स्मायली जीवन माझे
स्मायली जीवन माझे 
 ताजे...स्मायली जीवन माझे! ![]()
स्मायली जीवन माझे 
 ताजे...स्मायली जीवन माझे! ![]()
सध्या लग्नाचा हंगाम (सीझन या अर्थाने) चालू आहे कुणाचे लग्न असा प्रश्न विचारू नये "वधू-वरांचे" असे सू(ड)चक उत्तर दिले जाईल्.अखिल महाराष्ट्रात प्रांतोप्राती ज्या चालीरीती/प्रथा आहेत त्यातील एक गोंधळ.
असे म्हणतात की नवदांपत्याला पुढील जागरणात काही गोधळ होऊ नये म्हणून जागरण्-गोंधळ प्रथा चालू झाली.
नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य साहित्यच का मिपा वर पोस्ट करावं म्हटलं...
आज वैताग आलाय, कंटाळा आलाय, अशात काही सुचतं का बघावं म्हटलं...
यमक जुळतं का बघावं म्हटलं...
तर ही घ्या एक ओढून ताणून जिलबी

सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच
आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच
कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात
आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच
आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं
कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच
प्रेरणा
जेपी म्हणे' गा मिपादेशी | या लिखाणाची ऐशीतेशी,
बेहतर आहे एका लेखाशी| पण लिहीणार नाही.
खड्यात जावो ही लिखाई| आपल्याच्याने होणार नाही.
समोर सारे हुशार बेणे|विजींनीयर डागटर ऐणे,
काखे वही,हाती पेन| डायरी माझ्या लिहीण.
पण हा कुठला कंपुपणा| आपसात चर्चा कुदवती.
या लोकांना नाही उद्योग |गायब झाले सगळे लोग.
लेंकानो लिहाना रोज |वाचुन तेच तेच बोर झालो.
लिखाई का असते सोपी| रोज कळफळक बडवती ,
कित्येक लेकाचे आयटी | मेगाबायटी प्रतिसाद देती,
आमच्या मित्राने एक बाजू मोठ्या कळकळीने मांडली.
त्याच्या भावनांशी बर्याच अंशी सहमत होताना नाण्याची दुसरी बाजूही समोर यावी असे वाटले.
पुरुषांची बाजू मांडण्याचा केलेला हा केविलवाणा खाटाटोप म्हणाना....
प्रत्येक नजर वाटे
गिळते मी तूज आता
लग्नाचे बंध होती
पुरुषाचे भोग आता ||धृ||
काथ्याकुटास व्हावे तय्यार लेखणीने
भक्षण घटीपळांचे करण्यास लेखणीने
स्वविरोधी बोलण्याला मातीत लोळवावे
माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने
मसीहा चितारण्याची अवगत कला करावी
औक्षण जणू स्वत:चे करण्यास लेखणीने
अफवादि निर्मितेला जेथे उभार तेथे
पेरुन बीज यावे रुजण्यास लेखणीने
भाकड-वृथा कथांच्या कक्षेमध्ये फिरावे
अभिजात सृजनाला डसण्यास लेखणीने
वाणी अरण्यरुदनि शिरजोर होई तेव्हा
संपादकांनी यावे धरण्यास लेखणीने
जेव्हा सदस्य करिति वादळ विराट तेव्हा
द्यावे अभय म्हणावे पळण्यास लेखणीने
-अंगावर उठे 'शबय शबय'
आजकाल मिपावर गुर्जींचा (इथे दोन्ही कानांच्या पाळ्यांना हात लावण्यात आलेला आहे याची ज्याची त्याने नोंद घ्यावी) प्रभाव जास्तच झाल्याने ह्या ईडंबणावर त्यांची छाप दिसू शकते (दिसेलच ;) )...हे ईडंबण गुर्जींना अर्पण...जिल्बी मात्र मीच पाडली बर्का ;)
आम्ची पेर्णा http://www.misalpav.com/node/29809
-------------------------------------------------------------------------------
जगने न तुज्य(कृपे)विना ,
का रडवतो तू मला,
गेला कोंडून तू मजला,
जणू श्वास माझा गेला,
पाठ शिवा हो पाठ शिवा
वार्धक्यातही वाघ रडवला
डाव टाकूनि नवा नवा
बन कमळांचे मुदित* सापळे
लपायास मज असे मोकळे
सत्तांधाला काय का कधी
शिवाशिवीचा खेळ नवा?
टिकटिकविरहित जरी तव पाऊल
अचूक मला पण लागे चाहूल
कित्येकांची चळते बुद्धी
तुझ्या ऐकता पायरवा
उमटू न देईन साद पाऊली
सर्रकन जाईन जशी सावली
सामावून मज घेईल अलगद
हा कमळांचा उभा थवा
मालकी घेशील परी कशाची
तुझ्या पदांची तुझ्या यशाची
पाठलाग मग कुठे संभवे
महाराष्ट्र जर तुला हवा !! ;)
*मोद-मोदी-मुदित
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण,
आकर्षण ते लवणादी प्रोक्षण,
कर्तन करुनी या शब्दांचे
सारे करुया जिल्बी भक्षण
पैसा ताई फू...फुंकरुनी
निखार्यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट  :-/  )
मम हाती तो तांब्या-कसला
जिल्बी पडता जीवच घेई
दुष्ट हत्ती तो काड्या लावी
संधी कधिही सोडत नाही
स्वतःच देतो तांब्या भरुनी
आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/  )
धन्या वाकडू सामिल यांना
हल्ली तो ही काड्या सारी
धन्या वा कडू... असला तरिही
दगड मारण्या तयार भारी