श्रद्धांजली
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिकाश्रद्धांजली

गेल्या वर्षभरात, म्हणजे २०१८च्या साधारण अखेरीपासून ते आतापर्यंत मिपाने आणि मिपाकरांनी तीन मिपाकर बघता बघता कायमचे गमावले. आज २०१९ची दीपावली साजरी करतानाच्या उत्सवाला ह्या दुःखाचीही काळी किनार आहे. लिहिण्याचे, विचार मांडण्याचे स्वातंत्र्य अबाधित असले पाहिजे, संस्थळावरील वातावरण मुक्त असले पाहिजे हे धोरण बाळगून मिसळपावची स्थापना करणारे तात्या अभ्यंकर उर्फ चंद्रशेखर अभ्यंकर एक उमदे, अवलिया व्यक्तिमत्त्व होते. शास्त्रीय संगीत आणि त्यासंबंधित घराणी, गायक, व्यक्तिचित्रे ह्याबरोबरच इतरही खुसखुशीत लेखन करणारे, आवडलेल्या लिखाणाला दिलखुलास प्रतिसाद देणारे, तितक्याच हिरिरीने न पटलेल्या मुद्द्यांवर वाद घालणारे, माणूसवेडे तात्या मिपाच्या सुरुवातीच्या दिवसांत मिपाचा यूसपी होते असे म्हणायला हरकत नाही. त्यांंनी नुसतेच संस्थळ सुरू केले असे नाही, तर अनेक गुणी माणसेही घेऊन आले, त्यांना मिपाकर बनवले, मैत्री केली, मिपापरिवार घडवला, वाढवला. मजरूह सुलतानपुरी ह्यांचा प्रसिद्ध शेर आहे, त्यात किंचित बदल करून म्हणावेसे वाटते की,


.png)
वाचन
14861
प्रतिक्रिया
0