Skip to main content

विनोद

परिक्षा

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 14/04/2026 16:40 या दिवशी प्रकाशित केले.

गणपत वाणी आयुष्यभर दहा बाय आठ खोपटातल्या काउंटरमागे बसून उदबत्तीच्या काड्यांनी दात कोरत राहिला. ‘आयुष्यभर’ असे तो नुसता म्हणायचा. कारण पुर्वी याशिवाय आपले दुसरे एखादे आयुष्य होते हे त्याला दात कोरतांना एकदाही आठवले नव्हते. यापुढच्या काळात आपले दुसरे एखादे आयुष्य असेल हेदेखील त्याला दात कोरतांना पटले नसते. म्हणजेच उदबत्तीच्या काड्यांनी दात कोरणे एवढेच त्याचे एकमेव माफक आयुष्य होते. या माफक आयुष्यात त्याला एकाच कठीण परीक्षेला सतत सामोरे जावे लागत होते. त्याची काही तक्रारदेखील नव्हती. दातात अडकून बसलेला खाद्याचा एखादा हट्टी कण उदबत्तीच्या काड्यांनी उचकटवून काढणे हीच ती परीक्षा.

बाई माझी कंबर लचकली..

लेखक आजी यांनी बुधवार, 18/02/2026 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
हेलनसारखा नाच मी करु शकत नाही. अगदी जयश्री गडकर सारखाही नाही. पण तिच्यासारखं न नाचूनही मध्यंतरी माझी कंबर लचकली. दुखायला लागली. मी व्हाटस् ॲप वर लग्गेच ते सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना कळवलं. मग लगेच सूचना सुरू झाल्या "चोळ,शेक,अमुक पेन किलर घे. तमकं क्रीम लाव. पडून राहा. विश्रांती घे." काहीजणांनी विचारपूस केली. "काही जड वस्तू उचललीस का? फार वेळ खाली वाकून काही केर पोछाचं काम केलंस का?" (ही असली कामं सुनेला करायला सांगत जा."असा सल्लाही काहीजणांनी दिला.) "गार फरशीवर खूप वेळ बसलीस का?" "कमरेचे व्यायाम जास्त वेळ केलेस का?" (नशीब,कुणी झुम्बा डान्स केलास का?

उर्जा चक्र

लेखक निनाद यांनी मंगळवार, 20/01/2026 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व रसिकांचे आणि फॅन्स चे कविता करावी या आग्रहासाठी अनेक आभार! खूप काळापासून माझी कविता ओव्हरड्यु होती हे मी मान्य करतो.

~ गंध धुंद ~

लेखक किल्लेदार यांनी गुरुवार, 06/11/2025 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
कोणे एके काळी विमानतळावर ड्युटी फ्री शॉप दिसलं की दारू गोळा करणे ही एक “ड्युटी” मानून, मी ती अगदी निष्ठेनं पार पाडत असे. नाकासमोर चालण्याचा स्वभाव, नाकाला इतर कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू न देता नेमक्या दुकानात घेऊन जाई. हव्या त्या बाटल्या मिळाल्या की त्या ड्युटी मधून एकदाचं फ्री झाल्यासारखं वाटायचं. जरा वेळापूर्वी मुक्त असलेले दोनही कर, करमुक्त दुकानातून घेतलेल्या जड बाटल्या सावरण्यात गुंतले की इतर जाणिवा मुक्त होत ज्यात सर्वत्र दरवळणाऱ्या सुगंधाचीही एक असे.

बालक पालक

लेखक देवू यांनी शुक्रवार, 03/10/2025 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या घरातील गप्पा, शेजारच्या छोट्या गोष्टी, रस्त्यावर घडलेली एखादी घटना— यात किती मजेशीर किस्से दडलेले असतात, नाही का? या छोट्याशा प्रसंगात विनोदही असतो, शिकवणही असते आणि जीवन हलकंफुलकं करण्याची ताकदही असते. असेच काही लहान मुलांचे निरागस किस्से. पिझ्झा घराचा दरवाजा वाजला म्हणून आईने दरवाजा उघडला. शेजारची अंकिता, पाच वर्षाची चुणचुणीत मुलगी, पाठीवर दफ्तर घेऊन दारात उभी. अंकिता : आंटी मम्मी येईपर्यंत तुमच्याकडे बसू का? आई : ये, आत बस.

इतिहास्यास्पद (३) स्वातंत्र्यदिनाचा व्याप (की ताप?)

लेखक कुमार जावडेकर यांनी बुधवार, 20/08/2025 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १: इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना भाग २: इतिहास्यास्पद (२) स्वातंत्र्यदिनाची तयारी भाग ३: इतिहास्यास्पद (३) स्वातंत्र्यदिनाचा व्याप (की ताप?) पुरेसे प्रतिनिधी मिळाल्यावर कार्यक्रमाच्या तयारीसाठी गांधीजींनी सगळ्या व्याख्यात्यांची 'गोलमेज' परिषद आयोजित केली. मात्र यमसभेत मेज नसल्यामुळे ती नुसतीच 'गोल' परिषद झाली. त्यातून ‘परिषद’ ह्या शब्दाचा ज्या पक्षाशी संबंध असतो त्या पक्षाशी गांधीजींचा संबंध नसल्यामुळे त्यातून त्यांना मिळाला तो फक्त ‘गोल’! गांधीजींचा ‘ओन गोल’...

इतिहास्यास्पद (२) स्वातंत्र्यदिनाची तयारी

लेखक कुमार जावडेकर यांनी मंगळवार, 12/08/2025 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १: स्वातंत्र्यदिनाची कल्पना इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना भाग २: स्वातंत्र्यदिनाची तयारी स्वातंत्र्यदिन म्हणजे काय हे समजावण्यापासून जिथे तयारी आहे तिथे हे खायचं काम नव्हतं. पण यमदेवांना त्यावरही उपाय सुचला. त्यांनी गांधीजींवर ही जबाबदारी सोपवली.

इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना

लेखक कुमार जावडेकर यांनी सोमवार, 04/08/2025 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
समजा, मैफिलीची सुरुवात भीमसेन, तानसेन, मेहदी हसन, आमिर खुसरो आणि सुधीर फडके यांनी ‘यमन रागाचे प्रकार’ गाऊन केली तर? आमचा कार्यक्रम संस्मरणीय असण्याचं हे कारण होतं. त्याला खास उपस्थिती होती. नाही तर ‘स्वातंत्र्यदिन’ या विषयावर कार्यक्रम करणं यात आता नवलाई राहिली नाहीये. अगदी तो परदेशात साजरा झाला तरी त्यात विशेष असं काही वाटत नाही आजकाल. पण हे स्थळ अनोळखी होतं. उर्वरित जगाला (म्हणजे आम्ही उपस्थित आणि ‘यम टी.व्ही.’ दर्शकांव्यतिरिक्त कुणाला) हे कळणार नव्हतं. असे उपक्रम कुठे योजले जातात ते आता सांगणं आवश्यक आहे. आमच्याकडे तीन महादरवाजे आहेत. एकावर ‘स्वर्ग’ असं लिहिलंय. दुसऱ्यावर ‘नरक’.

सृष्टीआड दृष्टी

लेखक कुमार जावडेकर यांनी सोमवार, 16/06/2025 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुलाखत: “नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली. “पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले. “हा आपला विनय आहे.

(ढू आय डी)

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 11/05/2025 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
हे काव्य म्या अल्पमतीने केवळ मनोरंजन म्हणून खरडले आहे.. वेळोवेळी धारातिर्थी पडलेल्या आय डीं शीं याचा बादरायण संबध जोडू नये,जोडल्यास कवी जबाबदार नाही.