(डोलकरांचे मनोगत)
लेखनविषय:
(डोलकरांचे मनोगत)
पेरणा अर्थातच
शतदा भरला एक प्याला शेवटचा
मी तृप्त पाहुनी खंबा हा टिचर्सचा
रिचवले हजारो पेग मी उदरात
सदैव राहो, दरवळ हा गोल्ड फ्लेकचा
चखण्याची देउन आहुती पोटाला
मी किंचित पिळले अलगद त्या लिंबाला
नसता जेवण व्यर्थ मानले असते
मज आहे कारण आज घरी जाण्याला
धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले
कुठे जायचे ते अडखळत सांगितले
जरी घरी आल्यावर पडली उपेक्षा पदरी
निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !!
हे विजय मल्या थोर तुझे उपकार
तू दिली आम्हाला रम व्हिस्की बीयर
गायबला जरी तू बँकांना देउन तुरी
सदैव राहिल तुझी आठवण यार
मोह नसे अन्य कुठलाही देहाला
सिंहाचा वाटा जरी असे पार्टीला,
डोळे फिरले पाय जरी लटपटले,
मी नाही घालले लोटांगण धरणीला !!
- थोडा दानव
वाचन
7770
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
आयला ! काय पण मटेरीयल शोधलंय विडंबनाला.
In reply to आयला ! काय पण मटेरीयल शोधलंय विडंबनाला. by संजय क्षीरसागर
क्या बात है सर... जिओ....
In reply to क्या बात है सर... जिओ.... by ज्ञानोबाचे पैजार
=)) क्विता जब्राट
In reply to आयला ! काय पण मटेरीयल शोधलंय विडंबनाला. by संजय क्षीरसागर
:)))
पैजारबुवा, जबरदस्त हो! खरा
थोडा दानव :))
दंडवत स्वीकारावा
व्हॉट इज दिस पैजारबुवा,
In reply to व्हॉट इज दिस पैजारबुवा, by नीलमोहर
अचूक बोललात _/\_
आणि हो,
In reply to आणि हो, by नीलमोहर
डोलकर म्हटल्यावर दर्याचा राजा
In reply to डोलकर म्हटल्यावर दर्याचा राजा by सूड
नाही हो,
:))))))))))))))))))))))))))))
अगागा!
पैजारबुवा रॉक्स....!!!
जबरदस्त हो पैजारबुवा !
क्या बात है !!
हा हा! हे कसं काय राहून गेलं
कमाल आहे सहनशक्तीची
धडपडत लटपटत रिक्षात पाय
हा हा हा !!!