मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुठं कुठं जाऊ मी सांगायला?

चांदणे संदीप · · जे न देखे रवी...
प्रेरणा : "कुठ कुठ जायाच हनिमूनला" ही प्रसिद्ध ठसकेबाज लावणी! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? अहो भरल्या जवानीत 'सर' तुम्ही मला हेरलं हेरलं ते हेरलं अन् जॉबच् माझ्या ठरलं ख्रिसमस झाला, "न्यू" इयर झालं आता फक्त ऑफिस की हो उरलं! मार्केटींग, मॅनेजमेंट, निवांत एच.आर. कोण नाही पर्वा करायला कुठं कुठं जाऊ मी सांगायला? थोडं तरी इन्क्रिमेण्ट करायला! रात्रभर एकटा बसू कसा? क्लायंटला अडचण सांगू कसा? बाकीचे सारे, प्रोफेशनल खरे जातात टायमात ते घरला! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? जमेल तेवढं खेचून मी काम नाही केला आजिबात आराम सकाळचा नाष्टा, रात्रीचं जेवण मिळेना आजकाल बघायला! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? थंडीत मरणाचं गारठून पावसात येतो मी भिजून उन्हाच्या झळा, माझ्याच भाळा जातोच सुट्टी मागायला कुठं कुठं जाऊ मी सांगायला - संदीप चांदणे

वाचने 4665 वाचनखूण प्रतिक्रिया 5

In reply to by प्रचेतस

चांदणे संदीप Mon, 01/04/2016 - 19:12
=)) =)) तेवढ जुन्या जाणत्यांनी "गरम पाण्याचे कुंड" आणि "कोडाईकनाल" या शब्दांमागचा खरा अर्थ सांगितला तर फार उपकार होतील! तेवढीच माझ्यासारख्या नवमिपाकरांच्या ज्ञानात वाढ होईल! :) धन्यवाद, Sandy