Skip to main content

विनोद

सुटलेल्या पोटाची कहाणी -४

लेखक Anand More यांनी मंगळवार, 08/12/2015 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ भाग-२ भाग-३ __________________________________________________________________________________ जिमच्या फीजमध्ये बराच खर्च झाला होता. म्हणून अनावश्यक खर्चाला काट मारायचे ठरवले होते. मनात असूनही नायके किंवा आदिदास ची झोळी, डोक्याला आणि हाताला बांधायचा पट्टा. नवीन बूट वगैरे थेरं न करता गुमान घरातली कुठल्याश्या दुकानाची प्लास्टीकची पिशवी उचलली, त्यात जुने बूट आणि मोठा रुमाल टाकला. आधी मुलाना शाळेत सोडले आणि मग वळणार इतक्यात पोरांनी हसून अंगठा दाखवला. तो शुभेच्छा दर्शक असावा, ह्या सर्वातून तुझ्या हाती मी ठेंगाच देणार आहे असे देव मुलांच्या हातून सुचवीत नसावा अशी मी स्वतःच्या मनाची समजूत करून घेतली आणि तिथून निघालो. माझा स्वभावंच तसा आहे. एकदम आशावादी.

सुटलेल्या पोटाची कहाणी -३

लेखक Anand More यांनी सोमवार, 07/12/2015 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ भाग-२ __________________________________________________________________________________ निश्चय केला, मनातल्या मनात भीष्म की कायशीशी प्रतिज्ञा केली, 'पोट आत घेणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते आत घेणारच'. प्रतिज्ञा केल्यावर जाणवले बहुतेक हा हक्क नसून कर्तव्य असावे, पण मग शाळेत नागरिकशास्त्राच्या तासाला, 'हा मुलगा वर्गाचा नागरिक नसलेला बरा' असेच सर्व शिक्षकांचे मत असल्याने मी कायम outstanding विद्यार्थी राहिलो होतो, त्यामुळे अश्या चुका होणारंच अशी स्वतःची समजूत काढून घेतली.

मला आवडलेला विनोद

लेखक भंकस बाबा यांनी रविवार, 06/12/2015 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या विद्वानाच्या नगरितले नेते कृषिमंत्री होते तेव्हाचि गोष्ट. एकदा आपले माननीय नेते काही परदेशी सन्माननीय पाहुण्याना भारतातील शेतीशी आधारित जोडधंदे दाखवायला घेऊन गेले. शहराबाहेरील एका मोठ्याशा गोठ्यात शिरुन त्यांनी पाहुण्याना पशुधन दाखवायला सुरुवात केलि. समोर असलेल्या गवळिबुवाची अगदी आपला शाळकरी मित्र असल्याच्या थाटात चौकशी केली. गवळीबुवाच्या पायाला भलेमोठे प्लास्टर पाहून त्यांनी त्याचे कारण विचारले. गवळीबुवानी सांगितले की दूध काढ़ताना गाईने लाथ मारली. बस मग काय , कृषिमंत्र्याचे त्या गवळ्याचे बौद्धिक घेणे सुरु झाले. "अरे त्या गाईला पहल्यान्दा थोपटायचे असते.

सुटलेल्या पोटाची कहाणी -२

लेखक Anand More यांनी शनिवार, 05/12/2015 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ क्लासला दिवाळीची सुट्टी सलग पाच दिवस दिली होती. घरी निवांत होतो. तीन चार नवीन पुस्तकं आणून ठेवली होती. त्यामुळे खुशीत होतो. दिवाळीचा फराळ करत पुस्तक वाचत बसलो होतो. ही शेजारी येउन बसली आणि अगदी हलक्या सुरात लाडीगोडीने बोलू लागली.

सुटलेल्या पोटाची कहाणी -१

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 04/12/2015 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
ही सगळी कहाणी सुरु झाली दिवाळी पासून . मला कल्पनाच नव्हती की मी या कहाणीचा हिरो आहे म्हणून. म्हणून आधी सगळे अनुभव टिपून ठेवले नव्हते. त्यामुळे आता जसे तुकड्या तुकड्याने आठवतायत तसे लिहितो. जर दोन तुकड्या मधलं अंतर जास्त वाटलं तर खुशाल समजा की चाळीशीच्या उंबरठ्यावर असल्याने मध्ये मध्ये येणाऱ्या विरक्तीच्या झटक्याने, मी या सर्व उपद्व्यापातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असीन. --------------- हा तर मी काय म्हणत होतो. २०१५ ची दिवाळी आली. ऑफिस मधल्या मुलींनी ऑफिस सजवायचा घाट घातला. त्यांचा उत्साह पाहून मी देखील हो म्हटलं. पोरींनी छान सजवलं ऑफिस. मी पण खूष झालो.

एक डाव भुताचा

लेखक बाजीप्रभू यांनी मंगळवार, 01/12/2015 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
जनरली हॉरर कथेमधली पात्रं उशीर झाल्यावर जंगलाचा रस्ता पकडतात आणि अलगत भुताच्या जाळ्यात सापडतात, पण त्यादिवशी मी आणि संजयने पकडलेला रस्ता नेहमीचाच होता. मला आजही तो प्रसंग आठवला कि अंगावर काटा येतो. डिसेंबरचे दिवस होते, हवेत बऱ्यापैकी गारवा होता. रात्री १० च्या नंतर धुकं आता नेहमीचंच झालं होत. आमच्या शाळेच्या मुख्य इमारतीच्या अगदी समोर आतल्याबाजूला मैदानाला लागूनच चाळ टाईप शाळेचीच इमारत होती. कोणते वर्ग भरायचे ते आता आठवत नाहीये पण संध्याकाळी ते रिकामे असायचे. मी, संजय, संजय-२ आणि निलेश त्यातल्या एखाद्या रूममधे एकत्र अभ्यास करायचो...

बाबा तू चुकला रे

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 01/12/2015 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
(हल्ली कुणीही उठतो आणि शिक्षणाला नावे ठेवतो. मी शिकलो नाही, अभ्यास केला नाही, पिरेड केले नाही, शिक्षणात ढ होतो हे सार अभिमानाने सांगतो.

पुणेरी कथालेखक - २

लेखक DEADPOOL यांनी शुक्रवार, 27/11/2015 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
पुनश्च गजाननाच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने! १.तुळशीबागेत 'भेटेल' तुला मी. यातील भेटेल शब्दात अत्यंत मोठा गर्भितार्थ आहे. त्यामुळे या शब्दांवर आक्षेप घेणाऱ्यास घाणघापुरचा मेसेज पाठविण्यात येईल! २.आम्ही पुण्यातील असण्यावर आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीने शनिवारवाड्याचा प्रथम मालक कोण याचा शोध घ्यावा. (ती वास्तू आम्ही पेशव्यांना भेट दिली होती) ३."कथा ५१ भागातच का?" हा लाडिक प्रश्न विचारणार्या लोकांस 'एकीवरील आकड्यांचे महत्व' हे चा.द.रसोड यांचे पुस्तक पाठविण्यात येईल.

(जिलेबी कथा - लिहायचे नियम)

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 27/11/2015 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
'पेरणी'साठी बियाणे! मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत! प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये! १. कथा शक्यतो १च भागात द्यावी किंवा जास्त स्क्रोल करायला लावून कुणाकडूनही 'भाग थोडे मोठे टाका' किंवा 'हात दुखला स्क्रोल करून' अशी प्रतिक्रिया मिळवून आपल्या अतिशहाणपणाचा प्रत्यय देऊ नये.

पुणेरी कथा - पाळावयाचे नियम

लेखक DEADPOOL यांनी गुरुवार, 26/11/2015 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
गजाननच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने आम्ही 'तुळशीबागेत भेटेल तुला मी' या कथामालेचा शुभारंभ करत आहोत! प्रस्तुत कथा ही ५१ भागात प्रकाशित होणार आहे.तरीही ही कथा वाचताना पाळावयाची काही पथ्ये! १. ही कथा ५१ भागात असल्याने कोणीही 'लवकर भाग टाका' अशी प्रतिक्रिया देऊन आपल्या अधाशिपणाचा प्रत्यय देऊ नये. (त्यांना १ ते४ या वेळेत 'चितळे' नामक वाट कशी पहावी या शाळेत पाठवले जाईल.) २. 'पुभाप्र' नामक पळवाट वापरल्यास त्याला पुण्यात लुंगी घेण्यासाठी पाठवण्यात येईल. ३. १ ते ४ या वेळेत कथेवर प्रतिसाद टाकल्यावर आपण रिकामटेकडे आहात असा अर्थ काढण्यात येईल. ४. व्यनि करून ओळखी काढण्याचा प्रयत्न करु नये.