खूण

Primary tabs

आरती रानडे's picture
आरती रानडे in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
खूणखूण ओळखीची, दावू कुणा कळेना
माझ्याशिवाय कोणी, माझ्याकडे बघेना

हातातुनी निखळला, आरसा मनीचा
तुकड्यात चेहर्‍याचे प्रतिबिंब सापडेना

घालून भूल गेला, नाद बासरीचा
चकव्यात देह फिरतो, वाट आठवेना

ओठात ओठ रुतता, चढली अशी खुमारी
रात्री किती रमविल्या, शेजेसही स्मरेना

घेऊन प्राण गेला, नाव गाव सुटले
हृदयात साजणाच्या, जागा तरि मिळेना

शेवटास उरली, राख आठवांची
शिणली कुडी जिवाची, जळता परि जळेना


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 1:56 pm | यशोधरा

वा, सगळ्या द्विपदी सुरेख जमल्या आहेत!

अथांग आकाश's picture

27 Oct 2019 - 12:57 am | अथांग आकाश

कविता आवडली!!
0

श्वेता२४'s picture

8 Nov 2019 - 5:43 pm | श्वेता२४

.

अलकनंदा's picture

19 Nov 2019 - 1:51 pm | अलकनंदा

वा! वा!