एक पैंजणाचा पाय

Primary tabs

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
एक पैंजणाचा पाय
रुणझुणती चांदणी
गुणगुणती पहाट
पुरवेच्या आभाळास
आता सुर्व्याचीच वाट

नीज सोडून चालली
रात घाबरीघुबरी
वळुनिया पाही मागे
जाग आली दारोदारी

जणू सूर सतारीचे
घुमती चारीठाय
पडे अंगणी सड्याच्या
एक पैंजणाचा पाय


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

सुरेख! पहिल्या कडव्यापासूनच पकड घेणारी कविता.

बरखा's picture

31 Oct 2019 - 11:01 pm | बरखा

आवडली कविता

पद्मावति's picture

31 Oct 2019 - 11:06 pm | पद्मावति

पडे अंगणी सड्याच्या
एक पैंजणाचा पाय
आहा...काय सुरेख!

नाखु's picture

31 Oct 2019 - 11:44 pm | नाखु

दिवाळी निमित्त चांदणे फुलले.

चंदेरी रात्री प्रवासी नाखु

श्वेता२४'s picture

8 Nov 2019 - 5:56 pm | श्वेता२४

छानच आहे कविता

पैलवान's picture

9 Nov 2019 - 1:46 pm | पैलवान

जणू सूर सतारीचे
घुमती चारीठाय
पडे अंगणी सड्याच्या
एक पैंजणाचा पाय

सु.रे.ख.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Nov 2019 - 2:27 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली रे संदीप.
सुरेखच लिहिली आहेस.
पैजारबुवा,