Skip to main content

मिपा दिवाळी अंक २०१९- अनुक्रमणिका

लेखक टर्मीनेटर यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक  २०१९



अनुक्रमणिका

रसग्रहण
लेख
कथा
कविता
पाककृती
संकीर्ण

अंकविशेष: रसग्रहण


श्रेयनिर्देश: अनुक्रमणिका आणि संपूर्ण अंकातील मोटिफ्स - यशोधरा



वाचने 66597
प्रतिक्रिया 56

प्रतिक्रिया

मिपाच्या दिवाळी अंकात नेहमीच प्रयोग करण्यात आले. नवनवीन मिपाकर नेहमीच आगळं वेगळं देण्याचा प्रयत्न करतात. अनुक्रमाणिका अशीच सुंदर आणि हटके झालीय. अनुक्रमाणिका आणि अंकाची उत्तम सजावट करणारे टर्मिनेटर यांचं मन:पूर्वक अभिनंदन. खुपच आवडलं काम. _/\_ -दिलीप बिरुटे

वाढलात होय फराळ! एकच नंबर संयोजन बघा अभ्या, संजुभाऊ, यशोताई, आणि ज्यांची नावे कळली नाही पण अंकात मेहनत घेतली आहे अश्या सगळ्यांचे असंख्य आभार मानतो मी ह्याप्रसंगी. बाकी साहित्यरत्ने इथं पेश ए खिदमत करणाऱ्या लेखकू मंडळींचे घाऊक कौतुक, प्रत्येक लेख लिहून त्यावर सेपरेट प्रतिक्रिया देईनच, हे फक्त फराळ मिळाल्याचा अत्यानंद व्यक्त करणे झाले.

मेहनत दिसून येतेय..... अभिनंदन....सगळा अंक वाचून झाला की सविस्तर प्रतिक्रिया देतो.

अनुक्रमणिका पाहून उत्सुकता वाढली आहे, सवडीने अंक वाचतेच. (ह्यावेळी वैयक्तिक कारणांमुळे लिहायला जमले नाही.. :( ) स्वाती

मिपाच्या इतिहासातील सर्वात देखणा दिवाळी अंक!

हायला कसलं भारी ए

अंक देखणा झाला आहे आणि अनुक्रमणिकेवरून वैविध्याचा अंदाज येतो आहे. अनुक्रमणिकेत वापरलेले सहा बहुरंगी मोटिफ्स विशेषच आवडले आहेत. लेख आता सावकाशीने वाचणार. अंकासाठी राबणाऱ्या सर्वांचे खूप कौतुक आणि मंगलमय शुभेच्छा ! अनिंद्य

अंकसजावट आवडली. टर्मिनेटर यांचे आभार. HTML CSS code पाहिला. हे शिकून घेणार. युजर / साईट वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे.

टर्मिनेटर, अतिशय सुंदर काम. आधी श्रीगणेश लेखमाला आणि आता दिवाळी अंक...तुमच्यामुळे आपल्या उपक्रमांची शोभा कैकपटीने वाढली आहे. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन.

३ डायमेन्शनल अंक आहे. प्रेक्षणीय , वाचनीय आणि श्रवणीय सुद्धा.

@टर्मीनेटर - अरे काय देखणी अनुक्रमणिका आहे! अतिशय निगुतीने आणि सुबकतेने बनवली आहे. सगळेच मोटिफ्स फार सुरेख आणि उत्सवी आहेत - बनवणार्‍याला साष्टांग नमस्कार. एक विनंती/सुचना आहे - लिन्क्स आणि लेखनाचा रंग एकच असल्यामुळे लेखातल्या माहितीपुर्ण लिन्क्स दिसत/जाणवत नाही आणि त्या अजाणता दुर्लक्षिल्या जातात. लिन्क्सला वेगळा रंग देता येईल का? CSS मधे बदल करून हे सहज जमेल असे वाटते. कृपया हा बदल करावा ही विनंती.

In reply to by मनिष

सगळेच मोटिफ्स फार सुरेख आणि उत्सवी आहेत - बनवणार्‍याला साष्टांग नमस्कार.
धन्यवाद :) वर अनिंद्य ह्यांनीही उल्लेख केला आहे, दखल घेतल्याबद्दल अनेक आभार!

In reply to by यशोधरा

श्रेयनिर्देश: अनुक्रमणिका आणि संपूर्ण अंकातील मोटिफ्स - यशोधरा
तुला आता किती वेळा नमस्कार करणार ना?? खरंच फार सुरेख आहे सगळं - मी पाहिलेला आजवरचा सर्वात देखणा अंक. व्यावसायिक अंकही एवढा देखणा होऊ शकत नाही, हे श्रेय तुमच्या टीमच्या labour of love चं आहे. जियो!!!!

In reply to by मनिष

अंक आवडल्याचं वाचताना खूप आनंद वाटतो आहे. धन्यवाद. अंकाच्या रुपड्याबद्दल म्हणशील, तर विशेषतः अंक सजावट ठरवताना आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी टर्मिनेटरनी खूप मदत आणि मुख्य काम केलंय. खूप मजा आली हे काम करताना.

In reply to by मनिष

सगळेच मोटिफ्स फार सुरेख आणि उत्सवी आहेत - बनवणार्‍याला साष्टांग नमस्कार.
धन्यवाद :) वर अनिंद्य ह्यांनीही उल्लेख केला आहे, दखल घेतल्याबद्दल अनेक आभार!

In reply to by मनिष

मनीषजी, वास्तविक तुमचाच लेख संपादित करत असताना हा मुद्दा माझ्या लक्षात आला, आणि त्या आणि त्या पुढच्या सर्व लेखनातला मजकूर आणि लिंक्स चा रंग वेगळा वेगळा करण्यात आला होता. त्या आधी संपादित केलेल्या लेखांमध्ये सर्व अक्षरांचा रंग सारखा राहिला असणार, जसे जसे लक्षात येईल तसे आवश्यक तिथे सुधारणा अवश्य करण्यात येईल, तसेच आणखीन काही त्रुटी आढळल्यास निदर्शनास आणून द्याव्या ही विनंती! प्रतिसाद आणि सूचनेसाठी आभार 🙏

In reply to by टर्मीनेटर

मला असं दिसतंय - लेखनाचा आणि लिंक्सचा रंग एकच आहे (#333333), लिंक्स चा रंग (#900) कुठेतरी ओव्हरराईड होतोय. माझ्या डीबगर तो स्ट्राईकआउट असा दिसतोय - color: "900", MiPa links

In reply to by मनिष

अभिनंदन ! एकटे तुम्ही सोडून बाकी सर्वांना लिंक्स लाल रंगात दिसत होत्या...अनेकांनी तसे कळविले होते 😀

मिपाच्या दिवाळी अंकाच्या हाटेलीत काय काय पदार्थ आहेत ते या अनुक्रमणिकेच्या शोकेस मध्ये लावून ठेवले आहेत. आधाशी वाचक गिर्‍हाईकांच्या तोंपासू नाही तरच नवल. मला लेख पदार्थांचा दरवळ, सुगंध पदार्थ तयार होत असतांनाच जाणवला होता. अनुक्रमणिका पाहून एक एक पदार्थांचा आस्वाद घेतो आहे अन प्रतिक्रिया देवून पैसे चुकते करतो आहे.

अत्यन्त देखणा अंक आणि सजावट अनुक्रमणिका पाहूनच मन तृप्त झाले असा फराळ मिळणार असेल तर दिवाळी दर महिन्याला येवो हा अंक आमच्या पर्यंत पोचवण्या साठी मेहनत घेणार्या सर्वं हातांचे अनेक आभार पैजारबुवा

अंक देखणा आणि भरगच्च झालाय - छापील, डिजिटल आणि दृक-श्राव्य अशा विविध माध्यमांचा समन्वय साधणारा. अनुक्रमणिकेत, अनेक जुनी नावं आणि नव्याने लिहिते झालेले लेखक, ह्या दोघांचीही उपस्थिती आनंददायक आहे. आता सवडीने अंक वाचून काढेन. यशोधरा, अभ्या, टर्मीनेटर आणि अन्य सहभागी सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

या वेळेस दिवाळी अंक जणू काही मौल्यवान रत्नांचा खजिना आहे! अंक सवडीने वाचते आहे. अंकासाठी कष्ट घेणार्‍या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!

काल मोबाईल वर अनुक्रमणिका पाहिली, तीच्यावरचे प्रतिसाद वाचले तेव्हा एक प्रश्न पडला की यात एवढे कौतुक करण्यासारखे काय आहे? आज डेस्कटॉप वर पाहिली तेव्हा प्रश्नाचे उत्तर मिळाले.आपसूक तोंडातून शीळ व एक शब्द बाहेर पडला "स्प्लेंडीड". मोठ्या पडद्यावर पाहायचा बाहुबली सारखा भव्य चित्रपट मोबाईलच्या छोट्या पडद्यावर वर पाहिल्यसारखा खजील झालो. कसली सुंदर जमली आहे राव खूप आवडली!!!

अनुक्रमणिका, मुखपृष्ठ, मांडणी सर्वच अप्र्तिम

देखणा आणि वाचनीय अंक! संपादक मंडळाने केलेल्या लाजवाब कामगिरीबद्दल अभिनंदन आणि अनेकोनेक आभार. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. अंक पुरवून पुरवून बरेच दिवस वाचणार आहे!

नाsssssही. ज्युसरचे मुठपृष्टवाला दिवाळी अंकच पाहिजे. नाखुचाचांनी काही चालबाजी केलीय. फोटोशॉपकरून तेच चित्र लावा.

दिवाळी अंक खूप छान झालाय. मोबाईलवर वाचलाच पण त्यापेक्षाही लॅपटॉपवर वाचायला मजा येते. वाचताना अंकाचे डिझाईन एका वेगळ्याच दुनियेत घेवून जाते.

दिवाळी अंक अतिशय देखणा झालाय. कंटेंट, सादरीकरण, विभागवार मांडणी - सगळंच अगदी अप्रतिम ! लोड ही होतोय फार वेळ न घेता. यशो आणि तिच्या पूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन. सगळ्यांना थोड्या उशिराने दिवाळीच्या शुभेच्छा !

दिवाळी अंक २०१९ मस्त जमलाय. यावेळेला हे अनुक्रमणिकेचे पान फार आवडले. हेच पान सांगते अंकात अगदी बारीक सारीक गोष्टींची छान दखल घेतली आहे. काही लेख वाचले. काही फक्त बघितले. छान आहेत.

अतिशय देखणा अंक. संपादक मंडळींनी मेहनत घेतली आहे. निवांतपणे वाचणार. :) मला एकंदरित चित्रे दिसत नाहीत. मोबाईल आणि आता लॅपटॉपवरुन सुद्धा.

मला एकंदरित चित्रे दिसत नाहीत. मोबाईल आणि आता लॅपटॉपवरुन सुद्धा.
भारता बाहेरून बघत असाल तर असे होण्याची शक्यता आहे! IP address बद्दल प्रत्येक देशाच्या वा काही प्रसंगी राज्यांच्या काहीतरी तिकडम पॉलीसीज असतात. अंकातल्या ९०% इमेजेस https://i.postimg.cc/ ह्या संस्थळावर होस्टेड असून तुमच्या प्रांतात जर सदर संस्थळाचे IP pool ब्लॉक असेल तर तुम्हाला चित्रे नाही दिसणार. अर्थात ही फक्त एक शक्यता झाली! खात्री करून घेण्यासाठी खालील पैकी एखादी proxy site वापरून बघा ही विनंती.

हो भारताबाहेरून पाहतेय. ते वर दिलेले पर्याय वापरून पाहिन. धन्यवाद टर्मिनेटर :)

अ ब ब!!! इतका दिमाखदार अंक!!! इतक्या दिग्गजांचे इतके भन्नाट लेख!!!!! सर्वांना त्रिवार दंडवत!! आणि संपादक मंडळातील सर्वांचे अभिनंदन! त्यांचे विशेष कौतुक की, इतके दिग्गज असूनही त्यांनी मला लिहायला सांगितलं आणि माझा लेख घेतला. खरोखर कृतज्ञ आहे.

अंकाची सजावट अतिशय सुंदर झाली आहे. आवडली!

मिपावरचा आजवरचा सर्वात देखणा दिवाळी अंक. टर्मीनेटर यांचे एचटीएमएल, सीएसएस वापरुन केलेले काम पाहून या गोष्टी पुन्हा नव्याने शिकाव्याशा वाटत आहे. मला शिक्षणादरम्यान एचटीएमएल वापरुन विविध प्रयोग करायला खूप आवडत असे. नोकरी लागल्यावर मात्र प्रत्यक्ष कामात ते वापरायला न मिळाल्याने फारशी गती राहिली नाही.

उजव्या हाताला दिवाळी अंकाचे जे थंबनेल आहे त्याच्या खाली अनुक्रमणिका शब्द आहे तो हायपरलिंक्ड नाही. तो जो थंबनेल आहे त्यालाही हायपरलिंक केले तर उत्तम. हायपरलिंक अनुक्रमणिकेची द्यावी. तसेच या लिंकवर http://www.misalpav.com/diwaliank2019 - अनुक्रमणिका वरती आली तर उत्तम. अनुक्रमणिकेचा क्रम खाली गेल्याने वाचनाचे नक्की मार्गदर्शन मिळत नाही. (तसेच दिवाळी अंकासाठी ऑनलाईन इडीटर बदललेला दिसतो आहे. ल ला ल जोडून येत नाही. भल्लाने कल्ला केल्ला. योग्य त्या व्यक्तींपर्यंत निरोप पोचवावा हि विनंती.

In reply to by पाषाणभेद

आय माय स्वारी बरंका. भल्ला ने कल्ला केल्ला दिसल्ला आहे. पण टंकन करतांना दिसत नव्हता!!!

टर्मिनेटर आपण एक जबरदस्त - अफलातून दिवाळी अंक सजवलाय . हॅट्स ऑफ !

अभ्या तुम्हाला अभ्या म्हणणं योग्य वाटत नाही मुखपृष्ठ अफलातून ! ...

यशोधराजी , अभ्या , टर्मिनेटर ( आणि जे कोणी दिवाळी अंक निर्मितीमध्ये सहभागी होते ) -------------------------------------------------------------------------------- अंक अतिशय म्हणजे अतिशय सुरेख झाला आहे . आपले मनापासून खूप खूप अभिनंदन ! मनःपूर्वक दाद देतो . चांगले , नावाजलेले दिवाळी अंक सुद्धा आपल्या अंकापुढे मागे पडतील . आणि हे मी मनापासून , जबाबदारीने म्हणतोय . पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !

यशोधराजी अंकात जे मोटिफ्स वापरले आहेत , ते सुरेख आहेत . आणि ते वापरण्याची कल्पनाही भारी !

परत परत वचतोय. आजपर्यंत पाहिलेला सर्वात मस्त दिवाळी अंक