Skip to main content

‎निर्गुणी भजने‬ (भाग १)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 26/04/2016 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
मला गाण्यातलं फार कळत नाही. रागांची नावं वगैरे तर अजिबातच नाही. शाळेत संगीताच्या तासाला मी दाणी बाईंचा फार आवडता विद्यार्थी असावा. कारण रागाची नावे, त्यांची लक्षणगीते, ते कधी म्हणावेत याचे संकेत, या किंवा अश्या सारख्या सर्व प्रश्नांना तोंडी परीक्षेत मी केवळ एकच उत्तर देत असे, 'आठवत नाही'. त्यामुळे माझी तोंडी परीक्षा लवकर आटपायची आणि लेखी पेपर तर माझ्या पुढे बसलेल्या मुलाचा तपासला की माझे मार्क आपोआप ठरायचे. त्यामुळे बाईंच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षण मी वाचवले आहेत याची मला खात्री आहे. पण माझ्या मते मी उत्तम कानसेन आहे. सूर मला मोहात पाडतात.

मरण!

लेखक DEADPOOL यांनी सोमवार, 25/04/2016 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!" म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.

कहे कबीरा (२)- सुनता है गुरु ग्यानी !!

लेखक मनमेघ यांनी शुक्रवार, 22/04/2016 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
सुनता है गुरु ग्यानी । गगन में आवाज हो रही झीनी झीनी । नभ मेघांनी आक्रमिले...घन घन माला नभी दाटल्या...त्या ढगांचा गडगडाट होतो आहे आणि लवकरच पाऊस सुरू होणार आहे ही सामान्य घटना कबीर एका वेगळ्या नजरेतून बघतात. आणि त्यांच्या 'भाई साधो' लोकांना प्रश्न विचारतात.. सुनता है गुरु ग्यानी? गगन में आवाज हो रही, झीनी झीनी. माझ्या ज्ञानी मित्रा, तुला गगनात होणारा आवाज ऐकू येतोय ना? बघ तर तुला काय सांगतो हा आवाज? ज्या ढगांचा हा आवाज आहे त्यांच्या पलीकडे पाणी आहे. आणि त्या बिंदूच्या आधीही 'नाद' ऐकू येतो. साधनेत सर्वप्रथम 'अनहत नाद' च ऐकू येतो आणि मग बिंदू दिसतात.

कहे कबीरा (१) - हीरना समझ बूझ बन चरना-

लेखक मनमेघ यांनी सोमवार, 18/04/2016 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
हीरना समझ बूझ बन चरना ।। कुणी तरी अमुक व्यक्ती चूक करणार आहे आणि ती चूक त्याच्या जिवावरच बेतणार आहे हे दुसऱ्या कुणा तमुक व्यक्तीला समजलं तर ती तमुक व्यक्ती अमुक व्यक्तीला सावध करेल. ती चूक करु नकोस म्हणून सांगेल. अमुक आणि तमुक जर खूप जवळचे असतील तर ज्या तळमळीने हे सावध करण्याचं काम होईल तीच तळमळ कबीरांची आहे आणि हे भजन गाणाऱ्या कुमारांचीही. कुमारांनी सुरुवातीचं 'हीरना'च असं काही म्हटलंय की ऐकताना ते आपल्यालाच उद्देशून आहे असं वाटतं. हरीण हा चंचल प्राणी आहे. एका जागी फार न थांबता हरीण जंगलात विहार करीत राहते. त्या जंगलात कुठे काय आहे याची त्याला जाणीव नाही.

संदीप खरे

लेखक अनुप देशमुख यांनी गुरुवार, 14/04/2016 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
खर तर संदीप(एकेरी उल्लेखाबद्दल क्षमस्व पण संदीपला सर किंवा अहो म्हणण म्हणजे तो खूप लांब गेल्यासारखा वाटतो) तर संदीप माझ्या फार पूर्वीपासून ओळखीचा... म्हणजे माझ्या कॉलेज पासून फक्त ऐकलेला, तेव्हा नुकतेच मनात पालवी फुटण्याचे वय. आणि त्यातच संदिपच पहील गाण कानावर पडल ते म्हणजे सरीवर सर्.... नुकताच पाऊस पडून गेलेला..मला वाटत कोणीही शहाणा माणूस ते गाणं ऐकल्यावर त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही...तेव्हाच वाटल “कुछ तो बात है इस दिवाने कि बातो मे” ...अक्षरशः दीवाना केल त्याच्या शब्दांनी...

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 09/04/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

देशोदेशीची वाद्ये: पोलँड

लेखक विजय पुरोहित यांनी शनिवार, 09/04/2016 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
पोलॅंड किंवा पोलॅंडचे गणराज्य हा मध्य युरोपातील आकारमानाने एक मोठा देश. युरोपात आकाराने 9वा तर लोकसंख्येने आठवा देश. साधारण इ.स. 966 पासून या देशाचे स्वतंत्र अस्तित्व नकाशावर दिसू लागले.

बोबडी कविता!

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 05/04/2016 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
बाबाच्या पोटावर झोपतय एक वेडं पिल्लू तोंडामध्ये अंगठा धरून हसतंय हळू खुदूखुदू! इवल्याशा बोटांच्या इवल्या इवल्या मुठीने ढुशी देत सारख्या सारख्या करतयं बाबाला गुदूगुदू! बा - बा - का - का मध्येच हसू खळखळून बोबड्या बोलांच गाणं एक फिरतंय घरभर दुडूदुडू! - संदीप चांदणे

देशोदेशीची वाद्येः रोमानिया

लेखक विजय पुरोहित यांनी रविवार, 03/04/2016 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वी ‘काही अपरिचित वाद्ये’ या छोटेखानी लेखातून नेटवर भेटलेल्या काही अपरिचित तरीही नादमधुर संगीत वाद्यांचा अल्पस्वल्प परिचय करुन दिलेला होता. अनेक वाचकांनी लेख आवडल्याचे नमूद केले. तसेच मिपावरील काही दिग्गज, जुन्याजाणत्या आयडींनी देखील लेख आवडल्याचे नमूद केले. त्यातूनच पुढे माझ्या मनात असा विचार आला की स्वतंत्र देशनिहाय किंवा विभागनिहाय जर असा संगीतवाद्यांचा आढावा घेतला तर ते जास्त उपयुक्त आणि कल्पक ठरेल. तर त्याप्रमाणे आज सुरुवात करीत आहे ट्रान्सिल्व्हानिया या प्रदेशापासून.

काही अपरिचित वाद्ये

लेखक विजय पुरोहित यांनी शुक्रवार, 01/04/2016 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
यूट्यूबवर सर्फींग करत असताना काही अपरिचित तरीही अतिशय नादमधुर वाद्यांशी संबंधित व्हीडीओज पहायला मिळाले. त्यांच्याशी संबंधित यूट्यूब दुवे येथे मुद्दाम टेक्स्ट स्वरुपात डकवत आहे जेणेकरुन आपणांस ही त्यांचा आनंद घेता येईल. तसेच त्या त्या वाद्याशी संबंधित विकीपीडियावरील माहिती थोड्याफार प्रमाणात सोबत देत आहे. ते ते वाद्य कसे दिसते हे संबंधित यूट्यूब व्हीडीओत दिसेलच, त्यामुळे स्वतंत्र वर्णन करत बसण्याची गरज नाही. तसेच वाद्याचे मूळ इंग्रजी स्पेलींग मुद्दाम दिलेले आहे जेणेकरुन तुम्हाला तो कीवर्ड वापरून यूट्यूबवरील इतर व्हीडीओदेखील पाहता येतील.