Skip to main content

विनोद

दुष्काळ वणवा

लेखक माहीराज यांनी शनिवार, 10/10/2015 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाचे थेंब हे आटुन गेले सारे, दाटलेले मेघ तरीही कोरडेच वारे, उष्णतेचा वणवा सहन कुणा होइना, तापलेल्या मातीचा रंग कुणी पाहीना, चातकाचा उर भरुन ही गीत मुखी येईना, सांज वेडी बावरली तीज धीर कुणी देइना.. विजांचे चमकणे ढगात लुप्त झाले, मेघांचे नगाडे ही आज गप्प झाले, उन्हाचे तेज ही आणखीच तप्त झाले, भरल्या मनी माञ आसुच फक्त मागे... पुढे वाढवली तरी चालेल..
काव्यरस

[साडीवाले]

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी शनिवार, 10/10/2015 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
विजूभाउंच्या 'आय्टीवाले'च्या धर्तीवर- परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात साडीविक्रेते लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते. त्यां लेखाचा मतितार्थ असा की साड्या विकणारे लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हव्या तेवढ्या साड्या उपलब्ध असतात मात्र नशिबात वडिलांचा कोट-टाय घालण्याचे सूख मात्र नसते. एकूणातच समाजातील साडीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो. यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल? लोकांच्या मते १)साडीवाले भरपूर साड्या विकतात. २) दुकानात बसून फक्त बायकांना बघायचे हेच तर नुस्ते काम असते.

शेअर्स मार्केट म्हणजे काय रे भाऊ

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शनिवार, 10/10/2015 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
शेअर मार्केट म्हणजे काय रे भाऊ? छोटू आणि गोटू या दोन भावांचा संवाद छोटू--शेअर मार्केट म्हणजे काय रे भाऊ? गोटू--अरे शेअर मार्केट म्हणजे किनई ,एक प्रकारचा बाजार असतो, जिथं एक माणूस तंयाचं डोकं ठिकाणावर नसल्यासारखं सतत कांहीतरी विकत घेतो,थोड्या वेळानं तीच वस्तु डबल विकतो किंवा त्याचया उलटहि करतो,दुसरा, तिसरा ,चौथाहि हेच करतो.ना इथं प्रत्यक्षात कोणी माल वा पैसे रोख देतो वा घेतो. छोटू--म्हणजे वेड्यांचा बाजार काय रे भाऊ? जिथे एकजण म्हणतो मी ताजमहाल विकत घेतला, दुसरा म्हणतो पण मी कुठे विकला? गोटू--अरे नव्हे नव्हे!शेअर मार्केट म्हणजे एक प्रकारचा

"हाय"कू

लेखक नाखु यांनी बुधवार, 07/10/2015 09:37 या दिवशी प्रकाशित केले.

"हाय"कू

"हाय"कू हा प्रकार समजवण्याचा नाही समजण्याचा आहे. लेखक मकदूरांना त्यांचे प्रेरणास्थान श्री श्री श्री श्री आत्मुदा (इथे आपला उजवा हात आपल्याच उजव्या आणि डाव्या कानाला लावेल न लावेल असा स्पर्श करणे अतिआवश्यक आहे).यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला. पुणे प्रांतीही त्यांना केलेली आर्त विनवणी दुर्लक्षली गेली आणि आम्हाला अंगठा दाखविला. ( त्या अंगठ्याला चुना होता असे वल्लींचा अंदाज आहे, त्या मुळे तो अंगठा आमच्या विनवणीसाठी ठेंगा म्हणून होता का चैतन्यचूर्ण करामत हे कळाले नाही.

मोकलाया दाही दिश्या ते भटकाया दाही दिश्या : एक प्रवास

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 06/10/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
(ढेस्क्लेमर: या लेखातून माझा कुणालाही हिणवण्याचा अथवा दुखावण्याचा हेतू नाही. याउलट 'हसण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी हसणे' हा माझा हास्य'बाना' सर्वांपर्यंत पोचविण्याचा एक किंचीतसा प्रयत्न आहे! तरीही कुणाला माझ्या लेखातील/काव्यातील काही जागांना आक्षेप असल्यास कळवावे, दुरूस्ती किंवा तो भाग काढून टाकण्यासाठी संमंना सांगून प्रयत्न केला जाईल!) न्मसर्कार म्हणडलि! तर महाराजा, शीर्षक आणि पहिली ओळ वाचून पुढे काय वाचायला मिळणार आहे याचा एक अंदाज मिपाकरांना आलाच असेल! तुम्ही बरोबर विचार करताय, सदर लेख "त्याच" काव्यचमत्काराला वाहिलेली एक शब्दांजली आहे.

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 05/10/2015 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

अकबर बिरबल (मोत्यांची शेती)

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 28/09/2015 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचा भाग: अकबर बिरबल (मेहुण्याची शिफारस) -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- अकबर बिरबल (मोत्यांची शेती) -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- [दृश्य: अकबराच्या लाडक्या बेगमच्या महालातील सुंदर शयनकक्ष.

३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 16/09/2015 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.