मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाव्हण्यानं डोळा मारला

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
पाव्हण्यानं डोळा मारला
ह्या पाव्हण्यानं डोळा मारला ग मला जवळ ये आसं म्हनला ग बाजारात बसले मी ग भाजी विकायला समोर आला अन लागला भाव पुसायला हातात घेवून पाही खालीवर जुडी मेथीची दे आसं म्हनला ग मला जवळ ये आसं म्हनला ग आजूबाजूला जमली गर्दी मला ग त्याची नव्हती वर्दी शुक शुक करतोय, हात हालवतोय समोर उभा तो राह्यला ग मला जवळ ये आसं म्हनला ग नजर माझी गिर्‍हाईकांवर नव्हती काही त्याच्यावर हात घालूनी खिशातमधी नोटा त्यानं काढल्या ग मला जवळ ये आसं म्हनला ग वागणं त्याचं वंगाळ नव्हतं समजलं मला काय खरं ते व्हतं चष्मा नाही डोळ्याला म्हनला आज घरी तो राहीला ग मला जवळ ये आसं म्हनला ग - पाषाणभेद (दगडफोड्या) २६/०९/२०११

वाचने 1210 वाचनखूण प्रतिक्रिया 1

प्रकाश१११ 27/09/2011 - 04:22
पाषाण भेदा -शाब्बास .लई भारी आजूबाजूला जमली गर्दी मला ग त्याची नव्हती वर्दी शुक शुक करतोय, हात हालवतोय समोर उभा तो राह्यला ग मला जवळ ये आसं म्हनला ग