लॉक असेल तर तुम्हाला चित्रे नाही दिसणार. अर्थात ही फक्त एक शक्यता झाली! खात्री करून घेण्यासाठी खालील पैकी एखादी proxy site वापरून बघा ही विनंती.

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 9:08 pm | मीअपर्णा

हो भारताबाहेरून पाहतेय. ते वर दिलेले पर्याय वापरून पाहिन.

धन्यवाद टर्मिनेटर :)

मार्गी's picture

30 Oct 2019 - 11:54 am | मार्गी

अ ब ब!!! इतका दिमाखदार अंक!!! इतक्या दिग्गजांचे इतके भन्नाट लेख!!!!! सर्वांना त्रिवार दंडवत!!

आणि संपादक मंडळातील सर्वांचे अभिनंदन! त्यांचे विशेष कौतुक की, इतके दिग्गज असूनही त्यांनी मला लिहायला सांगितलं आणि माझा लेख घेतला. खरोखर कृतज्ञ आहे.

आनंदयात्री's picture

5 Nov 2019 - 6:26 am | आनंदयात्री

अंकाची सजावट अतिशय सुंदर झाली आहे. आवडली!

श्रीरंग_जोशी's picture

20 Nov 2019 - 12:08 am | श्रीरंग_जोशी

मिपावरचा आजवरचा सर्वात देखणा दिवाळी अंक.

टर्मीनेटर यांचे एचटीएमएल, सीएसएस वापरुन केलेले काम पाहून या गोष्टी पुन्हा नव्याने शिकाव्याशा वाटत आहे. मला शिक्षणादरम्यान एचटीएमएल वापरुन विविध प्रयोग करायला खूप आवडत असे. नोकरी लागल्यावर मात्र प्रत्यक्ष कामात ते वापरायला न मिळाल्याने फारशी गती राहिली नाही.

पाषाणभेद's picture

20 Nov 2019 - 7:33 am | पाषाणभेद

उजव्या हाताला दिवाळी अंकाचे जे थंबनेल आहे त्याच्या खाली अनुक्रमणिका शब्द आहे तो हायपरलिंक्ड नाही. तो जो थंबनेल आहे त्यालाही हायपरलिंक केले तर उत्तम. हायपरलिंक अनुक्रमणिकेची द्यावी.
तसेच या लिंकवर http://www.misalpav.com/diwaliank2019 - अनुक्रमणिका वरती आली तर उत्तम. अनुक्रमणिकेचा क्रम खाली गेल्याने वाचनाचे नक्की मार्गदर्शन मिळत नाही.

(तसेच दिवाळी अंकासाठी ऑनलाईन इडीटर बदललेला दिसतो आहे. ल ला ल जोडून येत नाही. भल्लाने कल्ला केल्ला.

योग्य त्या व्यक्तींपर्यंत निरोप पोचवावा हि विनंती.

पाषाणभेद's picture

20 Nov 2019 - 7:34 am | पाषाणभेद

आय माय स्वारी बरंका. भल्ला ने कल्ला केल्ला दिसल्ला आहे. पण टंकन करतांना दिसत नव्हता!!!