कॅरॅक्टर ओळख
वॉल्टर व्हाइट : केमिस्ट्री टीचर , अ सायको अँड अ जिनिअस. जो स्व्तःच्या फॅमिलीसाठी काहीही करेल !
जेस्सी : अॅन ईमोशनल फूल, जो वॉल्ट साठी काहीही करेल !
स्कायलर व्हाइट : हाउसवाईफ, वॉल्टची बायको, जी स्व्तःच्या फॅमिलीसाठी काहीही करेल !
हँन्क : डि ई ए एजंट , वॉल्ट चा साडू !
मरि : हँक ची बायको !
जर तुम्ही ही सिरिज पाहीली नसेल, तर अवश्य पाहा ! नेट्फ्लिक्स वर अजुनही आहे !
प्रिमाइस : अ केमिस्ट्र्रि टिचर टर्न्स माफिआ !
वॉल्टला कॅन्सर आहे, स्टेज ४ ज्यातून तो जगू शकत नाही.
जेस्सी त्याचा केमिस्ट्रीचा विद्यार्थी, जो सध्या Methamphetamine बनवतो आणि विकतो.
पुढचं काहीही मी सांगत नाही ! ही सिरिज फक्त बघण्यासाठी आहे ! आणि बघण्यासाठी आहे ! त्यासाठी हा एवढासा प्रपंच
जरुर बघा आणि कळवा !
प्रतिक्रिया
14 Apr 2025 - 8:55 am | चांदणे संदीप
उन्मेशराव, या धाग्याबद्दल खूप खूप धन्यवाद! ___/\___
दोन दिवसांपूर्वीच एका जेष्ठ आणि श्रेष्ठ मिपाकरास मी याबद्दल सांगत होतो.
आता पर्यंत चार वेळा बघून झाली आहे आणि ही सिरीज पाहिल्यानंतर कुठल्याही क्राईम ड्रामा मध्ये तो थ्रिल येत नाही. डोक्याला मुंग्या येतात तसा. अलिकडेच महाराजा (विजय सेतुपतिचा) बघितल्यावर तसे झाले होते एकदाच!
मी या सिरीजचा जबरदस्त फॅन आहे. याच्याबरोबरच बेटर कॉल सॉल हा ब्रेकिंग बॅडचा प्रिक्वेल (पण एका खास पात्रासाठी) आणि अल कमिनो (अ ब्रेकिंग बॅड मूव्ही) हा चित्रपटही जरूर बघावा. ब्रेकिंग बॅडबद्दल बोलावं/लिहावं तितकं कमीच आहे. २०१४ च्या अखेरीस ही पहिल्यांदा ही सिरीज बघून पूर्ण केली होती आणि त्यानंतर एके दिवशी पिंपरीच्या रस्त्यावर एका बुलेटच्या पाठीमागे हाईजनबर्गला रेडियम मध्ये पाहिलं. कसले रोमांच उठले होते तेव्हा, शब्दांत सांगू शकत नाही.
एखादा ब्रेकिंग बॅड फॅन क्लब सुरू करावा काय?
सं - दी - प
15 Apr 2025 - 4:52 pm | उन्मेष दिक्षीत
जरुर ! ब्रेकिंग बॅड ट्रिविया ही स्टार्ट करायला हरकत नाही :)
16 Apr 2025 - 9:08 pm | प्रसाद गोडबोले
उन्मेष ,
मिपावर परत लिहिते झालात हे पाहुन छान वाटलं !
ब्रेकिंग बॅड ही माझीही खुप आवडती सीरीयल आहे , पण मला एल कॅमिनो हा चित्रपट जास्त आवडाला .
एकुणच उत्कृष्ठ पटकथा, दिग्दर्शन आणि अभिनय ह्या सर्वच बाबतीत यशस्वी असलेली काही मोजकी उदाहरणे आहेत त्यात ब्रेकिंग बॅड चे स्थान खुप उच्च आहे !
बाकी बेटर कॉल सॉल हे देखील तसेच अफलातुन आहे !
16 Apr 2025 - 9:51 pm | उन्मेष दिक्षीत
मधे ब्रेक घेतला होता ज्यामधे मी एका कारणामुळे चांगलाच ब्रेक झालो होतो ईमोशनली !
एल कॅमिनो बघतो. मला जेसी ची हालत बघवत नाही :)
16 Apr 2025 - 9:57 pm | उन्मेष दिक्षीत
बेटर कॉल सॉल पाहीले आहे ! परत बघणार आहे.
आता ब्रेकिंग बॅड ४थ्यांदा पाहणे आले :) ! स्कायलर चा इतका राग का येतो मला कळत नाही :)
सगळ्यात महत्वाची आणखी एक कॅरॅक्टर ओळख मुद्दामुन लिहिली नाही :) उगाचच स्पॉइलर नकोत म्हणुन.