संपादकीय : श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।।

यशोधरा's picture
यशोधरा in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।।

'दिवाळी' येते तीच मुळात हसत, खेळत, नाचत. सभोवताल प्रकाशाने, देदीप्यमान तेजाने उजळून टाकत. सोबतीला असतात गतकाळाच्या दिवाळीच्या आठवणी, वर्तमानकालीन अपेक्षा आणि पुढील वर्ष आनंदात, सुखासमाधात जावं, ह्या आशा आणि इच्छा. दिवाळी म्हटलं की पहाटेची अभ्यंगस्नानं, उटणी, मोती आणि म्हैसूर चंदन साबणाचे सुवास, अत्तरं, फराळ, फटाके, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, नवीन कपडे हे सारं असतंच, त्याचबरोबर दिवाळी अंक घरी आल्याशिवाय बऱ्याच मराठी घरांत ह्या सणाची पूर्तता होत नाही!

महाराष्ट्रदेशी सुदैवाने दर्जेदार दिवाळी अंकांची परंपरा आणि वाचन संस्कृती वर्षानुवर्षं जपली जाते आहे. या अंकांमधून वाचकांना दर्जेदार वाचायला मिळालं आणि मिळतं आहे. अंकानिमित्त्ये प्रतिथयश लेखक मंडळींचं लिखाण वाचायची संधी उपलब्ध तर होतेच, तसंच नवीन लेखकांच्या लिखाणाची तोंडओळख होते. म्हणूनच अजूनही दिवाळी आली की दिवाळी अंकांची वाट बघितली गेल्याशिवाय राहवत नाही. हातात अंक घेऊन, पानं उलटत लिखाण वाचण्यामध्ये आनंद आहेच, तरी आताच्या धावपळीच्या आयुष्यात इतका निवांत वेळ हाताशी नसला तर? पण म्हणून काय झालं? सुदैवाने, हाताच्या बोटांवर आंतरजालाची सोय उपलब्ध झाली आहे ना. हौस आणि आस्था असली की मार्ग सापडतोच, ह्या न्यायाने दिवाळी अंकाचं स्वरूपसुद्धा बदलत डिजिटल होऊ लागलं आहे. कधीकाळी आंतरजाल, संस्थळं हे सारं नावीन्यपूर्ण असलं, तरी बघता बघता आंतरजालाचा आवाका वाढत जाऊन संस्थळं ही समाजातील लक्षणीय अशा वर्गासाठी रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली आहेत. सगळे सण, उत्सवसुद्धा ह्या संस्थळांवर आता सुखेनैव ऑनलाइन साजरे होतात. दिवाळीही त्याला अपवाद नाही.

दिवाळी अंकांसाठीही आता डिजिटल माध्यमाला पसंती मिळू लागली आहे. वाचनीय साहित्य आणि संस्थळ सर्वदूर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ते एक प्रभावी माध्यम ठरतं आहेच, तसंच आवडत्या लेखनाची हवी तेव्हा, सहजरीत्या पुनर्भेट घेणंही ह्या माध्यमामुळे सहज शक्य झालं आहे. पुन्हा ह्या माध्यमात लेखांच्या लांबी-रुंदीची काळजी करण्याचंही कारण उरलेलं नाही!

***

प्रत्येक संस्थळ साहित्य प्रकाशित करताना आपल्या प्रकृतीनुसार, स्वभावधर्मानुसार आपलं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करतं आणि डिजिटल माध्यमाच्या ताकदीचा पुरेपूर उपयोग करून घेत वाचकवर्गाच्या पसंतीनुसार अधिकाधिक उत्तम साहित्य वाचकांपुढे आणायचं सूत्र जपतं. मिपाही त्याला अपवाद नाही. आजवरील वेगवेगळ्या उपक्रमांत आणि उपक्रमांव्यतिरिक्तही मिपावर विविध प्रकारचं उत्तम साहित्य वाचण्यासाठी उपलब्ध झालं आहे आणि असतं. डिजिटल माध्यमाचा फायदा घेत, आता साहित्य खुलवण्यासाठी दृक्-श्राव्य पर्यायाचाही वापर मिपाच्या अंकांत होतो आहे आणि तो मिपाकरांच्या पसंतीसही उतरत आहे.

मात्र, आता ह्या डिजिटल माध्यमाचा यथायोग्य उपयोग करत मिपाने वाचकांना दिलं जाणारं उत्तम 'कंटेंट' आणि राबवले जाणारे उपक्रम ह्यांची यथायोग्य जाहिरातही करायला हवी. नवे चांगले वाचक आकृष्ट करण्यासाठी, जुने निष्ठावान चोखंदळ वाचक थांबवून धरण्यासाठी, उपक्रमांत सर्व सदस्यांचा सहभाग साधण्यासाठी आणि एकुणातच संस्थळाची व्यापक प्रमाणावर दखल घेतली जावी, ह्यासाठी ते आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करून वा त्याविषयी उदासीनता दाखवून चालणारं नाही. होत असलेल्या माध्यमांतराचा यथायोग्य उपयोग करून घ्यायला हवा, नव्याची कास धरायला हवी आणि जुन्याची साथही जपायला हवी.

***

ही साथ जपत, ह्या वर्षी डिजिटल दिवाळी अंक वाचकांपुढे आणतानाच, लेखनाच्या आवाहनाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाची आणि आलेल्या साहित्याची एक आठवण जपण्यासाठी, स्मृतिचिन्ह म्हणून ह्या वर्षीच्या दिवाळी अंकातील निवडक साहित्यासह मिपाचा छापील दिवाळी अंक प्रायोगिक तत्त्वावर प्रकाशित होतो आहे. मिपा हे हा अभिनव उपक्रम राबवणारं पहिलंच संस्थळ असावं. ह्या निर्णयासाठी मिपा प्रशासनाचं मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातही असे नावीन्यपूर्ण आणि मिपा परिवाराचा उत्साह वाढवणारे उपक्रम त्यांनी राबवावेत ह्या हार्दिक शुभेच्छा.

मिपाकरहो, तुम्ही भरभरून दिलेल्या लेखन प्रतिसादामुळे हे शक्य झालं आहे. मिपा ऑनलाइन दिवाळी अंकाची धुरा खांद्यावर घेतेवेळी ह्या उपक्रमाचाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाग असल्याचा मला आणि माझ्या संपादक चमूला अत्यंत मनापासून आनंद आहे!

***

ह्या वर्षी दिवाळी अंकाची तयारी करण्यासाठी गणपती आणि दिवाळी ह्यांमध्ये जेमतेम दीड महिन्याचा अवधी हातात होता. इतक्या कमी वेळेत दिवाळी अंकांची संकल्पना ठरवणं, लेखनासाठी आवाहन तयार करणं, मिपाकर लेखकांना लिहिण्यासाठी आमंत्रित करणं, लेखनासाठी वेळोवेळी त्यांचा पाठपुरावा करणं, अधे मध्ये अंकाची जाहिरात करणं, आलेल्या लिखाणावर संपादन संस्कार करणं, अंक सजवणं आणि अशा अनेक कामांसाठी आपल्या उपलब्ध वेळेतला मोठा वाटा देऊन दिवाळी अंकाच्या निर्मितीत सहभागी झालेल्यांचे मी मनापासून आभार मानते.

त्यांची नावं अकारविल्हे : अभ्या.., आदूबाळ, गवि, जव्हेरगंज, टर्मिनेटर, नीलकांत, पद्मावति, पैलवान, प्रचेतस, प्रशांत, प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, सुधांशुनूलकर, स्नेहांकिता.

दिवाळी अंकासाठी आवर्जून लेखन करणार्‍यांनाही मनापासून धन्यवाद. दिवाळी अंकात लिहिण्याच्या आवाहनाला आणि विनंतीला मान देऊन तुम्ही आपल्या लेखनाने अंकाची शोभा वाढवली आहे. मिपा दिवाळी अंक आणि मिपाचे इतर उपक्रम हे घरचं कार्य समजून दर वर्षी आणि प्रत्येक उपक्रमागणिक हा लोभ असाच वृद्धिंगत होत राहावा आणि आपल्या लिखाणाचा लाभ मिपा व आंतरजालीय वाचकवर्गाला व्हावा.

ह्या सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, वाचकहो, तुमच्याविना कोणत्याच उपक्रमाला काही अर्थ राहणार नाही. तुमच्याकडून सातत्याने मिळणाऱ्या प्रोत्साहनाबद्दल तुमचे अनेक आभार. मिपावर तुमचा लोभ सतत जडलेला राहो.

शेवटी, आम्हा सर्वांतर्फे तुम्हा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना ज्ञानेश्वर माउलींचे सामर्थ्यवान आणि देखणे शब्द उद्धृत करते.

सूर्ये आधिष्ठीली प्राची। जगा जाणीव दे प्रकाशाची।।
तैसी श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।।

एक सूर्यकिरण शलाकाही जशी समर्थपणे सर्वत्र पसरलेला अंधकार भेदून भवताल प्रकाशाने उजळून टाकते, सर्व समष्टीला प्रकाशाची लख्ख जाणीव करून देते, त्याप्रमाणे तुम्हा सर्वांच्या अंतरंगी ज्ञानलालसेची आणि ज्ञानार्चनेची दीपावली सतत तेवती राहो!

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

25 Oct 2019 - 3:08 pm | कुमार१

अप्रतिम अंक !
संपादक व चमूचे अभिनंदन
शुभ दीपावली .

अनिंद्य's picture

25 Oct 2019 - 6:15 pm | अनिंद्य

यशोधरा, अभ्या.., आदूबाळ, गवि, जव्हेरगंज, टर्मिनेटर, नीलकांत, पद्मावति, पैलवान, प्रचेतस, प्रशांत, प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, सुधांशुनूलकर, स्नेहांकिता.

मिपाच्या ह्या देखण्या अंकाचा गोवर्धन आपण सर्वांनी व्यवस्थित तोललाय !

अंक देखणा झाला आहे आणि अनुक्रमणिकेवरून वैविध्याचा अंदाज येतो आहे. आता सावकाशीने वाचणार.

अंकासाठी राबणाऱ्या आपण सर्वांचे खूप कौतुक आणि सणाच्या भरपूर शुभेच्छा.

अनिंद्य

सुंदर अंक. उत्तम संपादकीय. यशोधरा यांची अथक मेहनत आणि टीमचं त्यांना सहकार्य. उत्कृष्ट..

नाखु's picture

25 Oct 2019 - 11:19 pm | नाखु

आणि संपादकीय सुद्धा साजेसे, मुख्य म्हणजे वाचकांची दखल आणि त्यांचेच अभिप्राय दखलपात्र आहेत हे प्रांजळपणे मांडणारे आहे.
जितके वाचक वाढतील तितकेच नवीन आयाम आणि अनुभूती असलेले लेखक निपजतील वाचकांतून आलेला लेखक इतरांच्या लिखाणाची दखल नक्कीच घेइल याची खात्री आहे.
छापील अंक ही सुद्धा नाविन्यपूर्ण संकल्पना आहे.
सर्व ज्ञात अज्ञात सहभागींचे मनपूर्वक अभिनंदन आणि वाचकांच्या तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

वाचकांची पत्रेवाला नाखु

चाणक्य's picture

26 Oct 2019 - 12:01 am | चाणक्य

संपादक चमूचे आभार आणि अभिनंदनही. अंक स्क्रोळला, मस्त वाटतोय. आता निवांत वाचणार.

प्रथम दर्शनीच अंकाने मन जिंकले आहे.
संपादकीय आवडले. आता सर्व अंक वाचून त्यावर प्रतिसाद देईन.
यशोधरा ताई, तुम्हाला आणि सर्व संपादक चमूला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

यशोधरा, अभ्या, आदूबाळ, गवि, जव्हेरगंज, टर्मिनेटर, नीलकांत, पद्मावति, पैलवान, प्रचेतस, प्रशांत, प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, सुधांशुनूलकर, स्नेहांकिता.

तुमचे ढीगभर आभार!!! दृष्ट लागावा असा अंक झालाय - देखणा, भरगच्च आणि दर्जेदार. कितीतरी दिवसांनी रामदास, संजोप राव ह्यांचे लेख दिसतायत. बघुनच मन खुष झाले, चवीचवीने वाचून प्रतिक्रिया देईनच.

दिवाळी अंकांसाठीही आता डिजिटल माध्यमाला पसंती मिळू लागली आहे. वाचनीय साहित्य आणि संस्थळ सर्वदूर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ते एक प्रभावी माध्यम ठरतं आहेच, तसंच आवडत्या लेखनाची हवी तेव्हा, सहजरीत्या पुनर्भेट घेणंही ह्या माध्यमामुळे सहज शक्य झालं आहे. पुन्हा ह्या माध्यमात लेखांच्या लांबी-रुंदीची काळजी करण्याचंही कारण उरलेलं नाही!

ह्याशिवाय मह्त्वाचे म्हणजे दृक-श्राव्य माध्यमही ताकदीने येथे वापरता येते, आणि कित्येक लेखात ते तसे वापरलेही आहे. अगदी मुख्पृष्ठाच्या संतूरीपासूनच मन प्रसन्न झाले. जियो.

पुन्हा एकदा ह्या सगळ्या अंकासाठी मेहनत करणार्‍या चमूचे मनःपुर्वक आभार. __/\__

पाषाणभेद's picture

26 Oct 2019 - 11:56 am | पाषाणभेद

यशोधरा, अभ्या, आदूबाळ, गवि, जव्हेरगंज, टर्मिनेटर, नीलकांत, पद्मावति, पैलवान, प्रचेतस, प्रशांत, प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, सुधांशुनूलकर, स्नेहांकिता या सर्वांचे अभिनंदन. मराठी माणूस- दिवाळी- अन मिपाचा दिवाळी अंक हा तिय्या बरोबर जमला आहे.

हा दिवाळी फराळ दिल्याबद्दल सर्व मिपाव्यवस्थापनाचे आभार.

उत्कृष्ट संपादकीय आणि अत्यंत देखणा अंक.

पद्मावति's picture

28 Oct 2019 - 11:00 pm | पद्मावति

उत्कृष्ट संपादकीय आणि अंकही फार सुरेख जमलाय. संपूर्ण टीमचे आणि मुख्य म्हणजे भरभरून उत्तम लेखन देणाऱ्या मायबाप मिपाकरांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार.
संपादिका यशोधरा, आमच्या कॅप्टन यशोचे खास कौतुक. गेले दोन तीन महिने पाहतेय. आधी श्री गणेश लेखमाला आणि मग दिवाळी अंक- स्वतःच्या हाताला दुखापत झाली असूनही ज्या समर्थपणे तिने हे आव्हान पेललं त्यासाठी सॅल्यूट तिला. अंकाच्या बारीकसारीक डिटेल्सचे सुद्धा तिने व्यवस्थित नियोजन केले आणि अंमलबजावणी केली. यशोचे व्यवस्थापन, नियोजन, वक्तशीरपणा आणि कामाचा उरक यासाठी केवळ आणि केवळ __/\__

बार रेज झाला वगैरे वगैरे वगैरे....

मंडळाचे कौतुक आणि यामधून काम कसं होतं याचा धडाही मिळाला.

जुइ's picture

31 Oct 2019 - 9:23 pm | जुइ

संपादकीय आवडले! या वेळेस अंकात नव्या तसेच जुन्या जाणत्या लेखकांच्या लेखांचा खूप वाचनीय असा मिलाफ झाला आहे. यशोधरातै आणि तुमच्या दिवाळी अंक चमूचे हार्दिक आभार आणि अभिनंदन हा मौल्यवान अंक आम्हाला वाचायला दिल्याबद्दल. अंक सवडीने वाचत प्रतिसाद देते आहे.

सुमो's picture

2 Nov 2019 - 5:39 am | सुमो

उत्तम आणि नेमके संपादकीय.

दीड एक महिन्याच्या कालावधीत इतका देखणा आणि विविध प्रकारच्या साहित्याने नटलेला मिपा दिवाळी अंक २०१९ हा केवळ मिपाच्याच नव्हे तर मराठी अंतर्जालसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल हे नि:संशय.

रावसाहेबांच्या वाक्यात सांगायचे तर "खूsप कष्ट घेतलेत हो"

यासाठी मिपा दिवाळी अंकाच्या संपादिका आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे व सर्व लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन !

मित्रहो's picture

3 Nov 2019 - 9:14 am | मित्रहो

आणि तितकाच सुंदर दिवाळी अंक. उत्तरोत्तर मिपाच्या दिवाळी अंक अधिकाधिक उत्तम होतं आहे. छापील दिवाळी अंकात प्रत्येकाचे ठरलेले लेखक आहेत, काहींचा त्यांचा अजेंडा आहे. अशात अतिशय मेहनत घेऊन बनवलेले मिपासारखे डिजीटल दिवाळी अंक आवडतात. साऱ्या संपादक मंडळाची मेहनत दिसून येते. सर्वांचे मनापासून आभार असाच आनंद देत राहा.

अलकनंदा's picture

19 Nov 2019 - 2:11 pm | अलकनंदा

आज सगळा कविता विभाग वाचून काढला. खूप सुरेख. जमेल तसे अंक वाचतेय, भरपूर आहे वाचायला!

अंकाचे रुपडे देखणे आहे, संपादकीय आवडले.