मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिपश्चंद्र

विअर्ड विक्स ·

किसन शिंदे 19/03/2025 - 15:22
पुस्तकाच्या तुलनेत मालिका व्यवस्थित जमून आलेली नाही हे माझे वैयक्तिक मत आहे. कथेमध्ये खुप जास्त पोंटेशियल असूनही पटकथा व्यवस्थित न लिहिल्याने मालिका गंडलीय. अभिनयाच्या बाबतीत फक्त राजीव खंडेलवाल तेवढा एकटाच पुस्तकातल्या रवि या व्यतिरेखेशी साम्य दाखवणार वाटला. आणि न्यायाधिश दिक्षित एक.

In reply to by किसन शिंदे

प्रतिसादाबद्दल आभार . पुस्तक वाचलेलं नाही . पण एखाद्या पुस्तकावरून आधारित चित्रपट व मालिका पहाताना एक दोष जाणवतो तो म्हणजे कथासार अगोदरच माहित असते आणि संदर्भ माहित असल्यामुळे रंजकता नाहीशी होते . या लेखात मी दोन घटना संदर्भ दिले आहेत. कथा त्यावरून सुचली का काही सत्यता दडलेली आहे ह्याचा पुस्तकात उल्लेख केला असल्यास कळवावे.

सस्नेह 20/03/2025 - 21:48
मालिकेचे माहिती नाही. पुस्तक वाचले. मध्ये मध्ये जरा पाल्हाळिक वर्णन आहे तेवढे सोडले तर कथानक लक्षणीयरीत्या उत्कंठावर्धक आणि वेधक आहे. कादंबरी आवडली. मालिका बघेन जमल्यास.

In reply to by सस्नेह

प्रतिसादाबद्दल आभार . जरूर पहा . या लेखाचा उद्देशच हा आहे कि का आदित्य सरपोतदार सारख्या मराठी माणसास हि मालिका हिंदीत बनवावी लागली हे आपण जाणणे फार गरजेचे आहे. मराठी चित्रपट कोणी पाहत नाही आणि OTT वर कोणी विचारत नाही. मराठी भाषा अभिजात म्हणून घोषित केले तरी आजकालच्या जगात पुस्तकांपेक्षा द्रुकश्राव्य हे भाषा प्रसाराचे प्रभावी माध्यम ठरू शकते आणि इथेच आपण मागे पडतोय असे माझे प्रांजळ मत आहे.

In reply to by सस्नेह

बऱ्याच दिवसानी तुमचा प्रतिसाद पाहून आनंद वाटला! कश्या आहात ह्या मालिकेबद्दल ऐकून आहे. पाहीन लवकरच!

खरेतर दा विन्ची कोड नंतर अश्या साच्यावर बर्याच जणांनी कादंबर्या/मालिका/चित्रपट बनवुन हात धुवुन घेतले. एखादा पुरातन खजिना/रहस्य आणि त्याचा सांभाळ करणारे अथवा रहस्यातला एखादा भाग माहीती असणारे सध्याचे जमान्यातले वंशज वगैरे.बरेच क्रिप्टीक संदेश/श्लोक वगैरे आणि त्याची उकल करताना करावा लागणारा संघर्ष,त्यातले थ्रिल वगैरे वगैरे. ही मालिकाही त्याच पठडीतली आहे पण खजिना एकदम मिळतो ते थोडे अतर्क्य वाटले. तशी बरी आहे मालिका. वन टाईम वॉच.

In reply to by कानडाऊ योगेशु

प्रतिसादाबद्दल आभार . या लेखात मी दोन घटना संदर्भ दिले आहेत. आपले त्याविषयी काय मत आहे ? कारण त्या घटना संदर्भ कुठेतरी गुप्ततेस वाव देतात. १. इतके वर्षात का कोणी राज्यपाल इतिहास संशोधकाप्रमाणे आपल्याच घरात भुयार शोधू शकला नाही ? २. उत्तराखंड ची एक व्यक्ती का कोणताही विशेष दिवस नसताना शिवनेरी दर्शनास वयाच्या ७५ नंतर स्वतः चढत गेले ?

नमस्कार मंडळी ! ऐतिहासिक मराठी पार्श्वभूमीवर हिंदी जाल दुनियेतील मालिका बघण्याचा मनसुबा असेल तर पुढील लेख वाचून आपणास एक पर्याय मिळू शकतो. " प्रतिपश्चंद्र " हि डॉ प्रकाश कोयंडे लिखित एक ऐतिहासिक रहस्य कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित " द सिक्रेट्स ऑफ शिलेदार " हि मालिका तप्ततारा जालदुनियेवर उपलब्ध आहे. "NATIONAL TREASURE MOVIE " पठडीतील हि मालिका आहे. हि मालिका आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केली आहे. मध्यवर्ती भूमिकेत राजीव खंडेलवाल आणि सई ताम्हणकर आहेत. जोडीला दिलीप प्रभावळकर ,आशिष विद्यार्थी आणि कानन अरुणाचलम आहेत. रहस्य कथा असल्यामुळे कथाविस्तार टाळतो.

बाजाराचा कल :१७ मार्चचा आठवडा

युयुत्सु ·

लॉस हार्वेस्टिंग चालु आहे, हे आर्थिक वर्ष पुर्ण होत नाही... तो पर्यंत मार्केटला असेच टाइट पट्टीत ठेवण्यात येईल.... हे आर्थिक वर्ष पुर्ण होइपर्यंत मार्केट असेच बोअरिंग असेल...

In reply to by आंद्रे वडापाव

वामन देशमुख 16/03/2025 - 22:17
ये फॉल तो सिर्फ एक झांकी थे... पिक्चर अभिंभीं बाकी हैं.
सहमत आहे आणि तसेच कॉल्स विकले आहेत.

In reply to by युयुत्सु

पुढील ५ वर्षे मार्केट , (२०५०० ते २५५००) या रेंज मध्येच आट्या पाट्या खो खो खेळेल ... (आय अँम कंकरिंग विथ शंकर शर्मा ) According to Sharma, the benchmark Nifty 50 index is set to offer zero returns from the September 2024 highs over the next four to five years.

बाजाराचा कल :१७ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, मी स्वत:ला चिमटे काढून कंटाळलो! मागील पोस्टमध्ये केलेले "युयुत्सुनेट मात्र पुढच्या आठवड्यात नकारात्मक अनिश्चितता दाखवते आहे." हे भाकीत परत एकदा खरे ठरले आहे! हे कसे ते समजाऊन घ्यायचे असेल तर निफ्टीचा साप्ताहिक कालचौकटीवरील आलेख पाहणे योग्य ठरेल. आकृती १ - पुढील आलेखात निळ्या बाणाने दाखवलेली मेणबत्ती काल संपलेल्या आठवड्याची आहे. ही मेणबत्ती काय दाखवते? मार्केट निश्चित्पणे वर पण गेले नाही आणि फार खाली पण गेले नाही, म्हणजे अनिश्चित राहिले.

अभ्यासोनी मग ...

अनन्त्_यात्री ·
"अभ्यासोनी मग | प्रकटावे" ऐसे कुण्या रामदासे | सांगितले "दिसामाजी काही | तरी ते लिहावे प्रसंगी वाचावे | अखंडित" असेही वदले | तेव्हा रामदास मना उपदेश | करताना आता मला सांगा | लिहिणे, वाचणे अभ्यास करणे | कोणा झेपे? अभ्यास कशाला | प्रकटण्या आधी? इंटरनेट हाती | असताना ! हाती जे येईल | फॉरवर्डावे तेच पुढच्यास ठेच | लागेना का वायफळ मळे | पिकवू अमाप काळाची झडप | येवो सुखे

The Matrix: एका अद्भुत Sci-Fi प्रवासाची कथा

कपिलमुनी ·

कपिलमुनी 13/03/2025 - 18:09
लेखामध्ये असलेल्या इंग्रजी लिपीबद्दल क्षमस्व बरीच नाव, तंत्रज्ञन , इनंग्रजी चित्रपट असले कारणाने इंग्रजी वापर जास्त आहे .

कंजूस 13/03/2025 - 19:40
असे चित्रपट किंवा सायफाय प्रकारातले अजून पाहिले नाहीत. अर्थात चित्रपटासाठी कथावस्तू ही काल्पनिक आणि मनोरंजन म्हणून असते. त्या कोनातूनच पाहिले पाहिजेत. "What is real? How do you define real?” हे जर ग्रीक तत्त्वज्ञानातून पाहिले तर "real" या शब्दावरच प्रश्नचिन्ह पडते. "Absolute" म्हणायचे असेल का? जगात एकमेव, इतरांपासून वेगळे स्वतंत्र काहीच नाही. एकमेकांच्या तुलनेत हेच बरोबर. ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी समस्येचं स्पष्टीकरण /सत्यता / proof देतांना इतक्या गोष्टी विचारात घेतल्या आहेत की " या या गृहितकांना धरून हे विधान सत्य आहे असे काटेकोर बांधीव उत्तर देतात. म्हणजे अमुक नियम, अमुक स्थितीमध्ये अमुक हे खरे / सत्य /real म्हणून शकतो. स्थिती, वेळ आणि गती या तीन गोष्टी प्रत्येकांसाठी वेगळ्या आणि एकमेव असतात. हे विसरून चालणार नाही. Matrix आणि set theory या गणितातील कल्पना वरवर साध्यासुध्या वाटल्या तरी गहन आहेत. सिनेमाच्या कथेतून प्रेक्षकांना विचार करायला लावणे आणि मनोरंजन करणे ( भारावून टाकणे) हे साध्य होते. समीक्षा आवडली.

विजुभाऊ 14/03/2025 - 10:44
मॅट्रिक्स हा सिनेमा पाहिल्यावर डोके बधीर झालेले होते. एकूणातच भन्नाट आहे वेगवान स्टंट्स , ३६० डिग्री शॉट्स , तसेच बुलेट स्लो मोशन वगैरे त्या काळी अद्भूत होते. वेगळ्या धाटणीची तरीही खिळवून ठेवणारी कथा. हा त्याचा मुख्य आधार स्तंभ. आजही तितकाच भावतो

खुप कमी कलाकृती किंवा चित्रपट ... आपण जीवनात 'अनुभवतो' .. हा चित्रपट पाहून .. असं वाटलं .. आपण फुल्ल झोपेत असताना कोणी , थंड पाणी तोंडावर मारलं आणि धबा धबा दोन्ही मुस्काडात लावल्यावर जो शॉक बसेल नं ... तसं काहीसं झालेलं ...

झकासराव 15/03/2025 - 16:02
जबरदस्त चित्रपट आहे फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते

In reply to by झकासराव

टीपीके 15/03/2025 - 19:52
जबरदस्त चित्रपट आहे
+१
फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा
+१
फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय
+१
दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते
+१

कपिलमुनी 15/03/2025 - 17:43
सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे

टेक्निकल क्वेरी
बौद्ध विचारधारा
मॅट्रिक्स चित्रपटात आहे ही बौद्ध विचारधारा आहे का ? पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना? ब्रह्म सत्य जगन मिथ्या अर्थात दिसणारे भासणारे जग हे मोठ्या असून आपले मूळ स्वरूप जे की ह्याच्या पारे असे असलेले ब्रह्म आहे हा विचार बौद्ध मतातही येतो का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 02/04/2025 - 19:12
मॅट्रिक्सच्या शेवटी
ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।
हे गाणं आहे ब्वॉ https://youtu.be/A67OhOUoUsc?si=qjAHPlPY4nNyyuuN बौद्ध मतामध्ये ब्रम्ह नाही पण अद्वैताचा स्वीकार आहे, द्वैत नाकारले आहे.कर्माचा पुरस्कार आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 03/04/2025 - 14:04
पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना?
ह्याचा काही रेफरन्स (विकीपीडीया व्यतिरीक्त) आहे का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न विचारणे हा एकप्रकारे "आम्हाला काही माहीत नाही पण तुम्ही म्हणाल ते आम्ही खोडून काढू" ह्या आशयाचा, सप्तभंगीनय अर्थात जैन तत्त्वज्ञानाचा किंवा तदृश आविष्कार मानता येईल का ?

In reply to by सोत्रि

आणि म्हणूनच आपल्याला इतिहासात जैन आणि वैदिक असा शास्त्रार्थ , खंडन मंडण झालेले दिसत नाही. जैन धर्म हा बौद्ध धर्माचा इतकाच प्राचीन असून त्यांच्याशी कोठेही वाद विवाद झाल्याचे दिसत नाही ह्याचे कारण हेच आहे की त्यांना फक्त दुसऱ्याचे मत खोदून काढण्यात यश आहे, स्वतःचे मत प्रस्थापित करण्यात नाही. मग काहीही बोलण्यात अर्थच रहात नाही. पण ह्या सप्तभंगीनय मुळे बोलणे खुंटले तरी त्या नंतर आलेले मौन हे संदेहात्मक आहे, निश्चयात्मक नव्हे. उदाहरणार्थ मी जेवढा केवढा वेदांताचा अभ्यास केला आहे त्यानुसार ब्रह्म सत्य आहे , जग मिथ्या आहे, मिथ्या म्हणजे खोटे असा अर्थाने नव्हे तर भासात्मक असे. आपला भास आहे , माया आहे. ज्ञानेश्वर माऊली त्याला चिदविलास म्हणतात अर्थात पाण्यावर उठलेले तरंग हे पाणीच आहेत तसे जग हे ब्रह्मावर उमटलेले तरंग असल्याने ब्रह्मच आहेत ! तस्मात् किमान वेदांती दृष्टिकोनातून ब्रह्म सत्य जग मिथ्या हे मला माहीत आहे, ज्ञात आहे, प्रचीत आहे. आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो तेव्हा त्या सर्वं मध्ये जग देखील येते का असा मला पडलेला प्रश्न आहे. जर बौद्ध जगात देखील शून्य आहेत असे म्हणत असतील तर हे आकलन होणारा मी हा जगाचा भाग असल्याने शून्य नाहीये हे खात्रीलायक असल्याने इथेच बौद्ध मताचे खंडन होईल ! अर्थात माझे अध्ययन हे सनातन वैदिक परंपरेत झाले असल्याने बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. (पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही, हा प्रकार कुमारील भट्ट ह्यांनी फार पूर्वीच केला आहे, मला त्यात रस नाही.) म्हणून मी प्रथम प्रश्न विचारला होता. अर्थात ह्यावर सप्तभंगीनय चा आश्रय घेऊन प्रश्नाला प्रतिप्रश्न येत असल्यास हे जैन तत्वद्न्यान झाले. मग काहीही बोलणे खुंटले. तात्पर्य काय की मॅट्रिक्स चित्रपटात "तुम्ही अनुभवत आहात हे सत्य नसून , जग मिथ्या मायाजाल आहे." हे तत्वद्न्यान बौद्ध नसून वैदिक तत्वज्ञानाच्या जवळ जाणारे आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 13/04/2025 - 12:46
तत्वज्ञान ३ प्रकारचे असते:
  1. ऐकीव (परोक्ष)
  2. चिंतनमय (परोक्ष)
  3. प्रत्यक्ष, अनुभूतीमय (अपरोक्ष)
परोक्ष ज्ञान हे स्वतःची अनुभुती नसते, त्यामुळे त्याचं खंडन-मंडण करण्याची तार्किक गरज पडत असावी, भूतकाळात आणि आताही. अपरोक्ष ज्ञान ही इंद्रियतीत अनुभूती असते जी शब्दात पकडणे शक्य नसते. जो अनुभूतीच्या त्या मितीला स्पर्श करून येतो तो सगळ्या खंडन-मंडणच्या पलीकडे गेलेला असतो कारण हे सगळं मिथ्या आहे हे त्याने अनुभवलेलं असतं. आणि काही प्रस्थापित करण्याचीही गरज नसते कारण ते ज्ञान आहेच, प्रस्थापित केलं काय आणि नाही काय, हे त्याला कळलेलं असतं.
बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही,
अशा विरोधाभासी आणि एकंदरीतच ऐकीव माहितीवर आधारित बौद्ध तत्वज्ञानावर जी निष्कर्षात्मक मतं तुमच्या लेखात आणि प्रतिसादात येतात त्याने कुतूहल वाटत आणि ती निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घ्यायची इच्छा होते. प्रतिप्रश्न करण्याचे कारण कोणाच्याही मताचे खंडन-मंडण हा खचितच नसतो. कारण भारतीय तत्वज्ञाचा डोलारा ह्या प्रश्नमंजुषेवर आधारलेला आहे. प्रतिप्रश्न फक्त निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घेण्यासाठी असतो जेणेकरून चुकीची मतं, धारणा पसरू नये. वानगीदाखल:
आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो
मुळात बौद्ध धर्म असं काही नाहीयेय, त्यामुळे नेमकं कोण शून्य शून्यं म्हणतोय? ते शून्य म्हणजे नेमकं काय? हे प्रश्न पडतात आणि तेच विचारले जातात. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय: 1. होय. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 2. नाही. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 3. होय आणि नाही. दोन्ही अर्थाचे संदर्भ ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 4. मला माहित नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 20/04/2025 - 18:24
बुद्धाच्या शिकवणूकीत, "जग हे सत्य आहे का" (किंवा नाही) हे असं डायरेक्ट नाहीयेय. त्याच्या पटिच्चसमुप्पाद सुत्त, अनिच्चा (Anicca) सुत्त आणि अनत्त लक्षण सुत्त (Anattalakkhaṇa Sutta) ह्या तीन महत्वाच्या आणि एकमेकांशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या सूत्रांपैकी अनिच्चा (Anicca) सुत्तांत सर्व अनित्य/नश्वर असल्याचे विषद केले आहे. अनिच्चा (Anicca) / अनित्यबोध – सर्व गोष्टी क्षणभंगुर आहेत. म्हणजे आपण ज्या गोष्टी “स्थिर सत्य” म्हणून धरतो (जसे की शरीर, वस्तू, नाती, इ. म्हणजे एकंदरीत जग), त्या प्रत्यक्षात क्षणाक्षणाला बदलत आहेत. जरी सर्व काही बदलत असलं तरी, ते अस्तित्वात आहे, फक्त ते “स्थायी” नाही, नश्वर आहे. संदर्भ: अनिच्च सुत्त (Anicca Sutta) — साम्युत्त निकाय, SN 22.45 - (साधक) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे . बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे . Neo

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 21/04/2025 - 20:55
जग मिथ्या आहे.
न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्राचे (जड जगत् ) नियम सब-ऑटोमिक जगतात (सूक्ष्म कण), क्वाँटम फिजिक्सला, लागू पडत नाहीत, तिथले नियम आणि वास्तव यांत प्रचंड भिन्नता असते. पण त्यामुळे जड जगत् , जे सूक्ष्म कणांनी बनले असते, ते मिथ्या होत नाही. न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्रांच्या नियमानुसार तेही सुरळीत चालू असते.
बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे
हे समजून घेणे हा झांगडगुता आहे. समजून घ्यायचे म्हणजे नक्की काय? तर कोणीतरी हे असं म्हणालंय हे विचारांच्या पातळीवर मानायचे. मानायचे म्हणजे तशी श्रद्धा ठेवायची. ते इतकं सोप्पं असत तर सगळेच मुक्त झाले असते आणि ही चर्चा करायलाच कोणी नसतं. पण चर्चा तर होते आहे... अरे हो, पण जगन्मिथ्या असं म्हटलं गेलय, म्हणजे ते मानल पाहिजे, म्हणजे ही सगळी चर्चाही मिथ्याच झाली की :) असो,
जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे.
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय. पण जन्म-मृत्यू चक्र, जगणं, आहेच. ते सत्य आहे. त्यामुळे जे काही सभोवताली घडतंय ते मिथ्या नाही त्याच्या मागे कार्यकारण भाव आहे (cause & effect) हे स्वानुभूतीच्या पातळीवर अनुभवलं की खालील भवचक्राचे ज्ञान होते: अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (दु:ख) ह्या चक्रातल्या तृष्णा आणि आसक्ती ह्या कड्या तोडल्या की भवचक्र (जन्म-मृत्यू चे चक्र) तोडता येते. ह्या कड्या तोडत सर्व कर्मसंस्कारांचे निर्मूलन म्हणजे मुक्ती, म्हणजेच निर्वाण (गीता ६.१५ श्लोकातंल निर्वाण) - (नश्वर) सोकाजी

In reply to by सोत्रि

एकदा नक्की सांगा काय ते
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय.
बौद्ध तत्जत्वज्ञानुसार जग मिथ्या आहे की सत्य ? कारण सनातन तत्त्वानुसार तरी जग मिथ्या च आहे, पुढील सगळच मिथ्या आहे, चर्चाही मिथ्या आहे. सगळं सोप्पेच आहे , सगळे मुक्तच आहेत, मिथ्या चर्चेचा उद्देश मिथ्या व्यामोह हटवणे हाच आहे. एकदा ह्या जगाच्या मित्यत्वाचीं जाणिव झाली की बोलायला, चर्चा करायला काही राहतच नाही. ह्याला माऊली "शब्देवीण संवादु, दुजेविण अनुवादु" असे म्हणतात. तात्पर्य इतकेच की जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे आणि तुम्हाला हे कळले आहे तर आपली चर्चा सफल झाली आहे. आता बोलायला काहीच नाही. :) आणि तुम्ही म्हणत असाल की जग मिथ्या आहे हे माझे गृहितक आहे तर मग चर्चेच्या सुरुवातीलाच मी म्हणालो ते मॅट्रिक चित्रपटात गृहीत धरलेली संकल्पना हिंदू ठरते, बौद्ध नव्हे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 22/04/2025 - 10:55
जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे
ह्या मूळ प्रश्नावर दिलेले प्रतिसाद वाचूनही हाच निष्कर्ष काढला असेल तर खरंच बोलायला काहीच नाही! :) इत्यलम! - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 23/04/2025 - 02:44
ओह्हो, त्या प्रतिसादाच्या शिर्षकामुळे घोळ झाला तर. पर्याय ३ ऐवजी चूकून २ टाईपला होता आणि शिर्षक रिव्हू करायचे राहून गेले. पण फक्त प्रतिसादाचं शिर्षक वाचून, प्रतिसाद न वाचताच निष्कर्ष काढलेला दिसतोय :) असो, टायपोची चूक माझी आहे, त्यामुळे ती नम्रपणे मान्य करून खाली बसतो! - (माणूस) सोकाजी

In reply to by सोत्रि

समजा तुम्ही पर्याय ३ निवडला असला तरीही जास्त फरक पडत नाही कारण प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय ३: होय आणि नाही ३.१. नाही . समजा जग अर्थात मॅट्रिक्स सत्य नाही, मिथ्या आहे , भास आहे तर मग त्यातील दु:ख तृष्णा दुखापासुन मुक्ती , मुक्तीचे उपाय आदि सर्व च मिथ्या ठरते ! अर्थात मी आधी जसं म्हणालो तसं जगाचे मॅट्रिक्स चे मिथ्यत्व लक्षात येणे हा ह्या चक्रातुन बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरतो. ( आणि एकदा मॅट्रिक्स मधुन बाहेर पडल्यावर ही चर्चा ही मिथ्याच आहे . ) ३.२. होय. समजा बौध्द तत्वज्ञानानुसार जग अर्थात मॅट्रिक्स सत्य आहे तर त्यातुन बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही. बौध्दांच्या मते - वेदांती लोकं ह्या जगाच्या बाहेर , मॅट्रिक्स च्या बाहेर असा जो आत्मा , ब्रह्म वगैरे म्हणत आहेत तो अनात्मा अर्थात शुन्य अर्थात झीरो ह्या अर्थाने नव्हे तर वॉईड ह्या अर्थाने ! तस्मात मॅट्रिक्स मधुन तुम्हाला डिटॅच केले गेले की काहीही नाही केवळ व्हॉईड आहे. अर्थात दोन्हीही प्रकारे मॅट्रिक्स चित्रपटात वापरलेली संकल्पना ही बौध्द न ठरता वेदांती ठरते . आता हा प्रश्न इतका महत्वाचा का आहे ? तर काही लोकं म्हणातात - बुध्द हा विष्णुचा अवतार आहे आणि काही लोकं म्हणातात - श्रीमदाद्यशंकराचार्य हे प्रच्छन्न बुध्द आहेत . ह्याचे मला कळलेले कारण म्हणजे नागार्जुनाचा माध्यमिक मार्ग अर्थात शुन्यवाद अनात्मवाद आणि श्रीमदाद्यशंकराचार्य प्रणित उपनिषद ब्रह्मसुत्र आणि भग्वदगीतेवर आधारित अद्वैत वेदांत हे दोन्ही खुप जवळचे आहेत. फरक बस इतकाच आहे की - सर्व जग, मॅट्रिक्स हे मिथ्या आहे म्हणाल्यावर उरते त्याला बौध्द शुन्य म्हणत आहेत , त्यावर वेदांत म्हणत आहे की - अरे पण त्या शुन्याचे आकलन ज्याला होते तो आत्मा तो आहेच की ! तोच आत्मा आहे , ब्रह्म आहे. आणि केवळ तेच सत्य आहे , बाकी सर्व मॅट्रिक्स , जग मिथ्या आहे. भास आहे. चिद्विलास आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 08/04/2025 - 02:09
चित्रपट लेखिका-दिग्दर्शिका भगिनी दोघीही ट्रान्सजेंडर महिला आहेत. मॅट्रिक्स लिहिताना कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.

In reply to by कॉमी

Bhakti 08/04/2025 - 06:26
कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.
असे वाटले नाही... याबाबत पण अजून समजून घ्यावे लागेल. आणि मॅट्रिक्स मध्ये इतकं स्पष्टपणे मायाजालचाच प्रत्येक काळी समावेश आहे, वैदिक अध्यात्म संकल्पनांची क्षणोक्षणी आठवण येत राहते

Bhakti 17/04/2025 - 11:19
मॅट्रिक्सच्या एका भागात(२ का ३ आठवत नाही.)निओ निर्मात्याला भेटतो तेव्हा तो सांगतो ,तू या प्रोग्रॅम मोडायला आला आहेस तो पहिला नाही,पाचवा की सहावा आहे.याचा संबंध क्लप वा युग या संकल्पनेशी वाटतो.ओरॅकल मला वाटतं प्रकृती आहे,अर्थात निओ पुरूष आहे.शेवटी जो चेहरा आहे तो परब्रम्ह वाटतं आहे.पण स्मिथ कोण आहे? ते तीन होते पहिल्यांदा ते सत्व,रज,तम त्रिगुण होते का? मग केवळ एकच गुण रज म्हणजे असंख्य स्मिथ तय्यार होतात का? -अतिविचारी भक्ती ;):)

कपिलमुनी 22/04/2025 - 10:54
द मॅट्रिक्स मधले बौद्ध रेफरन्स माया - सगळं भासमात्र आहे बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं. द मॅट्रिक्समध्येही आपण बघतो की माणसं एका बनावट जगात जगत आहेत – कम्प्युटरनी बनवलेलं वर्च्युअल रिअॅलिटी. हेच तर माया! आणि निओ – मुख्य पात्र – जेव्हा जागा होतो, तेव्हा त्याला समजतं की तो खरा जगतच नव्हता. ही जागृती म्हणजेच बोधी. संसारचक्र आणि मुक्ती बौद्ध तत्त्वज्ञानात “संसार” म्हणजे जन्म-मरणाचं चक्र. हे चक्र अज्ञान आणि आसक्तीमुळे सुरू राहतं. मॅट्रिक्स हेही असंच एक चक्र आहे – सगळे लोक त्यात अडकलेत, रोजचं तेच जगणं, कोणताही विचार न करता. मोर्फियस, ट्रिनिटी हे लोक जणू बोधिसत्व आहेत — जे स्वतः जागे झालेत आणि इतरांनाही मुक्त करत आहेत. बोधी – आत्मज्ञान निओ जेव्हा Matrix वर पूर्ण नियंत्रण मिळवतो, तेव्हा तो केवळ शक्तिमान होत नाही, तर त्याला वास्तव काय आहे याची जाणीव होते. हीच बोधी, आत्मज्ञान. Oracle ज्या प्रकारे निओला सरळ उत्तरं न देता त्याला विचारात टाकते, तो संवाद – हा झेन बौद्ध परंपरेतला कोअन (koan) वाटतो. अहंभावाचा लय (अनात्मा) बौद्ध धर्मात "अनात्मा" म्हणजे "स्व" ही कल्पनाच खोटी आहे. आपण जे आहोत असं वाटतं, ते खरं नसतं. निओचं परिवर्तन हेच दाखवतं — तो “मी” असण्याच्या पलीकडे जातो, सगळं विश्वमय होतो. पुनर्जन्म आणि रूपांतरण निओचा पुनर्जन्म — विशेषतः पहिल्या भागात तो मरण्याच्या टप्प्यावर जातो आणि परत उगम पावतो — हेही आध्यात्मिक पुनर्जन्म दर्शवतं. बौद्ध मार्गामध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे — जुनं सोडून नव्याच जाणीवेकडे वाटचाल. आत्मपरीक्षण Oracle चं वाक्य लक्षात आहे का? "You’re not here to make the choice. You’ve already made it. You’re here to understand why you made it." हे अगदी बौद्ध झेन पद्धतीचं आहे — जेथे उत्तरं नसतात, फक्त विचार आणि अनुभव असतो. शेवटचा विचार द मॅट्रिक्स बघताना जर आपण केवळ दृश्य प्रभावांवर लक्ष न देता त्यामागच्या तत्त्वज्ञानाकडे बघितलं, तर तो एक गूढ आणि आध्यात्मिक प्रवास वाटतो. बौद्ध धर्माने जसं आपल्याला आत्मसाक्षात्कार आणि मुक्ती शिकवली, तसंच निओचा प्रवास आपल्याला दाखवतो — की आपल्याला जागं व्हायचं आहे, Matrix (माया) मधून बाहेर यायचं आहे. हाच तर संदेश आहे – “Wake up, Neo.”

In reply to by कपिलमुनी

बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं.
माया ब्रह्म वगैरे मांडणी वेदांतातील आहे. बौद्ध तत्त्वज्ञान ब्रह्म आत्मा वगैरे मानत नाहीत . अनात्मा उल्लेख तुम्हीच केलेला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 23/04/2025 - 03:02
बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.
तुम्ही म्हणाला होतात , “बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे.” त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो, जो यथार्थ नाही. पण तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढण्याचा तुम्हाला अधिकार (फ्री वील ;) ) आहे आणि तो मान्यही आहे. (ऐकीव गोष्टींवर आधारित निष्कर्ष काढण्याच्या प्रयत्नांच नेहमीच कुतूहल वाटतं राहिल.) - (कुतूहल न शमलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

वर सविस्तर उत्तर दिलेले आहे : https://www.misalpav.com/node/52791#comment-1192893
त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो
हे बघा , मॅट्रिक्स अर्थात जग मिथ्या मानले आणि निओला त्या मॅट्रिक्स मधुन बाहेर काढले तर तो जो काही निओ दिसतो आहे त्याला वेदांती आत्मा म्हणातात , बौध्द मतानुसार आत्मा असं काही नाही, सर्व शुन्य आहे. व्हॉईड आहे , मग काय उरलं ? अर्थात बौध्द मतानुसार मॅट्रिक्सच्या "बाहेर" असं काहीच नाही . मग स्क्रीन ब्लॅकाऊट होऊन पिक्चर संपणार नाही का ! चुकीचे असेल तर तुम्ही सांगा - बौध्द मतानुसार काय होईल निओला मॅट्रिक्स मधुन बाहेर काढल्यावर! अवांतर : मला काहीकाही लोकं विचारतात की तुला 'कळलं' आहे ना , तु तर 'बाहेर पडला' आहेस ना , मग तु कशाला ह्या भानगडीत पडतोस चर्चा वगैरे करण्याचा ? -कारण एकदा बाहेर पडुन परत आत आल्यावर "मजा " आहे राव !! bliss

Bhakti 22/04/2025 - 11:30
मॅट्रिक्स (1999) हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाशी अनेक प्रकारे जोडला जाऊ शकतो, विशेषतः मायावाद (माया) आणि आत्म्याच्या स्वरूपाविषयीच्या संकल्पनांशी. खाली काही प्रमुख मुद्दे आहेत जे या संबंधाला स्पष्ट करतात:माया आणि मॅट्रिक्स: वेदांतात, माया ही विश्वाची भ्रामक शक्ती आहे जी खरे वास्तव (ब्रह्म) लपवते आणि आपल्याला भौतिक जगात अडकवते. मॅट्रिक्समध्ये, "मॅट्रिक्स" हे एक संगणकीय सिम्युलेशन आहे जे मानवांना खरे वास्तव (त्यांचे गुलामगिरीचे जीवन) पाहू देत नाही. निओ आणि इतर पात्रे या मायेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, ज्याप्रमाणे वेदांतात आत्मा मायेच्या बंधनातून मुक्त होऊन ब्रह्माची जाणीव करून घेतो.आत्मा आणि निओचा प्रवास: वेदांतात, आत्मा हा शाश्वत, अविनाशी आणि ब्रह्माशी एकरूप आहे. निओचा प्रवास हा आत्मज्ञानाच्या शोधासारखा आहे. तो स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची (The One) ओळख करून घेतो, ज्यामुळे त्याला मॅट्रिक्सच्या मर्यादांवर मात करता येते. हा प्रवास वेदांतातील "अहं ब्रह्मास्मि" (मी ब्रह्म आहे) या तत्त्वाशी मिळताजुळता आहे.द्वैत आणि अद्वैत: वेदांतातील अद्वैत तत्त्वज्ञान सांगते की खरे वास्तव एकच आहे (ब्रह्म), आणि भौतिक जगातील द्वैत (द्वंद्व) हे मायेमुळे आहे. मॅट्रिक्समध्ये, निओला मॅट्रिक्स आणि वास्तविक जग यांच्यातील द्वैत समजते, आणि शेवटी तो या द्वैताच्या पलीकडे जाऊन मॅट्रिक्सच्या नियमांवर नियंत्रण मिळवतो. हे अद्वैताच्या विचाराशी सुसंगत आहे, जिथे सर्व काही एकच आहे.मुक्ती आणि मोक्ष: वेदांतात, मोक्ष म्हणजे मायेच्या बंधनातून मुक्ती आणि ब्रह्माशी एकरूप होणे. मॅट्रिक्समध्ये, निओ आणि इतर पात्रांचा उद्देश मानवांना मॅट्रिक्सच्या गुलामगिरीतून मुक्त करणे आहे. निओचा स्वतःचा बलिदान आणि पुनर्जन्म (चित्रपटाच्या शेवटी) हे मोक्षाच्या संकल्पनेशी प्रतीकात्मकरीत्या जोडले जाऊ शकते.गुरू आणि मार्गदर्शन: वेदांतात, गुरू हा आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतो. मॅट्रिक्समध्ये, मॉर्फियस आणि ओरॅकल ही पात्रे निओला त्याच्या खऱ्या सामर्थ्याची आणि उद्देशाची जाणीव करून देतात, जे गुरूच्या भूमिकेसारखे आहे.कर्म आणि निवड: वेदांतात, कर्म आणि स्वतंत्र इच्छा (free will) यांचा समतोल महत्त्वाचा आहे. मॅट्रिक्समध्ये, "निवड" (choice) हा एक केंद्रीय विषय आहे. ओरॅकल निओला सांगते की तो आधीच निवड करून आला आहे, पण ती समजून घेणे त्याच्यावर अवलंबून आहे. हे वेदांतातील कर्म आणि आत्मनिर्णयाच्या संकल्पनेशी मिळते.निष्कर्ष: मॅट्रिक्स हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाला थेट उद्धृत करत नसला, तरी त्यातील थीम्स—मायेचे भ्रम, आत्मज्ञानाचा शोध, आणि खऱ्या वास्तवाची ओळख—वेदांताशी सखोलपणे जोडलेल्या आहेत. निओचा प्रवास हा वेदांतातील आत्म्याच्या मुक्तीच्या मार्गाचे प्रतीक आहे, जिथे तो मायेच्या पडद्याला फाडून सत्यापर्यंत पोहोचतो.

Bhakti 10/05/2025 - 10:57
मॅट्रिक्सचा चौथा भाग परवा पाहिला.निओला परत मॅट्रिक्समध्ये यंत्र पाठवतात.जवळपास ६० वर्षे होतात.निओ सर्व विसरलेला असतो.तो एक गेम डिझायनर होतो.थोडाशा आठवणींसह तो मॅट्रिक्समध्ये पूर्वी घडलेल्या घटनांवरून मॅट्रिक्स नावाचाच गेम बनवतो.ट्रिनिटीलाही वाचवून मॅट्रिक्समध्ये पाठवतात.शेवटी निओला इतर लोक मॅट्रिक्सबाहेर काढतात.मग तो ट्रिनिटीलाही बाहेर काढतो.आता मसिहाची शक्ती ट्रिनिटीमध्ये येते. तेव्हा ते स्मिथला विचारतात.तू दोघांना का वाचवलं कोणा एकालाच वाचवायचं होत.तेव्हा तो सांगतो तुम्ही एकत्र असाल तेव्हाच शक्ती परिपूर्ण असाल हे लक्षात आले.तुम्ही एकमेकांशिवाय शक्तीहीन आहात. इथेच शिवशक्ती अद्वैत संकल्पना लक्षात येते.शिव शक्ती शिवाय अधुरा आहे.यांचे द्वैत केवळ माया आहे.हे दोन्ही अद्वैत आहेत. We are in simulation https://youtu.be/X9TbJWb8k2Y?si=EmpIqJoNE55ClIKS खुपच भारी मुलाखत आहे.जर आपण मॅट्रिक्समध्ये आहोत तर प्रेम ,द्वेष,पैसा या गोष्टी कशा जस्टीफाय करणार याची खुप सुंदर उत्तरे दिली आहेत.निवांत यावर टिपणं काढून लेखच देईन.तोपर्यंत नक्की ऐका. -अतिविचारी भक्ती

एका तांत्रिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा असलेला जग, इंटरनेटने नुकतीच पायाभरणी केलेली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) संकल्पनांना अजूनही फक्त विज्ञानकथांमध्ये स्थान असलेला काळ म्हणजे एकविसावे शतक. याच्या उंबरठ्यावर १९९९ साली एक सिनेमा प्रदर्शित होतो, जो प्रेक्षकांच्या विचारसरणीला एक नवीन दिशा देतो—The Matrix.

अंतराळ स्थानक बघण्याचा सोहळा आणि लखलखत्या तार्‍यांची मांदियाळी!

मार्गी ·

उत्तम लेखन ! आमचा विशेष अभ्यास नाही, आणि टेलिस्कोप ही नाही, पण नुसते गुगल स्काय मॅप्स पाहून रात्रीच्या वेळेला एकांतात ग्रह तारे नक्षत्र न्याहाळत बसणे हा एक अत्यंत आल्हाददायक अनुभव असतो हे कैक वेळा अनुभवलं आहे . लिहित रहा . पुलेशू

नमस्कार. ८ मार्चच्या शनिवारी लोणावळ्याच्या जवळ अंजनवेल ऍग्रो टूरीझम इथे मी व माझा मित्र गिरीश मांधळे- आम्ही आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेतला. महिला दिनी अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स असलेलं स्पेस स्टेशन बघण्याचा थरार सर्वांनी अनुभवला! त्याशिवाय शुक्राची कोर, गुरूच्या उपग्रहांचा लपंडाव, चंद्रावरचे कित्येक विवर, पहाटेच्या आकाशातले तारकागुच्छ, आकाशगंगेचा दुधाळ पट्टा, सकाळी ट्रेकिंग व ध्यान आणि समारोपाला सूर्य डागाचं निरीक्षण अशी खूप पंचपक्वान्नांची मेजवानी तिथे मिळाली. त्या अनुभवाचं हे शब्दचित्र आपल्यासोबत शेअर करत आहे.

दोसतार चे निमित्त

विजुभाऊ ·

सौंदाळा 12/03/2025 - 07:46
भारीच मोठ्या बक्षिसापेक्षा हे अनुभव जास्त आनंद देऊन जातात.

दीपक११७७ 12/03/2025 - 13:55
अभिनंदन । बादवे, मित्रा साठी नवीन मित्र जूना मित्र असे वर्गिकरण केले जाते तसे मुलांच्या बाबतीत केले जात नाही जसे हा माझा नवीन मुलगा हा माझा जूना मुलगा

चौथा कोनाडा 14/03/2025 - 14:15
व्वा ..... भारीच की ! लेखणीची कमाल .... कथानक आपल्याशीच मेळ खातंय ... किती मोठं यश लेखकाचं ! DSTRFLO हार्दिक अभिनंदन विजूभाऊ !

काल अचानक एका जुन्या मित्राचा फोन आला. तो कुठल्याशा गावात एका अभिवाचन स्पर्धेचा परिक्षक म्हणून तिथे गेला होता. तेथे एका मुलाने (वय वर्षे १४) माझ्या दोसतार कादम्बरीतील एक उतारा अभिवाचनासाठी निवडला होता. मित्राला सध्या सम्पर्कात नसल्याने दोसतार बद्दल काहीच माहिती नव्हती. पण पुस्तकातील उतारा धमाल वाटल्याने त्याने त्या मुलाच्या पालकांकडे चौकशी केली. त्याच्या पालकानी पुस्तक दाखवल्यावर त्याने थेट मला फोन लावला.त्या मुलाच्या पालकाना माझ्याशी बोलायचे होते. त्या मुलाला कोणीतरी दोसतार पुस्तक भेट म्हणूण दिले होते.

साहित्य चोराला अद्दल घडवायचा निर्धोक स्वस्त व टिकाऊ उपाय

स्वरुपसुमित ·

Bhakti 11/03/2025 - 22:30
खुप तांत्रिक मुद्दे आहेत.निवांत समजून घेते.

मित्रानो साहित्य चोरी हा प्रकार महाराष्ट्रात पार तुकाराम महाराज असल्यापासून लोकांना माहीत आहे ऑनलाईन विश्वात तर कॉपी पेस्ट लगेच शक्य असता फेसबुक आधी फक्त गुगल आणि ऑर्कुट ला शोधून आपले लिखाण चोरी शोधतात येत होती पण आता १७६० social नेटवर्किंग मुळे ते पण अवघड झाले परत कोणी साहित्य चोरी केली तर लोक आपापल्या वाल वर त्याच्या नावाने खडे फोडून ठणाणा करतात आतापर्यंत मराठी विश्वात तरी एखाद्या साहित्य चोराला चोरी खाली अटक किंवा जेल झाल्याचे ऐकिवात नाही २ वर्ष आधी एका कविता चोरी प्रकरणी पोलीस कम्प्लिन्ट ची कॉपी वायरल होत होती तोच सर्वात मोठा पराक्रम इथे वर्षानुवर्षे खून ,बलात्कार ,दरोडे लोकांना

धनवर्षाव (शतशब्दकथा)

अनन्त्_यात्री ·

विजुभाऊ 11/03/2025 - 13:42
फारच प्रेडिक्टेबल वाटली श श क. दुसरे म्हणजे त्यात दोन वाक्ये कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत. याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर? आणि फाशी ठोठावली... गुप्तधनासाठी..कन्याबळी देणाऱ्या बापाला.

मांत्रिक किडनॅपर होता. आहुती देणाऱ्याला हे माहित नव्हते की आपलीच मुलगी किडनॅपरने आपल्यासमोर बळी देण्यासाठी ठेवलीय.

सर्वपित्रीची रात्र गावकुसाबाहेर तीन पिंपळामधल्या जागेत माझ्या चर्मासनासमोरचं धगधगतं, वखवखलेलं आहुतीकुंड. शेवटच्या आहुतीच्यावेळी मांत्रिकानं लालभडक पट्टीनं डोळे झाकलेयत माझे. ही महाआहुती ..कारण ती अर्भकाची. याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर? आता असल्या वांझोट्या विचारांना थारा नाही.

माझी मदतनीस..

आजी ·

विजुभाऊ 10/03/2025 - 15:15
बरोबर आहे. मदतीनीसाना ही स्वतःच्या प्रगतीचा हक्क आहे. जसजसे शिक्षणाचे प्रमान वाअढत जाईल तसतसे ज्याना मदतनीस लागतात त्याना स्वावलम्बी व्हावे लागेल

स्वधर्म 10/03/2025 - 17:00
आजी, तुंम्ही अगदी पांढरपेशा माणुसकीने तुमच्या घरी येणार्या मदतनीस बाईंशी वागत आहात, ते ठीकच. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो: मुळात आपल्या समाजात काही लोकांना ही दुसर्यांची नकोशी कामे कमी पैशात करावीच का लागावीत? कोणत्याही प्रगत देशात असा दररोज दुसर्याच्या घरी येऊन काम करणारा वर्ग निदान एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. कारण? तिथे एवढी आर्थिक विषमता नाही. आपल्या देशात मध्यमवर्गीयांना सुध्दा अशी दररोज सेवा घेणे परवडते, कारण त्यांच्या आणि मदतनीसांच्या आर्थिक ऊत्पन्नात बरीच मोठी तफावत आहे. असा वर्ग उपलब्ध असणे, हे कमालीची आर्थिक विषमता असल्याचे लक्षण आहे, आणि ते योग्य नाही. बाकी आपण त्यांच्याशी व्यक्तीगत चांगले वागत असणे व त्याबद्दल स्वतःला बरे वाटणे हे ठीक, पण माणसाच्या श्रमांना एवढी किंमत आली पाहिजे की सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना अशी सेवा घेणे परवडलेच नाही पाहिजे. अगदी अंथरुणाला खिळलेले, वयस्कर लोक यांना मदतनीस लागतात. काही शिक्षक घरी येऊन शिकवतात, पण त्यांना अशी माणुसकी पुरेशी नाही, तर त्यांचे आभार मानून त्यांना व्यवस्थित सन्मानपूर्वक पैसे द्यावे लागतात.

In reply to by स्वधर्म

खूप छान विचार स्वधर्म! खर आहे! १५००-२००० रुपयात महिनाभर भांडे घासणे नी लादी पुसणे हे कष्टाचे काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल आदर वाटतो. त्यांचे वयही बऱ्याचदा ४०-५० च्या घरात असते तरीही न थकता त्या चार ते पाच घरे दिवसातून करतात. छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते. सणासुदीला सुटीही नसते. अशी पिळवणूक अनेक ठिकाणी दिसते अश्या लोकांबद्दल वाईट वाटते. काही लोक कंटाळून काम सोडतात नी फळे, भाजीच्या गाड्या लावतात किंवा रिक्षा चालवणे वगैरे करतात! एकंदरीत ह्या परिस्थीतिला देशात प्रचंड असलेली लोकसंख्या कारणीभूत आहे असे वाटते! पण जिकडे मध्यम नी उच्च मध्यमवर्गीय लोक एका मुलानंतर दुसरे मूल जन्माला घालायला दोन ते तीनदा विचार करतात तिकडे हीच लोक हयगय न करता चार पाच तरी मूले सहज जन्माला घालतात! हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही. कधी कधी वाटते हे परिस्थितीच्या रेट्यामुळे आहे कधीकधी वाटते ह्या लोकांनाच सुधारायचे नाही!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 11/03/2025 - 08:59
हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही.
शिक्षणाचा अभाव यामुळे हे घडतं. आणि अजून एक समान गोष्ट दिसते या मदतनीस बायकांचे नवरे दारूडेच,जुगारी वगैरेच कसे ? शून्य टक्के पोषण असलेल्या:'दारूवर बंदी' सरकार घालणार नाही,हे चक्र मोडायला बाईच झिजत राहणार :(

In reply to by Bhakti

ही काही पटलं नाही भक्ती ताई. काही मोजक्या लोकांना दारू पिणे निषिध्द आहे , ब्रह्महत्येचे पातक आहे पण इतरांनी दारू आवर्जून प्यावी . दारू पिण्यासारखी देशभक्ती नाही. दारू सिगारेट पिणे आणि पेट्रोलची गाडी चालवणे ही सर्वात मोठ्ठी देशभक्ती आहे कारण सर्वात जास्त कर ह्याच वस्तूंवर आहे. दारू पिऊन गाडी चालवणे हा तर देशभक्तीचा परमोच्च आदर्श आहे . दारूवरचा टॅक्स, पेट्रोल चां टॅक्स, RTO कडे दंड , कोर्टात सेटिंग , वकिलाना नोकरी , न्यायाधीशाला नोकरी . किती किती म्हणून आर्थिक उलाढाल होते ह्या दारू मुळे . उगाच दारूला बदनाम करू नका. - सुधाकर संस्थापक अध्यक्ष तळीराम फॅन क्लब आर्य मदिरा मंदिर =)))) {हलके घ्या. विनोद आहे =))))}

In reply to by प्रसाद गोडबोले

दारूवर सरसकट बंदी हवी, दारू पिताना एखादा सापडल्यास दारू बनवणारा नी पिणारा ह्याना दगडाला बांधून लादेनसारखे अरबी समुद्रात बुडवायला हवे! कितीतरी संसार दारूमुळे उध्वस्त होतात! - दारूला स्पर्श न केलेला बाहुबली!

In reply to by प्रसाद गोडबोले

खिक्क! तुम्ही गुरु म्हणून ४ वर्षाआधी भेटला असतात तर आज मस्त टाकी फुल्ल करून कुठे तरी पडून असतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ 12/03/2025 - 09:48
छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते
आयटी हमालांची अवस्था फार काही वेगळी नाहिय्ये. नवीन फ्रेशर्स ना १० ते १५ हजारांवर रबवून घेणार्‍या बर्‍याच कंपन्या आहेत. कितीतरी लोकासाठी तर फॅमिली लाईफ हा प्रकार म्हणजे लग्झरी असते. पण करतात ना. नाईलाज असतो. पोटासाठी आणि ब्यांकेच्या हप्त्यांसाठी करावी लागते अशी नोकरी

In reply to by स्वधर्म

Bhakti 11/03/2025 - 08:55
नाच गं घुमा हा काही महिन्यांपूर्वी आलेला सिनेमा पण मदतनीस आणि मालकीण यांच्या सौजन्यावर होता.या सिनेमा विषयी खूप मिश्र प्रतिक्रिया वाचल्या होत्या म्हणून पाहणार नव्हते.पण एकेदिवशी कंटाळा आला म्हणून पाहिला :) पण यातही हीच कहाणी आशाताई मदतनीस ची होती.आशाताई खतत्रुड नवरा, झोपडपट्टीतली आदळाआपट,मुलाची काळजी ,ट्रॅफिक, बसच्या वेळा या सगळ्यांची कसरत करून येतं.त्यात मालकीणचे अनेक गैरसमज होतं.पण शेवटी आशाताईच मालकीणचे खुप मोठ्ठे स्वप्न पूर्ण करायला मदत करते.आणि आशाताईलाही मालकीण खुप मदत करते.सिनेमा चांगला आहे,थोडा मिर्च मसाला अधिक आहे. पण आज मालकीण असो वा मदतनीस एक बाई दुसऱ्या बाईला समजून घेऊन पुढे जात आहेत,हे खुप मोलाचं आहे.

लेख आवडाला ! आता कम्युनिस्ट विचारसरणी स्विकारलेल्या लोकांना ह्या इथेही शोषक आणि शोषित अशी विभागणी दिसते, पण त्याला काय करणार , त्याला नाईलाज आहे ! ज्यांनी कॅपिटॅलिस्ट विचारसरणी स्विकारली आहे त्यांच्या लेखी मात्र - अशा कोणतेही कॅपिटल नसलेल्या व्यक्तींना, अन्स्किल्ड लेबरला तुम्ही व्यवसाय , रोजगार उत्पन्न करुन देत आहात, जीवनाचे साधन उपलब्ध करुन देत आहात ही खुप मोठ्ठी गोष्ट आहे ! आणि नुसतेच रोजगार निर्मिती न करता सदर व्यक्तीला "कामवाली" असे न संबोधता आदराने मदतनीस असे संबोधत आहात ही खुपच मोठ्ठी गोष्ट आहे ! शिवाय जास्त कामाचे जास्त पैसे देत आहात , जमेल तेव्हा गिफ्ट देत आहात , दिवाळीला बोनसही नक्की देत असाल , एकुणच हे सर्व दर्शवत आहे की तुम्ही क्रोनी कॅपिटॅलिस्ट नाही आहात ! तस्मात् तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे ! अशी, तुमच्यासारखी चांगली माणसे समाजात टिकली पाहिजेत , अन्यथा हे कम्युनिस्ट सोशॅलिस्ट लोकं जे की आता आर्मचेअर अ‍ॅक्टिविस्ट आणि अर्बन नक्षल चा बुरखा पांघरुन बसलेत ते एक ना एक दिवस अशा भोळ्या अशिक्षितीत लोकांची माथी भडकावुन "There will be blood." हे सत्य करुन दाखवतील , आणि अनस्किल्ड लेबरला देखील देशोधडीला लावतील ह्यातही शंका नाही ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 11/03/2025 - 11:08
समाजवादी विचारसरणी प्रामाणिक नसते असे नव्हे. पण आदर्श, जे असायला हवे ते, डायरेक्ट "असावे".. अशी काहीशी मांडणी भासते. आदर्श पर्याय हा अशक्य असू शकतो, त्यातल्या त्यात आहे ती सिस्टीम हळूहळू बदलत जाईल पण आदर्श करू जाल तर सगळेच कोसळेल. अशी मध्यम मार्गाची आशा करावी लागते हे त्या विचारसरणीला फारसे रुचत नसावे. त्यांनी सुचवलेल्या उपायांनी "नाही रे" वर्गाची "नको रे" अवस्था होऊ शकते.

In reply to by गवि

अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 11/03/2025 - 18:35
साधी गोष्ट होती: मुद्दा एक समाज म्हणून आपल्याकडे किती विषमता आहे, म्हणून काही लोकांना नाईलाजाने ही कामं करावी लागत आहेत, इतका साधा होता. कुणी पैसे दिले व माणुसकी दाखवली, हे ठीकच, त्यावर माझा काही आक्षेप नव्हता. असली कामं समाजातून कमी व्हायला पाहिजेत की नको? 'मदतनीस' स्वतःच म्हणत आहे 'जे जगणं माझ्या वाट्याला आलं ते तिच्या (मुलीच्या) वाट्याला नको.' हे त्यांचं असं जगणं चालूच रहावं, असं वाटणारी माणसं अजून समाजात आहेत, हेच मोठं दुर्दॅव आहे! अर्थात त्यामागे पिढ्यानुपिढ्यांच्या हितसंबंधांना धक्का लागू नये, प्रस्थापित प्रस्थापितच रहावेत, ही मूळ स्वार्थमूलक प्रेरणा आहे. झाडाचं एक पान दुसर्यासारखं नसतं वगैरे गैरलागू सिध्दांत तोंडावर फेकून कशाचंही समर्थन करता येतंच! बरं झालं असले लोक काही काळ तरी देशाच्या नेतृतवात नव्हते, नाहीतर डोक्यावरून मैला वाहून नेणार्याला काम व पैसे देऊन आंम्ही पुण्यच करत आहोत, असं म्हणत समाज तिथेच राहिला असता. अमेरिकेत अजूनही गुलामी प्रथा सुरू असती - गुलाम गुलाम म्हणून जन्माला आला त्यात आमचा काय दोष? त्याचं प्रारब्ध कर्मच तसं असणार असं आमचा वेदांत सांगतो ना. उलट त्याला पैसे व जेवण देऊन आंम्ही त्याच्यावर उपकारच करत आहोत म्हणत त्या अमानुष प्रथेचं समर्थन करत राहिले असते.

In reply to by स्वधर्म

गवि 11/03/2025 - 20:36
कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघा
कधीतरी बघा असे म्हणण्याइतका वाईट नाही हो मी. आणि अमुक एक असावे यात वाद नाहीच. पण त्यासाठी इम्प्लिमेंट काय करायचे?

In reply to by गवि

स्वधर्म 11/03/2025 - 22:17
गोडबोले यांनी समाजवादी गप्फा, 'झाडाचं पान...', शोषक शोषित इ. इ. ज्या थिअरीज सांगितल्या आहेत, त्यासाठी होता. माझा प्रतिसादही त्यांच्या प्रतिसादाखालीच दिसतोय, तुमच्या नाही. इंप्लीमेंट अनेक देशांनी, संस्थांनी केलंय. मुख्य गोष्ट ही की समाजातली आर्थिक विषमता कमी करणारी धोरणे आखली गेली पाहिजेत. शिक्षण व संधी तळागाळातल्या लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आता समाजातील यासारख्या खर्याखुर्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी राज्य आणि केंद्र सरकारे भ्रामक गोष्टींवर काम करत आहेतः उदा. औरंगजेबाची कबर. नद्यांचं पाणी स्वच्छ करण्यासाठी खर्च न करता नाशिकच्या कुंभमेळा आयोजित करण्यावर हजारो कोटी खर्च करणार आहेत. खेडोपाडीच्या शाळांसाठी पैसे नाहीत, पण हजारो कोटी खर्च करून शक्तीपीठ महामार्ग, मोठमोठी स्मारके बांधायचीआहेत.

In reply to by गवि

राम राम गवि ! त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) ज्याला लोकं कॅपिटॅलिझम म्हणतात ते तत्वज्ञानाच्या परिप्रोक्ष्यातुन पाहिलं तर विशुध्द हे "सत्य" आहे "सत्य". सत्य म्हणजे ट्रुथ असे भाषांतर करुन शिकलेल्यांना कसं समजणार ! समाजामध्ये कायमच कोणाकडे तरी जास्त कॅपिटल असणार कोणाकडे तरी कमी ! माणसांचे सोडा , प्राण्यांना देखील कळतं हे, प्राणी आपली टेरेटरी जे की कॅपिटल , ते प्राणापणाने जपतात , वाढवण्याचा प्रयत्न करतात . प्राणी सोडा , झाडांना देखील कळातं हे ! मोठ्ठं झाड जास्तीत जास्त सुर्यप्रकाश घेतं, पाणी घेतं , पोषकतत्व घेतं अन अन्य छोट्या झाडांना झक मारत त्या झाडाच्या सहार्‍याने आसर्‍याने जगता येतं , पण म्हणुन मोठ्ठं झाड तोडलं तर सगळी एको सिस्टीम नष्ट होते अन सगळीच झाडे मरतात , अन मग ती जमीन ग्रास लॅन्ड होऊन जाते . अहो झाडांचं सोडा , निर्जीव ग्रहतार्‍यांनाही आपल्या ग्रॅव्हिटेशनल फिल्ड मध्ये येणारी प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये खेचुन घ्यावी , आणि आपले अस्तित्व वाढवावे , ही "जाणीव" आहे ! हे ते सत्यमेव जयते म्हणातात ना त्यातले सत्य आहे ! मानवी समाजातील कॅपिटल ची एक रचना नष्ट होईल , पण लागलीच दुसरी काही रचना त्याची जागा घेईल , कामवाल्या बाईची पोरगी शिकुन कॉर्पोरेट मध्ये गेली तर तिथे काय परिस्थिती आहे हे आम्ही पाहतो, मग कमावलेले पैसे मार्केट मध्ये टाकु लागली तर कॅपिटल मार्केट मध्ये काय स्थिती , आपण किती चिल्लर आहोत हेही आम्ही पहात आहोत , बरं राजकारणात गेली तर तिथे पॉवर डायनॅमिक्स कसले जबरदस्त आहे हे सगळेच बीड मध्ये पहात आहेत , वॉशिंग्टन डी.सी. मध्येही पहात आहेत ! ज्याला कळतं त्याला कळतं ! यु कॅनॉट एस्केप इट ! यु सिंपली कॅनॉट ! ! हे सत्य आहे सत्य. त्यालाच ऋत असाही अल्मोस्ट समानार्थी शब्द आहे . त्यालाच धर्म असा शब्द आहे . आणि ह्या धर्माचे मुर्तीमंत स्वरुप - तोच राम आहे ! रामो विग्रहवान धर्म : _______________________________________ पण असो. ह्या क्रांती ब्रिंतीच्या बाबतीत मात्र आमचा स्वधर्म ह्यांना फुल्ल सपोर्ट आहे ! कम्युनिझम चा भस्मासुर शेवटी स्वतःच्याच मस्तकावर हात ठेऊन स्वतःचाच नाश करुन घेतु ही वस्तुस्थिती आम्ही अभ्यासली आहे , क्युबा मध्ये पाहिलं , लॅटिन अमेरिकेत पाहिलं , नॉर्थ कोरियात पाहिलं , रशियात पाहिलं , चायना मध्येही कम्युनिस्ट सरकार समानता आणुन तेथील लोकांच्या हिताची काय काळजी घेत आहे हेही पहात आम्ही =)))) तस्मात ह्या बाबतीत , स्वधर्म आमचा तुम्हाला जोरदार पाठिंबा आहे , भिडा तुम्ही , उध्वस्त करुन टाका ही व्यवस्था ! मजा यायला हवा =)))) लाल सलाम ! क्रांती चिरायु होवो ! =)))) Samant

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 13/03/2025 - 06:41
>> त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) >> ज्याला कळतं त्याला कळतं ! शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच. राहता राहिला प्रश्न पुलंचा. तुमचा कयास चुकवल्या बद्दल माफ करा, पण मी त्यांची पुस्तके, व्यक्ती आणि वल्ली वगैरे वाचलेली आहेत. पण बालबुध्दीने दिपून जाण्याचे दिवस संपल्यावर दृष्टी विस्तारित झाल्यावर काही वेगळे जाणवते. थोर लेखक होते, त्यांची विनोदबुद्धी तरल होती, भाषेवर हुकूमत होती, पण तेही तेच पाहू शकले जे त्यांना त्यांच्या स्थानावरुन दिसलं. तुंम्ही दुसरीकडे जन्माला आला असाल, तर काही वेगळं जाणवू लागतं. अंतू बर्वा, नंदा प्रधान, नानू सरंजामे यांना आडनावे आहेत, पण नामू परटालाच फक्त कसं बरं आडनांव नाही? त्याची जात हेच त्याचं आडनाव का? त्यांनी महिलांच्या जाडपणावर, रंगावर, गटणेच्या बावळटपणा वर केलेले हुकमी विनोद वेगळ्या प्रकारे दिसू लागले. ... ... चितळे मास्तर मात्र ‘ढ’ मुलांना अत्यंत आदराने पुकारीत. गोदी गुळवणी ही साक्षात ‘ढ’ होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चवथी-पाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली. हे असले विनोद बायकाही अगदी निरागसपणे एन्जॉय करतात, फक्त त्या गोदूसारख्या नसतील तर. अंतू बर्वा काय म्हणतो? ..पण इंग्रज गेला तो कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं? धंदा बुडीत खाती जायला लागला - फुकलंनीत दिवाळं! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा!’’ ज्यांनी कधी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलाच नाही त्यांच्या मनातील अपराधीपणाची भावना कमी करण्याचं काम पु. ल. देशपांडें करत आहेत का? शिवाय इंग्रज भारत सोडून गेले ते कंटाळून असं बोलून ज्यांनी याकामी बलिदान दिलं त्यांचं श्रेयही काढून घेताहेत. अजून काय हवं? * * * अंतू बर्वा यांची समाजवाद, समता-विषमता याबाबतची मतं तर फारच प्रखर आहेत. कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? पु. ल. देशपांडे यांच्या श्रीमंत भाषेच्या प्रभावातून बाहेर पडणं हे काम आहे. जे त्यांना दिसलं नाही, ते त्यांचं आ करुन वाचणाऱ्या तुंम्हाला काय दिसणार? जाऊ द्या, त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या. मी कुठेही साम्यवादाचं समर्थन केलेलं नाही, फक्त्यात समाजातली आर्थिक विषमता एवढाच मुद्दा होता. त्यामुळे क्रांती वगैरे पाल्हाळाबद्दल आमचा पास. दुसऱ्याला न मांडलेला मुद्दा चिकटवून झोपण्याची युक्ती जुनी झाली.

In reply to by स्वधर्म

त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या.
मी तेच करतो हो आता . तुका म्हणे आता खेळतो कौतुके l झाले तुझे सुख अंतर्बाही ll मी काय तुम्हाला टॅग केलेलं का माझ्या प्रतिसादात, का अक्षता पाठवलेल्या माझ्या प्रतिसादावर तुम्ही प्रतिसाद द्यायला या म्हणून =)))) मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली त्याला मी काय करू =)))) बाकी तुम्हाला जाणवत नसेल पण तुम्ही ज्याप्रकारे मते मांडता की समाजात कायम शोषक शोषित अशी विभागणी असणार , आर्थिक विषमता असणार, संघर्ष केला पाहिजे वगैरे वगैरे ही साम्यवादी मांडणीच आहे . जे तुमच्यात अंतर्बाह्य आहे ते मला तुम्हाला चिकटवायची गरज नाही. असो. चालू द्या तुमचं. बालपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा l ऐरावत रत्न थोर l तया अंकुशाचा मार ll अथक प्रयत्नांनी परत मिळवलं आहे हे बालपण आम्ही. आमचं आम्ही बालोद्यानात खेळत राहतो मजेत . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 15/03/2025 - 20:03
>> मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली. जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती. अगदी स्पष्टपणे! मी फक्त ती नीट संदर्भासहित दाखवून दिली. ती मी चर्चेत आणली असा खोटा कांगावा नका करू. >> कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? याला उत्तर न देता पळ काढला आणि अंगावर शेकतंय म्हटलं की दुसर्‍यांवर जातीवाचक आरोप करायचे! भले शाब्बास!!

In reply to by स्वधर्म

कंटाळा आला ह्या भंपकपणाचा =))))
जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती
आम्हातरी कधीही जात दिसली नाही पुलंच्या लेखनात . महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांनाही दिसलेली नाही, अजुन कोणी पुलंच्या पुस्तकाचे दहन बिहन केल्याचे ऐकिवात नाही. तुम्हाला जात दिसली हा तुमचा प्रॉब्लेम आहे , पुलंचा नाही अन माझाही नाही ! बाष्कळ प्रश्नांना काय उत्तरे देत बसणार ? मुळ मुद्दा हा होता की ही समाजवादी विचारसरणी भंपक आहे , समाजात वर खाली , डावे उजवे , श्रीमंत गरीब, हे भेद होतेच अन राहणारच , तुम्ही जाणुन बुजुन ओढुन ताणुन ते मिटवायचा प्रयत्न केला म्हणुन ते मिटणार नाही , त्याचे फक्त रुप पालटेल. थोटा पांडु, तिरळा हरी साठ्या , हे स्वातंत्र्यात होते , पारतंत्र्यात होते , इंग्रज अन कोण कोकणा रेल्वे अन स्वातंत्र्य प्रगती बिगती बगैरे कितीही झाले तरी हे भेदाभेद राहणारच आहेत . पण म्हणुन ह्या भेदांचे भांडवल करुन सामयवादी शोषक विरुध्द शोशित असा कायमचा संघर्ष जो तुम्ही मांडत आहात तो मात्र तद्दन निरर्थक आहे. अन काय बोलता , पळ काढणे =)))) अंगावर शेकणे =)))) तुमच्या इन जनरल विचारसरणीतील भंपकपणाचा कंटाळा आल्याने उत्तर द्यायची इच्छा नाही. मी कधीही जातिवाचक बोलत नाही कारण मी जाती मानतच नाही . माझ्या लेखी फक्त गट आहेत , जाती नाहीत ! जातीचा उल्लेख तुम्ही केला आहे ह्या प्रतिसादात नामु च्या निमित्ताने "https://www.misalpav.com/comment/1190789#comment-1190789" मी तसा उल्लेख केलेला नाही . चुकुनही कधी केलेला नाही . आता बास =)))) धुळवड पुरे . माझं काही तुम्हाला पटणारं नाहीये, अन तुमचं काही मला पटाणारं नाहीये , मग कशाला उगाच कळफलक बडवत बसा =)))) संघर्ष करा ! संघर्षच करत रहा !

In reply to by स्वधर्म

Bhakti 13/03/2025 - 10:56
बाकी खुप चांगलं लिहलंय.. पण हे खाली लिहिलेलं टाळू शकला असता तर बरं वाटलं असतं.
शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच.
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.खेदकारक!

In reply to by Bhakti

ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.
कारण ती वस्तुस्थिती आहे म्हणुन ! ह्यात खेदकारक असं काहीच नाही . एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ठ कुटुंबातच का जन्म घेत असावा ? कोणी श्रीमंत कोणी गरीब, कोणी सेलिब्रिटी कोणी भिकारी, कोणी शुद्र कोणी ब्राह्मण, कोणी सुसंकृत कोणी संस्कृती विध्वंसक , कोणी आहे रे , कोणी नाही रे . असं का असावं ? ह्याला व्यवस्थित रितसर तत्वज्ञानाच्या दृष्टीने, अध्यात्मिक उत्तर आहे. आणि पुढे जाऊन तुम्ही ज्या परिस्थितीत जन्माला आलात त्या परिस्थितीतच राहाता असेही नाही , तुम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला पाहिजे तसे बदल घडवताच ! आमच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये आम्ही जी लिनियर मॉडेल्स बनवतो त्यानुसार बोलायचे झाले तर तुमची सद्य स्थिती = तुमची प्रारब्ध्द कर्मे + संचित कर्मे + क्रियामाण कर्मे + ईश्वरेच्छा अशी समष्ठी असते ! जे संचित आहे ते संचित आहे ! तुम्ही तुमच्या क्रियामाण कर्माने ते ओव्हर राईड करु शकताच ! त्या कामवाल्या बाईंची मुलगी ने कष्ट केले तर तेही उच्च पदस्थ होऊ शकतेच ! (आणि एखाद्या उच्च स्थितीतील व्यक्तीने कर्मे केले नाही तर तो देशोधडीला लागु शकतोच . एकीकडे मुकेस भाई पोरांच्या लग्नांवर अब्जावधी रुपये खर्च करत असताना , त्यांचा सख्खा भाऊ , की ज्याला वडीलोपार्जित इस्टेटीत जास्त माल मिळाला होता , तो अनिल भाई अक्षरशः भिकारी होण्याच्या मार्गावर आहे !) ह्यात काहीही खेदजनक नाही. ज्याक्षणी तुम्हाला ह्या सर्व मॅट्रिक्स चे टर्निंग गेयर्स लक्षात येतात , जेव्हा ह्या मॅट्रिक्स चे अनादी अनंत अस्तित्व लक्षात येते तेव्हा तुम्हाला खेद वगैरे काहीही वाटायचेच बंद होते . त्यानंतर all you can do after that is to appreciate how exquisitely beautifully its designed ! असो हा स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने इथे जास्त लिहित नाही !

In reply to by Bhakti

स्वधर्म 15/03/2025 - 19:44
तुमच्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला जन्मावर माणसाचं भवितव्य ठरू नये, असं वाटणं सहाजिक आहे. पण तुंम्हा आंम्हाला काहीही वाटो, जन्मावर बरंच काही ठरतं ही वस्तुस्थिती आहेच. आपल्याला मिळणारी आर्थिक सामाजिक परिस्थिती जन्मावरच अवलंबून नाही का? माणसाला वाढीच्या वयात येणारे अनुभव त्याच्या आर्थिक सामाजिक व भौगोलिक परिस्थितीनुसारच ठरणार. आणि मग पुढे त्याच्या धारणा, मते, दृष्टिकोन हे आजूबाजूला जे मिळतं (शिक्षण, वाचन, संगत इ.) त्यावर ठरणार. ज्याची समज वाढलेली आहे, फक्त त्यालाच या अदृष्य पिंजर्‍याच्या पलीकडे काही दुसरे दृष्टीकोन आहेत हे कळणार. मान्य करणे ही अधिक पुढची पायरी झाली. कोणी कुठे जन्म घ्यावा, हे काही त्या व्यक्तीच्या हातात नाही. कदाचित समाजात संपूर्ण समता (संधी, शिक्षण, व्यवसाय) असणे हि अत्यंत आदर्श अवस्था कधीच येऊ शकणार नाही. पण जगभरातली सरकारे, जी लोककल्याणकारी आहेत त्यांनी हे केले आहे व परिणामतः त्यांच्याकडे विषमता कमी होऊन जीवनाचा दर्जा सुधारलेला आहे, हे तर स्पष्ट आहे. कोण कुठे जन्माला आला याला काही भ्रामक अध्यात्मिक कार्यकारणभाव चिकटवणे व म्हणून समाजात समता असणे याची टर उडवणे, हे मात्र समर्थनीय नाही.

In reply to by स्वधर्म

असे माझे मत आहे. विषमता आहे म्हणून स्पर्धा आहे. स्पर्धा आहे म्हणून विकास/प्रगती आहे. विषमतेवर कसा विजय मिळवायचा किंवा आहे त्या परिस्थितीत खुश रहायचं किंवा रडत बसायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जगात अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर कुरघोडी करून अविश्वसनीय असा बदल घडवून आणला. माझ्याच समोरचे एक उदाहरण. छोटे कुटुंब, आई,वडील एक मुलगा ,मुलगी. आई क्षयरोगी अतिंम टप्प्यात. वडिल नालायक, लंब्या,लंब्या फेकणारे. मुलांच्या जीवावर बांडगुळ म्हणावे लागेल.अर्थिक परिस्थिती हलाखीची. मुलगा स्टॅन्ड वर भाजभाजलेल्या शेंगा विकायचा तर मुलगी लोकांची धुणी भांडी. आई वारली,वडिलांनी दुसरे लग्न केले,मुलांना वाऱ्यावर सोडले. भावंडानी एकमेला आधार दिला. शिक्षण पुढे चालू ठेवले. गावातच काॅलेज असल्याने फारसा खर्च नव्हता. घरभाडे माफक व मुलांची धडपड बघून गल्लीतील लोंकानी शक्य होईल तशी मदत दिली. पुढे मुलगी बि एड,एम एड झाली आज गावातच प्रथितयश ट्युशन्स संस्थेची मालकीण तर मुलगा पुढे बि काॅम,सी ए झाला व स्वताची फर्म टाकली आहे. असो,मुळ विषय साधा सरळ होता. घरातील नोकरांना माणुसकीची वागणूक आणी योग्य मेहेनताना देण्याबाबत. त्याला इतर देशातील परिस्थितीशी तुलना करत भारतीय समाजिक विषमता कशी समाज वाद विरोधी आहे हा मुद्दा उपस्थित करून विषयांतर केले जात आहे. सामाजीक विषमतेला अनेक कारणे आहेत परंतू विषयांतर होईल म्हणून टाळून एवढेच म्हणतो की आपल्या बरोबर जे गरीब आपल्यासाठी काम करतात त्यांना य्योग्य वागणूक व सद्यपरिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करावी. माझ्या पत्नीला घरकामात मदत करण्यासाठी एकच कामवाली बाई गेले तेरा वर्ष नोकरीत आहे.थोडीफार शिक्षण झालेली,अकुशल. नवरा अशीच छोटी मोठी कामे करतो. दोन मुलं नुकतीच दहावी बारावी झालीत. वेळोवेळी जाहीर झालेल्या सरकारी योजनांचा कसा लाभ घ्यायचा हे माझ्या पत्नीने तीला मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री आवास योजनेचा फार्म भरायला लावला. आज तीचे स्वताचे घर झाले आहे. तीनचार अन्य घरात काम करते म्हणून हप्त्यात वाॅशिंग मशीन घेऊन दिले कारण तीच्या घरातील कपडे धुण्याचे श्रम आणी वेळ वाचावा, पिठ दळण्याची विजेची चक्की घ्यायला लावली. आता मुले फावल्या वेळात आसपास च्या घरातील दळणे दळून देतात व अतिरिक्त अर्थार्जन करतात. घर महिलेच्या नावावर असल्याने नवर्‍याची दादागिरी कमी झाली आहे. सरकारच्या लाडक्या बहिणाबाई म्हणून महिना भाऊबीज चालू झाली आहे. अर्थिक परिस्थितीत सुधार होतोय. आता मुलांवर अवलंबून आहे की ते आपल्या आईच्या कष्टाचे कसे परिमार्जन करतात. तर माईसाहेबांनी मांडलेला मुद्दा उचलून धरत एवढेच म्हणेन, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. लहान मोठे,गरीब श्रीमंत हा भेद यावत्चंद्रदिवाकरौ रहाणारच आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

यावत्चंद्रदिवाकरौ
तत्वज्ञान असं आहे की दिवाकराचे अर्थात सुर्याचं चंद्रापेक्षा मोठ्ठं असणे, जास्त तेजस्वी असणं , स्वयं प्रकाशमान असणं , दाहकारक असणं हेही विषमतेचे प्रतिक आहे , अन्याय आहे वगैरे वगैरे . =))))

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 14/03/2025 - 17:06
विषमता हा निसर्गाचा मूळ गुणधर्म आहे, हे निसर्गव्यवहारात ठीक. निसर्गव्यवहारात जंगलातील बलवान प्राणी दुर्बल प्राण्यांना खाणारच. मानवी व्यवहारात असं चालेल काय? पूर्वी असेच होते, राजाला सर्वाधिकार होते. मनात येईल त्याला शिक्षा करण्याचा अधिकार होता. का बरं हे बदललं असावं? मानवी व्यवहारात सामाजिक आर्थिक विषमता टिकवायची का? मानवी व्यवहारात समता (समानता नव्हे) आणण्याचे प्रयत्न कोणत्याही कल्याणकारी राज्याकडून केले जातात. ते थांबवावे का?

In reply to by स्वधर्म

कशी मिटवणार? एकाच आई-वडीलांची चार मुले. समान संधी णण एक भरपूर शिकतो डाॅक्टर इंजिनियर होतो. एक शिक्षणात सुमार काहीतरी धंदा काढतो,एक उनाड,मवालीगीरी करतो आता यात समता कुठुन येणार.. प्रत्येक घरात अशी उदाहरणे मिळतील. धंदेवाला खुप पैसा कमवतो तर शिक्षित सन्मान पुर्वक जिवन यापन करतो तर एक गुंडगीरी करून ..... अर्थात काहीही होऊ शकते. गुंडा भरपूर पैसे कमवतो तर धंद्यात नुकसान झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतो वगैरे,वगैरे....

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 15/03/2025 - 19:53
तुमची गल्लत होते आहे. अंतीम अवस्था (इंजिनिअर की मवाली इ.) समान असणे म्हणजे समता नव्हे. ते कधीही होऊ शकणार नाही, हे स्पष्टच आहे. सर्वांना जास्तीत जास्त समान संधी, शिक्षण, सन्मान, उपभोगाचे, साधनसंपत्तीवरचे अधिकार मिळणे ही समता.

वामन देशमुख 11/03/2025 - 12:02
आजी, नेहमीप्रमाणे हा लेखही प्रामाणिक निवेदन-मांडणीमुळे आवडला. माझ्या मते, "मदतनीस" वा इतर कुणीही आपल्याकडे - घरी किंवा ऑफिसात काम करणे आणि आपण त्याचा मोबदला देणे हा एक शुद्ध व्यवहार असतो. त्यात चांगले-वाईट असे काही नसते. त्यांच्या वेळेपेक्षा आपला वेळ अधिक किंमतीचा असतो आणि आपण आपल्याला परवडेल तितके पैसे देऊन तो वेळ विकत घेतो. या व्यवहारात दोघांचाही फायदा असतो. फायदा दिसत नसेल तर व्यवहारात कुणी उतरत नाही, टिकून राहत नाही. यात श्रीमंत, गरीब असाही काही भाग नाही. ज्यांना तसे वाटते त्यांना शुभेच्छा. प्रत्येकच जण कुणापेक्षा तरी श्रीमंत आणि इतर कुणापेक्षा गरीब असतो. वाजवी किंमतीत जमेल तेवढा इतरांना रोजगार देणे हीच खरी मानवता / माणुसकी असे मला वाटते. ठरलेल्या पगारापेक्षा अधिक पैसे देणे किंवा ठरल्यापेक्षा अधिक काम करणे हा त्या त्या व्यक्तींच्या चांगुलपणाचा भाग आहे.

सुबोध खरे 12/03/2025 - 19:53
मागणी आणि पुरवठा हे तत्व जगभर सर्वत्र काम करताना दिसते. त्यातून सर्वजण एकाच पातळीवर जन्माला येतात आणि परिस्थितीप्रमाणे त्यांचा उद्धार होतो किंवा नाही हे समाजवादी तत्व चूक आहे हे अनेक पातळ्यांवर सिद्ध झालेलं आहे. आमचे वडील नेसत्या वस्त्रानिशी १९५४ मध्ये मुंबईत आले. माटुंग्याच्या रेल्वे वर्क शॉप मध्ये सहाय्यक(अँप्रेन्टिस) म्हणून चिकटले. उरलेल्या वेळात स्टेनोग्राफी आणि टायपिंग शिकले तेथे कामगार म्हणून नोकरी मिळाली नाही. मग औषध कंपनीत टायपिस्ट म्हणून नोकरीस लागले. लग्न आणि मुले झाल्यावरही नोकरी सांभाळून बी ए केले, एल एल बी केले नंतर जमनालाल बजाज सारख्या संस्थेत डी बी एम केले. चतुर्थ श्रेणीतून चढत चढत प्रथम श्रेणीत पोहोचले. वडिलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्या आईने शिक्षण चालू केले. तिने पण बी ए , एम ए आणि बी एड केले. आम्ही कॉलेजात जाईपर्यंत आमचे आईवडील शिकत होते. वयाच्या ४३ व्य वर्षी आई परत शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस लागली आणि शेवटी ५८ व्य वर्षी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. एके ठिकाणी एका अतिशय खालच्या भाषेत बोलणाऱ्या इसमाला मी या शब्दात सुनावले होते कि जेंव्हा तुमचे वडील आठवड्याच्या अखेरीस "कुठे बसायचे" म्हणून ठरवत असताना आमचे वडील अभ्यास करत होते आणि थोडी थोडकी नव्हे तर लग्नानंतर ९ वर्षे शिकत होते. यानंतर आमच्या आईने ८ वर्षे शिक्षण घेतले. त्यांच्या खांद्यावर उभे राहून मी आणि माझा भाऊ उच्चशिक्षित झालो आणि सुखवस्तू झालो. संधी मिळाली नाही म्हणून रडत बसणारे असंख्य इसम गेली कित्येक वर्षे पाहत आलो आहे. पण जवळून पहिले असताना त्यांना आतूनच आपल्या उद्धाराची आच नाही असे बऱ्याच वेळेस लक्षात आले. अनेक इसमांना मदत करण्याचा प्रयत्न केला असताना फक्त काही लोकांनाच अशी आतून आच असते हे लक्षात आले. बाकी ध्यान फक्त परिस्थितीबद्दल रडारड करायची असते. आपल्या सहाय्यिकेस नमस्कार आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते.
समाजवादी समतावादी मूल्यांमधे जगणार्‍या संवेदनशील माणसांना विषमता हे वास्तव आहे याचे भान त्रास देते. आपण ही यांच्या शोषणाचा घटक आहोत या जाणीव होते मग तो अपराधगंड दूर करण्यासाठी ते विशेषणेच बदलतात. अपंगांना दिव्यांग म्हणणॆ, बलात्कार पीडीतेला निर्भया म्हणणे, मानसिक रुग्णांना शुभार्थी म्हणणॆ, कोरडवाहू शेतकर्‍याला बळीराजा म्हणणे वगैरे..

काम हवे असणारा व काम देणारा असे दोन घटक आहेत. ज्याला जसे परवडते तसे तो स्विकारत असतो. परदेशातही पाळणाघरे आहेत. कामवाल्या बायका आहेत. माळी आहेत. तीथे ज्यांना परवडते ते हायर करतात. पाळणाघरासाठी वयोमानानुसार दर आकारण्यात येतो. चार वर्षाचा नातू आहे काही शे डाॅलरा (म्हणजे जवळपास एखाद लाख) दरमहा द्यावे लागतात. विकसित देशामधे सुद्धा विषमता आहे. आता तिकडच्या कामवालीला ताशी शंभर रुपये जरी मिळत असले तरी ती कामवालीच असते. झाडू, पोचा,बर्तन,लाॅण्ड्री सारखी कामे यंत्रांने सहज बिनबोभाट होतात. बहुतेक फ्लोरिंग कार्पेटेड असल्याने व घरात सेंट्रल ए सी असल्याने धुळ नसतेच. रोबोट प्रशीक्षीत केला की मग नंतर तो बिघडे पर्यंत चुपचाप काम करतो. पगार मागत नाही,संप करत नाही,मोर्चे काढत नाही,काम सोडून जात नाही. इतर यंत्रांचे पण असेच असते. सर्वसाधारण पणे ही यंत्रे पाच वर्षांत करता बनलेली आणतात. त्यानंतर फेकून देतात व नवीन आणतात. आवारातील झाडे कापणे,लाॅन ड्रेसिंग करणे यासाठी सुद्धा स्वयंचलित यंत्रे उपलब्ध आहेत. मनुष्यबळ कमी व महागडे तर सहायक यंत्रे तुलनेत स्वस्त व अधीक फायदेशीर. त्यामुळे सर्वसामान्य (विकसीत देशातील) नागरीक सहायक मनुष्यबळाचा मागे न जाता यंत्रे वापरतात. हे माझे बारा महिन्यांच्या वास्तव्यातील निरीक्षण आहे.

कधीकाळी महान शास्त्रज्ञ,प्रेसिडेंट भारतरत्न पुरस्कृत महामानवाने सुद्धा वर्तमानपत्रे विकली आहेत असे ऐकले आहे. कुठलेही काम लहान मोठे नसते ते फक्त एका साठी अर्थार्जन तर दुसऱ्या साठी सोय असते.

कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसत पण त्याला काविळीचे औषध दिलं की सगळं बरं होऊन नॉर्मल दिसायला लागत. पण ज्यानं पिवळा चष्मा घातला आहे अन् सगळं पिवळं आहे असा बोभाटा करत आहे त्याला काय औषध देणार ? एकदा का जगात "शोषक आणि शोषित " अशी विभागणी बघायची सवय झाली आणि सतत एक गट दुसऱ्या गटावर अन्याय करतोय अन् दुसऱ्या गटाने पेटून उठून क्रांती केली पाहिजे वगैरे वगैरे विचारसरणी झाली की त्याला औषध नाही. साम्यवादी , समाजवादी , एलोन मास्क म्हणतो त्या शब्दात बोलायचं झालं तर Woke mind virus ला औषध नाही. असो. अशी माणसं रामाच्या काळात होती, कृष्णाच्या काळात होती, आपल्याही काळात आहेत. त्यांना " संघर्ष करा, संघर्ष च करत रहा " असे काहीसे सांगितलं गेले आहे ते तसे वागत राहतात. त्यात त्यांचा काय दोष ! आम्ही आपलं कृष्णाने सांगितलं तसं "सर्वत्र समबुद्धय:" व्हायचा प्रयत्न करत राहतो. :)

आजींच्या साध्याभोळ्या, घरगुती लेखावर जडबंबाळ तात्विक चर्चा करणार्‍या डाव्यांचा आणि उजव्यांचा तीव्र निषेध. आज्जे, तुझे नशीब चांगले हो की तुला चांगल्या कामवाल्या बायका मिळाल्या. आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत.

In reply to by धर्मराजमुटके

आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत. खिक्क!

नोकर असो वा हाताखालचे कामगार वा पांढरपेशी, नोकर वर्ग मालकाने माणूस म्हणून वागवले तर काही वेळेस अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळतो वा काही वेळेस नोकर वर्ग डोक्यावर बसतो . यामध्ये दुसरी शक्यता विचारात घेऊन अनेकजण निर्दयी बनण्याचा प्रयत्न करतात याउलट नम्रता व आदर हि कायमच उत्तम परतावा देते, हा माझा अनुभव आहे. बंगालसारख्या डाव्यांच्या वर्चस्व असलेल्या प्रदेशात कामगार कसे काम नि पैसे चोरी करतात हे अनुभवले आहे . याउलट त्यांच्याशी आदराने वागले तर ते बिनदिक्कत पडेल ते काम करतात. या जगात पोटाची गरज भागवण्यासाठी शिक्षित ,अशिक्षित अनेक जण दुय्यम दर्जाची कामे करतात याला इलाज नाही कारण सगळेच काही फुंसुक वंगडु नसतात.

आजी 22/03/2025 - 09:10
या लेखावर भरभरून प्रतिसाद आला. खूप चांगली चर्चा घडली. आनंद झाला. या निमित्ताने लिहिलेले उत्तर खूपच मोठे झाल्याने नवीन लेखाच्या रुपात प्रकाशित करत आहे. https://www.misalpav.com/node/52806 सर्वांचे आभार..

मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते. माझा मुलगा, सून, नातू हेही त्यांना ताई किंवा बाई, काकू, मावशी अशी त्यांच्या वयाकडे बघून हाक मारतात. त्यांना अहो जाहो करतात. माझ्या एक सांसारिक बाई म्हणून असलेल्या आयुष्यात अनेक मदतनीस आल्या. माझ्या घरी त्या अनेक वर्षे टिकायच्या. माझी बदली होईपर्यंत त्या माझं काम सोडायच्या नाहीत. घरी मी, माझे मिस्टर, मुलगा, सासू सासरे होते.

नववधू प्रिया मी..

सर्वसाक्षी ·

सर्वसाक्षी 09/03/2025 - 00:37
निघण्यापूर्वी विजाचा आणि स्त्रियांचा निरोप घेतला कृपया विजाचा आणि सरिताचा असे वाचावे. ( स्वयंसुधारणेचा प्रताप)

विजुभाऊ 10/03/2025 - 11:10
हे अशी मंडळी असतात काही. अगदी कोत्या मनाची. आयुष्यात आलेल्या संधीचा उपयोग करून बरोअब्बर वेळेवर इतराना त्रास द्यायची हौस भागवून घेतात

सौंदाळा 10/03/2025 - 12:56
काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल म्हणून उत्सुकता होती पण वहिनीने वाट लावली सगळ्याची. असो लेख छान झालाय. पण समजा ब्लॉकची चावी मिळाली असती तर काय 'सजावट' करायचा विचार होता हे पण सांगून टाका.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ 10/03/2025 - 15:12
साक्षी भाऊ लिहीते झाले ते महत्वाचे. साक्षी भाऊ फोटो चांगले काढतात कॅमेर्याने . आता एखादे फोटो सेशन येऊद्या...... निसर्गाचे

चौथा कोनाडा 17/03/2025 - 13:00
साक्षीभाऊंनी त्या काळची नवविवाहित जोडप्यांची अस्सल समस्या कुशलतेने मांडलीय. त्या वेळचा पतिपत्नी रोमान्स हा जोडप्याचा रोमान्स नसून कौटुंबिक रोमान्स असायचा .... आहे त्यात जोडप्याने अ‍ॅडजेस्ट करत यातुन एकांत शोधत नातं दृढ करायचं. आम्ही पण यातून तावून सुलाखून गेलोय.. यशस्वी झालोय ! साक्षीभाऊ अश्या कहाण्या येउंद्या आजून !

श्वेता२४ 17/03/2025 - 15:54
वहीनीची कृती कुचकेपणाची होती यात काही वाद नाही. पण त्यामागे तीला यात पराकोटीची तडजोड करावी लागलेली असणार असे दिसते. स्वताच्या लग्नात दोन्ही भाऊ सोबत राहत नसतानाही नवीन फ्लॅट घ्यायचा 'समजुतदारपणा' दाखविणाऱ्या विजूने दादा-वहीनीच्या प्रायव्हसी बाबत कोणताही समजूतदारपणा भूतकाळात दाखविेलेला दिसत नाही. त्याचाच वचपा वहीनीने काढलेला दिसतो. माझ्या माझ्या एका मित्राने लग्न झाल्यानंतर हनिमूनला जाण्याचे नियोजन केले होते. त्याच्या घरात त्याच्या वहिनीने असाच दंगा केला. त्यांच्या घरात लग्न झाल्यानंतर असे फिरायला जाण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे लग्नानंतर लगेचच त्याच्या मोठ्या भावाला कोणीही फिरायला जाऊ दिले नाही. लग्नानंतर महिन्यांनी त्याचा भाऊ वहिनीला घेऊन तिच्या माहेरी गेला आणि तिथून ते गुपचूप फिरायला गेले होते. त्यामुळे त्याच्या वहिनीने लग्नानंतर माझ्या मित्राने हनिमूनला जाऊ नये असा पवित्रा घेतला. माझा मित्र त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत लाडका होता. ३-४ वर्षाच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असल्यामुळे आई-वडीलही आता नव्या गोष्टी स्वीकारू लागले होते. त्यामुळे मित्राच्या हनिमूनला त्यांचा विरोध नव्हता. मित्राने हे मला सांगताच मी त्यांला हेच म्हणले की ज्यावेळी तुझ्या भावाच्या हनिमूनची गोष्ट होती त्यावेळी त्या दोघांनी हनिमूनला जावे याबाबत तू काय स्टॅन्ड घेतला होतास? त्यावर तो म्हणाला की मी काहीच बोललो नाही. घरचे सगळेच त्या विरोधात होते. त्यामुळे आई-बाबांना मी कसा विरोध करणार? त्यावर मी त्याला म्हणले तू काही इतका लहान नक्कीच नव्हतास की याबाबत एक भूमिका घेऊ शकशील. तू तुझ्या आई-वडिलांचे मत बदलायला हवे होतेस. कमीत कमी दादा वहिनी च्या बाजूने बोलला असतास तर आज वहिनीने इतका विरोध केला नसता.....

साधारण पस्तीस वर्षे झाली असतील या गोष्टीला विजा लग्न ठरल्याची बातमी घेऊन आला. आमच्या मित्रपरिवारामध्ये सर्वात लहान. गेल्या पाचेक वर्षात एकेक करून जवळपास सगळ्यांची लग्न होऊन गेली होती. नेहमी प्रमाणे सर्वांनी मुलगी कोण कुठली काय करते अशी सरबत्ती केली. वर पार्टीची मागणी होतीच. सगळ्यांनाच हुरूप आला, एक नवा कार्यक्रम मिळाला. त्या काळात इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे सबकुछ मित्र मंडळी सांभाळायची. सर्वांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं सर्वांचे आईवडील आपल्या मुलांच्या मित्रांना घरचेच समजायचे. लग्न पार पडणं ही सामूहिक जबाबदारी असायची आणि ती हौसेने पार पाडली जायची.