प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
30 May 2015 - 2:37 pm

लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.
मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला. सिग्नलला थेट मामाशेजारी उभं राहुन त्यांना फोन केला तर ते वल्लींची वाट पाहत रस्त्यावर उभे होते आणि वल्लींनी "अग्दी पाच मिंटात येतो बर्का असं अर्ध्या तासापुर्वी बोलल्याचं शुभवृत्तांत कळला". ;).. तो फोन संपवुन थोडा पुढे जातोय तोपर्यंत Gogglya उर्फ नितीनचा फोन आला. तो अगदी वेळेआधी १५ मिनीटं गणेशतलावापाशी जाउन उभा होता. शिका रे कैतरी नव्या आयडींकडुन. असो. पुढच्या १० मिनिटात मीसुद्धा गणेश तलावापाशी पोचलो. मंडळी कुठेही दिसेनात म्हणुन मी जरा तलावाच्या बाजुच्या रस्त्याला गाडी दिसली तर मुवि त्यांच्या चिरंजीवांच्या गाडीवर बसताना दिसले. त्यांना हात केला. तिथेचं झकासरावही भेटले. त्यांच्याशी बोलत असतानाचं मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो ह्याचा फोन आला. त्याला पत्त्याला लाउन आम्ही बागेकडे जायला निघालो.

(ह्या लोकांनी आणि पहिला राजा ह्या आयडीने बागेबाहेर बराचं उद्योग केल्याचं लक्षात आलं. बागेजवळ बसलेल्या चार टाळक्यांना त्यांनी "मिसळपाव?" असा प्रश्ण टाकला आणि त्या टाळक्यांनी पण "नाssSssSsही, वडापाव" असं उत्तर देउन गार केलं. दोनदा झालं हो असं. शेवटी ती पोरं येईल त्याला वडापाव असा आवाज द्यायला लागली असं ऐकुन आहे. ;) ;) )

मग आम्ही सगळ्यांनी बागेकडे कुच केलं. लांबुनचं बागेच्या पोडियम वर थांबलेले वल्लीबुवा दिसले (वल्लीबुवा-वल्ली आणि बुवा नव्हे). गाड्या लाउन मुविंबरोबर पोडियमवर पोचलो. तिकडे मितान तै, त्रि-----------------वे--------------णी तै (एखादा स्पेस कमी पडला असेल तर माफ करा हो), सौ. मुवि आणि अजुन एक तै होत्या (सॉरी, मला नावं नीट ऐकु आलं नाही. धाग्यामधे अपडेट कराल का? :( ). सौ. मुविंनी चविष्ट चिरोटे देउन सगळ्यांचं स्वागत केलं. इकडे अन-अनाहितामधले वल्ली, नितीन पाटील उर्फ gogglya, नाखु'न'काका, एक्काकाका, चौ.रा.काका, पहिला राजा इ.इ. मंडळींनी स्वागत केलं. नितीननी सगळ्यांना कॅटबर्‍या दिल्या आणि चौराकाकांनी पेढे वाटले. मग ओळखपरेडीचा कार्यक्रम चालु झाला. सगळ्यांची नावं कळली. (त्या एका तैंच नाव नीट ऐकु आलं नाही आणि काहितरी वैचारिक उपद्व्याप करायच्या नादामधे मी विचारायचं राहुन गेलं). तेवढ्यात गणेशा कंपनीला टँजेंट हाणुन कट्ट्याला आले. आणि गप्पा-टप्पांना सुरुवात झाली. हे होतयं न होतय तोपर्यंत आत्मुस बुवांचा (फेमस कथानायकाचे साहित्तीक निर्माते, दिगदर्शक, उत्तम लेखक, फुलराणीप्रेमी, जिलबीसंप्रदायाचे स्थापनकर्ते ई.ई.) फोन आला आणि येतोय असं कळवलं. ते येताहेत हे कळल्यावर मंडळींचे चेहेरे आनंदाने उजळले. =)). कपिलचाही फोन आला.

तेवढ्यात अनाहिताधर्माला जागुन समस्तं तै वर्गानी बागेमधे एंट्री घेउन वेगळा कट्टा चालु केला. =))

थोडा वेळ बाहेर उखाळ्या-पाखाळ्या काढुन, नं आलेल्या आयडींना उचक्या लावण्यामधे मंडळी गुंतली. (अन्या दातार, कालच्या तुला लागलेल्या उचक्यांना संपुर्णपणे नाखुनकाका जबाबदार आहेत रे). दंबुकवाले डॉक का आले नसावेत ह्यावरुन बराचं खल झाला आणि एक्काकाकांनी ते प्रॅक्टीसमधे गुंतलेले असल्याने आले नसावेत असा अंदाज व्यक्त केला. (पेशंट प्रॅक्टिस का टारगेट शुटिंग प्रॅक्टीस ही अंमळ शंका आहे) ;). तेवढ्यात दाढीधारी औरंगजेबाचं सपत्नीक आगमन झालं. त्याच्या पाठोपाठ कपिलही आला. मग सगळ्यांनी बागेमधे कुच केलं. अंधार व्हायला लागलेला होता. मंडळींनी इथे माझी खेचायचा माफक अतिअयशस्वी प्रयत्न करुन पाहिला =)). नाखुनकाकांना चौथा कोनाडा ह्या सखोल आयडीचा फोन आला आणि परत त्यांना आणायसाठी म्हणून आम्ही बागेबाहेर आलो. चौथा कोनाडाही सपत्नीक आलेले होते. एवढी हसत खिदळत चाललेली मंडळी बघुन बागेच्या गार्डांची पाचावर धारण बसली असावी असा अंदाज आहे. सगळेजण सावरकर उद्यानामधल्या धबधबा चौथर्‍यावर जमले. चिरोट्यांचा राउंड टु झाला. तिकडे परत गप्पांचा राउंड टु सुरु झाला. तिकडे जेमतेम १० मिनिट होतायत तोपर्यंत बुवांचा फोन आला. त्यांनाही बागेपाशी बोलावलं. त्यांना घ्यायला म्हणुन मी परत बागेच्या दाराशी गेलो. (अश्या फेर्‍या रोज मारल्या असत्या तर काठीसारखा बारिक झालो असतो. असो).

बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. त्यांना घेउन परत धबधब्यापाशी गेलो. जाता जाता गेल्या चार दिवसात त्यांच्यावर झालेल्या खरडहल्ल्याविषयी माफक चर्चा केली. बुवांनी दुर्लक्ष करणे (उर्फ फाट्यावर मारणे) ह्या हत्याराचे उपयोग समजाउन सांगितले. धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली. बुवा अजुनही फुलराणी कोण हे सांगायला तयार नाहित असं एक निरि़क्षण नोंदवतो. आता उशिर झाल्याने जेवायला जायचा बुट काढला गेला. कुठे जायचं ह्यावरुन चार-सहा हॉटेलांची नावं चावली गेली. शेवटी रसोई से फायनल करुन मंडळी बागेबाहेर यायला निघाली. सिक्युरिटी गार्डाच्या बाहेर पडाच्या शिट्ट्यांना चक्क फाट्यावर मारुन मंडळी रमतगमत बाहेर आली. बाहेर पार्किंग मधे पण परत थोडा वेळ कट्टा रंगला. आणि मंडळी जेवायला रवाना झाली. मी, कपिल आणि नितीन जेवायला जाणार नसल्याने बागेबाहेर आलो. कपिलही गेला. मग नितीनशी थोडा वेळ गप्पा हाणुन आम्ही आपापल्या घराकडे रवाना झालो.

कोणाचा गफलतीनी नामोल्लेख राहिला असेल तर सांगा रे.

(जेवण वृत्तांत लिहा रे कोणीतरी.)

a

डावीकडुन नितीन पाटील (gogglya), इस्पिकचा एक्का, झकासराव, उत्सवमुर्ती मुवि, चौरा, पहिला राजा, वल्ली, नाखु आणि मुवि ज्युनिअर.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Jun 2015 - 8:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अजिबात नाही. शिस्तीत नियम नं तोडता ओव्हरटेक करायची कला अवगत करायची.
बाकी तुम्ही फारचं सरळमार्गी बाबा...८० सी.सी. चा पाठलाग ही वेगळी गोष्ट आहे =)) एक अतिसाहसी खेळ आहे तो. ;)

श्रीरंग_जोशी's picture

1 Jun 2015 - 8:09 pm | श्रीरंग_जोशी

=))

फोटो आणि वर्णन दोन्ही चांगले जमले आहे!

नूतन सावंत's picture

31 May 2015 - 8:50 am | नूतन सावंत

कॅ.जॅ.स्पॅ.;अ.आ;ई.ए.;'चौ.क, यांनी मिळून लिहिलेला मिपाकर आणि अनाहितांची ओळख करवून देणारा वृतांत वाचायला मजा आली.कट्ट्याला हजार राहिल्याचे भाव मनात आले.

श्रीरंग_जोशी's picture

31 May 2015 - 8:59 am | श्रीरंग_जोशी

अहो तै, अनाहिताही मिपाकरच असतात.
तुम्ही बहुधा ते हिंदीतलं सज्जनो और देवियों सारखं इथे लिहिलं असावं.

माझ्यासाठी तरी मिपाकर पहिलेही मिपाकरच अन शेवटीही मिपाकरच :-) .

चौथा कोनाडा यांचा उपवृत्तांत आवडला.

खटपट्या's picture

31 May 2015 - 9:20 am | खटपट्या

अ‍ॅडीशनल उपव्रुत्तांत खूप जबरी !!

प्रचेतस's picture

31 May 2015 - 9:36 am | प्रचेतस

शुक्रवारी हिंजवडीत बरेच ट्रॅफिक जाम झाल्यामुळे घरी पोचायलाच जवळपास ६ वाजले. लगेचच एक्का काकांचा फोन आला की ते तिथे पोहोचले असून टेहळणी करत हिंडत आहेत. लगेचच नाखुनकाकांना फोन केला ते तयारच होते. लगेचच निघालो. वाटेत सारखे फोन वाजत होते पण गाडीवर असल्याने उचलला नाही. वाल्हेकरवाडी कॉर्नरला नाखुनकाकांना घेऊन गणेश तलावापाशी पोहोचलो. चिंचवडमध्ये इतकी वर्ष राहूनही गणेशतलावावर येण्याची पहिलीच वेळ. बंद गेटपाशी पहिला राजा आणि गोगोल्या वाट पाहात उभेच होते. एकाला विचारून एंट्री पॉइंटची माहिती करुन घेतली आणि प्रत्येकी १० रूपड्याचे टिकिट काढून आतमध्ये आलो.
पार्किंगमधूनच व्यासपीठावर एक्काकाका आणि चिंचवडमधलं एक हिरवट म्हातारं उभं होतं. लगेच गप्पांना बहार आली. हळूहळू करुन एकेक मंडळी येऊ लागली. मग बागेत शिरलो. चौथा कोनाडा आले. अभ्याला त्यांच्यांशी बोलायचं असल्याने अभ्याला फोन लावून त्यांची बातचित घडवून दिली. थोड्याच वेळात आत्मूबुवा पोहोचले. सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले व बारश्याच्या घुगर्‍या कधी वाटताय असे कुतूहलपूर्ण प्रश्न विचारले. 'पुढच्याच भागात' इतकेच उच्चारून त्यांनी दु..दु..दुर्लक्ष करुन वेळ मारुन गेली. मग धबधब्यापाशी गप्पांचा फड चांगलाच रंगू लागला. बाग बंद व्हायची वेळ झाल्याने आम्ही बाहेर पडलो. काही मंडळी निरोप घेऊन बाहेर पडली तर बाकी उरलेले सर्व जण रसोईत. मध्येच पैसाताई आणि बिपिनदा फोनद्वारे कट्ट्यास शुभेच्छा देऊन गेले. जेवणे झाल्यावर नादचे पान.

एकंदरीत लै मज्जा आली.

यशोधरा's picture

31 May 2015 - 10:03 am | यशोधरा

दु..दु..दुर्लक्ष >> =))

अत्रुप्त आत्मा's picture

31 May 2015 - 3:49 pm | अत्रुप्त आत्मा

@थोड्याच वेळात आत्मूबुवा पोहोचले. सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले व बारश्याच्या घुगर्‍या कधी वाटताय असे कुतूहलपूर्ण प्रश्न विचारले. 'पुढच्याच भागात' इतकेच उच्चारून त्यांनी दु..दु..दुर्लक्ष करुन वेळ मारुन गेली.>>> हे संपूर्ण खोटा रडे स्वात्मरंजक हत्तीकथन!

.
.
.
.
.
.
.
http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-004.gif

चौथा कोनाडा's picture

31 May 2015 - 6:06 pm | चौथा कोनाडा

पहिल्यांदाच बोलत असुनही अभ्याशी बोलाय लागल्यावर गप्पा इतक्या रंगु लागल्या की आता मुख्य कट्टा बाजूलाच राहिल अन अभ्या-फोन-कट्टाच होऊन जाईल अशी भीती वाटायला लागली. मग अभ्याला “नंतर बोलु” म्हणत मुख्य कट्ट्या कडे वळलो. तो पर्यंत टॉडाहॅमोढा गणेशाने लाघवीपणाने गप्पा मारत आमचा ताबा घेतला तो अगदी शेवटपर्यंत !

जेवणानंतर एक वेगळीच धमाल झाली. नादच्या बाहेर “तांबुलसेवन” कार्यक्रमा अंतर्गत आम्ही मिपाकर पान चघळत असताना एक ज्येष्ठ ललना एकाएकी समोर प्रकट झाली व आमच्या कडे गणेशाची चौकशी करु लागली. एकजात सगळ्यांनी गणेशाकडे बोट दाखवले. यामुळे टॉडाहॅमोढा गणेशा या एरीयातील शेलीब्रेटी असल्याची अम्हा सर्वांची खात्री पटली (कळलं ना, टॉडाहॅमोढा*= टॉल, डार्क हॅण्डसम अन मोकळा-ढाकळा) अन एखादी भारी टीव्ही सिरियल असल्याप्रमाणे सरसावुन पाहु लागलो. गणेशाचा “तो मी नव्हेच” हा पवित्रा पाहुन आम्ही चक्रावलो !

गणेशाने “तो मी नव्हेच, दुसरे कोणीतरी असेल” असे निक्षुन सांगितल्याने ज्येलने नादचा काचेचा दरवाजा ढकलुन काही मिनिटांत गविदादांना बाहेर खेचुन आणले मग ओळख करुन दिल्यावर समजले की ज्येल शोधत असलेला तो गणेश हाच! त्या गविदादांच्या शाळेमधल्या डोंबिवलीकर वर्गभगिनी आहेत अन गवि इथे आल्याने त्यांना शोधत इथवर पोहचल्या आहेत असे लक्षात आले. याच कट्यात गविदादांनी त्यांच्या सोबत दोनचार मिनिटाचा रि-युनियन एक नॅनो-कट्टा उरकुन घेतला हे पाहुन कट्टेक-यांच्या चेह-यावर गविंविषयी कौतुकाचे भाव उमटले.

गणेश-तलाव, गवि-गणेश अन गणेशा या अपुर्व योगायोगाने सारेच धन्य-धन्य झाले !

प्रचेतस's picture

31 May 2015 - 10:58 pm | प्रचेतस

गवि नाय. मुवि...मुवि.

अर्र र्र र्र र्र र्र र्र र्र र्र . . . . . मुवि च्या जागी गवि झालं ?
सॉरी, सॉरी, मुवि च म्हणायचं होतं मला !
(हे दोघे ही विहारी असल्यामुळे अक्षरांनी विहरत चुकीची जागा पकडली असावी काय ? आमी आपले मिपाचे जुने वाचक (वाचनमात्र) असल्यामुळे असे टायपो झाला असावा. सॉरी गवि, महासॉरी मुवि)

(स्वगत: चौको, जरा जपुन बाबा, पहिल्याच कट्टयाच्या उपवृतांतात असल्या "ध" चा "मा" वाली चुक म्हंजे पुढच्या कटट्याला मुविदादा अन गवि दोघांकडुनही फटके खायची शक्यता आहे. वल्लीनं म्हंजे आपल्या चौदाकरानं वेळीच सावध केलंय)

सविता००१'s picture

31 May 2015 - 12:11 pm | सविता००१

खुमासदार वृत्तांत आणि अप्रतिम फोटो

मधुरा देशपांडे's picture

31 May 2015 - 4:11 pm | मधुरा देशपांडे

कट्टा वृत्त्तांत आणि सगळेच उपवृत्तांत, फोटो आवडल्या गेले आहेत.

पैसा's picture

31 May 2015 - 5:28 pm | पैसा

सगळयांचे वृत्तांत आणि फोटो मस्त!

वृत्तांत आणि उपवृत्तांत भारीच !!!

कट्ट्याला मजा आली. कशेळी कट्ट्याला झाल्या होत्या त्यापेक्षा थोड्या जास्त गप्पा झाल्या. अनाहिता अनाहिता म्हणून तुम्ही लोक वेगळं ठेवत असला तरी आम्ही आपलं आधी मिपाकर म्हणून कट्ट्याला हजर असतो हे आजवर लक्षात आले नाही ही जराशी खंत. ते असो.
पुढच्या वेळी मिपाकर आपापल्या कुटुंबासह आले तर अजून मजा येईल. यावेळीही माझी लेक एकटी असल्याने तिच्यासाठी बागेतील खेळण्यांच्या विभागात अनिवार्य उपकट्टा करावा लागला !

बिपिनदा आणि पैसाताईच्या फोनाने बरे वाटले.
श्री त्रिवेणी श्री मितानसोबत ताईची वाट बघत असल्याने नाद ला येता आले नाही याची चुटपुट लागली.
बरं पुढचा कट्टा कधी ठरला म्हणे ?

टवाळ कार्टा's picture

31 May 2015 - 5:54 pm | टवाळ कार्टा

तेवढ्यात अनाहिताधर्माला जागुन समस्तं तै वर्गानी बागेमधे एंट्री घेउन वेगळा कट्टा चालु केला. =))

अनाहिता अनाहिता म्हणून तुम्ही लोक वेगळं ठेवत असला तरी आम्ही आपलं आधी मिपाकर म्हणून कट्ट्याला हजर असतो

कोणावर विश्वास ठेवायचा म्हणतो मी ;)

माझ्या कन्येने तुझी एक ट्यूशन घेतली की माझ्यावरच विश्वास ठेवशील ! ;)
वेगळा कट्टा सुरू केला नसता तर तिने एकेका असामीला पकडून जंगलबुक चा खेळ तिथेच सुरू केला असता ;))

टवाळ कार्टा's picture

31 May 2015 - 6:51 pm | टवाळ कार्टा

माझ्या कन्येने तुझी एक ट्यूशन घेतली की माझ्यावरच विश्वास ठेवशील ! ;) >> आणा की नेक्ष्ट कट्ट्याला :)

वेगळा कट्टा सुरू केला नसता तर तिने एकेका असामीला पकडून जंगलबुक चा खेळ तिथेच सुरू केला असता ;)) >> मग शेरखान कोण झाला अस्ता? ;) (ए...कोण रे तो ***जेब म्हणतोय)

प्रसाद गोडबोले's picture

1 Jun 2015 - 11:37 am | प्रसाद गोडबोले

टक्या ,

आपण कट्ट्याच्या आधीही मिपाकर असतो कट्ट्याच्या मधेही मिपाकर असतो आणि कट्ट्याच्या अंतीही मिपाकरच असतो !

आपल्याला आयडेंटीटी क्रायसीस नाही ;)

एकदा "बैठक" कट्टा करु अन निवांत बोलु ह्या विशयावर !!

टवाळ कार्टा's picture

1 Jun 2015 - 12:00 pm | टवाळ कार्टा

खिक्क...एमेन टू बैठक कट्टा...पावसाळा येतोच आहे

पिलीयन रायडर's picture

31 May 2015 - 7:23 pm | पिलीयन रायडर

हा माझा मिपावरचा (मायक्रो मिनी का होईना) पण पहिलाच कट्टा!
अनाहितांना एक दोनदा भेटले होते पण इतक्या घाऊक प्रमाणात मिपाकरांना पहिल्यांदाच भेटले.

ऑफिसातुन उशीर झाल्याने सावरकर उद्यानात अबीर सकट एंट्री मारायचा प्लान कॅन्सल करावा लागला. पण बहिणी सोबत नेमके भेळ चौकातच यावे लागल्याने किमान रसोई से मध्ये सगळ्यांना तोंड तरी दाखवुन जावे असे वाटले.

रसोई से मध्ये आल्यावर जिकडे जोरजोरात आवाज येत होते तेच मिपाकर हा युनिव्हर्सल ट्रुथ मुळे शोधायला कहीच अडचण झाली नाहि. अनाहितांना एका कोपर्‍याला ठेवुन जणु काही इकडे एक वेगळाच कट्टा चालु अहे असं क्षणभर वाटलं पण अर्थात तसं काही नसावं.

मुवी काका, वल्ली आणि बुवा ह्यांना ओळ्खायला काहीच अडचण आली नाही. गणेशांना ओळखुन एक जादुचा प्रयोग करुन झाला! एक्का काकांना बघताच "हे एक्का काका" असं मी म्हणाले पण नंतर उगाच "नाही बहुदा चौरा असतील" असंही झालं. पण ते एक्का काकाच निघाले. त्यांना भेटुन मनापासुन छान वाटलं. मुवी काका नेहमी प्रमाणेच मस्त बोलले. जसे ते मिपावर कायम प्रसन्न्न असतात तसेच ते प्रत्यक्षातही आहेत!

त्रि ला त र मी आ धी च भे ट ले आ हे. पण मोनुला पहिल्यांदाच भेटले. चौथा कोनाडा ह्यांच्या पत्नीसुद्धा होत्या. सगळ्यांशी बोलायला जमले नाही पण किमान तोंडओळख तरी झाली.

मला फार वेळ नसल्याने २ मिनिटातच निघावं लागलं पण छान वाटलं दोन मिनिटं का होईना हजेरी लावुन. कट्टयाला येणं जमत नाही शक्यतो. पण किमान एकातरी कट्ट्याला आले ह्याचा आनंद झाला. :)

नाखु's picture

1 Jun 2015 - 9:19 am | नाखु

खुमासदार आहेत तरी त्यात प्रगोने केलेली बुवांची " आस्थेवाईक विचारपूस" ही संक्षीप्त आणि अगदी ओझरती आली आहे हे नम्रपणे नमूद करतो. मितान तै आणि उपस्थित मिपाकरांनी श्री यमगर्नीकर साहेबांनी त्यांचे "

हक्काचे

" विषयातील अनुभव सांगावेत असा प्रस्ताव मांडला म्हणून या कट्टेकर्यांच्यावतीने तसेच कोल्हापूर कट्टेकर्यांच्या वतीनेश्री यमगर्नीकरांना ही "जुळी"* विनंती करीत आहे.

"जुळी"* म्हणजे काही कट्टेकरी दोन्ही कट्ट्यांना उपस्थित होते म्हणून बाकी जास्ती अर्थ काढू नयेत असे नाही.

जाता जाता "नाद" हे दुकान माझे आहे असा कोणी गैरसमज करून दिला तरी त्याकडे साफ दुर्लक्ष करणे कारण माझा पानाशी संबध इतकाच बर्‍याचदा कुंपनी तोंडाला पाने पुसलीत आमच्या आणि पानात पडलं ते मुकाट खावा इतकाच आहे.

दोन्हीवाला कट्टेकरी
नाखुस

अनाहीतांचे फोटो खूप कमी हायेत......

झकासराव's picture

1 Jun 2015 - 12:12 pm | झकासराव

कट्ट्याला मजा आली.
बुवा शेलेब्रेटी हायेत.
त्ये आल्यावर सगळ्यांनी जो कल्ला केला, त्याने बागेतील सगळी पाखरे (श्लेष नाहिये हे लक्षात असु द्यावे) झाडे सोडुन उडाली.
ना खु फुल्ल फॉर्म मध्ये बॅटिन्ग करत होते.
चौरा काका सपोर्टला राहुन पण मध्ये मध्ये चान्स मिळेल तसा षटकार हाणत होतेच.
कॅप्टन जॅ़ स्पॅरो खास माहिती देत असताना काका लोकांनी त्याला जास्त चिडवल्याने त्याने जास्त झाडं दाखवली नाहीत. :D
मितानला ४ वर्षांनी भेटलो परत. मिस्टर मितान देखील भेटले.
मुवि वैनींनी आग्रह करुन खाउ घातलेले चिरोटे अप्रतिम होते.
बुवांना पाकिट, पूलिस वै वै शब्द वापरुन पिडायचा प्रयत्न झाला. तसेच त्यांना मान्डी घालुन दुचाकी चालवण्याचा आग्रह झाला पण त्यांनी दुर्लक्ष केले.
वल्ली तिकडे कोरलेल्या मुर्त्या वै नसल्याने थोडासा शांतच होता.
प्रगोने आपली मिश्कील शैलीत ओळख देताच मिसेस प्रगो बर्‍याच हसल्या. त्या नंतर अखंड हसतच राहिल्या असतील अशी धमाल बघुन.
पहिला राजा, एक्का काका , मुवि ह्यांची पर्यटन ह्या विषयावर सविस्तर चर्चा झाली.
जेवायला मी थांबलो नव्हतो, घरी जायची घाई असल्याने, पण असे कट्टे वारंवार होवो आणि त्यात सहभागी व्हायला मिळो.

टवाळ कार्टा's picture

1 Jun 2015 - 12:37 pm | टवाळ कार्टा

१०० झाल्याबद्दल चिमण्याचे एक हेल-मेट देऊन त्याची शंभरी भरवण्याचा सत्कार कर्ण्यात येईल ;)

नाखु's picture

1 Jun 2015 - 12:44 pm | नाखु

"भिऊ नको मी तुझ्यापण पाठीशी आहे हा स्टीकर आवश्यक आहे हि नोंद.

सत्कारार्थी जेपी आणि मित्रपरीवार.

आणी मी तो मिस् केला....

कपिलमुनी's picture

1 Jun 2015 - 2:06 pm | कपिलमुनी

कट्ट्याला हजेरी लावण्यात आली.
सौ . मुविंनी केलेले चिरोटे अप्रतिम होते . त्याची रेसिपी लौकरच टाकावी अशी मुविंना आग्रहाची विनंती !
सर्वांना भेटून मजा आली.

अवांतर : एक्का काकांची लेफ्ट हँड ड्राइव्ह मर्सिडीझ एकदम क्लासिक आहे.

gogglya's picture

5 Jun 2015 - 7:52 pm | gogglya

अगदी. पुढील भेटीत एक चक्कर मारण्याचा विचार आहे!

दोन्ही वृत्तांत वाचून मस्तं मजा आली. फोटोही छान च आहेत. फोटो एक नंबर आणि वर्णन तर दस नंबर---!!!!

पहिला राजा's picture

1 Jun 2015 - 3:00 pm | पहिला राजा

कट्ट्याचे खुशखुशीत वर्णने & फोटोस (आणि comments सुद्धा ) - एकदम झक्कास च ..
MU VI काका - special thanx to you ..
बागेमध्ये फेर फटका चालू असताना - चौरा काकांनी (त्यांच्या वयोमाना नुसार) (हे मी type केले नाहीय, चौ रा काका असे type केल्या वर आपो आप अवतरले ) काही MI PA करांना त्याचे तोच MI PA घेण्यामागचे कारण विचारायला चालू केले (detail मध्ये) , कोणाला कोणाला ते मात्र आता आठवत नाही, ज्यांनी त्यांनी वाटले तर सांगावे ... माझा पण number येणारच होता, so मी मना मधे उत्तर तयार करत होतोच पण सुदैवाने माझा
प(हिला) रा(जा) चा का(वळा) झाला नाही.
असो ..
चौरा काका - next time
जेवण मिस केले ते फोटो बघून जरा जास्तच वाईट वाटले
चि. मुवि माझ्या सारखेच दुर्ग प्रेमी आहेत हे समजून खूप आनंद झाला
कॅप्तैन - काही दाखवले आणि बरेच काही लपवले (झाडे, छुप्या जागा आणि असे अजून बरेच काही) next time दाखवणार हे promise पाळा - काय ते समजले असेलच , सुज्ञास सांगणे न लागे .....
वल्ली = तिकडे सजीव वस्तू (झाडे, पक्षी , ect या प्रकारतील ) असल्या मुळे कि काय जास्त रमला नाही बहुतेक (कॅप्तैन इतका), बाकी लेणी वैगरे असले असते तर बुवा येई पर्यंत त्या वर तरी वल्ली बोलला असता ...

एक्का काकांची लेफ्ट हँड ड्राइव्ह मर्सिडीझ - झक्कास च , त्या मध्ये एखादा कट्टा जमेल का ??

सानिकास्वप्निल's picture

1 Jun 2015 - 3:13 pm | सानिकास्वप्निल

खुमासदार वृत्तांत - उपवृत्तांत व सुरेख फोटो :)
मस्तं वाटले वाचून.

चान चान!! आता शन्वारचा किंवा रविवारचा कट्टा कसा होतो (?) बघू. ;)

अनन्न्या's picture

1 Jun 2015 - 4:39 pm | अनन्न्या

सर्व उपवृत्तांतही! फोटोही छान.

सर्व वृतांत आवडले
मी पहिल्य्नदा गणेश तलाव नंतर बाग, ५:४५ ते ६:१५ असे बागेमध्ये round मारून गेलो. साहजिकच कोणी मिपा कर दृष्टीस पडले नाहीत. पहिलाच कट्टा असल्यामुळे मी पा standard time चा अंदाज नव्हता . असुदे पुढल्या कट्ट्या वेळी एखाद्या जुन्या मिपा कराचा भ्रमण ध्वनी जरूर घेऊन ठेवेन .

sai's picture

9 Jun 2015 - 12:10 pm | sai

छान वृत्तांत ।

सर्वन्ना भेटून छान वाटले
~
प्राची गोडबोले