नमस्कार मंडळी, सुप्रभात. गेले अनेक दिवस फेसबुक वर वावरताना अनेक जण आपापल्या परीने बॉलीवूड म्हणजेच आपली चित्रपटसृष्टी आणि त्यातील चित्रपट, गाणी याविषयी लिहिताना दिसतात. प्रत्येकाची आपापली शैली, दृष्टी यामुळे नकळत आपल्याला ही या गोष्टीकडे पाहण्याची एक दृष्टी मिळते.
मी ही लहानपणापासून चित्रपट गीतांचा वेडा आहे. अर्थात वयानुसार आवड बदलत गेली कारण तशी संगत होती. नव्वदीच्या दशकात कॉलेज मध्ये असताना ओपी , आर डी , किशोर , आशा आवडत. अनेक वर्षांनी काही दर्दी चित्रपटशौकिनांच्या संपर्कात आल्यामुळे मग ती आवड थोडी मागे सरकत रफी, लता, मदनमोहन, मुकेश इथपर्यंत बदलली.