मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते. माझा मुलगा, सून, नातू हेही त्यांना ताई किंवा बाई, काकू, मावशी अशी त्यांच्या वयाकडे बघून हाक मारतात. त्यांना अहो जाहो करतात.
माझ्या एक सांसारिक बाई म्हणून असलेल्या आयुष्यात अनेक मदतनीस आल्या. माझ्या घरी त्या अनेक वर्षे टिकायच्या. माझी बदली होईपर्यंत त्या माझं काम सोडायच्या नाहीत. घरी मी, माझे मिस्टर, मुलगा, सासू सासरे होते. माझी नोकरी धावपळीची, धकाधकीची, शिफ्ट ड्यूटीवाली. अशा धकाधकीच्या आयुष्यात मदतनीस बाई ही किती आधार देणारी असते हे नोकरी करणारी स्त्रीच जाणे. मी माझ्या मदतनीस बाईला सांभाळून घ्यायची. तिला व्यवस्थित,इतर ठिकाणी तिला मिळणाऱ्या पगारापेक्षा थोडा जास्तच पगार द्यायची. दिवाळीला बोनस, मिठाई द्यायची. वर्षातून एकदा चांगली साडी घेऊन द्यायची. वेळोवेळी उसने पैसे द्यायची. त्यातल्या काहीजणी प्रामाणिकपणे ते पैसे स्वतःहून आणून परत करायच्या.
मी त्यांना महिन्यातून दोन दिवस सुट्टी देत असे. पाहुणे आले आणि त्यांना जास्त काम पडलं तर त्याचे जास्तीचे पैसे द्यायची. अधुनमधून त्यांची, त्यांच्या घरच्या मंडळींची,मुलाबाळांची चौकशी करायची. एवढं कशाला तर त्यांच्या वाढदिवशी लक्षात ठेवून त्यांना शुभेच्छा आणि लहानशी भेटवस्तू द्यायची.
अधुनमधून माझ्या घरची मागच्या पिढीतील माणसं,"तू तिला डोक्यावर बसवून ठेवलं आहेस", असं म्हणायची.
"जास्तीच्या कामाचे वेगळे पैसे कशाला देतेस? आमच्या मोलकरणी एक कप चहा आणि दोन शिळ्या पोळ्या खायला दिल्या की सगळे माळे साफ करून देतात.", असंही मला ऐकवलं जायचं. पण मला ते अन्यायकारक वाटायचं.
एकूण काय तर माझ्या मदतनीस माझ्याकडे वर्षांनुवर्षे टिकत असत.
आज आता मी ज्येष्ठ नागरिक झालेली आहे. इतक्या वर्षांत मी अनेक मदतनीस अनुभवल्या. आणि माझ्या अनुभवावरून सांगते की या तथाकथित "कामवाल्या बायकां"मध्ये खूप बदल झालाय. आता माझ्याच मदतनीस तरुण मुलीचं एक प्रतिनिधी म्हणून मी उदाहरण देते. थोड्या फार फरकाने तशाच इतरही "कामवाल्या"आहेत असं आढळून येतं.
माझी मदतनीस अतिशय नीटनेटकी आहे. कामावर येताना ती कधीच गबाळ्यासारखी येत नाही.ती चांगल्या साड्या नेसते. पदर व्यवस्थित पिन अप करते.
गळ्यात मंगळसूत्र, त्यातल्या वाट्या तिनं पैसे साठवून सोन्याच्या करून घेतल्या आहेत. मंगळसूत्रासोबत गळ्यात एक बारीक मण्यांची ठसठशीत माळ ती घालते. कुंकू बारीक पण स्पष्ट दिसेलसं. हातांत नाजुक काचेच्या बांगड्या. त्या बांगड्यांच्या पुढे मागे सोनेरी वर्खाच्या बांगड्या. ब्लाऊज नीट,फिट बसणारा. उगीच गळा उतरलाय, उचलला गेलाय असं नाही. सडपातळ बांधा. तेजस्वी काळी कांती. दात शाबूत. शुभ्र पांढरे.
तिच्या घरात टीव्ही आहे, फ्रीज आहे.वाॅशिंग मशीन आहे. सर्व सेकंड हॅंड आणि हप्त्यावर घेतलेलं. ती हौशी आहे. गावात दर मंगळवारी बाजार भरतो. तिथं दमली भागलेली असूनही जाते. उत्साहानं बारीक सारीक खरेदी करते. मुलांसाठी स्वस्तातल्या वस्तू आणते. मीही तिला पूर्वी त्या बाजारातून नाडी बंडल, रुमाल असं काहीबाही आणायला सांगायची. आणि पैसे किती झाले विचारलं की म्हणायची "आई,राहू दे." मग मी तिला काही आणायला सांगेनाशी झाले.
ती सहसा आजारी पडत नाही. खूप ठिकाणी कामं करते. का तर तिला तिच्या मुलाला आणि मुलीलाही शिकवायचं आहे. तिचा मुलगा आणि मुलगी शाळेत जातात. तीही सातवीपर्यंत शिकलेली आहे. ती आपल्या मुलीला कुणाकडेही घरकामासाठी पाठवत नाही.
ती मला एकदा म्हणाली,"जे जगणं माझ्या वाट्याला आलं ते तिच्या वाट्याला नको. मी तिला शिकवणार. ती शिकेल तेवढं शिकवणार. ती चांगली नोकरी करु दे. पैसे मिळवू दे. म्हणजे तिच्या सासरी तिला किंमत राहील. तिच्या साठी चांगला नवरा बघेन. दारू पिणारा नवरा नको. मुलाला पण शिकवेन. त्या दोघांसाठी तर मी इतकी कामं करतेय. आई, तुमचं काम चांगलं आहे. माझं काय चुकलं तर मला समज द्या. पण मला कामावरून काढू नका. माझ्या प्रपंच्यात तुमच्या पगाराची मदत होते. मी आणखी पण दोन कामं जास्त धरेन. पण पोरांना नीट मोठं करीन."
आपल्या अपत्यांविषयी हीच भावना आज प्रत्येक "कामवाली"मध्ये दिसते. त्या आपल्या आणि आपल्या मुलाबाळांच्या सुरक्षित आणि सुखी भविष्याचा तर्कशुद्ध विचार करतात.
आत्ताच्या कामवाल्या शिळं , उरलेलं अन्न घरी घेऊन जात नाहीत. आपले जुने, फाटके कपडे स्वीकारत नाहीत.
घरातल्या बाथरूम्स धुतात पण कमोड साफ करायला नकार देतात. कुठेतरी स्वाभिमानाची जाणीव वाढते आहे.
माझ्या मदतनीस बाईला मी शिळं अन्न कधीच दिलं नाही. घरात काही विशेष पदार्थ बनवला असेल तर तो मी तिला आवर्जून खायला देते. तिच्या डोकं दुखणं सारख्या साध्यासुध्या आजारांवर माझ्या फर्स्ट एड किट मधली औषधं देते. या माझ्या वागणुकीतून तिचं माझं एक प्रेमाचं नातं तयार झालं आहे.
हे सगळं पाहून वाटतं की हा तळागाळातील समाज बदलतोय. आपण या बदलाचं स्वागत करुया. आणि त्याला गती यावी म्हणून यथाशक्ती मदत करुया.
वाचने
9482
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरोबर आहे.
व्यक्तीगत कामासाठी मदतनीस असाव्यात का?
खुप छान विचार आहेत.
In reply to व्यक्तीगत कामासाठी मदतनीस असाव्यात का? by स्वधर्म
खूप छान विचार स्वधर्म! खर आहे
In reply to व्यक्तीगत कामासाठी मदतनीस असाव्यात का? by स्वधर्म
हा विरोधाभास का हे लक्षात येत
In reply to खूप छान विचार स्वधर्म! खर आहे by अमरेंद्र बाहुबली
दारूवर बंदी
In reply to हा विरोधाभास का हे लक्षात येत by Bhakti
दारूवर सरसकट बंदी हवी, दारू
In reply to दारूवर बंदी by प्रसाद गोडबोले
संसारा उध्वस्त करी दारू l
In reply to दारूवर सरसकट बंदी हवी, दारू by अमरेंद्र बाहुबली
खिक्क! तुम्ही गुरु म्हणून ४
In reply to संसारा उध्वस्त करी दारू l by प्रसाद गोडबोले
छोट्या मोठ्या दुकानात काम
In reply to खूप छान विचार स्वधर्म! खर आहे by अमरेंद्र बाहुबली
या विषयावरील एका सिनेमाबाबतचा लेख
नाच गं घुमा हा काही
In reply to या विषयावरील एका सिनेमाबाबतचा लेख by स्वधर्म
लेख आवडाला !
समाजवादी विचारसरणी प्रामाणिक
In reply to लेख आवडाला ! by प्रसाद गोडबोले
अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत
In reply to समाजवादी विचारसरणी प्रामाणिक by गवि
कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघा
In reply to अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत by प्रसाद गोडबोले
खर आहे!
In reply to कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघा by स्वधर्म
कधीतरी थिअरीज सोडून
In reply to कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघा by स्वधर्म
तो प्रतिसाद तुंम्हाला नव्हता
In reply to कधीतरी थिअरीज सोडून by गवि
आले लक्षात. गोडबोल्यांना
In reply to तो प्रतिसाद तुंम्हाला नव्हता by स्वधर्म
राम राम गवि !
In reply to आले लक्षात. गोडबोल्यांना by गवि
लाल सलाम! जय ब्लादिमिर
In reply to राम राम गवि ! by प्रसाद गोडबोले
मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही
In reply to राम राम गवि ! by प्रसाद गोडबोले
त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या
In reply to मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही by स्वधर्म
भले शाब्बास!
In reply to त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या by प्रसाद गोडबोले
कंटाळा आला ह्या भंपकपणाचा =))
In reply to भले शाब्बास! by स्वधर्म
:-)
In reply to कंटाळा आला ह्या भंपकपणाचा =)) by प्रसाद गोडबोले
बाकी खुप चांगलं लिहलंय.. पण
In reply to मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही by स्वधर्म
ते प्रगो याला संस्कार नाव
In reply to बाकी खुप चांगलं लिहलंय.. पण by Bhakti
जन्मावर बरंच काही
In reply to बाकी खुप चांगलं लिहलंय.. पण by Bhakti
विषमता हा निसर्गाचा मुळ गुणधर्म आहे....
In reply to मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही by स्वधर्म
यावत्चंद्रदिवाकरौ
In reply to विषमता हा निसर्गाचा मुळ गुणधर्म आहे.... by कर्नलतपस्वी
विषमता हा निसर्गाचा मूळ गुणधर्म
In reply to विषमता हा निसर्गाचा मुळ गुणधर्म आहे.... by कर्नलतपस्वी
+१
In reply to विषमता हा निसर्गाचा मूळ गुणधर्म by स्वधर्म
मानवी व्यवहारात सामाजिक आर्थिक विषमता टिकवायची का?
In reply to विषमता हा निसर्गाचा मूळ गुणधर्म by स्वधर्म
गल्लत
In reply to मानवी व्यवहारात सामाजिक आर्थिक विषमता टिकवायची का? by कर्नलतपस्वी
जमेल तेवढा इतरांना रोजगार देणे हीच खरी मानवता
घरची कामं करणाऱ्या बायका
त्या बायका निदान कम सोडणे हा
मागणी आणि पुरवठा हे तत्व जगभर
अपराधगंडातून आलेली विशेषणे
आपापला दृष्टीकोन
अपराधगंड असण्याचे कारण नाही.
कावीळ झालेल्या माणसाला सगळं
आजींच्या साध्याभोळ्या
आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत
In reply to आजींच्या साध्याभोळ्या by धर्मराजमुटके
आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत.खिक्क!लेख आवडला
या लेखावर भरभरून प्रतिसाद आला