देवदिवाळी

Primary tabs

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
देवदिवाळी
स्थलकालाच्या कणाक्षणातून
तरंग उठतिल मग अखेरचे
सीमेवर असण्या-नसण्याच्या
क्षणभर उमलून मिटेल काही

जाणीव नेणीव कुठली, जेव्हा
कोसळतील द्वैतांच्या भिंती
विश्वद्रव्य लवथवते पुन्हा
निराकार होईल लवलाही

चिरंतनाच्या अवघड वेणा
सोसून हसणारे क्षणभंगुर
उजळत जाईल हलके हलके
विस्कळखाईत विझतानाही


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

अथांग आकाश's picture

25 Oct 2019 - 9:19 pm | अथांग आकाश

वा! छान जमली आहे!
0

हरिहर's picture

26 Oct 2019 - 10:47 am | हरिहर

खुप छान! मस्तच!

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 1:48 pm | यशोधरा

सुरेख!

श्वेता२४'s picture

8 Nov 2019 - 5:44 pm | श्वेता२४

आवडली कविता

जॉनविक्क's picture

10 Nov 2019 - 10:42 am | जॉनविक्क

कलात्मक पध्द्तीने

सोत्रि's picture

10 Nov 2019 - 11:02 am | सोत्रि

>> कलात्मक पध्द्तीने
सहमत!

अतिशय परखड सत्य मांडणारी रचना. सुंदर, अप्रतिम!

- () सोकाजी

सोत्रि's picture

10 Nov 2019 - 11:03 am | सोत्रि

- (घाई करणारा) सोकाजी

:) :) :)

अनन्त्_यात्री's picture

18 Nov 2019 - 5:14 pm | अनन्त्_यात्री

देणार्‍या मिपाकरांना धन्यवाद!

महास्फोटापासून (Big bang)सुरू झालेली विश्वव्यापी दिवाळी महाविलयाच्या (Big crunch) देवदिवाळीपर्यंत चालूच राहील.
शारीरिक अस्तित्वाला क्षणभंगुरपणाची मर्यादा असूनही चिरंतनाचा ध्यास असलेली मानवी प्रज्ञा (अस्तित्वात (?) असलीच तर) महाविलयाच्या क्षणी कोणत्या अनुभवांना सामोरी जाईल याचे एक संभाव्य शब्दचित्र या कवितेत रेखाटण्याचा प्रयत्न केलाय.

निर्मिती ते विलय, ह्या मधल्या क्षणभंगूर प्रवासाला शब्दांत बांधलेय तुम्ही! अफाट जमलंय.