ज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्र्यलढा
(ढिसक्लेमर: या नाट्यप्रवेशातील सर्व पात्रे, घटना काल्पनीक आहेत. त्या पात्रांचा व घटनांचा कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तींशी संबंध नाही. तत्राप असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
(भुमिका: अर्जून, माया, श्रेया, रिषी, कविता, प्रणव)
अर्जून: काय करावे बरे? हि अजून माया कशी आली नाही ते? छे! कित्ती उशीर? आता १० वाजून गेले अन प्रभात फेरीला सुरूवातही नाही. तिकडे आप्पांच्या उपोषणाला मग पाठिंबा कसा मिळणार? अन सरकार कसे हादरणार?
(अर्जून रंगमंचावर येरझर्या घालतो.)
माया: अर्जून, मी आले बघ.