Skip to main content

विनोद

गुणी बाळ

लेखक मीन यांनी बुधवार, 30/12/2015 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज जरा उशिराच जाग आली. अरे बापरे ! ८ वाजले. मी कधीच इतक्या उशिरापर्यन्त झोपून रहात नाही. कारण मी गुणी बाळ आहे. आजकाल मी स्वतः आपल्या हातने ब्रश करतो, स्वतःचं सगळं आवरतो. आईला किती कौतुक वाटतं माझं! माझी खोली आवरणं, कपाट आवरणं, बाहेर जाताना माझ्या सगळ्या गोष्टी घेणं हे आता खरं तर स्वतःचं स्वतः करण्याइतका मोठा झालोय मी. पण आईला ते पटतच नाही. खरच मोठा झालोय मी आता. असो. पटापट आवरुन खाली नाश्त्याला जावं; नाहीतर तो भरवायला कोणीतरी वरती माझ्या खोलीत यायचं. आमचा गोतावळा खूप मोठा. घरात माणसंच माणसं. आई, काकू, काका, मावशी, आत्या अगदी सगळेच्या सगळे. पण कोणालाच मी मोठा झालोय हे पटत नाही.

‪‎मी उत्सवला जातो‬ (भाग ४)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 29/12/2015 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ ____________________________________________________________________________________ खाण्याच्या स्टॉल्सच्या ठिकाणी सगळीकडे फिरत आधी काय काय आहे त्याची चाचपणी केली. वेगवेगळे स्टॉल छान सजले होते. कुठे महाराष्ट्रीयन, कुठे चायनीज, कुठे राजस्थानी, कुठे मालवणी, कुठे पाव भाजी, कुठे दाबेली, कुठे चाट, तर कुठे काय अशी सगळी चंगळ होती. मी डाएट वर असल्याचे माझ्या ध्यानात होतं. म्हणून पहिला मोर्चा फळांच्या स्टॉलकडे वळवला. एक मोठा बाउल भरून फळांचे काप घेतले आणि ते खाण्यासाठी दिलेले लाकडी दातकोरणे फेकून सरळ हाताने खाऊ लागलो. कुणाला टोचून बोलणे मला अजून जमत नाही मग टोचून खाणे काय जमणार. म्हणून पाचही बोटांनी फळांना गुदगुल्या करत मोठ्या मजेने रसास्वाद घेऊ लागलो.

‪मी उत्सवला जातो‬ (भाग 3)

लेखक Anand More यांनी सोमवार, 28/12/2015 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ ____________________________________________________________________________________ हिने पंचनामा करणाऱ्या हवालदाराच्या आणि निवाडा करणाऱ्या न्यायाधीशाच्या एकत्रित अविर्भावात माझी खरेदी बघितली. तिळाचे तेल घरात होते आणि मी सूट आहे म्हणून घेतलेले तेल तिच्या नेहमीच्या दुकानदारापेक्षा महाग होते. मी उगाच स्टॉलवाल्याकडे रिफील पॅक नव्हता, जास्त बाटल्या नंतर साठवणीला कामाला येतील वगैरे युक्तिवाद करून पाहिले. त्यावर तिने मी प्रत्येक बाटली चाळीस रुपये जास्त देऊन घेतली आहे असा हिशोब लावून दाखवला. मी उसनं अवसान आणून तिला, "तू कोळसा घोटाळ्यासारखे आकडे फुगवून सांगतेस," असे कायच्या काय बोललो.

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

लेखक DEADPOOL यांनी रविवार, 27/12/2015 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १

मी उत्सवला जातो (भाग २)

लेखक Anand More यांनी रविवार, 27/12/2015 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ____________________________________________________________________________________ मुले बागडत होती. सासू सासरे आणि आई खूष दिसत होते आणि हिच्या चेहऱ्यावरचा आनंद काय वर्णावा. सकाळी रेडिओवर ऐकलेले "आनंद पोटात माझ्या माईना" हे दत्त भक्तीगीत हिला उत्सवच्या गेटसमोर उभे करून तर अनाम कवीने लिहिले नसावे ना? अशी एक पुसटशी शंका माझ्या मनाला चाटून गेली. त्यांच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून मला देखील आनंदाचे भरते येत असताना मुलांनी मला गेटकडे खेचले आणि तिथल्या सहाय्यकाने, "तिकडून आत जा, हा बाहेर यायचा रस्ता आहे" असे मला सौजन्य, कंटाळा, तिरस्कार आणि कीव या सर्व भावनांचे मिश्रण असलेल्या आवाजात सांगून दुसऱ्या दिशेने पिटाळले. पोरं लगेच तिकडे पळाली देखील. ही माझ्यावर चिडली, माझी आई माझी बाजू कशी काय घ्यावी या विचारात पडली आणि माझी सासू, भोंडल्यातले "श्रीकांता कमलाकांता" हे गाणे आपल्या मुलीसाठीच लिहिले आहे असा चेहरा करून माझ्याकडे पाहू लागली.

मी उत्सवला जातो (भाग १)

लेखक Anand More यांनी शनिवार, 26/12/2015 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी वॉचमन केबिन मधल्या रेडीओमधून आर एन पराडकरांच्या आवाजातील दत्त भक्ती गीते एकामागून एक ऐकू येऊ लागली की दत्त जयंती आल्याचे मला कळते. मी मुलांना, दत्त दत्त दत्ताची गाय गायीचं दूध वगैरे सांगू लागलो तर मोठा म्हणाला, "आपण म्हशीचं दूध घेतो बाबा, गायीचं इतकं काही खास नसतं असं अम्मा म्हणते." एकंदरीत आपल्या आणि आपल्या मुलांच्या अम्मापुढे कुणाचं काही चालत नाही त्या अत्रीनंदनाला कळले असावे म्हणून त्याने देखील अम्मापेक्षा हम्माच जवळ केली असावी अशी शंका मनाला चाटून गेली. मी मनोमन अवधूताला नमस्कार केला आणि इतर कामांच्या मागे लागलो.

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

लेखक माहितगार यांनी बुधवार, 23/12/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग स्वप्नात झाले होते पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!) पंतप्रधान मोदींचे सचीव !! :) क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग त्यांनी विचारले गेले वर्ष भर काय केले ? ओबामां फोनु आला डू यु नो अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ओह मिपाकरांना आमचा निरोप द्या ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !!

स्त्री-पुरुष समानता - एक चिंतन

लेखक सौन्दर्य यांनी मंगळवार, 22/12/2015 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
विसावे शतक हे इतर अनेक कारणांमुळे ओळखले जात असले तरी ‘स्त्री-पुरुष समानता' ह्या दृष्टीने त्याचे अनन्य साधारण महत्व आहे. ह्याच शतकात स्त्रिया पुरुषांसारखे वस्त्र परिधान करून पुरुषांच्या पावलांवर पाय ठेऊन, नंतर पायावर पाय ठेवून, पुढे खांद्याला खांदा लावून आणि कित्येक वेळा पुरुषांच्या डोक्यावर पाय ठेवून काम करू लागल्या. घरापासून बाजारापर्यंत, विनाकारणापासून राजकारणापर्यंत, दैन्यापासून सैन्यापर्यंत, चूली-मूलीपासून वैद्य-वकिलाच्या झुलीपर्यंत, शटल ट्रेनपासून स्पेस शटलपर्यंत, आज सर्वत्र स्त्रियांनी आपला ठसा उमटवला आहे.

तांत्रिक अंधश्रद्धा

लेखक आनंद कांबीकर यांनी गुरुवार, 10/12/2015 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
"काय दिनु भाऊ, काल पोरगी पहायला गेलता म्हणे. केली का मग पास?" डोंबिवलित चढल्या चढल्याचढल्या मी त्याला विचारले. "हो गेलतो की. आणि पास पण करुण आलो" तो गर्दीतुन मान वर काढत बोलला. "मग ज़रा फोटु बिटू दाखवाकि आम्हाला?" मागच्याला पुढं घालत रम्या आमच्याकडे वळाला. दिन्याने एकदा खिशातून मोबाइल काढला, लॉक उघडायचे बटन दाबले आणि बाजूला उभा लोकांकडे पाहत परत खिशात ठेऊन दिला. बस मग काय,त्याला फोटो दाखवायचा नाही हे रम्याच्या लक्षात आले. "मुलीला केसं आहेत कारे? का आपल्या बॉससारखी हे?" म्हणत रम्या मोठ्याने खिदळु लागला. "ये रम्या, फोटुवर लाइन मारायची नई बरका. आपली वैनी हे" मी पण खेचायला सुरुवात केली.

सुटलेल्या पोटाची कहाणी -५

लेखक Anand More यांनी बुधवार, 09/12/2015 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४ __________________________________________________________________________________ मुन्नाभाई पिक्चर मुळे आपल्या शरीरात २०६ हाडे असतात हे कळले होते पण आपल्या शरीरातील स्नायूंची संख्या माहिती नव्हती. पण तिसऱ्या दिवसा नंतरच्या रात्री असतील नसतील त्या स्नायूंनी बंड केले.