Skip to main content

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला. सिग्नलला थेट मामाशेजारी उभं राहुन त्यांना फोन केला तर ते वल्लींची वाट पाहत रस्त्यावर उभे होते आणि वल्लींनी "अग्दी पाच मिंटात येतो बर्का असं अर्ध्या तासापुर्वी बोलल्याचं शुभवृत्तांत कळला". ;).. तो फोन संपवुन थोडा पुढे जातोय तोपर्यंत Gogglya उर्फ नितीनचा फोन आला. तो अगदी वेळेआधी १५ मिनीटं गणेशतलावापाशी जाउन उभा होता. शिका रे कैतरी नव्या आयडींकडुन. असो. पुढच्या १० मिनिटात मीसुद्धा गणेश तलावापाशी पोचलो. मंडळी कुठेही दिसेनात म्हणुन मी जरा तलावाच्या बाजुच्या रस्त्याला गाडी दिसली तर मुवि त्यांच्या चिरंजीवांच्या गाडीवर बसताना दिसले. त्यांना हात केला. तिथेचं झकासरावही भेटले. त्यांच्याशी बोलत असतानाचं मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो ह्याचा फोन आला. त्याला पत्त्याला लाउन आम्ही बागेकडे जायला निघालो. (ह्या लोकांनी आणि पहिला राजा ह्या आयडीने बागेबाहेर बराचं उद्योग केल्याचं लक्षात आलं. बागेजवळ बसलेल्या चार टाळक्यांना त्यांनी "मिसळपाव?" असा प्रश्ण टाकला आणि त्या टाळक्यांनी पण "नाssSssSsही, वडापाव" असं उत्तर देउन गार केलं. दोनदा झालं हो असं. शेवटी ती पोरं येईल त्याला वडापाव असा आवाज द्यायला लागली असं ऐकुन आहे. ;) ;) ) मग आम्ही सगळ्यांनी बागेकडे कुच केलं. लांबुनचं बागेच्या पोडियम वर थांबलेले वल्लीबुवा दिसले (वल्लीबुवा-वल्ली आणि बुवा नव्हे). गाड्या लाउन मुविंबरोबर पोडियमवर पोचलो. तिकडे मितान तै, त्रि-----------------वे--------------णी तै (एखादा स्पेस कमी पडला असेल तर माफ करा हो), सौ. मुवि आणि अजुन एक तै होत्या (सॉरी, मला नावं नीट ऐकु आलं नाही. धाग्यामधे अपडेट कराल का? :( ). सौ. मुविंनी चविष्ट चिरोटे देउन सगळ्यांचं स्वागत केलं. इकडे अन-अनाहितामधले वल्ली, नितीन पाटील उर्फ gogglya, नाखु'न'काका, एक्काकाका, चौ.रा.काका, पहिला राजा इ.इ. मंडळींनी स्वागत केलं. नितीननी सगळ्यांना कॅटबर्‍या दिल्या आणि चौराकाकांनी पेढे वाटले. मग ओळखपरेडीचा कार्यक्रम चालु झाला. सगळ्यांची नावं कळली. (त्या एका तैंच नाव नीट ऐकु आलं नाही आणि काहितरी वैचारिक उपद्व्याप करायच्या नादामधे मी विचारायचं राहुन गेलं). तेवढ्यात गणेशा कंपनीला टँजेंट हाणुन कट्ट्याला आले. आणि गप्पा-टप्पांना सुरुवात झाली. हे होतयं न होतय तोपर्यंत आत्मुस बुवांचा (फेमस कथानायकाचे साहित्तीक निर्माते, दिगदर्शक, उत्तम लेखक, फुलराणीप्रेमी, जिलबीसंप्रदायाचे स्थापनकर्ते ई.ई.) फोन आला आणि येतोय असं कळवलं. ते येताहेत हे कळल्यावर मंडळींचे चेहेरे आनंदाने उजळले. =)). कपिलचाही फोन आला. तेवढ्यात अनाहिताधर्माला जागुन समस्तं तै वर्गानी बागेमधे एंट्री घेउन वेगळा कट्टा चालु केला. =)) थोडा वेळ बाहेर उखाळ्या-पाखाळ्या काढुन, नं आलेल्या आयडींना उचक्या लावण्यामधे मंडळी गुंतली. (अन्या दातार, कालच्या तुला लागलेल्या उचक्यांना संपुर्णपणे नाखुनकाका जबाबदार आहेत रे). दंबुकवाले डॉक का आले नसावेत ह्यावरुन बराचं खल झाला आणि एक्काकाकांनी ते प्रॅक्टीसमधे गुंतलेले असल्याने आले नसावेत असा अंदाज व्यक्त केला. (पेशंट प्रॅक्टिस का टारगेट शुटिंग प्रॅक्टीस ही अंमळ शंका आहे) ;). तेवढ्यात दाढीधारी औरंगजेबाचं सपत्नीक आगमन झालं. त्याच्या पाठोपाठ कपिलही आला. मग सगळ्यांनी बागेमधे कुच केलं. अंधार व्हायला लागलेला होता. मंडळींनी इथे माझी खेचायचा माफक अतिअयशस्वी प्रयत्न करुन पाहिला =)). नाखुनकाकांना चौथा कोनाडा ह्या सखोल आयडीचा फोन आला आणि परत त्यांना आणायसाठी म्हणून आम्ही बागेबाहेर आलो. चौथा कोनाडाही सपत्नीक आलेले होते. एवढी हसत खिदळत चाललेली मंडळी बघुन बागेच्या गार्डांची पाचावर धारण बसली असावी असा अंदाज आहे. सगळेजण सावरकर उद्यानामधल्या धबधबा चौथर्‍यावर जमले. चिरोट्यांचा राउंड टु झाला. तिकडे परत गप्पांचा राउंड टु सुरु झाला. तिकडे जेमतेम १० मिनिट होतायत तोपर्यंत बुवांचा फोन आला. त्यांनाही बागेपाशी बोलावलं. त्यांना घ्यायला म्हणुन मी परत बागेच्या दाराशी गेलो. (अश्या फेर्‍या रोज मारल्या असत्या तर काठीसारखा बारिक झालो असतो. असो). बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. त्यांना घेउन परत धबधब्यापाशी गेलो. जाता जाता गेल्या चार दिवसात त्यांच्यावर झालेल्या खरडहल्ल्याविषयी माफक चर्चा केली. बुवांनी दुर्लक्ष करणे (उर्फ फाट्यावर मारणे) ह्या हत्याराचे उपयोग समजाउन सांगितले. धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली. बुवा अजुनही फुलराणी कोण हे सांगायला तयार नाहित असं एक निरि़क्षण नोंदवतो. आता उशिर झाल्याने जेवायला जायचा बुट काढला गेला. कुठे जायचं ह्यावरुन चार-सहा हॉटेलांची नावं चावली गेली. शेवटी रसोई से फायनल करुन मंडळी बागेबाहेर यायला निघाली. सिक्युरिटी गार्डाच्या बाहेर पडाच्या शिट्ट्यांना चक्क फाट्यावर मारुन मंडळी रमतगमत बाहेर आली. बाहेर पार्किंग मधे पण परत थोडा वेळ कट्टा रंगला. आणि मंडळी जेवायला रवाना झाली. मी, कपिल आणि नितीन जेवायला जाणार नसल्याने बागेबाहेर आलो. कपिलही गेला. मग नितीनशी थोडा वेळ गप्पा हाणुन आम्ही आपापल्या घराकडे रवाना झालो. कोणाचा गफलतीनी नामोल्लेख राहिला असेल तर सांगा रे. (जेवण वृत्तांत लिहा रे कोणीतरी.) a डावीकडुन नितीन पाटील (gogglya), इस्पिकचा एक्का, झकासराव, उत्सवमुर्ती मुवि, चौरा, पहिला राजा, वल्ली, नाखु आणि मुवि ज्युनिअर.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 56375
प्रतिक्रिया 127

प्रतिक्रिया

खुपच धमाल कट्टा ! माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले ! रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली. कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच! जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो : 01234 आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले. पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए : 23154 नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण ! 56423 असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच! एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा. वाचक नाखु

In reply to by नाखु

;-))) धन्यु नाखु ! तुमच्या सारखे दिग्गज असताना आमी म्हंजे ३५० सीसी बुलेट पुढे ५० सीसी ढुर्र ल्युना !

In reply to by चौथा कोनाडा

५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अ‍ॅक्सेसरी* होती *इथे औरंगजेब मागतोय तीच

In reply to by टवाळ कार्टा

आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !

In reply to by टवाळ कार्टा

कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्‍यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो. लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.

In reply to by टवाळ कार्टा

टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती. बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!

In reply to by पैसा

शाळेत असताना चढावर असणार्‍या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =)) त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.

In reply to by पैसा

टिव्हिएसची स्कूटी होती का? मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही. लुना व सनी वापरणार्‍यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्‍यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अ‍ॅक्टिवाने तर संपवलाच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अ‍ॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला दुसरी शक्यता वाटली होती. शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.

In reply to by श्रीरंग_जोशी

अजिबात नाही. शिस्तीत नियम नं तोडता ओव्हरटेक करायची कला अवगत करायची. बाकी तुम्ही फारचं सरळमार्गी बाबा...८० सी.सी. चा पाठलाग ही वेगळी गोष्ट आहे =)) एक अतिसाहसी खेळ आहे तो. ;)

कॅ.जॅ.स्पॅ.;अ.आ;ई.ए.;'चौ.क, यांनी मिळून लिहिलेला मिपाकर आणि अनाहितांची ओळख करवून देणारा वृतांत वाचायला मजा आली.कट्ट्याला हजार राहिल्याचे भाव मनात आले.

In reply to by नूतन सावंत

अहो तै, अनाहिताही मिपाकरच असतात. तुम्ही बहुधा ते हिंदीतलं सज्जनो और देवियों सारखं इथे लिहिलं असावं. माझ्यासाठी तरी मिपाकर पहिलेही मिपाकरच अन शेवटीही मिपाकरच :-) . चौथा कोनाडा यांचा उपवृत्तांत आवडला.

शुक्रवारी हिंजवडीत बरेच ट्रॅफिक जाम झाल्यामुळे घरी पोचायलाच जवळपास ६ वाजले. लगेचच एक्का काकांचा फोन आला की ते तिथे पोहोचले असून टेहळणी करत हिंडत आहेत. लगेचच नाखुनकाकांना फोन केला ते तयारच होते. लगेचच निघालो. वाटेत सारखे फोन वाजत होते पण गाडीवर असल्याने उचलला नाही. वाल्हेकरवाडी कॉर्नरला नाखुनकाकांना घेऊन गणेश तलावापाशी पोहोचलो. चिंचवडमध्ये इतकी वर्ष राहूनही गणेशतलावावर येण्याची पहिलीच वेळ. बंद गेटपाशी पहिला राजा आणि गोगोल्या वाट पाहात उभेच होते. एकाला विचारून एंट्री पॉइंटची माहिती करुन घेतली आणि प्रत्येकी १० रूपड्याचे टिकिट काढून आतमध्ये आलो. पार्किंगमधूनच व्यासपीठावर एक्काकाका आणि चिंचवडमधलं एक हिरवट म्हातारं उभं होतं. लगेच गप्पांना बहार आली. हळूहळू करुन एकेक मंडळी येऊ लागली. मग बागेत शिरलो. चौथा कोनाडा आले. अभ्याला त्यांच्यांशी बोलायचं असल्याने अभ्याला फोन लावून त्यांची बातचित घडवून दिली. थोड्याच वेळात आत्मूबुवा पोहोचले. सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले व बारश्याच्या घुगर्‍या कधी वाटताय असे कुतूहलपूर्ण प्रश्न विचारले. 'पुढच्याच भागात' इतकेच उच्चारून त्यांनी दु..दु..दुर्लक्ष करुन वेळ मारुन गेली. मग धबधब्यापाशी गप्पांचा फड चांगलाच रंगू लागला. बाग बंद व्हायची वेळ झाल्याने आम्ही बाहेर पडलो. काही मंडळी निरोप घेऊन बाहेर पडली तर बाकी उरलेले सर्व जण रसोईत. मध्येच पैसाताई आणि बिपिनदा फोनद्वारे कट्ट्यास शुभेच्छा देऊन गेले. जेवणे झाल्यावर नादचे पान. एकंदरीत लै मज्जा आली.

In reply to by प्रचेतस

@थोड्याच वेळात आत्मूबुवा पोहोचले. सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले व बारश्याच्या घुगर्‍या कधी वाटताय असे कुतूहलपूर्ण प्रश्न विचारले. 'पुढच्याच भागात' इतकेच उच्चारून त्यांनी दु..दु..दुर्लक्ष करुन वेळ मारुन गेली.>>> हे संपूर्ण खोटा रडे स्वात्मरंजक हत्तीकथन! . . . . . . . http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-004.gif

In reply to by प्रचेतस

पहिल्यांदाच बोलत असुनही अभ्याशी बोलाय लागल्यावर गप्पा इतक्या रंगु लागल्या की आता मुख्य कट्टा बाजूलाच राहिल अन अभ्या-फोन-कट्टाच होऊन जाईल अशी भीती वाटायला लागली. मग अभ्याला “नंतर बोलु” म्हणत मुख्य कट्ट्या कडे वळलो. तो पर्यंत टॉडाहॅमोढा गणेशाने लाघवीपणाने गप्पा मारत आमचा ताबा घेतला तो अगदी शेवटपर्यंत ! जेवणानंतर एक वेगळीच धमाल झाली. नादच्या बाहेर “तांबुलसेवन” कार्यक्रमा अंतर्गत आम्ही मिपाकर पान चघळत असताना एक ज्येष्ठ ललना एकाएकी समोर प्रकट झाली व आमच्या कडे गणेशाची चौकशी करु लागली. एकजात सगळ्यांनी गणेशाकडे बोट दाखवले. यामुळे टॉडाहॅमोढा गणेशा या एरीयातील शेलीब्रेटी असल्याची अम्हा सर्वांची खात्री पटली (कळलं ना, टॉडाहॅमोढा*= टॉल, डार्क हॅण्डसम अन मोकळा-ढाकळा) अन एखादी भारी टीव्ही सिरियल असल्याप्रमाणे सरसावुन पाहु लागलो. गणेशाचा “तो मी नव्हेच” हा पवित्रा पाहुन आम्ही चक्रावलो ! गणेशाने “तो मी नव्हेच, दुसरे कोणीतरी असेल” असे निक्षुन सांगितल्याने ज्येलने नादचा काचेचा दरवाजा ढकलुन काही मिनिटांत गविदादांना बाहेर खेचुन आणले मग ओळख करुन दिल्यावर समजले की ज्येल शोधत असलेला तो गणेश हाच! त्या गविदादांच्या शाळेमधल्या डोंबिवलीकर वर्गभगिनी आहेत अन गवि इथे आल्याने त्यांना शोधत इथवर पोहचल्या आहेत असे लक्षात आले. याच कट्यात गविदादांनी त्यांच्या सोबत दोनचार मिनिटाचा रि-युनियन एक नॅनो-कट्टा उरकुन घेतला हे पाहुन कट्टेक-यांच्या चेह-यावर गविंविषयी कौतुकाचे भाव उमटले. गणेश-तलाव, गवि-गणेश अन गणेशा या अपुर्व योगायोगाने सारेच धन्य-धन्य झाले !

In reply to by प्रचेतस

अर्र र्र र्र र्र र्र र्र र्र र्र . . . . . मुवि च्या जागी गवि झालं ? सॉरी, सॉरी,

मुवि

च म्हणायचं होतं मला ! (हे दोघे ही विहारी असल्यामुळे अक्षरांनी विहरत चुकीची जागा पकडली असावी काय ? आमी आपले मिपाचे जुने वाचक (वाचनमात्र) असल्यामुळे असे टायपो झाला असावा. सॉरी गवि, महासॉरी मुवि) (स्वगत: चौको, जरा जपुन बाबा, पहिल्याच कट्टयाच्या उपवृतांतात असल्या "ध" चा "मा" वाली चुक म्हंजे पुढच्या कटट्याला मुविदादा अन गवि दोघांकडुनही फटके खायची शक्यता आहे. वल्लीनं म्हंजे आपल्या चौदाकरानं वेळीच सावध केलंय)

खुमासदार वृत्तांत आणि अप्रतिम फोटो

सगळयांचे वृत्तांत आणि फोटो मस्त!

वृत्तांत आणि उपवृत्तांत भारीच !!! कट्ट्याला मजा आली. कशेळी कट्ट्याला झाल्या होत्या त्यापेक्षा थोड्या जास्त गप्पा झाल्या. अनाहिता अनाहिता म्हणून तुम्ही लोक वेगळं ठेवत असला तरी आम्ही आपलं आधी मिपाकर म्हणून कट्ट्याला हजर असतो हे आजवर लक्षात आले नाही ही जराशी खंत. ते असो. पुढच्या वेळी मिपाकर आपापल्या कुटुंबासह आले तर अजून मजा येईल. यावेळीही माझी लेक एकटी असल्याने तिच्यासाठी बागेतील खेळण्यांच्या विभागात अनिवार्य उपकट्टा करावा लागला ! बिपिनदा आणि पैसाताईच्या फोनाने बरे वाटले. श्री त्रिवेणी श्री मितानसोबत ताईची वाट बघत असल्याने नाद ला येता आले नाही याची चुटपुट लागली. बरं पुढचा कट्टा कधी ठरला म्हणे ?

In reply to by मितान

तेवढ्यात अनाहिताधर्माला जागुन समस्तं तै वर्गानी बागेमधे एंट्री घेउन वेगळा कट्टा चालु केला. =))
अनाहिता अनाहिता म्हणून तुम्ही लोक वेगळं ठेवत असला तरी आम्ही आपलं आधी मिपाकर म्हणून कट्ट्याला हजर असतो
कोणावर विश्वास ठेवायचा म्हणतो मी ;)

In reply to by टवाळ कार्टा

माझ्या कन्येने तुझी एक ट्यूशन घेतली की माझ्यावरच विश्वास ठेवशील ! ;) वेगळा कट्टा सुरू केला नसता तर तिने एकेका असामीला पकडून जंगलबुक चा खेळ तिथेच सुरू केला असता ;))

In reply to by मितान

माझ्या कन्येने तुझी एक ट्यूशन घेतली की माझ्यावरच विश्वास ठेवशील ! ;) >> आणा की नेक्ष्ट कट्ट्याला :) वेगळा कट्टा सुरू केला नसता तर तिने एकेका असामीला पकडून जंगलबुक चा खेळ तिथेच सुरू केला असता ;)) >> मग शेरखान कोण झाला अस्ता? ;) (ए...कोण रे तो ***जेब म्हणतोय)

In reply to by टवाळ कार्टा

टक्या , आपण कट्ट्याच्या आधीही मिपाकर असतो कट्ट्याच्या मधेही मिपाकर असतो आणि कट्ट्याच्या अंतीही मिपाकरच असतो ! आपल्याला आयडेंटीटी क्रायसीस नाही ;) एकदा "बैठक" कट्टा करु अन निवांत बोलु ह्या विशयावर !!

हा माझा मिपावरचा (मायक्रो मिनी का होईना) पण पहिलाच कट्टा! अनाहितांना एक दोनदा भेटले होते पण इतक्या घाऊक प्रमाणात मिपाकरांना पहिल्यांदाच भेटले. ऑफिसातुन उशीर झाल्याने सावरकर उद्यानात अबीर सकट एंट्री मारायचा प्लान कॅन्सल करावा लागला. पण बहिणी सोबत नेमके भेळ चौकातच यावे लागल्याने किमान रसोई से मध्ये सगळ्यांना तोंड तरी दाखवुन जावे असे वाटले. रसोई से मध्ये आल्यावर जिकडे जोरजोरात आवाज येत होते तेच मिपाकर हा युनिव्हर्सल ट्रुथ मुळे शोधायला कहीच अडचण झाली नाहि. अनाहितांना एका कोपर्‍याला ठेवुन जणु काही इकडे एक वेगळाच कट्टा चालु अहे असं क्षणभर वाटलं पण अर्थात तसं काही नसावं. मुवी काका, वल्ली आणि बुवा ह्यांना ओळ्खायला काहीच अडचण आली नाही. गणेशांना ओळखुन एक जादुचा प्रयोग करुन झाला! एक्का काकांना बघताच "हे एक्का काका" असं मी म्हणाले पण नंतर उगाच "नाही बहुदा चौरा असतील" असंही झालं. पण ते एक्का काकाच निघाले. त्यांना भेटुन मनापासुन छान वाटलं. मुवी काका नेहमी प्रमाणेच मस्त बोलले. जसे ते मिपावर कायम प्रसन्न्न असतात तसेच ते प्रत्यक्षातही आहेत! त्रि ला त र मी आ धी च भे ट ले आ हे. पण मोनुला पहिल्यांदाच भेटले. चौथा कोनाडा ह्यांच्या पत्नीसुद्धा होत्या. सगळ्यांशी बोलायला जमले नाही पण किमान तोंडओळख तरी झाली. मला फार वेळ नसल्याने २ मिनिटातच निघावं लागलं पण छान वाटलं दोन मिनिटं का होईना हजेरी लावुन. कट्टयाला येणं जमत नाही शक्यतो. पण किमान एकातरी कट्ट्याला आले ह्याचा आनंद झाला. :)

खुमासदार आहेत तरी त्यात प्रगोने केलेली बुवांची " आस्थेवाईक विचारपूस" ही संक्षीप्त आणि अगदी ओझरती आली आहे हे नम्रपणे नमूद करतो. मितान तै आणि उपस्थित मिपाकरांनी श्री यमगर्नीकर साहेबांनी त्यांचे "
हक्काचे
" विषयातील अनुभव सांगावेत असा प्रस्ताव मांडला म्हणून या कट्टेकर्यांच्यावतीने तसेच कोल्हापूर कट्टेकर्यांच्या वतीनेश्री यमगर्नीकरांना ही "जुळी"* विनंती करीत आहे. "जुळी"* म्हणजे काही कट्टेकरी दोन्ही कट्ट्यांना उपस्थित होते म्हणून बाकी जास्ती अर्थ काढू नयेत असे नाही. जाता जाता "नाद" हे दुकान माझे आहे असा कोणी गैरसमज करून दिला तरी त्याकडे साफ दुर्लक्ष करणे कारण माझा पानाशी संबध इतकाच बर्‍याचदा कुंपनी तोंडाला पाने पुसलीत आमच्या आणि पानात पडलं ते मुकाट खावा इतकाच आहे. दोन्हीवाला कट्टेकरी नाखुस

कट्ट्याला मजा आली. बुवा शेलेब्रेटी हायेत. त्ये आल्यावर सगळ्यांनी जो कल्ला केला, त्याने बागेतील सगळी पाखरे (श्लेष नाहिये हे लक्षात असु द्यावे) झाडे सोडुन उडाली. ना खु फुल्ल फॉर्म मध्ये बॅटिन्ग करत होते. चौरा काका सपोर्टला राहुन पण मध्ये मध्ये चान्स मिळेल तसा षटकार हाणत होतेच. कॅप्टन जॅ़ स्पॅरो खास माहिती देत असताना काका लोकांनी त्याला जास्त चिडवल्याने त्याने जास्त झाडं दाखवली नाहीत. :D मितानला ४ वर्षांनी भेटलो परत. मिस्टर मितान देखील भेटले. मुवि वैनींनी आग्रह करुन खाउ घातलेले चिरोटे अप्रतिम होते. बुवांना पाकिट, पूलिस वै वै शब्द वापरुन पिडायचा प्रयत्न झाला. तसेच त्यांना मान्डी घालुन दुचाकी चालवण्याचा आग्रह झाला पण त्यांनी दुर्लक्ष केले. वल्ली तिकडे कोरलेल्या मुर्त्या वै नसल्याने थोडासा शांतच होता. प्रगोने आपली मिश्कील शैलीत ओळख देताच मिसेस प्रगो बर्‍याच हसल्या. त्या नंतर अखंड हसतच राहिल्या असतील अशी धमाल बघुन. पहिला राजा, एक्का काका , मुवि ह्यांची पर्यटन ह्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. जेवायला मी थांबलो नव्हतो, घरी जायची घाई असल्याने, पण असे कट्टे वारंवार होवो आणि त्यात सहभागी व्हायला मिळो.

कट्ट्याला हजेरी लावण्यात आली. सौ . मुविंनी केलेले चिरोटे अप्रतिम होते . त्याची रेसिपी लौकरच टाकावी अशी मुविंना आग्रहाची विनंती ! सर्वांना भेटून मजा आली. अवांतर : एक्का काकांची लेफ्ट हँड ड्राइव्ह मर्सिडीझ एकदम क्लासिक आहे.

In reply to by कपिलमुनी

अगदी. पुढील भेटीत एक चक्कर मारण्याचा विचार आहे!

कट्ट्याचे खुशखुशीत वर्णने & फोटोस (आणि comments सुद्धा ) - एकदम झक्कास च .. MU VI काका - special thanx to you .. बागेमध्ये फेर फटका चालू असताना - चौरा काकांनी (त्यांच्या वयोमाना नुसार) (हे मी type केले नाहीय, चौ रा काका असे type केल्या वर आपो आप अवतरले ) काही MI PA करांना त्याचे तोच MI PA घेण्यामागचे कारण विचारायला चालू केले (detail मध्ये) , कोणाला कोणाला ते मात्र आता आठवत नाही, ज्यांनी त्यांनी वाटले तर सांगावे ... माझा पण number येणारच होता, so मी मना मधे उत्तर तयार करत होतोच पण सुदैवाने माझा प(हिला) रा(जा) चा का(वळा) झाला नाही. असो .. चौरा काका - next time जेवण मिस केले ते फोटो बघून जरा जास्तच वाईट वाटले चि. मुवि माझ्या सारखेच दुर्ग प्रेमी आहेत हे समजून खूप आनंद झाला कॅप्तैन - काही दाखवले आणि बरेच काही लपवले (झाडे, छुप्या जागा आणि असे अजून बरेच काही) next time दाखवणार हे promise पाळा - काय ते समजले असेलच , सुज्ञास सांगणे न लागे ..... वल्ली = तिकडे सजीव वस्तू (झाडे, पक्षी , ect या प्रकारतील ) असल्या मुळे कि काय जास्त रमला नाही बहुतेक (कॅप्तैन इतका), बाकी लेणी वैगरे असले असते तर बुवा येई पर्यंत त्या वर तरी वल्ली बोलला असता ... एक्का काकांची लेफ्ट हँड ड्राइव्ह मर्सिडीझ - झक्कास च , त्या मध्ये एखादा कट्टा जमेल का ??

खुमासदार वृत्तांत - उपवृत्तांत व सुरेख फोटो :) मस्तं वाटले वाचून.

सर्व वृतांत आवडले मी पहिल्य्नदा गणेश तलाव नंतर बाग, ५:४५ ते ६:१५ असे बागेमध्ये round मारून गेलो. साहजिकच कोणी मिपा कर दृष्टीस पडले नाहीत. पहिलाच कट्टा असल्यामुळे मी पा standard time चा अंदाज नव्हता . असुदे पुढल्या कट्ट्या वेळी एखाद्या जुन्या मिपा कराचा भ्रमण ध्वनी जरूर घेऊन ठेवेन .

छान वृत्तांत । सर्वन्ना भेटून छान वाटले ~ प्राची गोडबोले