दवाई-ऐ-गुलजार!

लेखनविषय:
Gulzar इलाज करवाते हम वही से... जहा जख्म होते है दवाई के लिए जहां पल गुजरे बिना घडी के, जहां हो थोडीसी जमी थोडा आसमां, जहां चाँद पोहोचे बिना इजाजत के, जहां हो मुसाफिर का ठिकाना, जहां आए जाने वाला पल पलट के, जहां दो दीवाने एक शेहर मे, जहां सजते है सपने सात रंग के, जहां पहचान होती है आवाज से, जहां अरमां हो पुरे दिल के, जहां सपनों में दिखे सपने, जहां रात हो ख़्वाबों की, जहां गले लागए झिंदगी, जहां ना हो कोई शिकवा झिंदगी से, जहां नाराज न

छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके

लेखनविषय:
लेखनप्रकार
एखादी कलाकृती किती संभाव्यता निर्माण करु शकते यावर तिची कालातीतता ठरते. आणि त्याचं एक अनोखं उदाहरण म्हणजे अमीर खुसरोचा हा क़लाम आहे : छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके ! मूळ क़लाम खाली दिलायं आणि त्याची अनेकानेक वेरिएशन्स एकेका दिग्गजानं आपल्या प्रतिभेनुसार केली आहेत. अपनी छ्ब बनाइके जो मैं पी के पास गई जो छब देखी पिहू की, तो अपनी भूल गई । इथूनच कल्ला सुरु होतो. कारण हा क़लाम सूफी़याना आहे.

स्वानंदचा बावरा आणि कबीराचा निरंजन

लेखनप्रकार
एक एक सकाळ एक एक नवीन गाणं घेऊन येते. आणि मग तेच गाणं दिवसभर माझा ताबा घेऊन बसतं. दोन दिवसापूर्वी असंच झालं. "हजारो ख्वाहिशे ऐसी" या चित्रपटातलं, "बावरा मन देखने चला एक सपना" हे गाणं आठवलं. स्वानंद किरकिरे साहेबांनी एकंच शब्द वापरला आहे "बावरा" पण काय मौज केली आहे ! या "बावराला" समर्पक शब्द मला मराठीत सापडला नाही. पण त्याला जवळ जाणारा एक शब्द आहे बेभान. तुम्हाला अजून चांगला शब्द सापडला तर कमेंट मध्ये सुचवा. गाण्याचे बोल खाली देतोय.

माहिती हवी - ठाणे परिसरात शास्त्रीय संगीत शिकवणी

लेखनविषय:
लेखनप्रकार
ठाणे पश्चिम परिसरात शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी चांगला गुरु अथवा चांगली संस्था असल्यास सुचवावे, स्वानुभवावरून सुचविल्यास अगदी उत्तम सविस्तर माहिती : मला स्वतासाठी शिकवणी हवी आहे आणि आधी ३ वर्ष शास्त्रीय संगीतात शिक्षण घेतले आहे सध्या घराजवळच शिकवणी हवी असल्याने माहितीसाठी विनंती

To मितवा, (पत्रास कारण की)

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज आरती याचं “राधे… . सृजन…” वाचनात आलं. आणि मग स्वत:ला थांबवताच आलं नाही. एकतर राधा-कृष्ण आवडतात मला. त्यात इतक सुंदर लिहिलेलं.खरच त्या सगळ्या भागांमध्ये रंगून गेले अगदी. लेख तर निव्वळ अप्रतिम. सगळच्या सगळ तस्स डोळ्यासमोर आलं. वाचून झाल्यावर नेहमीप्रमाणे तुला पाठवली लिंक. मला आवडलेलं साहित्य तुला आवडतच कायम. काही गोष्टींबाबत मतभेद असले [सगळ्यात आधी धुक्यातल चांदण] तरीही राधे आवडेल तुला याची खात्रीच होती. ५ मिनिटात तुझा मेसेज अपेक्षित होता. आणि तू केलासही. पण लेखाबद्दल काहीच न बोलता तू मला अचानकच विचारलस, ‘तुला कोमल रिषभ कळतो?’ आणि मला एक क्षण खरच काही कळल नाही. [कोमल रिषभ कळतो मला.

ओ पी नय्यर शैली - एक सांगितिक स्मरण

लेखनविषय:
प्रास्तविक- १९६२ साल . राजकपूरचा "जिस देशमे .." थेटरात लागला आहे . मी इयत्ता दुसरीत . बाहेर लाउडस्पीकर्स वर "आ अब लौट चले, मेरा नाम राजु , ओ बसन्ती पवन पागल " ई गीतांची चलती ." हम राही, हरियाली और रास्ता" इइ सिनेमाची गीतेही कानावर. मी अन माझा भाउ शंकर जय च्या प्रेमात. एस जे माझं फिल्म संगीतातील पहिलं प्रेम. मग १९६५ चा सुमार "गोरी चल न हन्सकी चाल, बहारो फूल बरसाओ, ओ सनम तेरे हो गये" हम कानावर येत रहातात मी एस जे च्या प्रेमात काठोकाठ बुडालेला. मग मी १४ वर्षाचा होतो ,अन "मेरे सनम" येतो.

गझल गायक 'सुधाकर पांडुरंग कदम'

लेखनविषय:
लेखनप्रकार
मौजे आर्णी जिल्हा यवतमाळ येथील कुणी 'सुधाकर पांडुरंग कदम' गझल गायकी करत असावेत. विकिपीडीयावर बर्‍याच केसेस मध्ये ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निश्चित करणे कठीण जाते. तसेच काहीसे सुधाकर कदम यांच्या विषयीच्या लेखाबाबत झाले आहे आंतरजालावर इतरत्रसुद्धा त्यांनी स्वतःबद्दल स्वतः मोठ्या प्रमाणावर लिहिले असणार त्यामुळे स्वतंत्र संदर्भ शोधणे कठिण जात आहे. एकीकडे छोट्या गावांमधील गतीविधींची शहरी माध्यमांकडून दखल कमी घेतली जाऊन मूळ नोंदी कमी पडतात मग संदर्भांच्या अभावी ज्ञानकोशीय दखल घ्यावी अथवा नाही असा प्रश्न पडतो.

इंपॉसिबल मेलडी : ओपी !

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज ओपींचा वाढदिवस. लता मंगेशकरसारख्या स्वरसाम्राज्ञीच्या उपेक्षेवर बेदिक्कत मात करत स्वतःची संपूर्ण कारकिर्द घडवणारा हा एकमेव संगीतकार. `आय एम म्युझिक इल्लीटरेट' असं मनमोकळेपणानं कबूल करून, शास्त्रीय संगीताचं कोणतंही शिक्षण नसतांना केवळ स्वतःच्या स्वरसौंदर्याच्या आकलनावर, एकसोएक बंदिशी बांधणारा हा अवलीया रसिकांना कायम मोहवत आला आहे. कोणत्याही चांगल्या स्वर रचनेचे केवळ तीन घटक असतात, क्लॅरिटी, ऑडिबिलीटी आणि मेलडी. क्लॅरिटी आणि ऑडिबिलीटी हे सारखेच वाटणारे घटक दोन प्रकारे व्यक्त होतात, एक म्हणजे, दोन स्वरांमधलं अंतर आणि दुसरं, त्या अंतरामुळे ऐकू येण्यातली सुस्पष्टता.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखनविषय:
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

कुठं कुठं जाऊ मी सांगायला?

प्रेरणा : "कुठ कुठ जायाच हनिमूनला" ही प्रसिद्ध ठसकेबाज लावणी! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? अहो भरल्या जवानीत 'सर' तुम्ही मला हेरलं हेरलं ते हेरलं अन् जॉबच् माझ्या ठरलं ख्रिसमस झाला, "न्यू" इयर झालं आता फक्त ऑफिस की हो उरलं! मार्केटींग, मॅनेजमेंट, निवांत एच.आर. कोण नाही पर्वा करायला कुठं कुठं जाऊ मी सांगायला? थोडं तरी इन्क्रिमेण्ट करायला! रात्रभर एकटा बसू कसा? क्लायंटला अडचण सांगू कसा? बाकीचे सारे, प्रोफेशनल खरे जातात टायमात ते घरला! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? जमेल तेवढं खेचून मी काम नाही केला आजिबात आराम सकाळ
Subscribe to संगीत