Skip to main content

विनोद

(छटाक) नंतर

लेखक नाखु यांनी रविवार, 03/04/2016 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वार्ध आधीच्या भागात आपण वाचले की मिपा वाचक (मिवा) हा मिपा साहित्यीकाचे (मिसा) भेटीला जातो आनि त्यांचा काय संवाद होतो ते.अता त्याच मिपा वाच्काला साहेत्यकाने दिलेले आव्हान स्वीकारायचे अस्ते.
काय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस ??? वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि "ओळखून" असण फार फरक आहे रे !!
या भागत तोच मिवा नेमका मिपा सामार्ज्याची रंगपचमी निमित्त सफर करायचा मनसुबा जाहीर करतो आणि मग तो मिसा बरोबर साम्राज्यात दाखल होतो.

ओळखले का?

लेखक राजू यांनी शनिवार, 02/04/2016 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
"ए शुक शुक" "ए अरे थांब" अचानक मागून आवाज येतो पण स्वतःला "ए" ह्या नावाने कोणी हाक मारेल असे जरासे विस्मरणात गेले असल्याने हो...हो..थांबा जरा सविस्तर सांगतो तर आपण सगळे नोकरी-व्यवसायानिमित्त एका विशिष्ठ पदावर काम करत असतो आणि ते पद म्हणजेच आपली ओळख होते. म्हणजे कोणी दुकान,हार्डवेअर स्टोअर,हॉटेल या व्यवसायात असेल तर "शेठ' या विशेषणाने तर कोणी बँक मॅनेजर,बिजीनेसमन,डॉक्टर,वकिल ,सरकारी अधिकारी या पदावर असेल तर "सर" "साहेब" अशा विशेषणानेओळखले जातो. आणि विशेष म्हणजे समाजात सुद्धा आता एक वेगळीच छाप असल्याने "आबा" "आप्पा" "दादा" "भाऊ" अशी काहीशी ओळख निर्माण झालेली असते. तर "ए" अशा एकेरी नावाने आ

श्वान, यह तुने क्या किया? – एप्रिल फूल स्पेशल

लेखक उल्का यांनी शुक्रवार, 01/04/2016 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी लहान असतान कुत्तु, भूभू, भोभो अशा अनेक नावानी ओळख असलेला प्राणी शाळेत गेल्यावर कुत्रा, श्वान ह्या नावाने ओळखला जाऊ लागतो. हमखास एक निबंध पण लिहावा लागतो. ‘अतिशय ईमानी प्राणी, घरची राखण करणारा वगैरे वगैरे…’ तर असा हा कुत्रा माझाही खूप आवडता होता. खरे तर माझ्या बाबांचा तो खूप प्रिय प्राणी! त्यांना आमच्या घरात ‘कुत्रा आमचा पाळीव प्राणी’ असे म्हणायला एक आणायचा पण होता. परंतु माझी आई ठाम होती की दोन पायांच्या मानव प्राण्याशिवाय घरात कोणालाही प्रवेश नाही. अपवाद पाल आणि झुरळ असावेत. कधीतरी चिमणी पण यायची. पण ते स्वमर्जीने येत व जात. आईला त्याचा त्रास नव्हता.

<जिलबी का टाकावी>

लेखक नाखु यांनी गुरुवार, 31/03/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
"मिपावर का लिहायचे ? न लिहिल्यास अज्ञानातून (आप्लयालाच काय) इतरांनाही आपले अज्ञान कळत नाही." "इतरांच्या धाग्यातून आणि प्रतिसादातून शिकण्यासाठी तरी आपण धागे का वाचावेत! त्या जिलब्या आपण करून पाहू नये यासाठी!" "पण मला स्वत:च्या जिलबीतून दाखवायचे आहे. हे जग मोठी कढई आहे. जिलब्या टाकत टाक्त राहणे मला आवडते! माझे स्वत:चे पाकज्ञान मी निर्माण करणार! चकलीच्या जिलबीतून!" "मान्य आहे.

दहशत - एका नव्या रूपात!

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 21/03/2016 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने असं काय विचारल तिला की आतापावेतो गप्पांमध्ये सहभागी असणारी ऑफिसातली मंडळी अचानकपणे सुन्न झाली. आमावस्येच्या रात्री गावाबाहेरच्या जुन्या पडक्या देवळामागच्या काळोखात बुडून गेलेल्या झुडूपांमध्ये असते तशी भेदक कळा त्या झगमगत्या फॉल्स सिलींगमधल्या रोषणाईला आली होती. शांततेचा पारा तर उणे शेकड्यात जाऊन गुरफटून बसला. काहींच्या चेह-यावर अस्वस्थता इतकी दाटली की त्या ऑफिसातल प्रत्येक क्युबिकल आयसीयू वार्ड प्रमाणे भासू लागल.

आमचे आगोबा [मिपाक्विता]

लेखक टवाळ कार्टा यांनी शनिवार, 19/03/2016 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल दोन मिंटात पाताळेश्वर गाठी तीन ढेंगात आम्चे आगोबा.. सुकांताचे ताट आमरसही दाट न चुकता प्रत्येक कट्टा.. तैलबुध्धी शाबूत खाणेही मजबूत ज्ञानाचा तर नित्य धबधबा.. लेण्यांत आसरा घ्यावासा वाटतो दर्पणसुंदरीचा सहवास सदानकदा गुरजींकडे जाती घेऊन हाती दहा किलोचा पावभाजीसाठी डबा.. सुकांती आहार सतत (लेणी)विहार आरोग्याचा मंत्र आगोबा.. निरागसतेचा पुतळा जणू हा बुवांना पिडणे हाच मनसुबा .. ......... सालसकुमार दातपाडे

फेसबुक – एक वसाहत

लेखक उल्का यांनी शुक्रवार, 18/03/2016 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
(फेसबुक वर असेच एकदा वेगेवेगळी सेटिंग्स तपासात होते. काही सेटिंग्स बदलून view as करून पण बघत होते. तेव्हा स्वत:चाच प्रोफ़ाइल आपले वेगवेगळे रूप दाखवू लागला. जणू नवीन कपडे आणल्यावर एक एक घालून दाखवावे अगदी तश्शीच fashion parade चालली होती. तेव्हा काल्पनिक, काहीसे विनोदी (फार काही नाही अगदीच थोडे बर्र का) लेखन सुचले ते असे आहे.) हल्ली वास्तव जगाचा भाग बनलेलं एक आभासी विश्व आहे. आंतरजाल विश्व. ह्या विश्वात रमलात की कधी कधी वास्तवतेचे भानही रहात नाही. ह्या विश्वातील अनेक वसाहतींचा फेरफटका मारता मारता दमछाक होते जणू.

(कूणास ठाऊक ?)

लेखक टवाळ कार्टा यांनी शुक्रवार, 18/03/2016 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना कूणास ठाऊक ? काय घेण्यासाठी काय वेचण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय चापण्यासाठी काय गिळण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय टापण्यासाठी काय हुंगण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय करण्यासाठी का नूसतेच खर्चण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही पाकिटशोध (दिव्यसंग्रह)

तुळशीबाग

लेखक Dinesh Satpute यांनी रविवार, 13/03/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रांतीचे दिवस..रविवारचे दुपारचे जेवण झाल्यावर मस्त झोपण्याचा विचार सुरु असताना बायकोने आपल्याला जेवणानंतर तुळशीबागेत जायचे असल्याची घोषणा केली. उणेकरांसाठी (जगातुन पुणेकर वजा केल्यानंतर जे उरतात त्यांना मी उणेकर म्हणतो ) तुळशीबाग म्हणजे काय प्रकार आहे हे प्रथम सांगतो..तुळशीबाग हि काही फुलांची बाग नाही. तुळशीची रोपे सुद्धा येथे मिळत नाहीत...

एक पिपाणी द्या पप्पूस आणुनी

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 11/03/2016 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
एक पिपाणी द्या पप्पूस आणुनी पिचकीन जी तो परप्राणाने छेदुनी टान्गूनी सारी लक्तरे दीर्घ तिच्या त्या किंकाळीने, अशी पिपाणी द्या हीज आणुनी मती जाऊ द्या मरणालागुनि जाळूनी किंवा पुरुनी टाका कुन्थत न एका ठायी ठाका सावध ऐका पुढला धोका खांद्यास चला खांदा देऊनी एक 'कन्हैया' द्या हीज आणुनी (वाजवील तो बासुरी सुन्दर) प्राप्तकाल हा विशाल धूसर सुंदर बेणी तयात खोदा निजधामे त्या वरती नोंदा बसुनी का गाढवीवर मेदा विक्रम काही करा चला तर हल्ला करण्या ह्या सि.न्हावर,ह्या वाघीणीवर मुढानो या त्वरा करा रे मूढते चा ध्वज उंच धरा रे बेअकले ची द्वाही फिरवा रे पिपाणीच्या या सुरा बरोबर मूळ कविता : एक तुतारी द्या मज आणुनी