Skip to main content

तांत्रिक अंधश्रद्धा

प्रकाशित मुखपृष्ठ
"काय दिनु भाऊ, काल पोरगी पहायला गेलता म्हणे. केली का मग पास?" डोंबिवलित चढल्या चढल्याचढल्या मी त्याला विचारले. "हो गेलतो की. आणि पास पण करुण आलो" तो गर्दीतुन मान वर काढत बोलला. "मग ज़रा फोटु बिटू दाखवाकि आम्हाला?" मागच्याला पुढं घालत रम्या आमच्याकडे वळाला. दिन्याने एकदा खिशातून मोबाइल काढला, लॉक उघडायचे बटन दाबले आणि बाजूला उभा लोकांकडे पाहत परत खिशात ठेऊन दिला. बस मग काय,त्याला फोटो दाखवायचा नाही हे रम्याच्या लक्षात आले. "मुलीला केसं आहेत कारे? का आपल्या बॉससारखी हे?" म्हणत रम्या मोठ्याने खिदळु लागला. "ये रम्या, फोटुवर लाइन मारायची नई बरका. आपली वैनी हे" मी पण खेचायला सुरुवात केली. ठाण्यातून सुन्या आणि बाब्या बसले. त्यांनी पण दिन्याची जाम खेचली. येरव्ही दिन्या आमच्यात सामील व्हायचा पण आज त्याचे वागणे थोड़े खटकले म्हणुन सर्वांनाच चांगला चेव आलेला. दादरला उतरल्यावर स्टेशनच्या बाहेर येई पर्यंत दिन्या मागे पडलेला. आमची त्याच्या सोबत चलायची पण इच्छा नव्हती. बाहेर कंपनीची बस उभाच होती. आम्ही चटकन शिरुण पुढचे सीट पकडले. तो मागे जाऊन बसला. ऑफिसमधे सर्वजन आपल्या आपल्या कामला लागली. मी पीसी स्टार्ट करुण दिन्याकडे एक तिरपी नजर टाकली. तो त्याच्या टेबल जवळ उभा होता. हातातल्या मोबाइलला त्यानं ओषधाच्या बाटली सारखं हालवले आणि टेबलवर ठेऊन दिले. लंचब्रेक मधे आम्ही सर्वांनी एकमेकांना आवाज दिले आणि कैंटीनकड़े निघुन गेलो. दिन्याला कुणीच् बोलावले नाही. आम्ही टेबलवर टिफिन खोलले तेवढ्यात दिन्या आला. खिशातून मोबाइल काढुन त्यानं, उडवायच्या आधी शाम्पेनची बाटली जाशी हालवतात तसा मोबाइल हालवाला. आम्ही एकसाथ त्याच्यावर नजर ठेऊन बसलो. त्यानं मोबाईल आमच्याकडे दिला आणि "ही बघा तुमची वैनी" म्हणाला. "माकडा, मग अगोदर दाखवायला काय झालते?" मी न राहवुन त्याला विचारले. "आरे! या मोबाइलचा प्रोब्लेम झालाय. खिशात ठेवला कि बंद पडतो. ओनऑफचे बटन कितीही वेळा दाबले तरी चालु होत नाही अन तीनवेळा जोरात हलवले की लगेच चालु होतो" सगळे जोरजोरात हसले. "साल्या, दुरुस्त करुण घे की मग!" बाब्या. "चांगला हप्ताभर ठेवला होता. शेवटी कंटाळून वापस आणला" दिन्या. "कल्याणला चल आज. आपला एक दोस्त हे. तो कसलेपण मोबाईल दुरुस्त करतो" मी. "मी भरपुर दुकानात दाखवलाय. काही उपयोग नाही" दिन्या. "अबे तु चाल त् खरं. आपला अहमदभाई जाम एक्सपर्ट हे" मी. "मला काम हे आज. एक काम कर आजचा दिवस तुझा फोन मला दे अन माझा तु घेऊन जा" दिन्या. ऑफिस सुटल्यावर माझा कीपॅडवाला मी त्याला दिला आणि त्याच्या स्क्रीनटच मधे माझे कार्ड टाकले. संध्याकाळी अहमदभाईला मोबाईल दाखवला. त्यानं अर्धा तासात दुरुस्त करुण दिला. नंतर आम्ही नऊ च्या शो ला गेलो. मधे मी बराचवेळा फोन खिशातुन काढुन चेक केला, ओके होता. शो सुटल्यावर रूमकडे आलो. घरमालकाने मेन गेट ला कुलुप लावालेले. पार्टनरला फोन करुण चावी फेकायला सांगवी म्हणुन खिशातुन फोन काढला तर तो बंद पडलेला. मग उजव्या हातात फोन घट्ट धरला आणि जोरात तिनवेळा वरखाली केला. ..... आणि गालातल्या गालात हसतच पार्टनरला फोन लावला.

याद्या 4696
प्रतिक्रिया 20

क्रमशः आहे का? काही कळलं नाही बुवा..!! बाकी करूण ऐवजी करून टायपाला सोपं आहे. "कंटाळून, मेन" या ठिकाणी तुम्ही "न" वापरला आहे मग करूण मध्येच "ण" का?

In reply to by योगी९००

कथेतल्या पात्रांच्या सामाजिक पार्श्वभूमीचा अंदाज केला तर ते लोक साधारणपणे 'करूण' असंच बोलत असावेत असं वाटतं. मग 'न' चा अट्टाहास का?

मला समजली ही कथा. असाच अनुभव मलाही आलेला आहे. आमचे जेजेचे प्रोफेसर होते. कॉलेज संपल्यावर मी त्यांच्यासोबत त्यांच्या रुमवर पार्टनर म्हणून राहत होतो. त्यांच्या कडे एक असेंबल्ड पीसी होता. जो त्याकाळाच्या मानाने (२००५-६) हायएन्ड वैगेरे होता. पण त्याच्या स्क्रीनला एक विचित्र खोड होती. ती अचानक आपल्याआपण ब्राईटनेस, कॉन्ट्रॅस्ट, इत्यादी सेटींग चेंज करायची. म्ह्णजे अगदी भुताटकी हो. आपण काम करत आहोत. रात्रीचे दोन वाजलेत, अचानक स्क्रीन्वर ब्राईटनेस चे स्केल येऊन आपोआप आकडे कमी जास्त होतायत, अजून काय काय होतंय. जणू कोणीतरी जाणून बुजून करतंय. क्रमशः बाकी नंतर टाय्पतो.

स्क्रीनवरचं भूत - २ ह्या प्रकाराचा सरांना नेहमी अनुभव होता. पण ते तेवढे लक्ष देत नसत. आम्ही तरूण रक्ताचे वळवळे जीव. टेक्नॉलॉजी आणि गॅजेट्स जीव की प्राण. मी तो कंप्युटर वापरायचो. तेव्हा मला हे फार त्रासदायक असायचे. मी बरेच प्रयत्न केले आणि मग कंटाळून शेवटी सरांना विचारले. ते म्हणाले "अरे हा सेम प्रॉब्लेम माझ्या आधीच्या मॉनिटर मध्येही होता." त्यांनी म्हणे एचपी कंपनीचा 'ब्रांडेड आहे' म्हणून एक पीसी घेताला होता. काहिइ काळाने त्याच्या १५" मॉनिटरमधे हा प्रॉब्लेम सुरु झाला. मग त्यांनी १७" दुसरा मॉनिटर घेतला, सीपीयु जुनाच. त्या मॉनिटरलाही सेम प्रकार सुरू झाले. मग कंटाळून त्यांनी सीपीयुत समस्या असेल असे समजून सीपीयु नवीन असेंबल करून घेतला. पण समस्या काही सुटली नाही. आता इथे काय झालं? एक स्वतंत्र पीसीच्या मॉनिटरचा प्रॉब्लेम दुसर्‍या स्वतंत्र पीसीच्या मॉनिटरमधे कसा गेला? इथे मी गेला म्हणतोय. कारण.... क्रमशः

स्क्रीनवरचं भूत - ३. जाऊदे. जास्त ताणत नाही. आमचे एक दुसरे प्रोफेसरही काही दिवस राहायला आले होते, त्यांनी ह्या सरांचा तो जुना एचपीचा संच विकत मागितला. जेणेकरून घरी त्यांची बहिण काहीतरी काम शिकेल त्यावर. तो पीसी मग बॉक्समधून बाहेर आला. व्यवस्थित जोडून बिडून झाला. आम्ही काय लक्ष देत नव्हतो. सरांनाही थोडे पैसे मिळाले, अन्यथा ती वस्तू पडून राहिली असती म्हणून आनंद झाला. मॉनिटरचा तसा फार प्रॉब्लेम नव्हता. कॉन्फिगुरेशन आता जुने झाले होते म्हणून आमच्या कुणाच्या उपयोगाचे नव्हते. ते दुसरे सर खुश होते कारण त्यांन कमी पैशात चांगला ब्रॅण्डेड आणि आपल्याच सहकार्‍याने कमी काळ वापरलेला पीसी मिळाला. त्या सरांनी तो पीसी सुरु केला. त्यांनाही आम्ही सदर समस्येबद्दल पूर्ण कल्पना देऊन ठेवली होती. पण हायला! त्या मॉनिटरला आता काहीच समस्या नव्हती. क्लीन, क्लिअर अ‍ॅण्ड स्मूद....! तो मॉनिटर असे काही चालत होता की जणू काय झालेच नाही. आणि त्याच्याच बाजुला आमचा नवा मॉनिटर आपली भुताटकी दाखवतोय! तेही लाइव. जुना संच मला माहित असे पर्यंत त्यांच्या बहिणीकडे उत्तम चालत होता. म्हणजे चार वर्षे तरी. त्यांच्या बहिणीने स्क्रीनवरच्या भुताचा काहीच प्रॉब्लेम आला नाही असे सांगितले. आमचा मॉनिटर शेवटपर्यंत तेच झटके देत राहिला. बरे असे नाही की काही विजेची समस्या होती कारण नंतर पाच रुमपार्टनर्सचे पाच पीसी तिथे चालत असत. कुणाला काही समस्या नव्हती. सरांच्याच मॉनिटरला काय झाले असावे आणि ते नविन मॉनिटरमध्ये कसे गेले हे एक गूढ राहिले! गूढ ह्यासाठी की आम्हा कोणालाही ह्याची तांत्रीक बाजू कधीच समजली नाही. जाणकारांना काही कल्पना असल्यास सांगावे, इतक्या वर्षांचे गूढ संपेल! ;-)