मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिकाआमोद सुनांंसि जालें!

कधीकाळी दिवाळी म्हणजे घरात आठवडा - दहा दिवसभर आधी फराळाच्या निरनिराळ्या पदार्थांचा घमघमाट सुटत असे. हो, खवैय्यांना आमोद सुनांसि जालें, असा साक्षात्कार व्हायची तीच ती घटिका असायची! ती अनुभवता ब्रह्मानंदी टाळी लागायची बाकी! दिवाळीची चाहूल लागायची तीच मुळी घरात फराळ बनवायचा घाट घातला गेला की. आयुष्याला शहरांतूनसुद्धा काहीशी संथ लय होती, श्वास घ्यायला उसंत होती आणि साग्रसंगीतरीत्या चवीचवीने सण साजरे करता येण्याची चैन नशिबात होती.
बघता बघता गेल्या काही वर्षांत बऱ्याच ठिकाणी चित्र बदललं आहे. आयुष्य चांगलंच वेगवान झालंय, जगण्यासाठीची स्पर्धा वाढली आहे, शिक्षण, करिअरसाठी वेळ देत राहणं, आयुष्याची बऱ्यापैकी अपरिहार्यता झाली आहे. हे सगळं वाईट आहे, असं अजिबात नाही. होणारे बदल अधिक आर्थिक सुबत्ता घेऊन येतात, एकूणच रोजच्या जीवनातही अधिक पर्याय घेऊन येतात. काही गोष्टी मागे सोडून द्यायलाही भाग पाडतात. प्रत्येक जीवनशैलीचे बरे-वाईट परिणाम असतातच, त्याला पर्याय नाही. जीवनगाणे गायचं आणि पुढे पुढे चालायचं. तरीही, कधीकधी त्या संथ दिवसांची लय पुन्हा साधावी वाटते. चारी ठाव फराळ घरी करणं काही कारणाने शक्य नसलं, तरी थोडं फार करावं वाटत असेल, तर हा झटपट बनवता येईल, असा लाडूचा प्रकार. माझ्या मैत्रिणीने मला सांगितलेली ही सोपी पाककृती. लागणारा वेळ: २० ते ३० मिनिटं लागणारे जिन्नस: १ वाटी रवा १ वाटी पिवळं धम्मक गूळ किसून १ वाटी ओलं खोबरं किसून वेलदोड्यांची पूड तूप मनुका, बदाम, काजू जरुरीनुसार.
क्रमवार पाककृती: १. एक ते दीड टेबलस्पून तुपात रवा चांगला खरपूस भाजून घ्या. २. भाजून घेतलेला रवा जरा गार व्हायला ठेवा. ३. गार झालेला रवा, ओल्या खोबऱ्याचा कीस आणि किसलेला पिवळाधमक गूळ एका भांड्यात एकत्र करून, ते भांडं कुकरमध्ये ठेवून हे मिश्रण सुकंच १० मिनिटांसाठी वाफवून घ्या. कुकरला शिटी लावायची नाही. हवं तर वेगवेगळ्या भांड्यांत ठेवून वाफवून झाल्यावर हे मिश्रण एकत्र करू शकता. ४. वाफवलेलं मिश्रण बाहेर काढून त्यात वेलदोड्याची पूड घालावी. वाफवलेलं भांडं बाहेर काढलं की खरपूस भाजलेला रवा, वितळलं-न वितळलं असं गूळ आणि वाफवला गेलेला खोबऱ्याचा कीस ह्याचा मंद सुवास नाकात शिरल्याशिवाय राहत नाही! खऱ्या खवैय्याला 'आमोद सुनासि' अनुभूती यायचा हाच तो क्षण! नाक आणि खाद्यपदार्थाचा सुवास एकरूप झाल्याची! नाक हेच सुवास झालेय आणि सुवास हाच नाक झालंय, असा क्षण! एक क्षण डोळे मिटून, समाधानाने दीर्घ श्वास घेऊन तो सुगंध अनुभवायला हरकत नाही, पण अजून लाडू वळून व्हायचेत मंडळी! ५. आता मिश्रण जरा गरम असतानाच लाडू वळायला घ्या. मिश्रण सुकं वाटलं तर थोडं १-२ टीस्पून तूप घालावं. बदाम, काजू ह्यांची भरड पूड घाला, अथवा लाडू वळताना मनुका आणि एकेक काजू/ बदाम लावता येतील.

झाले लाडू. सोपे, साधे आणि झटपट होणारे. साग्रसंगीत लाडू बनवायला वेळ नसेल, तर हे लाडू दिवाळीसाठी नक्की करा! तळटीप : जास्त दिवसांसाठी ठेवायचे असतील तर फ्रीजमध्ये ठेवा.

.png)
वाचने
11742
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
झटपट आणि मस्तं. करून बघणार हे
__/\__
"इस दिवाली पेहले इंडियन फिर ऑईल"
In reply to __/\__ by मायमराठी
संपले का आहेत?
संपले तरी पुन्हा करू की!
In reply to संपले का आहेत? by कंजूस
दोन वर्षांपूर्वी शालेय
सोप्पे आणि झटपट
यम्मी
का बरं फोटो नाही दिसत तुला?
In reply to यम्मी by मीअपर्णा
झटपट!
सर्व वाचक आणि
मस्तच. ...
आमोद सुनासि
जालें. हे पहा,
In reply to आमोद सुनासि by हणमंतअण्णा शंक…
हा हा हा