Skip to main content

विनोद

विनोद — मराठी विनोदी लेखन, किस्से आणि हास्यकथांचा संग्रह. हसवणारे मराठी विनोद व गमती येथे वाचा.

एक अजरामर पाककृती.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 05/05/2011 10:33 या दिवशी प्रकाशित केले.

लेखांचा खीमा-पाव

साहीत्य :
१) मिपावरील कुठलाही लेख ज्यात सावरकर, टिळक, आंबेडकर, यशवंतराव, पु.ल.देशपांडे, इत्यादि....('तात्यासाहेब', 'बळवंतराव' भीमराव, 'भाईकाका, इ.) अशा माणसांची किमान तीन किंवा जास्त वेळा नावे आलेला लेख. हे या पदार्थाचे प्रमूख साहित्य आहे. हे नसेल तर किमान एखाद्याने चांगल्या भावनेने लोकांना चांगले वाचायला मिळावे या भावनेने टाकलेला लेख. यात जर इतिहास डोकावत असल्यास हा पदार्थ अत्यंत रुचकर होतो असा अनुभव आहे.

टक्कल

लेखक utkarsh shah यांनी सोमवार, 02/05/2011 08:57 या दिवशी प्रकाशित केले.

त्याचं काय झालं....

(असा सुरुवात केल्याने सगळे लक्ष देऊन ऐकतात अस अनुभव आणि बहुधा पु. ल. देशपांडेनी पण सांगितलाय... असो.)

परवा दिवशी PMT स्टॉपवर उभा होतो. सगळ्या PMT कचरा भरल्यासारखे वाहत होत्या... कोणतीच बस आमच्या स्टॉपवर थांबत नव्हती. रिक्षावाले इतके पैसे मागत होते की त्यात अजुन थोडे पैसे टाकले असते तर एक नेनो आली असती.तर तिथे आमचे एक काका भेटले.काका म्हणजे शेजारी राहत होते. बरेच दुखी आणि कष्टी दिसत होते.मी विचारले ,"काका, काय झाले कसल्या चिंतेत आहात?"

सरुटॉबाने कट्टा - एक सुरुवात

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 19/04/2011 00:13 या दिवशी प्रकाशित केले.

१७ एप्रिल,रात्रीचे साडेसात वाजलेले, पुण्याच्या हद्दीबाहेर थोड्याश्या सुनसान रस्त्याच्या बाजुला एका मोठ्या इमारतीसमोर दोन धिप्पाड तरुण थोड्याश्या अंधारात उभे. समोरुन एक गाडी येते, कर्र्र्र्र्र ब्रेक दाबुन बंद पडते, एक दोन वेळा सुरु होते पुन्हा बंद पडते, त्या दोन्ही तरुणांच्या चेह-यावर हसु येतं, त्यांचे हात खिशात जातात, पुढ्च्याच क्षणी बाहेर येतात, तेवढ्यात गाडी पुढं जाते, त्या तरुणांचे हात पुन्हा खिशात. ते परत अंधारात सरकतात.

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.

मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित.

(चालः चल री सजनी अब क्या सोचे)

लिही रे भावा तू अपुल्या मनचे
डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे
लिही रे...

टाकून खरडी भिक्षा मागणे
जमवून कंपू गोंधळ घालणे
असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे
लिही रे...

असेलही तुझी लेखणी धमाल
करिती इथले सगळेचि लाल
स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे
लिही रे...

लिहीले जरी तू ओतुनि तनमन
गेले जरी पुढच्या पानी ते पटकन
दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे
लिही रे...

कोण होतास तू... कोण होतीस तू

लेखक नीलांबरी यांनी शनिवार, 16/04/2011 08:32 या दिवशी प्रकाशित केले.

सकाळी साडेपाच वाजता कोणाचातरी गजर मोठ्ठ्यानं किंचाळत असतो. अपार्टमेंटमधे रहायचं म्हणजे हा एक त्रासच. भिंती फार मजबूत नसल्या की आजूबाजूचे सगळे आवाज कसे अंगावर धावून येतात. गजराचा मालक आता बंद करेल, मग बंद करेल म्हणून मी पांघरूण कानापर्यंत ओढून घेते. पण गजर अविरत ओरडतच राहतो. थोड्याच वेळात माझ्या लक्षात येतं की हा गजराचा आवाज माझ्याच उशाजवळून येतोय...

कॉमनसेंस आणि पालीचं पिल्लू

लेखक विनीत संखे यांनी गुरुवार, 14/04/2011 09:46 या दिवशी प्रकाशित केले.

कधीकधी साधासुधासा विचार करणं आणि तसं वागणं आपल्या हातात नसतं. म्हणतात नं "कॉमनसेंस इज अ सेंस विच इज नॉट सो कॉमन!". मुळातच लग्न झाल्यावर आणि पोरं बाळं आल्यावर कॉमनसेंस वापरणे दुर्मिळ होत जाते हे आपण सर्वच खाजगीत मानतो. अर्थातच मुलांचा अभ्यास घेताना एखाद दुसऱ्यावेळेस हा सेंस कामी येत असेलही, पण त्याबाबतीत पालकांपेक्षा मुलंच जास्त सरस ठरत असतात हेही तितकेच खरे.

(एका अपरिमेयाचे मुक्तसुनीत)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 13/04/2011 22:51 या दिवशी प्रकाशित केले.

साक्षात 'पाय' वर कविता करणार्‍या आमच्या घासू गुर्जींचे पाय पकडून! ;)
:०()8=

(वर्तुळ)

मी पहिल्यांदा हा आकारबंध
वस्रपटलांच्यामध्ये केला स्थानबद्ध
केव्हापासून जागलिये खाद्यपिसासा

मुक्ततुंदिलरेखी वलयरेषेपलिकडे
खाद्यकणग्राही रसनापटापलिकडे
घडले असे गारुड

निशा'चर' जगतात शीतकपाटाच्या
दारापल्याड मुक्त केकावलीचा
दिसलाय भरलेला आवाका

आवाक्याबरोबरच विस्तारलं एक
जिव्हालौल्यसाधक दोंदाकारप्रसारक
तुमानवेधी "शून्य"

त्याच्या क्रीमगर्भरोलांचा
नीलबेरीसामायिक पेस्ट्रीचा
तो तनःचक्षुसाक्षात्कारच

फोरिनची पाटलीण

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 13/04/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.

एक तृप्तीचा ढेकर देउन शंकरराव पाटावरुन उठले आणि ओसरीवर येउन बसले. आता एकेक करत मंडळी येतील आणि दुपारचा चहा होइस्तोवर पंचायतीची कामं उरकुन घेता येतील असा शंकररावांचा कयास होता. शंकररावांकडे तशी गावची पाटीलकी पिढीजात होती त्यात सरपंचपद पण त्यांच्याकडेच होते. त्यामुळे ते गावात आब राखुन होते. वर्षाकाठी एकदा पालकमंत्री, शिक्षणमंत्री गावच्या शाळेला भेट देउन जातील याकडे ते जातीने लक्ष घालत त्यामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये पण त्यांचा वट होता.

मुन्नी बदनाम- एक रसग्रहण

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 12/04/2011 17:38 या दिवशी प्रकाशित केले.

मुलांनो, आज आपला रसग्रहणासाठीची कविता आहे 'मुन्नी बदनाम हुई' काही चहाटळ लोक तिला आयटम साँग देखील म्हणतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करु. म्हणतात ना हाथी चले अपनी चाल....

तर थोडी माहिती.
गीत- मुन्नी बदनाम हुई'
चित्रपट - दबंग्ग
संगीत - ललित सेन ( जतिन ललित मधला)

हे पद्य मुख्यत्वे सलमान खान, मलायका (इतर उच्चारही आहेत) अरोरा खान आणि सोनू सूद यांवर चित्रित केले गेलेले असून इतर वडापाव( नीट वाचावे) वालेही कवायत करताना दिसतात.

मुख्य तेवढ्याच मुद्द्यांचे रसग्रहण करण्याचा आपण प्रयत्न करुया. आपल्याला चमच्याने भरवणे (२१) अपेक्षित नाही.

काव्यरस

गंध कुणाचा!

लेखक नीधप यांनी रविवार, 10/04/2011 09:36 या दिवशी प्रकाशित केले.

जुनाच लेख परत एकदा...
------------------------------------------------------------
वोल्वो बसेस चा प्रवास आणि सुगंधाचे भयानक नाते असते. यालाच 'भीषॉन शुंदॉर' म्हणत असावेत.