चॉकलेट नारळ बर्फी

Primary tabs

गणपा's picture
गणपा in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
चॉकलेट नारळ बर्फी
साहित्य:
२ कप डेसिकेटेड नारळ.
पाऊण कप पाणी
पाऊण कप साखर
३-४ मोठे चमचे मिल्क पावडर
पाव कप मिल्कमेड
२ लहान चमचे वेलचीपूड
व्हॅनिला इसेन्स
२ चमचे कोको पावडर
सजावटीसाठी पिस्ता चुरा, चांदीचा वर्ख.

कृती:
सर्वप्रथम एका पातेल्यात साखर, पाणी आणि मिल्कमेड टाकून १०-१५ मिनिटं उकळी आणा.

आच मंद करून त्यात इसेन्स टाकून त्यातला अर्धा पाक वेगळ्या भांड्यात काढावा.

एका भांड्यांत अर्धा पाक वेगळा काढून त्यात बाकीचे खोबरं, वेलचीपूड, मिल्क पावडर हे जिन्नस आर्ध्या प्रमाणात टाका.
दुसऱ्या भांड्यांत राहिलेल्या अर्ध्या पाकात कोको पावडर टाकून मग उरलेले जिन्नस टाका.

ही मिश्रणं १० मिनिटं शिजवून घ्या.

एका ताटाला तुपाचं बोट लावून त्यावर वरील मिश्रण कालथ्याने पसरवून घ्या. वरून कोको पावडरवाल्या मिश्रणाचा थर लावा. शेवटी पिस्त्याचा चुरा भुरभुरा. वर्ख लावा आणि गार करत ठेवा.

गार झालं की सुरीला तूप लावून हव्या त्या आकारात वड्या पाडा.

naralbarfi


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2019 - 12:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जीवघेणा फोटो. पाकृ आवडली गणपासेठ.

-दिलीप बिरुटे

गणपा's picture

31 Oct 2019 - 11:48 pm | गणपा

धन्यवाद सर :)

पाकृ आवडली. डेसिकेटेड नारळ म्हणजे तयार सुक्या खोबऱ्याचा चुरा किंवा चव बाजारात मिळतो तसा की ओलं ताजं खोबरं, खवलेलं?

हो, बाजारत मिळतो तोच (सुक्या खोबऱ्याचा) पांढरा शुभ्र चव / चुरा

जुइ's picture

29 Oct 2019 - 2:09 am | जुइ

वड्यांचा फोटो खूप सुंदर आलाय. पाककृती आवडली!

गणपा's picture

31 Oct 2019 - 11:45 pm | गणपा

धन्यवाद :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Oct 2019 - 2:58 am | मिसळलेला काव्यप्रेमी

बर्‍यापैकी सोप्प वाटतय हे.
करुन बघतो
(बिघडले आणि बायको ने हाणला तर तुला बघून घेइन गणपा)

गणपा's picture

31 Oct 2019 - 11:49 pm | गणपा

कंसातलं दिसलचं नाही. ;)

गवि's picture

29 Oct 2019 - 8:55 am | गवि

उत्कृष्ट..

गणपा's picture

31 Oct 2019 - 11:47 pm | गणपा

धन्यवाद :)

छान आणि सोपी रेसिपी. करायला जमेल असे वाटते हे. :)

नक्की करून बघा,अगदीच सोपी आहे.

श्वेता२४'s picture

31 Oct 2019 - 9:47 pm | श्वेता२४

करुन बघते

गणपा's picture

31 Oct 2019 - 11:47 pm | गणपा

धन्यवाद :)

पद्मावति's picture

31 Oct 2019 - 10:37 pm | पद्मावति

छान दिसतेय बर्फी.

गणपा's picture

31 Oct 2019 - 11:46 pm | गणपा

धन्यवाद :)

लगेचच्या लगेच उचलून तोंडात टाकाविशी वाटतेय.

जॉनविक्क's picture

4 Nov 2019 - 2:28 pm | जॉनविक्क

इतकं चॉकोलेट प्रकरण आवडीचे, त्यामुळे पाकृ कातील झाली आहे असे बोलतो :)

खोबरे आणि चॉकलेट हे दोन्ही वीक पॉइंट असल्याने रेसिपी फारच आवडली आहे!
धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

23 Nov 2019 - 9:39 am | मुक्त विहारि

धन्यवाद