Skip to main content

अभ्यासोनी मग ...

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 14/03/2025 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
"अभ्यासोनी मग | प्रकटावे" ऐसे कुण्या रामदासे | सांगितले "दिसामाजी काही | तरी ते लिहावे प्रसंगी वाचावे | अखंडित" असेही वदले | तेव्हा रामदास मना उपदेश | करताना आता मला सांगा | लिहिणे, वाचणे अभ्यास करणे | कोणा झेपे? अभ्यास कशाला | प्रकटण्या आधी? इंटरनेट हाती | असताना ! हाती जे येईल | फॉरवर्डावे तेच पुढच्यास ठेच | लागेना का वायफळ मळे | पिकवू अमाप काळाची झडप | येवो सुखे
लेखनविषय:

वाचने 552
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया