एक किस्सा
नमस्कार. मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे. चूकभूल सांभाळून घ्या :)
नमस्कार. मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे. चूकभूल सांभाळून घ्या :)

फोर जी फाईव्ह जी ची संपर्क क्रांती करणारी दुनिया आपल्या देशात अवतरली आणि आपल्या जालीय जीवनातही एक मोठा बदल घेऊन आली. आता स्मार्टफोन झालाय आपला नवीन तळहात आणि जालविश्व् बनलंय आपलं दुसरं घर. फेसबुक, इन्स्टा, टिकटॉक वगैरे आता घरचेच झालेत पण गेली काही वर्ष टिकटॉकर्स, स्टॅन्ड अप कॉमेडीयन्स आणि यू ट्युबर्स च्या जोडीला प्रचंड फोफावलेला एक नवा वर्ग म्हणजे फूड ब्लॉगर्स / Vloggers.
कातरवेळ
--------------------------------------------
जेव्हा केशरी रंगाचं अस्तित्व पुसत
राखाडी रंग आकाशात पसरत जातो
तेव्हा उत्फुल्लपणाचं अस्तित्व पुसत
अस्वस्थपणा मनात उतरत जातो
मनात अनामिक हुरहूर दाटून येते
कारण ती कातरवेळ असते
जेव्हा पाखरं माघारी फिरतात
जेव्हा माणसं घरात शिरतात
तेव्हा कुठल्याकुठल्या आठवणींची
वटवाघळं मनात भिरभिरतात
कधी कोणाची दुखावणारी
मनात खोल याद असते
कारण ती कातरवेळ असते
तर मी असे म्हणतो, कि वाय नोबडी इज ईंटरेस्टेड टु नो ट्रुथ ऑर लिव लाइफ द वे इट इ़ज, द लाइट वे ?
लोकांना अस्वस्थता अजिबातच नाही का ? लाईफ फुल्ली एंजॉय करावेसे वाटत नाही का ? सारख्या धक्का देणार्या गोष्टी टाळाव्याश्या वाटत नाहीत का ?
मजा म्हणजे काय, निश्चिंत असावे असे वाटत नाही का ? एकमेकाला काल्पनिक बंधनात बांधणेच आपण खरे मानतो आहोत का ?
चालू घडामोडी सोडून आपल्या आयुष्यात बदल घडू शकतात हे मान्यच नाही का ?
चक्क यु जीं नी सुद्धा (एकदा) म्हटलं आहे, कि यु हॅव मेड हेल आउट ऑफ धिस ब्युटिफुल हेवन ! , युजी कोण विचारू नये, आमचे दैवत आहे !
पांढरं फरवालं स्वेटर
---------------------------
खूप थंडी होती . खूपच . नकोशी , बोचरी , गारठवणारी , हाडं फोडणारी थंडी !
रात्रीचे दहाच वाजले होते . एवढ्या लवकर रस्त्यावरची गर्दी थंडीने जुलमाने हाकलून लावली होती . रस्त्यावर तुरळक गाड्या अन माणसं .
नदीकाठच्या रस्त्यावर काही झोपड्या . त्यांना झोपड्या तरी कसं म्हणायचं ? नावापुरताच आडोसा . त्यात माणसं ... माणसंच की ती - परिस्थितीने फटकारलेली .
तान्ह्या पोरापासून वाकलेल्या म्हाताऱ्यापर्यंत .
अस्तित्व
----------------------------------------------------------------------------------------------------------------
लोहगडाच्या पायथ्याशी वसलेलं आमचं गाव . आमच्या छोट्याशा गावच्या छोट्याशा शाळेत एक पाहुणे आले होते. आबा . आम्हां मुलांना भेटायला. शिक्षणातून आयुष्य कसं घडवता येतं , यावर त्यांचं भाषण होतं . शिक्षणाच्या माध्यमातून ते समाजसेवा करत होते .
पावसाचे दिवस.पण पाऊस काही नव्हता.त्यामुळे आम्ही शाळेच्या मैदानातच होतो . लाल मातीमध्ये बसलेलो. तर आमच्या मागे, हिरवा झालेला लोहगड धुक्याची तलम पांढरी ओढणी पांघरून बसलेला.
हे डोंगरकड्या
---------------------------------------------
हे डोंगरकड्या ,
गड्या , काय डौलात उभा आहेस तू !
छाती पुढे काढून
हे डोंगरकड्या ,
तुझ्या उन्नत छातीवर
बरसत असतील मेघ
अन त्यांच्या मोतियांची माळही
रुळत असेल तिच्यावर
अन तूही ते मोती
अलगद सोडत असशील
तुझ्या पायागती
भरभरून
हे डोंगरकड्या ,
हिवाळ्यात धुक्याची शाल लपेटत असशील
तुझ्या त्या छातीभोवती
तरुणीच्या धवल अवगुंठनासारखी
अन गार वारंही गपगुमान
बाजूबाजूने वाहून निघून जात असेल
तुझ्या पोलादी छातीला नमून
अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल
काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत.
आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे. लेख दिवाळी अंकासाठी स्वीकारला गेला अथवा नाही, हे लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवण्यात येईल.
-दिवाळी अंक समिती
नमस्कार मिपाकरहो...
मूर्ती लहान पण
--------------------
ते एक भेटवस्तूंचं भलंमोठं दुकान होतं .
आरव त्या दुकानाबाहेर उभा राहून शोकेसमधल्या वस्तू पहात होता . डोळ्यांवर येणारे केस मागे करत . लॉकडाउनच्या काळात केस फारच वाढले होते बिचाऱ्याचे . सारखे सारखे कापायला आईला वेळ तर असायला हवा ना !
बापरे ! किती वस्तू होत्या तिथे . तऱ्हेतऱ्हेच्या चिनी, फेंगशुईच्या वस्तू . छोट्या बांबूंच्या कुंड्या ,तोरणं- माळा . अनेक छोटी, खोटी फुलझाडं. शिवाजी महाराज , बुद्ध , कृष्ण आणि अनेक देवमंडळी . त्यामध्ये काही विदेशी मंडळीही होती बरं का . जुन्या युरोपिअन थाटाचे कपडे घातलेले देखणे तरुण - तरुणी .
एका ओळखीच्या मुलाचे लग्न होते. मी मानलेली बहीण असल्याने मला सर्वत्र मानाचे निमंत्रण होते. लग्न झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी मोठी मेजवानी ठेवली. आमचे भाऊ हे मध्यमवर्गीय परिवारांत जन्माला आले होते आणि मुलीच्या प्रेमात पडले होते तेंव्हा गरीबच होते. हळू हळू स्वतःच्या हिमतीवर त्यांनी बऱ्यापैकी संपत्ती निर्माण केली. त्यामुळे सर्वाना बाहेरून ते श्रीमंत वाटले तरी त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर होते. मेजवानीत आमची ओळख मुलीच्या मावशीबरोबर झाली.