काय गुण सांगू माझ्या सालीचे
लेखनविषय:
काय गुण सांगू माझ्या सालीचे
माझ्या सालीचे काय गुण सांगू माझ्या सालीचे
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||धृ||
ती घरात येते तर एकदम जसे चक्रीवादळ येते
भाऊजी भाऊजी म्हणत ती माझ्या मागे फिरत असते
नटते थटते लाजत मुरडते
मी जरा बोललो तर लाजून आखडते
भरल्या घरात शोभतात का तिला हे असले धंदे?
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||१||
एकदा मी ऑफीसातून घरी लवकर गेलो
ती एकटीच घरी असल्याने चिंतेत पडलो
तेव्हढ्यात तिने विचारले भाऊजी इकडे जरा येणार का?
कॉलेजच्या नाटकातला प्रेमाचा सीन समजून देणार का?
तुम्हीच सांगा ती नाकाने सोलत असते का कांदे
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||२||
खर्चाच्या बाबतीत तिचा हात कोणी नाही धरणार
माझा खिसा खाली करण्यात तिचा असतो हातभार
लाडीगोडीनं ती नेहमी हॉटेलात जायचे म्हणणार
सिनेमा पाहण्यात तर ती पहिला नंबर घेणार
बायकोला म्हणते "मला वाढदिवसाला पैठणी घेवून दे"
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||३||
कुणालातरी ती प्रेमपत्र लिहीते
मायन्यात मात्र प्रिय मलाच म्हणते
बायकोसमोरच हे सारे घडते
म्हणूनच माझ्या संसाराची काळजी वाटते
विचारल्यावर 'त्याचे' नाव सच्याच आहे हे ती सांगे
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||४||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०१/०९/२०११
वाचने
2168
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
साली आधी घरवाली!!
असो, तुमचे बहुरुप्याचे खेळ बरे असतात!
हे हे हे हे (मकरंद अनासपुरे इष्टाईलमध्ये)
आवांतर : कल्जि घेने. सालीवरून पाय घसरल्यानं आपगात व्हतान.
( काल्जिवाहू मिपामि ) नरेश.
मला वाटलं शेंगदाण्यांच्या सालीचे गुण सांगितले आहेत.
आधी घरवाली