Skip to main content

त्रिकाळ

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


त्रिकाळ




प्रत्येक ओळीच्या शेवटचा शब्द पुढच्या ओळीच्या सुरुवातीला घेऊन कवितेतल्या कवितेत अंताक्षरी खेळत ही लालकेशरी फुलांची भेट मिपाकरांसाठी!

लालकेशरी निळ्याजांभळ्या शुभ्र फुलांच्या उठती लाटा लाटांमागून वारा वाहे शेतशिवारी दिसती वाटा वाटांवरती मायमाउली जिच्या शिरी गवताचा भारा भाऱ्याभवती दोर बांधुनी मुलास घेते पाठीवरती पाठ तिची हो पहा वाकली कुणी घेता का गोपाला? गोपाला रे गोपाला चाल जरा रे गोपाला....
*****
लालकेशरी निळ्याजांभळ्या शुभ्र फुलांच्या उठती लाटा लाटांमधुनी पहा प्रियतमे झरा सुखाचा झुळझुळ वाहे .... वाहता वाहता गिरकी घेता खळीच पडते गालावरती गालावरच्या खळीत खुळखुळ नाद जलाचा वाजत राही वाजत वाजत पुन्हा सरकते वाट जलाची धावत जाते धावत निर्झर गहिरा होतो तिथे बसू ये जरा खुशीने...
*****
लालकेशरी निळ्याजांभळ्या शुभ्र फुलांच्या उठती लाटा लाटा उठल्या हसल्या बुडल्या आपल्या वाटे निघून गेल्या गेले आले सर्व घडीचे हसले बसले रंग सावळा विटून गेला गेल्यावरती कुणी न येते, एकट वाटे अता जिवाला जीव आठवे समुद्र सारा विरून गेला जन्म भोगता
भोग भोगतो तोवर मजला नाम घेऊ दे तुझे कृपाळा लालकेशरी निळ्याजांभळ्या शुभ्र फुलांच्या उठोत तेव्हा हजार लाटा....

20191016-122815
अनुक्रमणिका

वाचने 7230
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

काय प्रतिभा आहे. मस्त मस्त.

मांडणी आवडली आहे. असे करायला हिंमत आणि सृजनशीलता लागते,आधि चाल आणि मग त्यात चपखलपणे गाणे बसविण्यात जी लागते तीच नाखु

यशोधरा ताईने यात feed back देऊन संपादक म्हणून मोठेच काम केलेय. सर्व रसिक मिपा करांना दिवाळीच्या शुभेच्छा.