Skip to main content

विनोद

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 15/01/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

अन् मी झाडावर न चढण्याचा संकल्प सोडला.

लेखक धुरंधर यांनी सोमवार, 11/01/2016 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
तसं मला झाडावर चढायला लय आवडतं. म्हणजे कसं समजा कालेजात जातांन्ना सोबत्या बोल्ला की, ती पोट्टी बघ तुह्याकडे पायतीय तरं मी लगेच पटकण झाडावर.... मग पायणारचं ना भाऊ मी दिसतोच तसा ह्यँन्डसम, पाय तु तिला दोनच दिवसात पटावतो का नाही ते! आणि तिसरा दिवस उजाडता-उजाडता मी झाडाच्या खाली आणि तो सोबत्या मला खिजावण्याच्या नादांत झाडावर पायतो तव्हा पण लगेच आपलं उत्तर तय्यार आसतं. आरे ती आपल्याला परवडणार आहे का.. तिचा किती खर्च रायतो दिवसाचा ... (मग हळूच खिशात हात घालून चिल्लर आहे का नाही ते पाहत) ते बी करू रे आपून पण ती लयच लफडेखोर आहे असं म्हणत्या.

सुभ्या

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 10/01/2016 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
पाठीत धापकन् बुक्का बसला तेव्हा सुभ्या खड़बडून जागा झाला. "कारे गाढवा! इ.भु.ना. चा तास म्हणजे काय झोपायचा तास वाटतो काय रे तुला!" गुरुजी मोठ्याने त्याच्या कानाजवळ येऊन खेकसले. तो, त्याच्या अगोदारचा म्हणजे मराठीच्या वालावलकर बाईंचा तास चालु झाला तेव्हा झोपलेला, इ.भु.ना. च्या कोंडुळे गुरुजींना समोर पाहुन पुरता गोंधळला. "असा अफजल खान पाहिल्यावानी काय बघतोयस? चल ताजमहल कुणी बांधला सांग लवकर?" सगळा वर्ग त्याच्यावर डोळा लाउन बसलेला आणि त्याची खाली बाकावर चुरगळलेले मराठीचे पुस्तक सरळ करण्याची धांदल. "इ.भू.ना.

श्री. श्री. संत यनावाला महाराज

लेखक शरद यांनी बुधवार, 06/01/2016 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. श्री. संत यनावाला महाराज मित्रहो, धाग्याचे शीर्षक वाचून धक्का बसला नां ? पण त्याचे काय आहे, हल्ली दूरदर्शनवरील ब्रेकिन्ग न्युज प्रमाणे प्रत्येक शीर्षक धक्कादायक नसेल तर कोणी तिकडे लक्षच देत नाही. आता साधी गोष्ट, तुम्हाला माहीत आहेच महाराष्ट्रातील संत आपली ओळख कोणालाही पटू नये म्हणून नाना प्रयत्न करत असतात. श्री.(एकच श्री. बर कां !) तुकाराम महाराज घ्या. चांगला वाण्याचा वंशातला माणुस, म्हणे मीठ विकावयाला कोकणात गेला. त्यांच्या दुकानात विकावयास असलेल्या मीठाच्या गोण्या कोकणातून येतात हे त्यांना माहीत होतेच; पण लोकांना आपली खरी ओळख पटू नये म्हणून हा खटाटोप.

बाजीराव मस्तानी न पाहताच आलेले शहाणपण

लेखक सप्तरंगी यांनी मंगळवार, 05/01/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
ऐतिहासिक नोंदी : बाजीराव मस्तानी न पाहताच आलेले शहाणपण : 1. सगळेच शहाणपण येण्यासाठी movie पहायची नाही तर fb , मिपा , नेट नेटाने चाळायची गरज असते. 2. आत्ताच आलेल्या माहितीनुसार यापुढे उठसुठ कुठल्याही सुमार गोष्टींसाठी पाकिस्तानात जा असे म्हणायची गरज नाही तर सरळ बाजीराव-मस्तानी पहा असेही म्हणू शकतो, equal आणि उचित अपमान केल्याचे श्रेय पदरी पडेल. 3.

पुढाऱ्याचे प्रेम

लेखक सप्तरंगी यांनी सोमवार, 04/01/2016 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम या थिम वर एक गद्य-पद्य लिहायचे होते त्यात मी ' पुढाऱ्याचे प्रेम ' वर लिहायचे ठरवले.

कुठं कुठं जाऊ मी सांगायला?

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 04/01/2016 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : "कुठ कुठ जायाच हनिमूनला" ही प्रसिद्ध ठसकेबाज लावणी! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? अहो भरल्या जवानीत 'सर' तुम्ही मला हेरलं हेरलं ते हेरलं अन् जॉबच् माझ्या ठरलं ख्रिसमस झाला, "न्यू" इयर झालं आता फक्त ऑफिस की हो उरलं! मार्केटींग, मॅनेजमेंट, निवांत एच.आर. कोण नाही पर्वा करायला कुठं कुठं जाऊ मी सांगायला? थोडं तरी इन्क्रिमेण्ट करायला! रात्रभर एकटा बसू कसा? क्लायंटला अडचण सांगू कसा? बाकीचे सारे, प्रोफेशनल खरे जातात टायमात ते घरला! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? जमेल तेवढं खेचून मी काम नाही केला आजिबात आराम सकाळ

2016 पासून मिपावर प्रतिक्रिया देण्यास बंदी येणार? खरं का रे भाऊ?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 03/01/2016 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
("नाहीतरी "बंदी" हा शब्द आम्हा बहुतांश भारतीयाना लय आवडतो. "संध्याकाळी सात पर्यंत मुलीने घरी आलं पाहिजे."--आईबाबांची बंदी ते दारूबंदी पर्यंत." सरकारी बंदी) "२०१६ पासून मिपावर प्रतिक्रिया देण्यास बंदी येणार आहे.असं मी ऐक्लं.खरं का रे भाऊ?" "नाही रे,ही काही तरी अफवा असावी.अरे,प्रतिक्रिया नसतील तर मिपावर कोण येणार आहे? लेख एक असतो आणि प्रतिक्रिया अनेक असतात.तुझ्या लक्षात आलंच असेल." "ठरावीक वाचकच प्रतिक्रिया देतात.आणि त्यांच्या प्रतिक्रियेवर आणखी ठरावीक वाचक त्यांची प्रतिक्रिया देतात.मुळ लेख बाजुलाच रहातो असं बरेच वेळा होतं.आणि प्रतिक्रिया मिळण्यालायकच लेख असावा लागतो.असं मी ऐकलंय.

रिप्लेसमेंट

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 03/01/2016 02:24 या दिवशी प्रकाशित केले.
हजाराच्या सात नोटा त्यानं मोजुन पाकिटात ठेवल्या आणि बाबुच्या टपरिवर येऊन उभा राहिला. "भाऊ, एक 'बार' मळा बर् आपल्याला" "पगार झाली दिस्ती आज?" बाबुने खोचकपणे विचारले. त्याचं लक्ष नव्हतं. तालुक्याच्या बस स्टॅंडवर ति मैत्रिणींच्या घोळक्यात उभी होती. तो तिच्यावरच नजर लाउन उभा होता. अर्धा बार तोंडात टाकला आणि अर्धा व्यवस्थित पाकिटात ठेऊन तो तिथेच उभा राहिला. बाबु आणखी काहीतरी बोलला पण त्याचे ध्यान 'ति'कडेच लागलेले. थोडयावेळाने टपरीच्या पायावर पिचकारी मारून, तोंडातला बार चघळत आणि छाती पुढे काढत तो तिच्या जवळ येऊन उभा ठाकला. तिना मान फिरवली. खरे तर ति घाबरलेली पण शांत उभा होती.

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 02/01/2016 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट