मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ह्या असल्या पाऊसरात्री

चांदणे संदीप · · दिवाळी अंक

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


ह्या असल्या पाऊसरात्री




ह्या असल्या पाऊसरात्री मी नीज लोटुनी देतो आठवांच्या मऊ उशीला हलकेच कुशीत घेतो
रात्र कशी सरावी? या अवघड प्रश्नामध्ये नाव कागदी सोडून हेलकावे बघत बसतो
प्रौढ जलधारांच्या सुरात चालती गप्पा मी त्यांच्या मैफलीला पहिल्या रांगेत बसतो
किती नाही म्हणावे मी हळवा उगाच होतो तुझे गाणे तुझ्यासाठी माझ्याही नकळत गुणगुणतो

20191016-122815
अनुक्रमणिका

वाचन 2732 प्रतिक्रिया 0