मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बालकथा

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

परीकथा - भाग १४ - फेसबूक स्टेटस २.९ - २.१० वर्षे

तुमचा अभिषेक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२० नोव्हेंबर २०१६ आठवड्याभराचा खोकला म्हणून आमचे आईसक्रीम बंदच आहे. आज नेमके तिला सोबत मार्केटमध्ये घेऊन गेलो आणि सोलकढी घेण्याच्या निमित्ताने तिची नजर आईसक्रीम वर पडली. एवढ्या दिवसांचा आतला सुप्त शैतान जागा झाला. आणि त्या बॉम्बे टू गोवा मधील "पकौडा पकौडा" सारखे "आईसक्रीम आईसक्रीम" सुरू झाले. खोकला ताजा असल्याने विकत घेऊन देण्याचा प्रश्नच नव्हता. त्या नादात माझी सोलकढीही राहिली. तिला कसाबसा गुंडाळून तिथून निघालो. आणि तिथेच चुकलो. जेवढे तिला आवरायचा प्रयत्न करत होतो तेवढी ती जास्त दंगा घालू लागली. आईसक्रीमच्या दुकानापासून जसा लांब जाऊ लागलो तसा मला थडाथड लाथाबुक्यांचा प्रसाद मिळू लागला.

चकल्या….. ३४२५

ज्ञानोबाचे पैजार ·
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी. यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे. तिसरी कथा मजेदार आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता? … १) १२३४५६७८९…… मी माझ्या बायकोच्या दबावा मूळे या प्रयोगात सामिल झालो होतो. माझ्या कवटीला भोक पाडताना सुध्दा ती डॉक्टरांना अखंड सूचना देत होती. माझे डोके बधिर असल्यामुळे परत बधिर करायची गरज नाही असे तिनेच डॉक्टरांना सांगीतले होते, ऑपरेशन सक्सेसफुल, डॉक्टरांनी जाहिर केले, आणि हिच्या चेहर्यावर आन्ंदाचा महापुर उसळला, लगेच तिने पर्स मधुन एक बटाटा काढून डोक्याच्या पोकळीत टाकला. आणि आन्ंदाने म्हणाली “ बरं झाल!

संध्याकाळचा एक पर्पल-प्रसन्न संवाद

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आटपाट परगावात आटपाट काम निघाले आणि अस्मादीकांनी एजंट महोदयांना मोबाईल फिरवला, रेल्वेचे कन्फर्म्ड तिकीट उपलब्ध झाले नाही तेव्हा बसगाडी शिवाय पर्याय नव्हता, शिवनेरी शिवाय इतर बससेवांवर मागची बरीच वर्षे चालवलेला बहीष्कार उठवण्याची वेळ आली होती.

लाल टांगेवाला

रासपुतीन ·
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरहो, मी वाचलेल्या आणि न वाचलेल्या पुस्तकांची त्यांच्या प्रकारानुसार (आत्मचरित्रे, विनोदी, कादंबरी ई.) गूगल शीट/वर्कशीट/स्प्रेडशीट बनवत आहे. यामध्ये पाहिलेले अन अजून परत पाहण्याची इच्छा असलेले, आवडलेले अन न आवडलेले मराठी/हिंदी/इंग्रजी/तेलगु/कन्नड्/भोजपुरी चित्रपट ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. आवडत्या/नावडत्या डिशेस व होटेल्स ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. तसंच केलेला आणि न केलेला व्यायाम सुद्धा प्रकारानुसार (पोहणे/पळणे/सायकलिंग) असा ऍप मधला डाटा एकत्र करत आहे.

(डोलकरांचे मनोगत)

ज्ञानोबाचे पैजार ·
(डोलकरांचे मनोगत) पेरणा अर्थातच शतदा भरला एक प्याला शेवटचा मी तृप्त पाहुनी खंबा हा टिचर्सचा रिचवले हजारो पेग मी उदरात सदैव राहो, दरवळ हा गोल्ड फ्लेकचा चखण्याची देउन आहुती पोटाला मी किंचित पिळले अलगद त्या लिंबाला नसता जेवण व्यर्थ मानले असते मज आहे कारण आज घरी जाण्याला धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले कुठे जायचे ते अडखळत सांगितले जरी घरी आल्यावर पडली उपेक्षा पदरी निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !! हे विजय मल्या थोर तुझे उपकार तू दिली आम्हाला रम व्हिस्की बीयर गायबला जरी तू बँकांना देउन तुरी सदैव राहिल तुझी

रेडइंडियन मुलांच्या कथा...

जयंत कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अमेरिका व कॅनडाच्या सरहद्दीवरील एखादी रेड इंडियन वस्ती. रात्रीची वेळ, काठ्यांच्या तंबूंची कापडे मंद हवेत हलताएत... शेकोटीसमोर मुले व त्यांचे मिशोमिस (आजोबा) बसले आहेत. मुलांना गोष्ट सांगेन हे आधीच कबूल केले आहे. आकाशात तारे, चांदण्या चमचम करत आहेत व खाली शेकोटीवर ज्वाळांचा खेळ... मिशोमिस सुरु करतो... ऐका रे मुलांनोऽऽऽ चार शिकारी भाऊ होते.

मटार उसळीची लागलेली चटक कशी सोडवावी?????

निनाद ·
तर मंडळी " दिसा माजी काहीतरी ते डोके खावे,प्रसंगी अखंडीत खातच जावे" असे टफीस्वामींनी सांगुन ठेवले आहे .या उक्तीमुळे रोज काहीतरी हितगुज आपल्याशी करावे असे वाटत राहाते. असो. तर आजचा विषय आहे मटार उसःळ. आपल्या सर्वांचा आवडीचा विषय. उ. त्क्रांतीवादानुसार माणुस हा मिसळ आहारी आहे .तो मिसळाहार आणि उसळाहार दोन्ही आवडीने करतो.त्याला मी कसा अपवाद असणार? जसे मला कळत आहे तेव्हापासुन मि मटार उसळीचा भोक्ता आहे. आम्ही सदस्य लहान असताना आठवड्यातून एकदा आमच्या डोक्यामध्ये मटार उसळ किंवा मिसळ शिजायची.