आरोग्यदायी पाककृती

|| बिर्याणीस्तोत्रम् ||

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in जे न देखे रवी...
28 Feb 2016 - 2:16 pm

नमस्कार लोकहो,

मराठी दिन आणि बोलीभाषा सप्ताहादि सुंदर उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हे संस्कृतचे शेपूट जरा विचित्र वाटण्याची शक्यता आहे. पण पुच्छवक्रतान्यायास मिपाकर समजून घेतीलशी आशा आहे. तस्मात सादर करीत आहो:

|| बिर्याणीस्तोत्रम् ||

अथ ध्यानम्|

ओदनं प्रथमं स्मृत्वा तत्पश्चात् कुक्कुटं स्मरेत्|
स्मरेत् खाद्यरसाँश्चैव स्वादो यैश्च प्रदीयते ||1||

एराणे वै पुरा कल्पे अजायत् प्रथमं हि सः |
तस्मात्कलियुगे शीघ्रं प्रविष्टो भारतेऽपि सः||2||

कलौ यद्यपि वर्धेत खल्वधर्मो भृशं भुवि |
अभवत्तु शुभं किञ्चित्तथापि पश्यतामहो ||3||

इतिहासआरोग्यदायी पाककृती

मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
27 Feb 2016 - 12:47 pm

डॉक्टर साहेबांची माफी मागुन आपले काव्य पुष्प मी मिपारसिकांच्या चरणी सविनय सादर करतो. या अज्ञबालकाचे चार तोडके मोडके बोबडे बोल तुम्ही गोड मानून घ्याल ही आशा करतो

वेळ संध्याकाळची मी पाळतो
मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो

फारसे चखणे नसावे वाटीतही
मी उगाचच मेन्युकार्डही चाळतो

ही मळलेली वाट आहे पण इथे
परताना मी किती ठेचकाळतो

कोणते असतात ग्रेव्हीत हे कलर
रंग शर्टाचा कसा डागाळतो

केवढे जडशीळ झाले हे नयन
देव जाणे कसा तोल सांभाळतो

गझलसुभाषितेतंत्रविज्ञानकृष्णमुर्तीअदभूतआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगजेंद्रगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीरोमांचकारी.हझलवीररस

हायकु (कायकु)-२

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
3 Feb 2016 - 2:29 pm

पुर्वीचा प्रयत्न

बाप लेकीचा
अल्लड प्रश्न
साजुक उत्तर
बालक कोण ? पालक कोण ? गुंता दुस्तर
=====
कालचक्र
हलले पान
हसली कळी
झुकुन पाही (सुकली) फुलरांगोळी
======
थोरांची ओळख (?)

आधी पाहू धर्म
मग शोधू जात
ते उत्तुंग कर्तुत्व,सदगुण ई. ठेवू बासनात
========

सहचरी
डोळ्यात धाक
लटका राग
झोपेतही माग ,....जागेपणी विसरल्या आठवणींचा

चारोळ्यासमाजजीवनमानमौजमजाआरोग्यदायी पाककृतीकविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइल

बायको गेली माहेरी..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
7 Jan 2016 - 10:26 am

बायको गेली माहेरी,आलो मी मिपावरी
परी कर्तव्याची दोरी, आता गळ्यात आहे.

कळले आहे तिला, नवरा मिपा खुळा
मारून एक खिळा, ती गेली आहे

दिसाल जर ऑन-ला-ईनं, लगेच फोन-मारीनं! (दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif )
आणि करिन तुमच्याशी, व्हॉट्स अप बोल-बंदी.

दिवसातून काही काळ,थोडी सकाळ/संध्याकाळ
एव्हढाच ऑथोराईज वेळ, तिकडून मिळाला आहे

धोरणनाट्यपाकक्रियाबालगीतशुद्धलेखनफलज्योतिषमौजमजाअभंगआरोग्यदायी पाककृतीकविता माझीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचौरागढफ्री स्टाइलहास्य

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
5 Jan 2016 - 1:06 pm

प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ...

कवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडारेखाटनdive aagarvidambanअनर्थशास्त्रअनुवादअभंगआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचिकनचौरागढछावाजिलबीनागद्वारप्रवासवर्णनप्रेम कविताफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमराठीचे श्लोकमुक्त कवितावाङ्मयशेतीविठ्ठलशिववंदनाशृंगारहिरवाईहास्यशांतरस

हवाबाणहरडेचघळ

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
23 Dec 2015 - 3:21 pm

पेरणेमधल्या हळूवार भावना या कवितेतही जपायचा प्रयत्न केला गेल्या आहे. तरी सुध्दा अतिसंवेदनाशील वाचकांनी कृपया खालील काव्य वाचू नये. होणार्‍या परीणामास मंडळ जबाबदार रहाणार नाही.

घरात् सोय नव्हती, म्हणुन माळरानात गेला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,

पाकक्रियाविडंबनऔषधोपचारकृष्णमुर्तीआरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीप्रवासवर्णनप्रेम कविताभूछत्रीमुक्त कविता

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
23 Dec 2015 - 12:00 pm

क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
स्वप्नात झाले होते
पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!)
पंतप्रधान मोदींचे सचीव !! :)

क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
त्यांनी विचारले गेले
वर्ष भर काय केले ?
ओबामां फोनु आला
डू यु नो अँड व्हॉट दे सेड ?
हॅप्पी न्यू यीअर !!
ओह मिपाकरांना आमचा
निरोप द्या
ओह मिपाकर
हॅप्पी न्यू यीअर !! बरं का !
हॅप्पी न्यू यीअर !!

प्रेमकाव्यमुक्तकविडंबनउखाणेम्हणीसुभाषितेविनोदप्रवासभूगोलनोकरीअर्थकारणराजकारणdive aagarmango curryvidambanअनर्थशास्त्रअभंगअभय-काव्यआरोग्यदायी पाककृतीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीप्रवासवर्णनप्रेम कविताफ्री स्टाइलबालसाहित्यभावकविताभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितावाङ्मयशेतीस्वरकाफियाहास्यवीररसअद्भुतरसशांतरस

मिपावरी कोनाडा असावा.....

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
9 Dec 2015 - 4:47 pm

मैत्रीण पहिली कशी मिळाली
लाइन कोठे कशी क्रॅास झाली
निसंकोच आम्हा इथे व्यक्त व्हाया
मिपावरी कोनाडा असावा.....

घरी सासू येणे कसे आवरावे
वाचाळ पत्नी, कसे शांतवावे
समस्येवरी यां चर्चा घडाया
मिपावरी कोनाडा असावा.....

कसा धीर गळतो, कसा त्रास होतो
बिछान्यावरी का वनवास होतो
उपाय त्यावर जाणून घ्याया
मिपावरी कोनाडा असावा.....

भविष्य मेनू आरोग्य ज्ञान,
उपयुक्त साहित्य प्रत्येक पान
पंचअंग भावे पुरुषस्वभावा
मिपावरी कोनाडा असावा.....

बालगीतआरोग्यदायी पाककृती

(जिलेबी कथा - लिहायचे नियम)

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
27 Nov 2015 - 6:22 pm

'पेरणी'साठी बियाणे!

मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत!

प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये!

धोरणवावरधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाबालगीतमुक्तकविडंबनभाषाव्युत्पत्तीशब्दक्रीडाशुद्धलेखनविनोदसाहित्यिकसमाजkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाज्योतिषराजकारणशिक्षणमौजमजाअनर्थशास्त्रआरोग्यदायी पाककृतीइशाराकाणकोणजिलबीभूछत्रीमार्गदर्शनलावणीवाङ्मयशेतीहास्य

सहाचा वडा

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
15 Oct 2015 - 11:39 am

प्रेरणा
काय करणार लोकं पण अश्शा जिलब्या पाडतात ना, आवरता आवरत नाही.
सहाचा वडा गरमागरम असतो!
वड्याच्या कव्हरला गुदगुल्या केल्या कि
आपला हात मस्तसा भाजतो,
चटणी हवी काय म्हणून
मिश्कीलपणे विचारतो!

सहाचा वडा झणझणीत असतो!
शरीराचा रोम न् रोम जागा करतो
जिभेवर लसणीचा स्वाद पसरवतो,
अजून मिरची हवी होती का? म्हणून
खोडीलपणे विचारतो!

पाकक्रियाआरोग्यदायी पाककृती