मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कार्यक्रम..

प्राजु ·

विसोबा खेचर Tue, 10/16/2007 - 00:56
आता येत्या गुरूवारी माझा श्रीमती शांताबाई शेळके यांच्यावर त्यांच्या जयंती निमित्त ( १२ आक्टो) कार्यक्रम मी सादर करणार आहे. कार्यक्रमास अनेकानेक शुभेच्छा... भारतामध्ये हा कार्यक्रम गुरूवारी ७.३० ला संध्याकाळी ऐकता येइल. सकाळी की संध्याकाळी? माझं 'घड्याळ' थोडं कच्चं आहे म्हणून प्रामाणिकपणे विचारतो! :) कामधंद्यातून सवड झाल्यास कार्यक्रम नक्की ऐकेन. कार्यक्रमातील दोन्ही बायका माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत! शांताबाई, एक उत्तम कवयत्री म्हणून आणि प्राजू, आपल्या मिसळपाव परिवाराची एक कुटुंबीय म्हणून! :) आपला, (आकाशवाणी मुंबई 'ब' केन्द्रावरचा 'कामगार विश्व' आणि 'आपली आवड' या कार्यक्रमांचा चाहता!) तात्या.

कोलबेर Tue, 10/16/2007 - 01:50
आम्ही पण जरूर ऐकू. पण त्या लिंकवर ऐकायचे कसे? बरीच खटपट केली तरी काहीच ऐकायला मिळाले नाही :-(

प्राजु Tue, 10/16/2007 - 03:43
लिंकवर त्यांनी दिलेल्या वेळेलाच कार्यक्रम चालू असतात. एरवी रेडीओ बंद. आणि त्यावेळी लिंक वर गेलात तर मराठी वर क्लिक करताच कार्यक्रम चालू होतो. - प्राजु.

सहज Tue, 10/16/2007 - 06:47
शुभेच्छा! (एव्हाना बहूदा रेकॉर्ड झाला असेल म्हणा का थेट प्रक्षेपण?) शक्यतो जमवूच. पुनःप्रसारीत होणार असेल तरी कळवा म्हणजे ज्यांना काही कारणाने जमणार नाही त्यांना सोयीचे. जमल्यास तबकडी मिळवा म्हणजे कायमस्वरूपी आस्वाद घेता येईल ज्याला जसे जमेल तेव्हा, पुन्हा पुन्हा! :-)

स्वाती दिनेश Tue, 10/16/2007 - 10:03
वा छान प्राजु, कार्यक्रमाला शुभेच्छा! सहजराव म्हणतात त्याप्रमाणे तबकडीचे पण पहा.:) स्वाती

ध्रुव Tue, 10/16/2007 - 11:09
माझ्याही शुभेच्छा!! पण अजून कुठलाही कार्यक्रम ऐकता आला नाही. लिंकवर क्लिक केले तरी ऐकू येत नाही!! :( ११.am ला कार्यक्रम आहे. आज त्या वेळेस काही चालू नाही का?? ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

चित्रा Tue, 10/16/2007 - 20:26
शुभेच्छा! तुमचा कार्यक्रम नक्कीच ऐकायला आवडला असता. पण कामाच्या वेळेमुळे ऐकता येणार नाही. सी डी किंवा इतर काही रेकॉर्डिंग मिळेल का?

प्रियाली Tue, 10/16/2007 - 21:04
शुभेच्छा तर आहेतच पण कार्यक्रम नेहमीसारखाच बहारदार सादर करशील अशी खात्रीही आहे. गुरुवार लक्षात ठेवायला हवा. :)

कार्यक्रमाकरता शुभेच्छा! अद्याप हे सदर 'तांदुळातून खडा बाजूला काढून टाकतात' त्या पद्धतीने दुजाभाव किंवा पंक्तिप्रपंच करणार्‍या 'माध्यमिक मिसळपावकर' सारख्या एखाद्या सदरात न जाता मिसळपावच्या मेनस्ट्रीमवरच आहे याबद्दल मी मिसळपावचे अभिनंदन करतो! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

प्राजु गुरुवार, 10/18/2007 - 05:03
मिसळपाव वासियांना धन्यवाद..! आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.. आपली, प्राजु.

लेखनविषय:
लेखनप्रकार
मंडळी, थोडी स्वस्तुती करते आहे. इथे अमेरिकेत एक इंटरनेट रेडिओ आहे. तिथे मी निवेदिकेचं काम करते. माझे २-३ कार्यक्रम झाले आतापर्यंत. आता येत्या गुरूवारी माझा श्रीमती शांताबाई शेळके यांच्यावर त्यांच्या जयंती निमित्त ( १२ आक्टो) कार्यक्रम मी सादर करणार आहे. पॅसिफिक टाईम सकाळी ७.०० , ११.०० www.eprasaran.com इथे मराठी चॅनेल. भारतामध्ये हा कार्यक्रम गुरूवारी ७.३० ला संध्याकाळी ऐकता येइल. कार्यक्रम मिसळपाव करांनी ऐकावा ही विनंती आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात. - प्राजु.

माझा आवडता प्राणी: "गाढव"

हरिप्रसाद ·

हिंदीत " चूडीवाले बाबा" अशी कथा पाठ्यपुस्तकात वाचली होती. कुणाची होती लक्शात नाही. ( प्रेमचंदच्या नावावर खपवावी अस डोक्यात होतं पण तसं नसेल तर लोक मलाच गाढव म्हणतील या भीतीने मी तसे लिहिले म्हाई) त्यातला तो कासार गाढवाला पण शिव्या देत नाही. कारण त्याच्या व्यवसायाचा संबंध हा स्त्रियांच्या बांगड्या भरण्याशी असतो. त्यामुळे तोंडात वंगाळ भाषा नको. म्हणुन तो गाढवाशी पण प्रेमाने बोलतो. कोण म्हणतो गाढवाला अक्कल नसते. मी एकदा पाउस आल्यावर बसस्टॊपचा आसरा घ्यायला गेलो तर माझ्या अगोदर गाढव तिथे हजर. अवांतर- खेचर ( विसोबा नव्हे) कसं काय निर्माण झाल हो? प्रकाश घाटपांडे

देवदत्त Mon, 10/15/2007 - 21:34
मजा आली वाचून... मला तो आवज चांगला काढता येतो पण तो काढल्यावर माझी आई माझ्या कानाखाली आवज काढते. धमाल :D

In reply to by विश्वजीत

विसोबा खेचर गुरुवार, 10/18/2007 - 07:23
आता पुढचा निबंध कोणावर? हेच विचारतो! :) गाढवावरचा लेख आवडला! साधा, सोपा परंतु तेवढाच सुरेख वाटला.. आपला, (गाढविचा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हरिप्रसाद गुरुवार, 10/18/2007 - 10:08
आपल्याला पुर्वी याच ठिकाणी " माझा आवडता पक्षी : कोंबडी " नावाचा निबंध वाचल्याचे आठवत असेलच. पाहू पूढ्चा निबंध माणसावर लिहू..............

भाग्यश्री Sat, 10/20/2007 - 11:43
हे सगळं तुम्हीच लिहीले आहे का? कारण हे ऑर्कुटवर कम्युनिटीज मधे वाचल्याचे आठवत आहे... खुलासा करावा...

तसे मला सगळेच प्राणी आवडतात पण लांबुनच बघायला ते ठिक वाटतात. पण या सर्व प्राण्यांमध्ये "गाढव " हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे. गाढवाला २ डोळे, २ कान, ४ पाय व १ शेपूट असते. त्याच्या अंगावर काहि वेळा पट्टे मारलेले दिसतात. त्यावेळी ते मला झेब्र्यासारखे वाटते. आपण रस्ता नेहमी झेब्रा क्रोसिंग वरुनच क्रोस करवा. झेब्रा हा प्राणी प्रामुख्याने जंगलात आढळतो. पण आजकाल मुळी जंगलच आढळत नाही. त्यामुळे झेब्रा कुठे असतो ते मला माहित नाही.

"बाप" माणुस झालो

झकासराव ·

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 09:31
झकासरावा, तुझे व तुझ्या सौ चे हार्दिक अभिनंदन.. छोट्याला अनेकोत्तम आशीर्वाद... मिसळपाव परिवार तुमच्या आनंदात सहभागी आहे.... तात्या.

१) आपल्या जबाबदार्‍या नकळत वाढल्या. २) लोकसंख्येत एकाची भर पडली ३) भविष्यात एका गरजू तरुणाचा रोजगार कमी झाला ४) रत्न निघतय कि दिवटा याची काळजी निर्माण झाली. ५) आपल्याला अधिक कमाई करण्याची गरज निर्माण झाली ( दु:ख हे आनंदासाठी चांगले विरजण आहे) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रमोद देव Mon, 10/15/2007 - 09:47
कुणी नवीन दुकान काढले की "दिवाळ्याचा अर्ज मागवून घ्या म्हणावं" असे म्हणणार्‍या 'अंतु बर्व्या'ची आठवण आली आपल्या प्रतिसादाने. घाटपांडे साहेब आपण जन्माने नसलात तरी वृत्तीने कोकणी दिसताहात( आहे की नाही स्वभाव विश्लेषण....आम्हाला बी वाइच शास्त्र येतं म्हन्तो मी) नाही तर असा प्रतिसाद दिला नसतात. (कृ. ह. घ्या.)

In reply to by प्रमोद देव

आमच्या नावातच घाट हाये. इथ येउन पुन्यात आल्यव आमच्यात कोकनि संस्कार झाले. आनंदात काय सगळेच सहभागी होतात. दु:खात व्हत नाहीत ना? म्हनुन आम्हि झकासरावांचे खरे हितचिंतक! झ़कासराव आम्हाला ई पेढा पाठवा बरका! पेढा खाल्ल्याव त्याची चव जिभेवर लई रेंगाळते, अवांतर - अंतू बर्वा परत एकदा वाचला पाहिजे. प्रकाश घाटपांडे

प्राजु Tue, 10/16/2007 - 00:16
झकासराव... बाजी मारलित तर...! अभिनंदन... आमचे ही आशिर्वाद चिरंजीवाना आपल्या. - प्राजु.

ध्रुव Tue, 10/16/2007 - 11:02
झकासराव अभिनंदन.., नाव काय ठेवणार आहात? छायाचित्रे चढवा जालावर..... वाट बघेन!! ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

झकासराव Tue, 10/16/2007 - 15:00
तुमच्या शुभेच्छाबद्दल. :) घाटपांडे साहेब तुम्ही भविष्याचे चित्र दाखवले त्याबद्दल विशेष आभारी आहे. :) देव साहेब अहो त्यांच्या आडनावातच "घाट" आहे की. हलकेच घ्या हो. बारस अजुन नाही झाल. दिवाळीनंतर होइल. नाव ठेवल्यावर सांगेन इथे सगळ्याना. :) छायाचित्र नक्की टाकेन. सध्या एकच मदत हवी आहे. इथे इ-पेढे द्यावे म्हणतोय. ते कसे द्यावे? (चित्र कसे टाकावे)

कांचन Tue, 10/16/2007 - 22:23
झकासराव, देवांनी तुमच्या वतीने दिलेले पेढे पावले! पुत्ररत्नप्राप्तीबद्दल अभिनंदन! कांचन

मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन आणि मुलाला आशीर्वाद! ह्या सदराची 'वैयक्तिक' या नावाखाली हेटाळणी होऊन ते 'आपापसात' मध्ये न जाता अद्यापही मिसळपावच्या मेन स्ट्रीमवरच आहे याबद्दल मी पंचायतसमितीचे आभार मानतो. कुणी सभासद स्वत:बद्दल किंवा इतरांबद्दल काही लिहू लागला की लगेच त्याला 'आपापसात' मध्ये पाठवून आपला प्रशासकीय शहाणपणा सिद्ध करायचा, हा प्रकार मिसळपाववर नाही, तसेच मिसळपाववर 'आपापसात' सदृष एखादा 'महारवाडा' नाही याबद्दल मला मिसळपावचे आणि पंचायत समितीचे कौतुक वाटते! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

झकासराव Wed, 10/17/2007 - 12:17
सार्‍यांचे :) पुरणपोळि, मिसळ पाव मी असल्या पदार्थांचा फॅन आहे. नुसत वाचल तरी तोंडात ३० मिलि लाळ येते. आणि लोक्स असे आयडी घेवुन मनात खाण्याची तमन्ना जागी करतात. चांगल आहे हे. :) मला अजुनही इकडे वेगवेगळ विभाग कसे आहेत ते कळालेल नाही.(मनोगतावर पण कळत नाही) म्हणुन बातमी अस काही दिसल त्याखाली टाकल हे. बरोबर आहे ना पण??

मागील आठवड्यात आम्हास पुत्र रत्न प्राप्ती झाली. :) आपल्या सर्वाना कळवावे म्हणुन ही बातमी इथे टाकली आहे.

भास

धनंजय ·

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 00:43
धनंजयराव, तुम्ही ही कविता प्रेमकाव्य या सदरात घेतली आहे खरी, परंतु मला तर ही कविता प्रेमकाव्याच्याऐवजी थोडीशी रहस्यमयच वाटली! मी याला 'रहस्यमय प्रेमकाव्य' असं म्हणेन! भिंतीवरती एक सावली कशी उमटली, कुठे धावली नसे आकृती तव जी आली टाकुनि झोता गाडी गेली हे कडवं मस्त आहे. माझ्यामते इथूनच खरी रहस्याला सुरवात होते. मला विचाराल तर याच कवितेचा धागा पकडून सुरवातीला 'प्रेमकथा' आहे असं दाखवून पुढे याची एक उत्तमपैकी डिटेक्टीव्ह ष्टोरी बनू शकेल असं मला वाटतं! 'शेजार्‍यांच्या खोल्यांमधुनी कुणी फिरकते रात्री उठुनी', 'भिंतीवरची सावली', 'रात्रीच्या अंधारात झोत टाकून गेलेली गाडी', इत्यादी मालमसाला या रहस्यमय कथेत मजा आणेल असं वाटतं! असो, कविता वाचून झालेलं प्रामाणिक मत नोंदवत आहे. राग नसावा.. धन्याशेठ, तुलाही जर माझं म्हणणं पटलं असेल तर लिही पाहू याच धर्तीवर एखादी छानशी रहस्यकथा! तू ती उत्तमरित्या लिहू शकशील अशी मला खात्री आहे! आपला, तात्या बॉन्ड ००७!

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Mon, 10/15/2007 - 07:20
तुमचे म्हणणे खरे आहे. कधीकधी प्रेम ही एक झपाटलेली अवस्था असते. टप्प्याटप्प्यावर प्रियव्यक्तीचा भास पाहाणारा प्रियकर आज ते भास म्हणून ओळखू शकतो, उद्या ते ओळखेलच असे काही सांगता येत नाही. कवितेत शेवटचा भास खरा की खोटा हे प्रियकराला कळत नाही. प्रियकराला वेड लागले आहे का? की जाणून बुजून एका शेवटच्या भासाचे निरसन तो करू इच्छित नाही, हे रहस्य आहे. पण झपाटून जायच्या भीतीने जो जगतो त्याने प्रेमाच्या फंद्यात का पडावे! झपाटण्यातही सच्चे प्रेम आहे.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 11:38
तुमचे म्हणणे खरे आहे. कधीकधी प्रेम ही एक झपाटलेली अवस्था असते. नाही, झपाटलेली अवस्था वगैरे काही नाही, मला तर यात खुनाबिनाचं प्रकरण असावं असा संशय होतो आहे! रात्रीच्या अंधारात झोत टाकून गेलेली गाडी पोलिसांची असावी का? :) आपला, (शि.आय.डी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टग्या Mon, 10/15/2007 - 11:53
खुनाबिनाच्या प्रकरणाबद्दल माहीत नाही. असूही शकेल. मला तर काही भागांत ही डिटेक्टिव्ह कथेपेक्षा एखादी गूढ भयकथा / भूतकथा असावी असे वाटले. शेजार्‍यांच्या खोल्यांमधुनी कुणी फिरकते रात्री उठुनी या पंक्ती वाचून, मध्यरात्रीचा मिट्ट काळोख आहे, झंझावात घोंगावत आहे आणि शेजार्‍यांच्या खोलीतून अचानक 'आजा रे परदेसी' किंवा 'आयेगा आनेवाला' ऐकू येत आहे, असा 'भास' झाला बॉ!

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 12:05
या पंक्ती वाचून, मध्यरात्रीचा मिट्ट काळोख आहे, झंझावात घोंगावत आहे आणि शेजार्‍यांच्या खोलीतून अचानक 'आजा रे परदेसी' किंवा 'आयेगा आनेवाला' ऐकू येत आहे, असा 'भास' झाला बॉ! हे वाचून मला तर आता धनंजयरावांच्या चेहेरा अशोककुमारसारखा दिसू लागला आहे! :) आपला, तात्यामुनी!

मपल्याला अदुगर वाटलं कि धनंजयराव त्यो संकृत कवी की नाटककार 'भास' याबद्दल बोलतायत. मंग कळाल कि ह त्येंच्या मनातलेच भास हायेत. बंटा मारला कि असे भास व्हतात बरं का? येशीखालून चालनारा मानूस बी टकुर्‍याला लागनं म्हनून वाकू वाकू चाल्तोय. पावसाच्या पान्याच्या डबक्यात बुडनं म्हणुन वाकु वाकु ठाव घेतुय. यष्टी लई लांब असली तरी अंगाव येईन म्हनून अदुगरच पळत सुटतोय. यकदा रामराम दुसर्‍यान घेतला तरी धा धा यळंला रामराम करतुयं. मंग मान्स बी वळ्खून जात्यात. ह घ्या सां न ल प्रकाश घाटपांडे

विकास Mon, 10/15/2007 - 23:02
शेजार्‍याच्या घरी येता वरचेवरी तुमचे लाडीक बोल येते कानावरी आणि जागे पणी येते स्वप्नांना जाग, का हो धरीला मजवर राग... वळती तुमचे डोळे माझ्या खिडकीकडे भारी हट्टी स्वभाव तुम्ही जाता पुढे जाता चैत्रापरी माझी फुलवून बाग, का हो धरीला मजवर राग... जाणे येणे होते तुमचे माझ्या घरी तुमच्या पावलांची वाट पडली परसू दारी वाटलं फिरून याल अवचीत केंव्हा तरी डोळे न्याहाळती, डोळे न्याहाळती, डोळे न्याहाळती खुळ्या प्रितीचा माग का हो धरीला मजवर राग... (जगाच्या पाठीवर, ग.दि.मा.) वाचण्या पेक्षा ऐकण्यासारखे..

धनंजय Tue, 10/16/2007 - 17:13
"लेकिन" चित्रपटात हे गीत आहे, कवी गुलजार आहेत : +++++++++++++++++ सुरमयी शाम इस तरह आये सांस लेते हो जिस तरह साये कोई आहट नहीं बदन की कहीं फिर भी लगता है तू यहीं है कहीं वक़्त जाता है, सुनाई देता है तेरा साया दिखाई देता है जैसे खु़शबू नज़रसे छू जाये सांस लेते हो जिस तरह साये दिन का जो भी पहर गुजरता है कोई एहसान सा उतरता है वक़्त के पाँव देखता हूँ मैं रोज ये छाँव देखता हूँ मैं आये जैसे कोई ख़याल आये सांस लेते हो जिस तरह साये +++++++++++++++++ अर्थात या चित्रपटात भुताटकी आहे. पण या गाण्याला हृदयनाथांनी संगीत असे हळुवार दिले आहे, आणि सुरेश वाडकरांनी असे काही गायले आहे, की ती भीतीदायक भूतबाधा मुळीच वाटत नाही, सर्वत्र प्रियेची आठवण येणार्‍या, आहट-छाँव-खुशबू हे भास बघणार्‍या प्रियकराचा त्या गाण्यातून अनुभव येतो. http://www.youtube.com/watch?v=rx6D4tNMQk0

प्राजु Mon, 07/21/2008 - 08:41
सुरूवातीला वाचताना काहिशी गूढ कविता असे वाटले होते. पण तिसर्‍या कडव्यापासून कविता एकदम झोक्कात जाते आहे. जीभ चटावे काय कारणा? फुका शोधते तुझ्या चुंबना जशी लागली सहज ती जरा सुकलेल्या या बधीर अधरा हम्म!!! भारीच हा विरह बुवा!! (कविता आवडली हे.सां. न. ला.) स्वगत : के सुं चा कारखाना बंद आहे का? बे.ला काय लाडू खाऊन झोपला आहे का?? आंबोळीचं काय?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

स्वगत : के सुं चा कारखाना बंद आहे का? बे.ला काय लाडू खाऊन झोपला आहे का?? आंबोळीचं काय?? अमोल केळकर चिकन खाऊन झोपी गेले का काय? पिडां काकांच्या 'पोरी पटवण्याचे १११ सोपान' या विषयाचा तास अजून संपला नाही काय? साला झाले काय या विडंबनकाराना? पुण्याचे पेशवे

अनिल हटेला Mon, 07/21/2008 - 13:54
रॉ मटेरियल रेडी आहे !!! कुठे गेले आपले एक्सपर्ट !!!! के सुं चा कारखाना बंद आहे का? बे.ला काय लाडू खाऊन झोपला आहे का?? आंबोळीचं काय?? -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

चतुरंग Tue, 07/22/2008 - 00:25
सुरेख काव्य! आपल्याला जाणवलेले 'भास' आमच्यापर्यंत पोचले! ;) (स्वगत - ह्या धनंजयशेठचा अभ्यासाच्या विषयांशिवाय इतरही 'विषयां'चा बराच अभ्यास दिसतो आहे! त्याशिवाय का असे 'भास' होतात? B) ) चतुरंग

Taxonomy upgrade extras
भास ***************** चाहुल लागुनि का मी जागे? पा‍उल नव्हते तव ते मागे - शेजार्‍यांच्या खोल्यांमधुनी कुणी फिरकते रात्री उठुनी * भिंतीवरती एक सावली कशी उमटली, कुठे धावली नसे आकृती तव जी आली टाकुनि झोता गाडी गेली * मस्तकावरि स्पर्श कसा हा गोंजारे मज हात तुझा का? छे! तो अभ्रा केस हलवितो पंखा वारा जसा फिरवितो * जीभ चटावे काय कारणा? फुका शोधते तुझ्या चुंबना जशी लागली सहज ती जरा सुकलेल्या या बधीर अधरा * भास तुझे हे अवतीभवती क्षणभंगुर तरी भ्रम हे असती निरसे ना परि, छळे गंध हा ओतप्रोत तव भिने मंद सा *****************

ले गई दिल 'दुनिया' जापानकी..४

स्वाती दिनेश ·

बेसनलाडू Mon, 10/15/2007 - 07:35
नेहमीइतकाच रंजक झालाय. चित्रेही छान. पुढचे भागही येऊद्यात. वाचत आहोत. (वाचक)बेसनलाडू

प्रमोद देव Mon, 10/15/2007 - 07:51
मी काल रात्री दिलेली ह्या लेखावरील प्रतिक्रिया उडालेली दिसतेय. हा काय प्रकार असावा ह्याचा पंचायत समितीने शोध घ्यावा अशी विनंती. ह्या आधी 'राजें'च्या लेखावरचा माझा प्रतिसादही असाच उडाला होता. कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. लेख संपादित करताना असा प्रकार घडत असावा असे मला वाटते आहे. कारण माझ्या प्रतिसादानंतर दोन्ही लेख 'अद्ययावत' केल्याचे आढळले. असे जर खरोखरीच होत असेल तर ते नेमके कशामुळे होत आहे हे इथले तज्ञ सांगू शकतील अशी अपेक्षा आहे आणि त्यावर तोडगाही काढू शकतील अशी खात्री आहे.

In reply to by प्रमोद देव

कोलबेर Mon, 10/15/2007 - 08:59
>>हा काय प्रकार असावा ह्याचा पंचायत समितीने शोध घ्यावा अशी विनंती. सदर घटना अज्ञात तांत्रिक बिघाडामू़ळे होत असाव्यात असे मागेही पंचायत समीतीच्या श्री. विकास ह्यांनी स्पष्टीकरण दिले होते. पंचायत समिती ही तांत्रीक बाजू सांभाळण्यासाठी नसल्याने ह्या समस्या सोडवण्यास असमर्थ आहे. श्री.नीलकांत हे एकटेच ह्या विषायातील जाणकार असून ह्या समस्येवर त्यांनाच उपाय करणे शक्य आहे, पण ह्या संकेतस्थळाची तांत्रीक बाजू सांभाळताना आजवरचे आपले व्याप सांभाळून त्यांनी दिलेले योगदान बघता ह्या समस्येवर त्यांनी वेळ मिळेल तसेच काम करावे असे मला वाटते. त्यांच्यावर अधिक भार टाकण्या पेक्षा ,महत्वाचे काहीही लिखाण इथे सुपुर्त करण्यापूर्वी त्याची एक प्रत काढून ठेवणे मला व्यक्तिशः अधिक तारतम्याचे वाटते. >>कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. ह्या विधानामागील आपली भुमिका कळू शकेल का? आपल्याला ह्यापूर्वी कधी असा अनुभव (छापील उत्तर) आला आहे का?

In reply to by कोलबेर

प्रमोद देव Mon, 10/15/2007 - 09:21
कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. ह्या विधानामागील आपली भुमिका कळू शकेल का? आपल्याला ह्यापूर्वी कधी असा अनुभव (छापील उत्तर) आला आहे का? अशा तर्‍हेचे उत्तर एका सदस्याला त्याच्या खरडवहीत अशाच एका तक्रारीबाबत दिलेले आढळले आहे म्हणून मुद्दाम तसे लिहिले आहे.ते उत्तर अधिकृत नसेलही पण प्रातिनिधिक जरुर म्हणता येईल. मी केलेले विधान हे कुणाला दुखावण्यासाठी केलेले नसून त्याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि अशा तर्‍हेचे प्रश्न इतरांना पडू नयेत म्हणून मुद्दामहून केलेले आहे ह्याची नोंद घ्यावी. तांत्रिक अडचण असण्याची शक्यता गृहित धरूनच मी ते विधान केलेले आहे आणि जिथे आणि जसे जमेल तशी त्यात इथल्या तज्ञांनी(नीलकांत आणि जे कुणी असतील त्यांनी) त्याची दखल घेऊन तड लावावी इतकीच माफक अपेक्षा आहे. बाकी काही तक्रार नाही ,आरोप तर नाहीच नाही . तेव्हा कृपया गैरसमज करून घेऊ नये ही विनंती.

सहज Mon, 10/15/2007 - 08:33
पहील्या ३ झुंझार खेळींनंतर हे एकदम नाबाद शतक बर का. अतिशय नेटका लेख वाटला. काही जणांना माहीती (छान आहे म्हणून) अजून हवी असे वाटू शकते. आवडला. ------------------------------------------------------------------------------------------ अवांतर - त्या प्रेमदगड किंवा आसपास वासू-सपना किंवा तत्सम नजरेस न पडल्याने विरस तर नाही ना झाला? :-) (श्लेश)

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 08:46
स्वाती, हाही भाग सुरेख झाला आहे.. विशेष करून किंकाकुजीचे चित्र क्लासच आहे, संग्रही ठेवावे असे आहे... साधी, सोपी भाषा. लेख वाचून प्रसन्न वाटले.. तात्या.

नंदन Mon, 10/15/2007 - 11:39
हाही भाग आवडला. खासकरुन शेवटच्या परिच्छेदात केलेलं मन:स्थितीचं वर्णन. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

3

॥ स्फूर्ती देवीची आरती ॥

नरेंद्र गोळे ·

विकास Tue, 10/16/2007 - 06:45
इथल्या वाचकांस कदाचित नवीही वाटू शकेल. धन्यवाद. आरती आवडली. मी प्रथमच वाचली.

॥ स्फूर्ती देवीची आरती ॥ स्फूर्ते अवघड भारी तुजविण संसारी । अज्ञानी वत्सांच्या ज्ञाना विस्तारी ॥ वारी वारी मजला अकर्मण्याद्वारी । कृतीच्या स्फूर्ती ने आम्हा निवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी, जय स्फूर्ती देवी । निष्चळ मन हो सत्वर, वर दे संजीवनी ॥ धृ ॥ त्रिभुवनी भुवनी पाहता तुलना तुज नाही । तव किमयेचे कौतुक कळते लवलाही ॥ अगणित मनुजा प्रेरक कमालीची ठरशी । ती शक्ती तू मज दे, गाईन तव कीर्ती ॥ २ ॥ उत्स्फूर्त वदने स्फूर्ती देशी निजदासा । आळसापासुनी सोडवी, वाढवी जीवनाशा ॥ स्फूर्ते तुज वाचून कोण वाढवी यशा । 'नरेंद्र' तल्लीन झाला, तव धरी जिज्ञासा

"तो सलीम राजपुत्र" ह्या मराठी गीताचा हिंदी अनुवाद !

नरेंद्र गोळे ·

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 00:50
गोळेसाहेब, आजपर्यंत तुम्ही केलेला हिंदी गीताचा मराठी अनुवादच वाचनात आला. आज प्रथमच एक हिंदी अनुवाद वाचला आणि तो मला आवडला.. मी मराठी आहे, मराठी भाषेचा अभिमान मला आहेच, परंतु हिंदी भाषेवरही माझे अतिशय प्रेम आहे आणि मला ती मराठीइतकीच आवडते! असो.. आपण अजूनही काही मराठी गीतांचा हिंदी अनुवाद करावा ही विनंती... मूळ 'मराठी' कविता/गाणे अनुवादासोबत प्रसिद्ध केल्यास हिंदी अनुवाद प्रकाशीत करण्यास हरकत नाही. - मिसळपाव पंचायत मी व्यक्तिश: पंचायत समितीच्या वरील निर्णयाचे स्वागत करतो... तात्या.

नरेंद्र गोळे Mon, 10/15/2007 - 13:04
धन्यवाद मिसळपाव पंचायतन! धन्यवाद तात्या! अनुवादाच्या कलेचे रहस्य मूळ आणि अनुवाद दोन्हीही सोबत पाहता येण्याने उकलते. ह्याची फार सखोल जाण आपल्या ह्या अभिप्रायांतून अभिव्यक्त होत आहे. आपण अजूनही काही मराठी गीतांचा हिंदी अनुवाद करावा ही विनंती...>> तात्या, "चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा" ह्या मराठी गीताचा मी हिंदीत आणि प्रवासींनी संस्कृतात केलेला सुरस अनुवाद मनोगतावर अजूनही आढळून येतो आहे, त्यावर पुन्हा एकदा नजरे करम करा.

तो सलीम राजपुत्र मूळ मराठी गीतकारः अनिल भारती, संगीतः गजानन वाटवे, गायकः गजानन वाटवे प्रीतीची आसवे पत्थ्थरात पाझरली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || धृ || अनोळखी शिपाईगड्या एकदाच पाहिले | शूराच्या चरणावर मस्त हुस्न वाहिले || इष्काच्या दरबारी चांदरात बरसली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || १ || बंड करून उठली तलवार सलीमाची | राजनिष्ठ, राजबीज आस मोंगलांची || अकबरच्या न्यायकसोटीस प्रीत उतरली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || २ || ते शराबी नयन कधी कुणा नाही डरले | राजा वा रयतेला ना कधीच घाबरले || मिलनच्या वाटेवर भिंत जरी बांधली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली

कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन

नरेंद्र गोळे ·

विसोबा खेचर Sun, 10/14/2007 - 15:21
तात्यांच्या एका लेखावरून प्रेरणा घेऊन हे इथे पेश करत आहे. धन्यवाद गोळेसाहेब! निगाहे करम असावे. म्हणजे काय? मला उर्दूतल्या बर्‍याचश्या शब्दांचा अर्थ समजत नाही, परंतु ती भाषा, तिचा लहेजा, तिचा डौल अतिशय आवडतो. कानाला ही भाषा खूप छान लागते! एकंदरीतच या भाषेचा डौल पाहिला की 'वाघ चुकून जर कधी बोललाच तर तो निश्चितपणे उर्दूतूनच बोलेल. त्याची मातृभाषा उर्दूच असेल!' असं भाईकाका म्हणतात ते पटतं! असो, या निमित्ताने उर्दू भाषेच्या सौंदर्याबद्दल आपण इथे काही लेखन करावे अशी मी तुम्हाला विनंती करेन! हीच विनंती मला माझे मित्रद्वय धोंडोपंत आणि चित्तोबा यांनाही करायला आवडेल! आपला, (उर्दूप्रेमी!) तात्या.

नरेंद्र गोळे Sun, 10/14/2007 - 20:08
तात्या, माझ्याबद्दल तुमच्या फार म्हणजे फारच अपेक्षा आहेत हो! ऊर्दू भाषेचा लहेजा वगैरे ते चित्तरंजननाच साधेल. आमच्यासारख्याच्या बसची बात नाही ती. निगाहे करम असावे म्हणजे "इकडे लक्ष द्यावे" एवढा साधा अर्थ मी धरलेला आहे. हे मिसळपाव नाव तुम्हीच सुचवलेले आहेत काय? तसे असल्यास तुमच्या ह्या दूरदृष्टीचा उचित सन्मान मिसळपावाच्या सोबतीनेच साजरा करावा लागेल. मात्र तुमचे इथल्या प्रशासनावर जराही वजन असेल तर अनुवाद करतांना तरी मूळ हिंदी, मराठी, ऊर्दू सोबत ठेवायला मनाई न करण्याचा सल्ला द्यावा ही नम्र विनंती.

In reply to by नरेंद्र गोळे

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 01:08
निगाहे करम असावे म्हणजे "इकडे लक्ष द्यावे" एवढा साधा अर्थ मी धरलेला आहे. धन्यवाद.. 'इकडे लक्ष द्यावे' या किंचित कठोर आणि शिस्तप्रिय वाटणार्‍या शब्दांऐवजी 'निगाहे करम' हे शब्द अधिक भावले, अधिक अदबशीर वाटले! असो.. हे मिसळपाव नाव तुम्हीच सुचवलेले आहेत काय? हो... तसे असल्यास तुमच्या ह्या दूरदृष्टीचा उचित सन्मान मिसळपावाच्या सोबतीनेच साजरा करावा लागेल. अहो दूरदृष्टी कसली? मिसळपाव हा माझा अत्यंत लाडका पदार्थ, तेव्हा तेच नांव द्यावसं वाटलं इतकंच! :) मात्र तुमचे इथल्या प्रशासनावर जराही वजन असेल तर अनुवाद करतांना तरी मूळ हिंदी, मराठी, ऊर्दू सोबत ठेवायला मनाई न करण्याचा सल्ला द्यावा ही नम्र विनंती. सल्ला द्यायचं काम मी करीन, इव्हन तुम्हीही ते करू शकता. इथे संपूर्ण लोकशाही आहे. मात्र तुमचे इथल्या प्रशासनावर जराही वजन असेल तर नाही, माझं इथल्या पंचायतीवर जराही वजन नाही! इथे काय असावं आणि काय असू नये ह्यात मी लुडबूड करत नाही. ते ठरवण्याचे सर्वाधिकार फक्त सन्माननीय पंचायत समितीकडेच आहेत. पंचायत समितीवरील सर्व सदस्य सुजाण व मिसळपावच्या भल्याकरता योग्य ते निर्णय घ्यायला अत्यंत लायक व समर्थ आहेत याबद्दल मला खात्री आहे! त्यांची नांवंही जाहीर केलेली आहेत. यापैकी कुणाही व्यक्तिने माझ्याकडे 'पंचायत समितीवर घ्या' अशी मागणी केलेली नाही, तसेच पंचायत समितीवरील कुणीही सदस्य माझ्या ताटाखालचं मांजर वा माझा मिंधा नाही, त्यामुळे वजनबिजन असण्याचा इथे प्रश्नच उद्भवत नाही! मी फक्त नांवापुरता मालक आहे, विश्वस्त आहे. पंचायतीवरील सर्व सदस्य माझे सबॉर्डिनेटस नसून माझ्या बरोबरचे सहकारी आहेत अशीच माझी प्रामाणिक भावना आहे! गोळेसाहेब, आपण इथे नवीन आहात, परंतु लवकरच आपल्याला येथील मुक्त वातावरणाचा व लोकशाही तत्वांचा सुखद अनुभव यावा अशी अपेक्षा आहे.. आपला, (विश्वस्त तरीही फक्त एक सामान्य सदस्य!) तात्या.

जयन्त बा शिम्पि गुरुवार, 01/29/2015 - 16:46
माझ्या मनात एक वेगळीच कल्पना घोळतेय . उपरोक्त हिन्दी गाण्याचे पुढिल कडवे आपण तयार करावयाचे म्हणजे असे कि गाण्याची सिचुअशन तुम्हाला समजली आहे, चाल लक्षात आलेली आहे , मुळचा कवीचा भाव समजला आहे तर नवीन कडवे तुम्ही रचून दाखवावे. जमेल काय? मी तसा प्रयत्न करणार आहे

कोई लौटा दे मेरे मूळ हिंदी गीतकार: शैलेंद्र, संगीत: किशोरकुमार, गायक: किशोरकुमार चित्रपट: दूर गगन की छाँव में, साल: १९६४, भूमिका: किशोरकुमार, सुप्रिया चौधरी, अमितकुमार अलबेले दिन प्यारे, मेरे बिछड़े साथ सहारे | हाय! कहाँ गये, हाय! कहाँ गये || आँखो के उजियारे, मेरे सूनी रात के तारे | हाय!

कुछ तो लोग कहेंगे..

विसोबा खेचर ·

धोंडोपंत Sun, 10/14/2007 - 14:26
आमचेही अभिवादन. आपला, (खिन्न) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

नरेंद्र गोळे Sun, 10/14/2007 - 14:58
तात्यासाहेब नमस्कार, अगदी खरे आहे आपले. आणि त्याचेही. कोणी परत करावे, हरपले दिन | हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || धृ || मनोरथांतील महाल, आणि स्वप्नांतील नगर | ज्यांच्यासाठी प्यायलो मी, जीवनाचे ते जहर || आज मी शोधू कुठे, कुठे गेले ते सारे | हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || १ || ह्या गाण्याला त्याने दिलेले संगीतही अफाट आहेच, आणि लताने गायलेले हे पुरूषी गाणेही अफलातून आहे.

In reply to by नरेंद्र गोळे

विसोबा खेचर Sun, 10/14/2007 - 15:08
तात्यासाहेब नमस्कार, अगदी खरे आहे आपले. आणि त्याचेही. नमस्कार गोळेसाहेब, तो होताच मुळी.... 'द वन ऍन्ड ओन्ली...'!! असो, मिसळपाववर आपले सहर्ष स्वागत.. आपला, (मनोगतीय सुहृद!) तात्या.

विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 02:19
मागे कुणीतरी मिपाकराने मला पोष्टकार्ड पाठवून अगदी कळकळीने त्याचा पत्ता विचारला होता. ते पोष्टकार्ड चुकून डिलिट झालं त्यामुळे ही विचारणा कुणी केली होती ते आता आठवत नाही. त्यानंतर बरेच दिवस लिहीन लिहीन म्हणत होतो पण राहून गेलं. आज संध्याकाळी कामधंद्याच्या निमित्ताने अचानक जुहूला जाणं झालं तेव्हा त्याची याद आली म्हणून त्याच्या बंगल्याजवळही थोडावेळ घुटमळलो, मन थोडं उदास झालं! तो माझा वीक पॉईंट होता! १९८७ सालीच मी त्याच्या घरी गेलो होतो ती आठवणही लवकरच लिहीन मिपावर! पुन्हा विसरून जायला नको म्हणून आत्ता इथे त्याचा पत्ता देत आहे. बर्‍याच विलंबाबद्दल मी त्या अज्ञात मिपाकराची माफी मागतो..! पोस्टल ऍड्रेस माहिती नाही, पण तिथे कसं जायचं ते सांगतो.. समुद्रालगत असलेल्या जहू तारा रस्त्यावर जायचं. जुहू कोळीवाड्याकडे जो फाटा जातो तिथनं जवळच त्याचं घर आहे. रस्त्याच्या एका बाजूला सगळे बंगले आणि काही ऑफीसं आहेत तर दुसर्‍या बाजूला समांतर जुहू चौपाटी आहे. जुहू तारा या मुख्य रस्त्यालगतच किंचित एका गल्लीवजा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या तोंडापाशीच त्याचा बंगला आहे! त्या रस्त्याचं नांव - स्वर्गीय किशोरकुमार गांगुली पथ! पण आता त्या बंगल्याकडे बघवत नाही. त्यातला अवलिया तर तिथून केव्हाच उडून गेला आहे! तात्या.

प्राजु Fri, 04/04/2008 - 08:06
१.आचल के तुझे मै लेके चलू इक ऐसे गगन के तले... जहॉं गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले.... २. फूलों के रंग से दिलकी कलम से.... ३. वह शाम कुछ अजिब थी.. कोणकोणती सांगावी आणि कोणती गाळावीत... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 13:43
त्याच॑ आणि माझ॑ नात॑ खुप खुप जुन॑... मी बराच लहान होतो, ७-८ वर्षा॑चा असेन नसेन. घरी 'चलती का नाम गाडी' ची कॅसेट आणली होती..तेव्हापासून ह्या कल॑दराच्या जो काही प्रेमात पडलोय तो आजतागायत सावरलेलो नाही! पहिल्या प्रेमाची हुरहुर त्याच्याच आवाजान॑ 'र॑गीन' झालेली अनुभवली. प्रेमभ॑गाच॑ दु:खही त्याच्या 'दर्दभरे नग्मे' ऐकुन कुरवाळल॑. आन॑दी झालो की त्याची 'मस्तीभरी' एक से बढकर एक गाणी ऐकुन आन॑द शतगुणित केला, पहिली सिगारेट ओढली तेव्हाही 'मै हर फिक्र को धूऍ॑मे उडाता चला गया' म्हणत तोच माझ्याबरोबर होता. प्रेमभ॑गान॑तर सैरभैर झालेल्या अवस्थेतही 'एक भले मानुस को अमानुष बना के छोडा' म्हणत माझ्याशी सहमत होत गेला. मित्र-मैत्रिणी॑बरोबर द॑गा-धूडगुस घालताना 'इय्या इय्या इय्या हे:...देखा ना हाय रे..' म्हणत तोच चौखूर उधळायचा! माझी आयुष्याची साथीदारीण भेटल्यावर तिला 'जीवन से भरी तेरी ऑ॑खे..' आणि 'फुलो॑ के र॑ग से' अस॑ म्हणून खुष कर हे हळूच कानात सा॑गणाराही तोच. कामाच्या रगाड्यात अडकल्यान॑तर ऑफिसातल्या कटकटी॑ना वैतागून मी चिडचिड केल्यावर 'ये जीवन है...इस जीवन का यही है र॑गरुप' अस॑ समजावून सा॑गणाराही तोच...तोच! कोण म्हणत॑य तो आपल्यात नाहीय्ये? अरे, मला तर तो रोज भेटतो. सतत माझ्याच तर बरोबर असतो !!!! -(....) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 13:49
पहिली सिगारेट ओढली तेव्हाही 'मै हर फिक्र को धूऍ॑मे उडाता चला गया' म्हणत तोच माझ्याबरोबर होता. अरे पण धमाल्या, ही ओळ तरी रफीसाहेबांनी म्हटली आहे! :) माझी आयुष्याची साथीदारीण भेटल्यावर तिला 'जीवन से भरी तेरी ऑ॑खे..' आणि 'फुलो॑ के र॑ग से' अस॑ म्हणून खुष कर हे हळूच कानात सा॑गणाराही तोच. वा! सुंदर लिहिलं आहेस..! पण वाचून समाधान नाही झालं! त्याच्या गाण्यांबद्दल अजूनही लिही, अगदी भरभरून...! आपला, (त्याचा दिवाना!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 14:02
अस॑ झाल॑ काय? असो, म्हणजे तेव्हा आम्ही ओळखायला चुकलो तर! तर किशोरदेवा, लेकराला माफ कर. आणि रफीसाहेब तुम्हीही! बाकी रफीसाहेबा॑च्या आवाजतली खुमारीही काही औरच होती नाही? -(ओशाळलेला) ध मा ल. ==========================
पण वाचून समाधान नाही झालं! त्याच्या गाण्यांबद्दल अजूनही लिही, अगदी भरभरून...!
ह॑...जरा तयारी करावी लागेल. प्रतिक्रियेपुरत॑ उर्स्फुतपणे लिहिल॑ गेल॑ खर॑, पण एव्हढ्या मोठ्या माणसाच्या गाण्या॑ना आम्ही हात घालायचा म्हणजे फे..फे उडायची लक्षण॑. ठीक ठीक, तुमची ही फर्माईश माझ्यावर उधार राहिली!

आजपासून २० वर्षांपूर्वी! १३ ऑक्टोबरची १९८७ ची संध्याकाळ! त्याचे वेडे असलेले आम्ही काही मित्र त्याच्या अंतयात्रेला निघालो होतो. त्याची अंतयात्रा जुहू येथील त्याच्या राहत्या घरावरून निघून चेंबूरला आरके स्टोडियोत येणार आहे असे आम्हाला कळले होते. आम्ही आरके स्टुडियोपाशी पोहोचलो. तिथे माणसांचा अक्षरश: महासागर पसरला होता. त्याचे आमच्यासारखेच हाजारो वेडे त्याच्या अंत्यदर्शनाकरता जमले होते! थोड्याच वेळात तो सजवलेला 'ट्रक' आला आणि आरके स्टुडियोत प्रवेशला. तेथे स्वत: शोमॅनने दादामुनींचे सांत्वन केले! परंतु कुणीच बोलायच्या स्थितीत नव्हते. तो आला होता, त्याने पाहिलं होतं, आणि त्याने जिंकलं होतं!

पाटणकर आजोबा..

विसोबा खेचर ·

प्रमोद देव Sat, 10/13/2007 - 17:47
तात्या! अगदी पुलंची आठवण आली बघ. व्यक्तिचित्र इतके सुरेख उतरलंय की इतका वेळ(लेख वाचत असताना) मी तुम्हा दोघांची ध्वनिचित्रफीत पाहात आहे असे वाटत होते. जियो.तात्या जियो.ह्यापुढे शब्द अपुरे आहेत.

लिखाळ Sat, 10/13/2007 - 19:40
तात्या, व्यक्तिचित्र रंगवायची तुमची हातोटी काय वर्णावी. फार जिवंत चित्र उभे केलेत. वर अत्त्यानंद म्हणतात तसेच ध्वनिचित्रफित पागत आहे असेच वाटले. तुम्हाला अश्या लोकांचा सहवास मिळाला हे भाग्यच. (लेख वाचताना एकिकडे भैरवी ऐकली. ) --लिखाळ. तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

सहज Sat, 10/13/2007 - 22:27
व्यक्तीचित्रे म्हणजे तात्यांचा हातखंडा प्रयोग बघा. नेहमीप्रमाणे यशस्वी. एखाद पान फक्कड जमावं व नेहमी त्याच एका पानवाल्याला ते खावसं वाटाव तस तात्याच व्यक्तीचित्र लिखाणात होत आहे. मस्तच रे तात्या! या लेखणीची कमाल पण अशी की नेहमी अवतीभवती सामान्य असलेली माणस पण एका लेखातून एकदम यादगार व्यक्तीरेखा / वल्ली बनून जातात नाही? >>वारले! अगदी शांतपणे आणि आनंदाने! एखाद्या जिवलग मित्राला भेटावं इतक्या सहजतेने मृत्युला भेटले! >>आहे त्यात आनंद मानायचा, उमेदीने जगायचं आणि आयुष्याचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यायचा हेच त्यांचं धोरण होतं. बाकी परमेश्वरा मला तरी तू असेच जीवन व असेच मरण दे रे, दोन्ही शांतपणे आणि आनंदाने!

कोलबेर Sat, 10/13/2007 - 23:47
तात्या व्यक्तिचित्रण मस्तच झाले आहे. आणि सलग एका दमात वाचयला मिळाल्याने फारच आवडले. बाय द वे सालस म्हणजेच अर्चना का हो?..तो भागही पूर्ण करा आता लवकरच.. आम्ही वाट पहात आहोत.

In reply to by कोलबेर

केशवसुमार Fri, 10/19/2007 - 15:45
तात्या व्यक्तिचित्रण मस्तच झाले आहे. आणि सलग एका दमात वाचयला मिळाल्याने फारच आवडले. कोलबेरशेठशी एकदम सहमत.. केशवसुमार

नंदन Sun, 10/14/2007 - 00:48
पाटणकर आजोबांचे व्यक्तिचित्र आवडले. प्रमोदकाका म्हणतात तशी पुलंची आठवण झाली. त्यांच्याच एका पत्रातली -- "पण तुम्हांला कळविणेस आनंद होतो की , 'हल्लीची पिढी बिघडली आहे' किंवा 'आमच्या वेळचं ते आता राहिलं नाही' यासारखी केवळ कवळीतूनच फुटायला योग्य अशी भाष्यं माझ्या तोंडून चुकूनही निघत नाहीत. हल्लीच्या मोगर्‍यालाही आपले नाक चोंदले नसल्यास कुठल्याही काळातल्या फुललेल्या मोगर्‍याइतकाच चांगला वास येतो." ही वाक्यं आणि पावभाजी खाणार्‍या-उत्तम संगीत ऐकणार्‍या आनंदयात्री आजोबांचं तत्त्वज्ञान यात फार काही फरक नसावा. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

स्वाती दिनेश Sun, 10/14/2007 - 12:05
अतिशय सुंदर! आणि एकाच बैठकीत वाचायला मिळाले याचाही आनंद जास्तच आहे :) व्यक्तिचित्र इतके सुरेख उतरलंय की इतका वेळ(लेख वाचत असताना) मी तुम्हा दोघांची ध्वनिचित्रफीत पाहात आहे असे वाटत होते. अत्त्यानंद म्हणतात त्याप्रमाणेच! आता जरा अधिक मागणी: जरा ते जुने अर्धे "प्रकल्प" पूर्ण कर की ! शिंत्रे गुरुजी,सालस ची आम्ही वाट पाहतो आहोत,:) स्वाती

देवदत्त Sun, 10/14/2007 - 13:05
हे व्यक्तिचित्र इतके छान आहे की सर्व समोर घडत आहे आणि ते आपल्यातीलच एक आहे असे वाटते. मैफल संपल्यानंतर एक सन्नाटा निर्माण झाला. लोकांना टाळ्या वाजवायचं भान नव्हतं! हे वाक्यच त्या मैफिलीची रंगत सांगून जाते. 'पाटणकर आजोबा अगदी एकटे आहेत' अशी निश्चितपणे माझ्या मनात कुठेतरी भावना असणार. तिला सुखद तडा गेला असणार आणि म्हणूनच माझ्या आनंदाश्रूंना वाट मिळाली असणार! एखाद्या व्यक्तीबद्दलची आपुलकी आणि त्यांचे मनातील स्थानच ह्यातून प्रकट होते. पण मनाने ते इतके तरूण होते की आम्हा कुणालाच कधी त्यांच्यात ऑडमॅन दिसला नाही. ते आम्हाला आमच्याच वयाचे, आमच्यातलेच कुणीतरी वाटत. खरे आहे... अशा व्यक्ती फारच कमी. एकंदरीत एका मस्त माणसाला मुकलो हेच जाणवतेय.

धोंडोपंत Sun, 10/14/2007 - 14:04
वा तात्या, अप्रतिम व्यक्तिचित्रण लिहीले आहेस. हे पाटणकर आजोबा तुला भेटले हे तुझे भाग्य आणि त्यांच्याबद्दल तू येथे एवढे अप्रतिम लिहीलेस हे आमचे भाग्य. अशी माणसे आयुष्यात क्वचित भेटतात आणि भेटली तरी आपल्याला सोडून पुढील प्रवासास जातात. कुठे कुणाच्या घडल्या भेटी | गीत एक मोहरले ओठी || पाटणकर आजोबांच्या स्मृतीला आमचे अभिवादन. आपला, (नतमस्तक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रियाली Sun, 10/14/2007 - 16:40
खूप दिवसांनी तुमच्या हातचं (किंवा मनातलं) घरगुती, सात्विक व्यक्तिचित्र वाचलं. अर्थातच, आवडलं हे सांगायला नको. शिंत्रे गुरुजी आणि रोशनीही पूर्ण करून टाका.

प्रमोद देव Sun, 10/14/2007 - 21:48
दोन्हीही मस्तच आहे. आत्ता फुरसतीत ऐकले. मजा आली.मालिनी बाईंचे गाणे म्हणजे एकदम मनाची पकड घेणारे आणि श्रोत्यांना जागच्या जागी खिळवून ठेवणारे आहे ह्याचा पुन:र्प्रत्यय घेता आला. धन्यवाद तात्या.

जुना अभिजित Mon, 10/15/2007 - 11:20
काही काही चेहेरेच असे असतात की 'याचं-आपलं जमणार!' याची खात्री पहिल्या भेटीतच होते. हे अगदी खरं आहे. दोन चार वाक्यातच एकमेकांची तार जुळते. पण विरह दु:ख तरी कुणाला चुकले आहे काय? अभिजित

चपला घालून घराबाहेर पडणार तेवढ्यात मागनं आवाज आला, "तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!">> तात्या डोळ्यातून पाणी आलं रे! आपल्या पाटणकर आजोबांप्रमाणे कै. माधव रिसबूड आमचे मित्र. त्यांच्या सहवासातले दिवस आठवले. त्यांच्यावर मनोगत दिवाळी अंकात कदाचित लिखाण येईल. व्यक्तिचित्रातून फलज्योतिष चिकित्सा असा तो विषय आहे, अंनिस वार्तापत्र या ( दिवाळी? ) वार्षिक विशेषंकासाठी हा लेख दोने तिन वर्षांपुर्वी नाकारण्यात आला. कारण काय तर व्यक्तिमहात्म्याकडे झुकणारा आहे. प्रकाश घाटपांडे

तात्या, व्यक्तिचित्र आवडले. चपला घालून घराबाहेर पडणार तेवढ्यात मागनं आवाज आला, "तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!" हे वाचतांना आमच्याही डोळ्यात पाणी तरळलं !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Tue, 10/16/2007 - 00:28
अप्रतिम व्यक्तीचित्र... पु.लं.च्या नंतर बहुतेक तुम्हीच...! वाचताना मलाही गहिवरून आलं. - प्राजक्ता.

In reply to by प्राजु

आर्य चाणक्य Sun, 10/21/2007 - 06:16
अप्रतिम व्यक्तिचित्र ह्याबाबात काही वाद नाही पण पु.लं.च्या नंतर एकदम तात्याच असे म्हणून असे म्हणून आपण पु.लं.चा काहिसा पाणउतारा करत आहात. जमल्यास पु.लं.चे समग्र साहित्य वाचा आणि मगच आपल्याला आमच्या विधानातील अर्थ कळेल. तात्या व्यक्तिचित्रं उत्तम लिहितात ह्यात काही वादच नाही पण पु.लं.शी तुलना करण्यासाठी त्यांना अजुन बरेच अंतर जावे लागेल असे आम्हाला तरी वाटते. तात्या प्रामाणिक मत आहे समजून घ्यालचं! - चाणक्य

In reply to by आर्य चाणक्य

विसोबा खेचर Sun, 10/21/2007 - 07:55
तात्या व्यक्तिचित्रं उत्तम लिहितात ह्यात काही वादच नाही पण पु.लं.शी तुलना करण्यासाठी त्यांना अजुन बरेच अंतर जावे लागेल असे आम्हाला तरी वाटते. तात्या प्रामाणिक मत आहे समजून घ्यालचं! अहो त्यात समजून काय घ्यायचं? आपलं म्हणणं अगदी खरं आहे! पुलं, भीमसेन, कुसुमाग्रज, ही मंडळी फक्त एकदाच होतात! आमचे भीमण्णा नेहमी म्हणतात की गुरू नेहमी इतका मोठा असा असावा की त्याच्यापर्यंत आपण कधीही पोहोचूच शकणार नाही! किंबहुना, अश्याच माणसाला आपण आपला गुरू करावा, गुरू मानावा, तरच आपली थोडीफार प्रगती होऊ शकते! प्राजुच्या मनात पटकन जे आलं तेच तिने लिहिलं आणि त्याचा मी आदरच करतो परंतु भाईकाका माझे गुरू आहेत एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो! तात्या.

विसोबा खेचर Tue, 10/16/2007 - 07:57
प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार.. आपल्या सर्वांचे प्रतिसाद मला मोलाचे आहेत.. 'पाटणकर आजोबा' हे व्यक्तिचित्र भाईकाकांच्या चरणी सादर समर्पित! काही मंडळींना हे व्यक्तिचित्र वाचताना भाईकाकांची आठवण झाली, या परिस मोठा सन्मान तो कुठला? माझ्यावर त्यांचा असाच वरदहस्त रहावा एवढीच इच्छा आहे! 'व्यक्तिचित्र' हा माझा सर्वात आवडता साहित्यप्रकार. भाईकाकांनी या प्रकाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. मी ष्टुलाबिलावर चढून तिथपर्यंत हात पोहोचतो आहे का ते पाहतो आहे, जेणेकरून तो लाडवांचा डबा माझ्या हाती लागेल! :) परंतु अजून मी फारच तळाशी उभा आहे याची नम्र जाणीव आहे! आजपर्यंत त्यांचंच बोट धरून चालण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यापुढेही करत राहीन! आत्ता फक्त 'सा' लावायला शिकतो आहे, अजून भीमसेन खूप दूर आहेत! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आर्य चाणक्य Sun, 10/21/2007 - 06:20
परंतु अजून मी फारच तळाशी उभा आहे याची नम्र जाणीव आहे! तात्या आज पर्यंतचा तुमचा आत्मस्तुतीचा हट्ट पाहाता आपण लिहिलेला हा प्रतिसाद फारच आवडला. आपला लेखनाचा दर्जा आता वाढत जाणार ह्यात आम्हाला काहीही शंका नाही.

नरेंद्र गोळे Tue, 10/16/2007 - 14:08
तात्या, मला ह्या लेखाने आचार्य अत्र्यांची आठवण करून दिली. ते मृत्यूलेखांचे अनभिषिक्त बादशाह होते. ज्या नेहरूंची "संयुक्त महाराष्ट्र" चळवळीदरम्यान त्यांनी यथेच्छ टिंगल केली त्यांच्यावरचा मृत्यूलेख (सूर्यास्त?) अविस्मरणीय ठरला. मला माहित नसलेल्या व्यक्तीरेखेस केवळ मृत्यूलेखानेच परिचित करवून माझ्यासाठी ती आदरणीय ठरवण्याचे तुमचे कसब वाखाणण्यासारखेच आहे. ऐंशीव्या वर्षीही स्वतःचे स्वतः जगणे कौतुकास्पद आहे. हल्ली आपल्याला स्वतःच्या सर्व गोष्टी स्वतः करायच्या म्हटल्या तर केवळ शिक्षा वाटावी एवढे आपले जीवन श्रमविभाजनाच्या आधारे सुरू आहे. आपल्यालाही ऐंशी वयोमान कालवशात प्राप्त व्हावे आणि संपूर्णपणे स्वस्वाधिन, स्वावलंबी आयुष्य जगता यावे हा बोध मला ह्यातून घेण्यासारखा वाटतो. शिवाय त्यांची इतरांबाबत निरपेक्षता आणि कलासक्तताही आपल्याला घेता आली तर सोनिया सुगंधू येईल. तात्या तथास्तू म्हणा! अविस्मरणीय व्यक्तिरेखा साकारणार्‍या ह्या लेखाखातर हार्दिक अभिनंदन !

साती Wed, 10/17/2007 - 02:18
तात्या, सुरेख लिहिला आहे लेख. असेच उत्तमोत्तम लेख तुमच्याकडून येथे वाचायला मिळावेत ही अपेक्षा. साती

विसोबा खेचर गुरुवार, 10/18/2007 - 07:08
गोळेसाहेब, साती, विश्वजीत, आपल्या तिघांचेही आभार... गोळेसाहेब, आम्ही 'तथास्तु' म्हणतो! :) साते, अगो तुझा पत्ता काय? आहेस कुठे? बरी आहेस ना? जावई काय म्हणतात आमचे? :) तात्या.

ध्रुव गुरुवार, 10/18/2007 - 18:21
वा तात्या, छान जमलं व्यक्तिचित्र!! अगदी जसच्या तसं डोळ्यासमोर आले आजोबा. आज वेळ झाला आणि एका दमात वाचला लेख. खरोखरच डोळ्यात पाणी आले. असेच लिहीत राहा, आम्ही वाचत राहू. ध्रुव http://www.flickr.com/photos/dhruva

तो Fri, 10/19/2007 - 16:14
व्यक्तिचित्रण व व्यक्तिमत्व दोन्ही आवडले.

सर्किट Sat, 10/20/2007 - 01:15
तात्या, जरा उशीराच वाचतोय, त्यामुळे प्रतिसाद द्यायलाही उशीर झाला. फार सुंदर उतरलाय लेख ! इतका, की आपल्यावरही कुणीतरी असा लेख लिहावा, (नंतर, आत्ता नाही :-) असे वाटले. - सर्किट

"तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!" तात्या, अतिशय चित्रदर्शी व्यक्तिचित्रण केले आहेस. व्यक्तिचित्रणात आता तुझी चांगलीच पकड जमत चालली आहे यात काहीच वाद नाही. केवळ आंतरजालावरच नव्हे, तर मराठी साहित्यातही अलिकडे अशी तुमच्या-आमच्यातली साधीसुधी व्यक्तिचित्रं अभावानेच वाचायला मिळतात. पाटणकर आजोबांचे व्यक्तिचित्र नक्कीच मनात कुठेतरी घर करून गेले. पुलंची आठवण झाली! अवांतर - आईलाही अतिशय आवडले. आईने मुद्दाम संगणकाजवळ बसून, नीट दिसत नसतानाही हळूहळू वाचले! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

चतुरंग गुरुवार, 10/30/2008 - 18:44
लेका काय रंगवले आहेस रे पाटणकर आजोबा! व्यक्तिचित्राच्या शेवटाला रडायचं नाही असं ठरवून शेवटाकडे जायला लागलो आणि शेवटचं वाक्य संपताना डोळे कधी डबडबून आले समजलं नाही रे. फारच छान! हॅट्स ऑफ!! (खुद के साथ बातां : रंग्या, तू मिपाकर होण्यापूर्वीचे लेखन एकदा सवड काढून वाचावेच लागेल, नाहीतर मोठ्या आनंदाच्या ठेव्याला मुकशील!) चतुरंग

तात्याराव, किती सुंदर लिहिता.पाटणकर आजोबा हुबेहुब पाहील्या सारखे वाटतात. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अनिल हटेला Fri, 10/31/2008 - 07:40
सुंदर आणि जिवंत चित्रण!!!! आजोबा मनात घर करून गेले !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मदनबाण Fri, 10/31/2008 - 07:54
तात्या फारच सुरेख लिहले आहे तुम्ही.. :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

चिंतामणी Sat, 11/06/2010 - 14:16
तात्या. फारच छान. तुम्हाला (आणि इतर सर्व रसिकांनासुध्दा) दिवाळीची भेट. पंडीत भिमसेन जोशी यांची पु.लं.नी घेतलेली मुलाखत. http://www.esnips.com/doc/fd8ac0de-e87d-4dd3-a194-313ee369a92c/Bhimsen-Joshi-aani-Pula आकाशवाणीवर प्रक्षेपीत झाली होती... हा लेख वरती आणणा-या शिल्पा बचे आभार.

श्रावण मोडक Wed, 03/21/2012 - 12:56
एकेकाळी इथं हा'ही' माणूस 'असं'ही लेखन करत होता, याची नोंद करण्यासाठी हा प्रतिसाद. यानिमित्ताने धागा वर येईल आणि कदाचित चार जण वाचतीलही. :)

In reply to by श्रावण मोडक

चाणक्य गुरुवार, 03/22/2012 - 23:24
एकेकाळी इथं हा'ही' माणूस 'असं'ही लेखन करत होता
म्हणजे काय? कळलं नाही

चौकटराजा Wed, 03/21/2012 - 18:46
हा धागा आपण वर आणला नसता तर मी माझ्या आयुष्यातील एका मोठ्या आनंदला मुकलो असतो. पीयेल असते तर म्हणाले असते " तात्या तू नाशिकच्या तात्याच्या तोडीचं लिहिलयस की ! " आम्ही म्हणतो " तात्या आपण प्यीयेल च्या तोडीचं लिहिलं आहे.

In reply to by आशु जोग

चौकटराजा गुरुवार, 03/22/2012 - 07:14
च्यायला मिपा म्हणजे कमालच आहे. इथे एक एक शब्द जपूनच टंकावा लागतो. आपण चौकटराजा हे मतिमंद नाव घेतलं बरे झाले. मी वेगळा बावळा म्हटले की सुटलो.

अन्तु बर्वा गुरुवार, 07/05/2012 - 20:38
आज जर आमचे पुलदैवत असते तर त्यानी व्यक्ति आणी वल्लि मधे नक्की ' पाटणकर आजोबान्ना' पान धरावयास लावले असते! कुठलेही व्यक्तीचित्र सजवायला तीन गोश्टीन्ची गरज असते. १) उत्कृष्ठ निरीक्षण शक्ती. २) केलेले निरीक्षण शब्दात उतरवयची ताकत ३) नशीब! आता नशीब ह्या साठी की ज्यांचे व्यक्तिमत्व शब्दात उतरवावे अशा लोकांचा सहवास प्रत्येकाला मिळत नाही. परमेश्वर कृपेने ह्या तींनी गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. अगदी पुलं सारख्या. मी अगदी अलीकडे मिपाचा सदस्य झालो. मागची पाने उलटता उलटता तुमचा एक लेख हाती (की माउसला!) लागला आणी एका पाठोपाठ तुमचे लेख वाचत गेलो. खरं सांगायचं तर तुमचा हेवा वाटतोय! अहो भिमण्णा, पुलं या सारख्या देव माणसान्चा सहवास तुम्हाला लाभला! आम्ही करन्टे की कालचक्राच्या चुकीमुळे ह्या पिढीत जन्माला आलो. बाकी तुमच्या लेखनाला __/\__! अवांतर: तेवढं एकदा 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' वर लिहा. दैवी गाणं आहे हो ते!

In reply to by अन्तु बर्वा

अर्धवटराव Fri, 07/06/2012 - 00:07
>>आम्ही करन्टे की कालचक्राच्या चुकीमुळे ह्या पिढीत जन्माला आलो. -- अरे असं म्हणु नको. आपल्या पुलदैवताला रुचणार नाहि ते. पु.ल. संप्रदायात "मनुष्यत्व" हि एकच गोष्ट शाश्वत मानली गेली आहे. आणि हे मनुष्यत्व प्रचंड उमदेपणाने सदैव - सर्वत्र नटलेले आहे. त्याचा उपघोग घे. अर्धवटराव

अनिवासि Mon, 07/09/2012 - 16:07
हा धागा चुकला होता पण परत वर आल्याने वाचावयास मिळाला. धागा वर आणणार्यास धन्यवाद ! आयुष्य जगावे तर पाटणकर आजोबासारखे आणि मित्र असावेत ते aapreciate करणार्या तात्यासारखे. तात्या अशा मित्राची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

तिमा Mon, 07/09/2012 - 17:37
'शब्दजुलाबी' धागे गाडून टाकण्यासाठी असे दर्जेदार धागे वर आणणे ही चांगली आयडिया आहे.

चित्रगुप्त Tue, 09/10/2013 - 02:39
व्वा तात्या व्वा. आज केवळ योगायोगानं हा लेख वाचायला मिळाला. अत्यंत सुंदर. अशी माणसे आयुष्यात येणं, ही खरी श्रीमंती. तसंच आत्ताच तुमचं 'शाहीन' हेही व्यक्तिचित्रं वाचलं. त्याचा पुढला भाग लिहिलात का? असल्यास दुवा द्यावा, नसल्यास लौकर लिहा. शुभेच्छा.

दत्ता काळे Tue, 09/10/2013 - 12:01
हा धागा ज्यांनी वर काढला त्यांचे मी आभार मानतो. तात्या..अतिशय उत्तम आणि भावस्पर्शी व्यक्तिचित्रण लिहिलंत. तक्रार करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता त्यामुळे साक्षात मृत्यु भेटायला आल्यावरसुद्धा त्यांनी कुठलीच तक्रार केली नसणार! वा. वा..

लेखन चटका लावून गेलो. काही ऋणानुबंध अनाकलनीय असतात. अवांतरः मालिनीताईंच्या गाण्याबद्दल लिहीलेल्या शब्दाशब्दाशी बाडीस. मी तो अनुभव घेतला आहे, फक्त तुमच्यासारखा शब्दात उतरवता येणार नाही कधी मला. मालिनीताईंना __/\__!! प्रथम त्यांचे गाणे ऐकले तेव्हा कां कुणास ठाऊक त्यांच्या पायावर डोके ठेवावेसे वाटले. म्हणून मैफल संपल्यावर त्यांच्याकडे गेलो. पायावर डोके ठेवले तसे त्यांनी मला दंडाला धरुन उठवले, अन म्हणाल्या, गाणं आवडल कां? च्यायला डोळ्यात टचकन पाणी आले.. परत पाया पडलो त्यांच्या!!

अखेरीस पाटणकर आजोबा वारले! अगदी शांतपणे आणि आनंदाने! एखाद्या जिवलग मित्राला भेटावं इतक्या सहजतेने मृत्युला भेटले! पाटणकर आजोबा मला प्रथम भेटले त्याला आता १५-२० वर्ष झाली असतील किंवा त्यांच्यामाझ्या दोस्तीला १५-२० वर्ष झाली असं आपण म्हणूया! एकदा मालिनी राजूरकरांच्या गाण्याला गेलो होतो तेव्हा श्रोत्यांमध्ये पहिल्याच रांगेत बसून पाटणकर आजोबा मालिनीबाईंच्या गाण्याला मनमोकळी दाद देत होते. जुन्या ष्टाईलचा धोतर-कोट-टोपी हा पोशाख. उंचीने, शरीरयष्टीने मध्यम. पण म्हातार्‍याच्या चेहेर्‍यावर मात्र तरतरी होती, मिश्किल भाव होते.