Skip to main content

संगीत

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

पाऊस आपला आणि (पडद्यावरचा)

लेखक नाखु यांनी गुरुवार, 23/07/2015 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस आपला आणि (पडद्यावरचा) आणि आतला-बाहेरचाही !!!! ===== त्याचा किंवा तीच्या आर्जवांना "होकार" आलेला असतो अन मन सावरीच्या कापसासारखं हलकं तरंगत असतं वास्तवाची जमीन दिसत नसतेच.

उस्ताद विलायत खाँ - 'सनातनी बंडखोर' सतार नवाझ - १

लेखक मूकवाचक यांनी गुरुवार, 09/07/2015 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
तिन्हीसांजेची वेळ होती. एका अभिजात संगीतप्रेमी मित्राला भेटायला त्याच्या सोलापुरातल्या एका चाळीतल्या घरी गेलो होतो. त्याचे वडील पट्टीचे व्हायोलिन वादक आणि निष्णात संगीत शिक्षक होते. घराचे दार सताड उघडेच होते. दारात पाऊल ठेवताच सतारीचे 'मारव्याचे' सूर कानी पडले. संथ आलापी सुरू होती. त्या सतारवादकाने धैवतापासून मींड घेत कोमल रिषभ असा काही नेमका लावला, की त्या स्वरात ओतप्रोत भरलेली आर्तता, व्यथा थेट काळजाला भिडली. एकही अवाक्षर न उच्चारता मी नादब्रह्मात बुडून गेलेल्या गुरुजींजवळ मांडी घालून बसलो. त्यांच्याशी फक्त नजरेनेच संवाद सुरू होता.

मला आवडलेले संगीतकार भाग ४ - सज्जाद हुसैन

लेखक शशांक कोणो यांनी गुरुवार, 18/06/2015 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडलेले संगीतकार :- १ मदनमोहन मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र मला आवडलेले संगीतकार :- ३ अनिल बिश्वास sajjad hussain संगीत काही लोकांच्या शरीरातून रक्तासोबत मिसळून वाहत असते. त्यांचा प्रत्येक श्वास संगीताने भारलेला असतो. त्यांच्या प्रत्येक शब्दात, कृतीत संगीत वसते.

मला आवडलेले संगीतकार :– 3 अनिल बिश्वास

लेखक शशांक कोणो यांनी सोमवार, 15/06/2015 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडलेले संगीतकार :- १ मदनमोहन मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र बंगालचे नाव आले की डोळ्यासमोर येतात दोन गोष्टी , एक म्हणजे बंगाली मिठाई आणि रबिन्द्र संगीत. बंगाली माणसाच्या स्वभावातच गोडवा आणि संगीत असते. अशा मातीतून आलेल्या अनेक संगीतकारांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. पण त्यात सर्वप्रथम नाव येते अनिल बिश्वास यांचेच. हिंदी चित्रपटाला रबिन्द्र संगीताची ओळख करून देणारे पहिले संगीतकार असे जर त्यांना म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र

लेखक शशांक कोणो यांनी शुक्रवार, 12/06/2015 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडलेले संगीतकार :- १. मदनमोहन आज इतकी वर्षे झाली पण मला कधी झोप येत नसेल तर आठवते लोरी म्हणजे अंगाई गीत. लहानपणी आईने अनेकदा अंगाई म्हणून निजवले असले तरी जेव्हापासून हिंदी चित्रपट संगीताचा शौक जडला तेव्हापासून दोन लोरी गीतांनी माझ्यावर जबरदस्त मोहिनी घातली.

मला आवडलेले संगीतकार :- १. मदनमोहन

लेखक शशांक कोणो यांनी मंगळवार, 09/06/2015 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
संगीतकार madnmohn हिंदी चित्रपटसृष्टीला ज्या अनेक संगीतकारांनी सजविले त्या प्रत्येकाची शैली स्वतंत्र होती. मदनमोहन यांचे वेगळेपण अगदी ठळकपणे डोळ्यात भरते. मदनमोहन हे आर्मीमध्ये काही वर्षे सर्विस केल्यामुळे शिस्तप्रिय आणि अचूक कामासाठी प्रसिद्ध होते. गजलसम्राट म्हणून ते ओळखले जायचे. अनेक नितांतसुंदर अजरामर गाणी विशेषत गजल्स त्यांनी आपल्याला दिलीत. हिंदी चित्रपट गीते आवडत नाहीत असे म्हणणारा विरळाच. जसे मला आंबा आवडत नाही असे म्हणणारा असेल इतकी ही गाणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग होऊन बसलेली असतात.

मला उमजलेले बॉलीवूड

लेखक शशांक कोणो यांनी सोमवार, 08/06/2015 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सुप्रभात. गेले अनेक दिवस फेसबुक वर वावरताना अनेक जण आपापल्या परीने बॉलीवूड म्हणजेच आपली चित्रपटसृष्टी आणि त्यातील चित्रपट, गाणी याविषयी लिहिताना दिसतात. प्रत्येकाची आपापली शैली, दृष्टी यामुळे नकळत आपल्याला ही या गोष्टीकडे पाहण्याची एक दृष्टी मिळते. मी ही लहानपणापासून चित्रपट गीतांचा वेडा आहे. अर्थात वयानुसार आवड बदलत गेली कारण तशी संगत होती. नव्वदीच्या दशकात कॉलेज मध्ये असताना ओपी , आर डी , किशोर , आशा आवडत. अनेक वर्षांनी काही दर्दी चित्रपटशौकिनांच्या संपर्कात आल्यामुळे मग ती आवड थोडी मागे सरकत रफी, लता, मदनमोहन, मुकेश इथपर्यंत बदलली.