मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझ्या एका शब्दासाठी

सुवर्णमयी ·

In reply to by बेसनलाडू

नंदन Wed, 10/31/2007 - 02:18
म्हणतो. शेवटचे कडवे विशेष आवडले. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय Wed, 10/31/2007 - 00:07
> तुझ्या एका शब्दामुळे > मला कविता सुचावी > माझी कविता अधुरी > तुझ्या एका शब्दाविना यांतील दुहेरी अर्थ खास.

विसोबा खेचर Wed, 10/31/2007 - 00:38
नेहमीप्रमाणेच सुंदर कविता.. तुझ्या एका शब्दामुळे मला कविता सुचावी ह्या ओळी सुरेख वाटल्या! अवांतर - अगो सुवर्णमयी तुझा पत्ता काय? आहेस कुठे? बर्‍याच दिवसांनी मिसळपाववर दिसते आहेस! असो, तुझ्याकडून अजूनही अश्याच उत्तम कविता मिसळपाववर लिहिल्या जाव्यात हीच इच्छा! तात्या.

प्राजु Wed, 10/31/2007 - 00:54
पण खरं सांगू.... तुझ्या शब्दाचे आभास श्वासाश्वासात गुंतले तुझ्या शब्दरंगामध्ये एक चित्र भिजलेले इथे काहीतरी खटकते आहे.... तुझा शब्द येता कानी देहभान हरपले "काव्य झाले तनमन," माझे आभाळ बोलले!!! हा एकदम सह्हि! प्राजु.

प्राजु Wed, 10/31/2007 - 01:13
तुझ्या शब्दाचे आभास श्वासाश्वासात गुंतले स्वप्नपाखरासवे मी शब्दशिंपले गुंफले हे छान आहे. - प्राजु.

आजानुकर्ण Wed, 10/31/2007 - 09:23
पद्मजा फेणाणी यांच्या "ही शुभ्र फुलांची ज्वाला" या क्यासेटमध्ये "तुझ्या एका हाकेसाठी... किती बघावी वाट" अशी कविता आहे तिची आठवण झाली. ती कविता यशवंत देव यांची होती असे वाटते. ही कविता... तुझ्या एका हाकेसाठी, किती बघावी ही वाट..... माझी अधिरता मोठी तुझे मौन ही अफाट..... तुझ्या एका हाकेसाठी, उभी कधीची दारात, तुझी चाहूलही नाही, होते माझीच वरात.... तुझ्या एका हाकेसाठी, हाक मीच का घालावी ? सात सुरांची आरास, मीच मांडून मोडावी..... आले दिशा ओलांडून, दिली सोडून रहाटी..... दंगा दारात हा माझा, तुझ्या एका हाकेसाठी...... तुझ्या एका हाकेसाठी, किती बघावी ही वाट..... माझी अधिरता मोठी तुझे मौन ही अफाट (कानसेन) आजानुकर्ण जोगळेकर

In reply to by आजानुकर्ण

सुवर्णमयी Wed, 10/31/2007 - 09:47
हे गाणे खूप छान आहे, त्यातला भाव तर फार मनाला भिडणारा आहे... हे गाणे जेव्हा जेव्हा ऐकले तेव्हा कितीदा अडवले तरी माझ्या मनातले विचार त्याच सुरावटीत येऊ लागले. पण त्या गाण्यावर आधारित ही कविता आहे म्हणणार नाही. (कारण माझी कविता अगदी साधी आहे, त्यात अभिप्रेत अर्थ आणि कल्पना सुद्धा वेगळी आहे. )हे पूर्ण गाणे दिल्याबद्दल आभारी आहे.

In reply to by सुवर्णमयी

आजानुकर्ण Wed, 10/31/2007 - 10:12
पद्मजांच्या आवाजात गाणे ऐकायला खूप मस्त वाटते. या अल्बममधली "पाऊस कधीचा पडतो" ही कवितासुद्धा मस्त आहे. या अल्बमसोबत आलेला "हसरा श्रावण" नावाचा दुसरा अल्बमही मस्त होता. (चूभूदेघे) कुसुमाग्रज, शांताबाईंची गाणी त्यात होती असे पुसटसे आठवते.

In reply to by आजानुकर्ण

स्वाती दिनेश Wed, 10/31/2007 - 13:07
कविता आवडली,छान अष्टाक्षरी! अवांतरः पाऊस कधीचा पडतो, झाडांची हिरवी पाने, हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सूराने... पुढच्या ओळी आठवत नाहीत :( ग्रेस यांची कविता ना? छानच आहे ती कविता,मला खूप आवडते,पण त्यांच्याच "ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता.." पेक्षा कमी प्रसिध्द आहेसे वाटते.(चू.भू.दे.घे.) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

आजानुकर्ण Wed, 10/31/2007 - 22:15
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा माझ्याच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा - आजानुकर्ण गोडघाटे अल्बमचे नाव या कवितेतील ओळींवरूनच दिले आहे असे वाटते - (अंदाजपंचे) आजानुकर्ण

सर्किट Wed, 10/31/2007 - 21:49
तुझ्या शब्दाचे आभास श्वासाश्वासात गुंतले स्वप्नपाखरासवे मी शब्दशिंपले गुंफले ह्या ओळी खूप आवडल्या. -सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Wed, 10/31/2007 - 22:19
शिवाय माझी कविता अधुरी तुझ्या एका शब्दाविना या दोन ओळीही अतिशय सुरेख आहेत.

सुवर्णमयी Wed, 10/31/2007 - 21:51
सर्वांचे आभार, मनमोकळ्या प्रतिसादाने लेखनास मदत होते, दखल घेतल्याबद्दल आभारी आहे.

In reply to by सुवर्णमयी

विसोबा खेचर गुरुवार, 11/01/2007 - 00:23
मनमोकळ्या प्रतिसादाने लेखनास मदत होते, दखल घेतल्याबद्दल आभारी आहे. दुसर्‍याला मनमोकळा प्रतिसाद देणे, दाद देणे हे मिसळपावचे वैशिष्ठ्य आहे! फक्त आपल्याच गोटातल्या लोकांना प्रतिसाद 'प्रसवणे' आणि इतर कुणाचीही दाद नाही म्हणून इतर संकेतस्थळांवर दुसर्‍या नावांनी त्या कविता 'प्रसवणे' असले प्रकार मिसळपावकडे नाहीत! मिसळपाव ही चार जिंदादील लोकांची टपरी आहे. इथे यावं, मिसळ खावी, ताक प्यावं, एकमेकांच्या लेखनाला दिलखुलास दाद द्यावी, नावं ठेवावी आणि पुढच्या पोटापाण्याच्या उद्योगाला निघून जावं! इतका साधा, सोपा आणि सरळ उद्देश आहे या टपरीचा! असो, सोनाली तुला पुढील लेखनाकरता शुभेच्छा! इथे तुझ्या लेखनाची मनमोकळी दखल नेहमीच घेतली जाईल याची खात्री बाळग! आपला, (जुन्नरच्या यष्टी ष्टँड वरची मिसळ आवडणारा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण गुरुवार, 11/01/2007 - 18:20
तात्या, जुन्नरला कधी गेला होता? नारायणगांव यष्टी ष्ट्यांडावर मस्त भेळ मिळते. आम्ही मंचरवरून स्पेशल भेळ खायला नारायणगांवला जायचो. आणि नारायणगांव ते कळंब या मार्गावर हॉटेल गोकुळ आहे तिथली मिसळ खायला विसरु नका. (नारायणगावची भेळ आणि हॉटेल गोकुळची मिसळ आवडणारा) आजानुकर्ण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/01/2007 - 16:38
तुझ्या शब्दाचे आभास श्वासाश्वासात गुंतले स्वप्नपाखरासवे मी शब्दशिंपले गुंफले या चार ओळी अधिक आवडल्या '' श्वासात शब्दांचे आभास" हे तर अप्रतिम. अशाच चांगल्या कविता वाचायला मिळतील, या आशेने पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! मनमोकळ्या प्रतिसादाने लेखनास मदत होते. काय म्हणता ? :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाती राजेश गुरुवार, 11/01/2007 - 17:16
तुझ्या एका शब्दासाठी वाट किती मी पहावी तुझ्या एका शब्दामुळे मला कविता सुचावी शब्दांची सुंदर गुंफण केली आहेस. आशाच सुंदर ओळी तु़झ्या कडून वाचायला मिळू देत.

धोंडोपंत Fri, 12/21/2007 - 20:47
सोनालीताई, अप्रतिम कविता. हार्दिक अभिनंदन. क्या बात है ! एकदम सही. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुझ्या एका शब्दासाठी
तुझ्या एका शब्दासाठी वाट किती मी पहावी तुझ्या एका शब्दामुळे मला कविता सुचावी माझी कविता अधुरी तुझ्या एका शब्दाविना जसा जीव चातकाचा तडफडे थेंबाविना तुझ्या शब्दाचे आभास श्वासाश्वासात गुंतले स्वप्नपाखरासवे मी शब्दशिंपले गुंफले तुझा शब्द येता कानी देहभान हरपले "काव्य झाले तनमन," माझे आभाळ बोलले!!!

पानगळीचे वैभव

धनंजय ·

सहज Mon, 10/29/2007 - 08:17
छान वाटली कविता. एकदम सोपी वाटली. गहन अर्थ बघायला परत वाचतो थोड्यावेळाने. :-) एखादा पानगळीचा किंवा पानगळ सुरू व्हायच्या आधीचा फोटो टाकलात तर अजून मजा येईल का? मला ते वेगवेगळे रंगाची पाने असलेली वृक्षरांग (अमेरीकन) बघायला मजा येते.

In reply to by सहज

चित्रा Mon, 10/29/2007 - 22:17
का वणवा वन खांडव करतो । बहुरंगी तरुंवरि धगधगतो? चेतवलेले मग हे भूतळ । उच्छ्वासा का करते शीतळ? हे खासच. तुमची कविता सुंदर आहे आणि ज्यांनी फॉल पाहिला नाहीय त्यांना पानगळीची "कल्पना" करता आली तर छानच (आपल्याकडेही या सुमारास थोडी पानगळ होतेच, रंग कदाचित तुमच्या "वणव्या"सारखे नसतील), पण त्यांना थोडीशी झलक मिळावी म्हणून - हे फोटो (मी काढलेले नव्हेत, जालावरचे). यावेळी फॉल कलर्स बघायला जायला झाले नाही अजून, नेहमी जातो आम्ही, पण बहुतेक यावेळी ती संधी हुकणार असे दिसते आहे - रस्त्यातून जाताना जे काही दिसतील तेवढेच. आणि अजून एक.

विसोबा खेचर Mon, 10/29/2007 - 08:35
उनाड खारी, त्यांच्या कानीं । कुणी सांगिली, काय कहाणी! खेळ टाकुनि अर्ध्यावरती । दाणा शोधित तुरुतुरु फिरती या स्वर्णाची माती होइल । का केवळ विस्मरली जाइल? छे! तो वसंत हिरवळ आणत । गतवर्षींची स्मरविल दानत! वरील ओळी सर्वात जास्त आवडल्या.. अतिशय सुरेख निसर्गकविता..बालकवींनाही आवडावी अशी! :) तात्या.

नंदन Mon, 10/29/2007 - 09:02
नुकतेच फॉल कलर्स पाहून आल्याने कविता अधिकच आवडली. मर्ढेकरांची शिशिरागम (शिशिरऋतुच्या पुनरागमे, एकेक पान गळावया...) आठवली. [अवांतर - शिशिरीं लेतिल दैगंबर्‍या यात दैंगबर्या असे हवे का? विचित्र-वैचित्र्य सारखा दिगंबर - दैगंबर्य/दैंगबर्‍य शब्दप्रयोग तुम्ही योजला असावात असे वाटते. हा नवीन शब्द आवडला. व्याकरणदृष्ट्या माझे म्हणणे किती बरोबर आहे, माहीत नाही. केवळ उच्चार दैगंबर्य असावा असे वाटले. छिद्रान्वेषीपणाबद्दल क्षमस्व.] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

धनंजय Mon, 10/29/2007 - 09:22
ते आधीचे चुकीचे टंकलेले होते - आता सुधारले. चर्याशी यमक जुळवले आहे. शिवाय आदल्या टंकनदोषाने एक मात्राही कमी पडत होती! छिद्रान्वेषण मुळीच नव्हे - धन्यवाद!

आजानुकर्ण Mon, 10/29/2007 - 09:30
कविता आवडली. अक्तूबरस्य हा शब्द मस्त. (आनंदित) आजानुकर्ण स्वर्णिम झाली यष्टी यष्टी? शिशिरीं लेतिल दैगंबर्या ह्या दोन वाक्यांचे अर्थ फारसे झेपले नाहीत (प्रश्नाळू) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

धनंजय Mon, 10/29/2007 - 09:39
यष्टी म्हणजे दांडी - क्रिकेटमधला "स्टंप आऊट" म्हणजे "यष्टीचित"! स्वर्णिम झाली यष्टी यष्टी = प्रत्येक दांडी सोनेरी झाली दिगंबर = (दिशा हेच वस्त्र असलेला) नग्न, दैगंबर्य = नग्नता, लेतील = वस्त्र घालतील शिशिरात (तरू) नग्नतेचेच वस्त्र करून घालतील.

In reply to by धनंजय

आजानुकर्ण Mon, 10/29/2007 - 09:52
वा! शिशिरीं लेतिल दैगंबर्या चा अर्थ जसा अंदाज बांधला होता तसाच आहे. पण यष्टीचा वापर कवितेत पाहून आऊट झालो. (यष्टीचीत) आजानुकर्ण

सर्किट Mon, 10/29/2007 - 22:33
वा धनंजयराव ! त्या वार्तेने गडबड झाली । नेणति अवघी सृष्टी झाली दिनरजनीचा गोंधळ खासा । उष्ण करी कधि शीतळ श्वासा ऑक्टोबर हीट (इंडियन समर, विश्वामित्री उन्हाळा) ला सृष्टीच्या नेणते होण्याच्या वेळी तिचा उडलेला गोंधळ हे रूपक देणार्‍या तुमच्या प्रतिभेला सलाम !!!! - सर्किट

प्राजु Tue, 10/30/2007 - 00:42
सध्या फॉल चालू आहे... सगळीकडे खरंच स्वर्णिम आहे... कविता अगदी खास आहे.... स्पर्शुनि परीस का ही सृष्टी । स्वर्णिम झाली यष्टी यष्टी? मग सुवर्णा सौरभ कैसा - । दंव भिजल्या पर्णाली जैसा? हे अगदी खासचं... आणि शाखांवरती सोने उगवुन । सहस्र हस्तें देती शिंपुन तरु पानांचा करुनी पात । वर्खाने भू पांघरतात अफाट कल्पना.......... प्राजु.

लिखाळ Fri, 03/27/2009 - 16:33
वा वा वा .. काय सुंदर ! फार सुंदर ! त्या वार्तेने गडबड झाली । --> हिमधवला जटजटिला गुंफुन । ऋतुचक्राचे करतिल चिंतन --- > या स्वर्णाची माती होइल । का केवळ विस्मरली जाइल? या कडव्यांतले वर्णन आणि त्यांचा कवितेतला क्रम केवळ अप्रतिम. कविता फार आवडली. यष्टीच्या बाबतीत अजानुकरणासारखेच यष्टीचित :) अक्तूबरस्य हा शब्द मजेदार. नंदन प्रमाणेच शिशिरागमन ही कविता आठवली. त्याच कवितेत किंवा 'गळण्याआधी' या नावाच्या कवितेत राळांचा फाग घेऊनी असे काही शब्द होते. त्यांची आठवण झाली. चित्रा यांनी टाकलेली चित्रे छान आहेत. मग सुवर्णा सौरभ कैसा - । दंव भिजल्या पर्णाली जैसा? याचा अर्थ काय? मग सुवर्णा सौरभ कैसा? दंव भिजल्या पर्णाली जैसा ! असा अर्थ आहे का? प्रमोद देवांनी त्यांच्या या लेखात दुवा दिल्याने ही कविता नजरेस पडली. देवबाप्पांचे आभार ! -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

धनंजय Sat, 03/28/2009 - 01:00
त्या एकदोन कडव्यांमध्ये नेहमीच्या काही "त्याच त्या" उपमा आधी दिल्या आहेत. आणि मग त्यापेक्षा पानगळ औरच काही आहे, त्या उपमा कमी पडतात, असे सुचवले आहे. प्रत्येक ठिकाणी डोळ्याला झालेल्या वेगवेगळ्या भासाचे खंडन कान/नाक/स्पर्शेंद्रिय करते. प्रत्येक ठिकाणी उपमेचा नकार प्रश्नाने केला आहे - वणावा असेल तर हा शीतळ उच्छ्वास कसा? बहार असेल तर भुंग्यांचा गुंजारव कसा नाही? सोने असेल तर त्याला पर्णालीचा सुगंध कसा? म्हणून वरीलप्रमाणे विरामचिह्ने ओळीत आहेत : मग सुवर्णा सौरभ कैसा - । दंव भिजल्या पर्णाली जैसा? बहुधा या 'उत्प्रेक्षा-अपह्नुती' जोड्या आहेत, आणि या अलंकाराला दुसरेही काही नाव आहे (पण कविता लिहिली तेव्हा मला हे माहीत नव्हते).

चतुरंग Fri, 03/27/2009 - 16:47
केवळ अप्रतिम काव्य! अत्यंत नादमय काव्य!! ओळन ओळ सुंदर. तुमच्या प्रतिभेला अनेक सलाम! (मलातर जागोजागी शंकराचार्यांचे एखादे निसर्गस्तवन वाचतो आहे की काय असा भास होत होता!! :) ) (प्रमोदकाकांच्या लेखनातल्या दुव्यामुळे तुमचे काव्य वाचनात आले त्यांचे अनेक आभार!) चतुरंग

सुमीत भातखंडे Mon, 03/30/2009 - 11:13
खूपच छान काव्य आहे. मी पण नव्हतं वाचलं आधी. देव काकांमुळे दुवा मिळाला, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद.

पानगळीचे वैभव ********************************** * मस्त सुस्त महिने ग्रीष्माचे । मंद रात्रिचे, दिन उष्म्याचे दवबिंदूमात्रावर जगती । हिरव्या वल्ली हिरव्या जगतीं * उनाड खारी, त्यांच्या कानीं । कुणी सांगिली, काय कहाणी! खेळ टाकुनि अर्ध्यावरती । दाणा शोधित तुरुतुरु फिरती * दमून दंगुन उन्हात गुंगुन । चराचर जणू निवांत बैसुन - पेंगुळलेला निसर्ग करितो । पेंगुळलेल्या कुतूहला तो * अक्तूबरस्य प्रथमे दिवसे । शिरशिर वारे घेऊनि वळसे झाडाझाडापाशी सांगीं । हेमंत-शिशिर तिष्ठतिं रांगीं * त्या वार्तेने गडबड झाली । नेणति अवघी सृष्टी झाली दिनरजनीचा गोंधळ खासा । उष्

एका शीघ्र कवितेचे दिर्घ काळाने विडंबन !

केशवसुमार ·

प्राजु Mon, 10/29/2007 - 04:56
किमान या विडंबनात 'पिण्याविषयी ' नाही काही... हे ही नसे थोडके..! - प्राजु.

सहज Mon, 10/29/2007 - 08:12
एरवी सोपा वाटणार्‍या एखाद्या विषयाचा पेपर, एकदम अवघड आला की एक अनपेक्षीत धक्का बसतो, तसे झाले. शीघ्र व दीर्घ दोन्ही शेजारी शेजारी ठेवून वाचल्या. काही खास आकलन नाही...काहीच शब्द वेगळे....पण... (कृपया राग मानू नका, तसेही काव्यसमज कमीच) हे विडंबन कमी, चौर्य जास्त वाटले. जाऊ दे हे काव्य, गजल प्रकार मला तसे अगम्यच... कोणी समजवले तर उत्तम..

विसोबा खेचर Mon, 10/29/2007 - 08:48
त्या संस्थळावरुन या संस्थळावर, 'केशवसुमार' लिहितो !! उभ्या उभ्या !! मिसळपाववर भांडण आपले रंगेना ! वाचून आली तशी निघून जा! मस्त...! केशवा, तुझी बॅटिंग अगदी जोरात सुरू दिसत्ये! चालू दे....:) आपला, (केशवसुमाराचा आडनावबंधु) तात्या.

सखे........! जा,आज प्रेमाला रंग चढेना, आपले काय बिनसले ? कधी तरी 'मुक्या'ने हे बोलणारच होतो, वेदनेला अश्रुत जाळणार होतो. सखे ....! तु एकदा ये काय! या शहरातून त्या शहरात, माणसाच्या विचारांच्या वणव्यात, मराठी शब्दांच्या भावविश्वात. त्या संस्थळावरुन या संस्थळावर, 'केशवसुमार' लिहितो !! उभ्या उभ्या !! मिसळपाववर भांडण आपले रंगेना ! वाचून आली तशी निघून जा!

ही ठमा

केशवसुमार ·

बेसनलाडू Mon, 10/29/2007 - 03:51
छान विडंबन. पुणेरी, गटारी, वक्री विशेष. "वक्री" हा काफिया खारीज ठरेल, असे वाटते, चूभूद्याघ्या. भांडण्यांचे नको; भांडणांचे हवे. (वक्री)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सहज Mon, 10/29/2007 - 08:28
चांदण्यांचे च्या जवळपास म्हणुन कदाचित भांडण्यांचे...असू दे तेवढे चालायचेच विडंबन आहे (कांजीण्यांचे घालण्यापेक्षा हे बरे. ;-)) राखरांगोळी --(रातरांगोळी) आवडले. :-)

In reply to by सहज

बेसनलाडू Mon, 10/29/2007 - 16:08
अहो वजनाच्या दृष्टीने चांदण्यांच्या आणि भांडणांचा दोन्ही सारखेच आहेत. षष्ठी विभक्ती प्रत्यय (च्या,ची,चे) लावताना भांडण शब्दाचे बहुवचनी सामान्यरूप भांडणां होते, भांडण्यां नाही :) जवळपास जायचे म्हणून कैच्या कै? न्हाय बॉ! (व्याकरणवीर)बेसनलाडू

सहज Mon, 10/29/2007 - 08:23
छान वाटले वाचायला. (छचोरगीरी म्हणा हवे तर) पण मजा आली.

विसोबा खेचर Mon, 10/29/2007 - 08:37
बघ मला, कोजागिरीला अवस वाटू लगली (साजरी हल्ली जरा करते गटारी ही ठमा) राखरांगोळी तुझी बघ "केशवा" होणार ही लागली राशिस आता रोज वक्री ही ठमा! केशवा, मस्त रे! तात्या.

धोंडोपंत Mon, 10/29/2007 - 10:58
वा वा वा वा केशवसुमार !!! झकास विडंबन झालाय हो. ठमी आवडली. आपला, (हसरा) धोंडोपंत मजा आहे राव तुमची. आमच्या राशीला अजून कोण पुणेरी ठमा लागली नाही. आपला, (उपेक्षित) धोंडोपंत मक्ता फारच छान झालाय. काफ़िया खारिज होणार नाही. वृत्ताच्या लयीत गुणगुणतांना वक्री चा उच्चार वकरी असा होतो. दोघांचेही वजन गा गा आहे. त्यामुळे मात्रेतही फरक येत नाही. आपला, (तंत्रशुध्द) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

सर्किट Mon, 10/29/2007 - 22:42
भाकीत खरे ठरले. जरी "अमावस्या" नावाचे विडंबन नसले, तरी गटारीचा उल्लेख आला आहेच ! भांडण्यांचे रान उठते फक्त थोडे बोलता केवढी बेजार करते बघ पुणेरी ही ठमा! तुम्हालापण ??? - (समदु:खी) सर्किट

आमची प्रेरणा बेसनलाडू यांची गझल पौर्णिमा चिंब भिजली, काल रात्री, घार गोरी ही ठमा पावसाच्या कल्पनेने शिंकणारी ही ठमा भांडण्यांचे रान उठते फक्त थोडे बोलता केवढी बेजार करते बघ पुणेरी ही ठमा! का अशी मम नजर खिळली तिच्या पाठीकडे ओळखू आली कशी ना पाठमोरी ही ठमा? बघ मला, कोजागिरीला अवस वाटू लगली (साजरी हल्ली जरा करते गटारी ही ठमा) राखरांगोळी तुझी बघ "केशवा" होणार ही लागली राशिस आता रोज वक्री ही ठमा!

बँक, खाजगी माहिती व आपण

देवदत्त ·

विसोबा खेचर Mon, 10/29/2007 - 00:36
देवदत्तराव, तुम्ही वर्णन केलेले अनुभव मलाही नेहमीच येत असतात आणि मीदेखील असे कुठलेही दूरध्वनी 'मी तुम्हाला कोणतीही माहिती देऊ इच्छित नाही, मला तुमच्याशी काहीही बोलायचे नाही' असे सडेतोड उत्तर देऊन डिस्कनेट करतो...साले हे असले फोन कॉल म्हणजे सगळी चोराभामट्यांची नसती कटकटच झाली आहे! माझे सदस्यांना असे विचारणे आहे की मी योग्य केले का? तुम्हाला जेव्हा असे फोन येतात तेव्हा तुम्ही काय करता? अगदी योग्य केले आहे. समोरचा माणूस अशी कुठलीही फालतू माहिती मला विचारू लागला की त्यातला फोलपणा माझ्या लगेच लक्षात येतो आणि मग मी तर त्या माणसाला माझी 'भ'काराची भाषा अगदी मनमुराद सुनावतो! शेवटी तोच कंटाळून फोन ठेवून देतो... :) बँक जर वेळोवेळी सांगते की तुमची माहिती अनोळखी इमेल किंवा फोनवर देऊ नका तर ग्राहक सेवा केंद्रातील त्या मुलीचे म्हणणे, की काही एजंट ही माहिती मागू शकतात, बरोबर मानावे का? मुळीच नाही.. माझ्या मते ह्या सगळ्या गोष्टी फक्त 'फ्रॉड' या एकाच सदरात मोडतात! भेंचो...., असल्या फोन कॉल्सची आणि इमेल्सची पार आईमाई करून टाकायची असते एवढंच मला माहिती आहे. देवदत्तराव, एका ताप,संताप, वैताग आणणार्‍या विषयाला येथे मिसळपाववर वाचा फोडल्याबद्दल आपले आभार... आपला, (ह्या फोनकॉल्सवाल्यांच्या बाबतीत कमालीचा शिवराळ असलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

किमयागार Wed, 11/14/2007 - 07:19
मा. साहीत्य संमेलन अध्यक्ष (ललित लेखनवाले), भकाराची भाषा मनमुराद सुनवायला तुम्हाला असल्या फोनची काय गरज? -किमयागर

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 08:29
मा. साहीत्य संमेलन अध्यक्ष (ललित लेखनवाले), सा सं अध्यक्ष? मी तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभा राहिल्याचं मला आठवत नाही! आपण कुणाबद्दल बोलताय? तात्या अभ्यंकर की हातकणंगलेकर? :) बाय द वे, 'ललित लेखनवाले' हे आवडले...:) भकाराची भाषा मनमुराद सुनवायला तुम्हाला असल्या फोनची काय गरज? हम्म, तेही खरंच म्हणा! :) आपला, (संमेलनाध्यक्ष) तात्या.

नंदन Mon, 10/29/2007 - 09:19
तुम्हांला आलेला फोन कॉल्सचा अनुभव असो किंवा नामांकित संस्था किंवा बँकांच्या संकेतस्थळावरून पाठवल्या गेल्या आहेत असं भासवणार्‍या इमेल्स, दोन्ही फिशिंग या सदरात मोडतात. येनकेनप्रकारेण पत्ता, दूरध्वनी किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक काढून घ्यायचा हा यामागचा उद्देश असतो. थोडी अधिक माहिती येथे आणि येथे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

देवदत्त Mon, 10/29/2007 - 11:59
तात्या, आपण लिहिलेले ताप,संताप, वैताग आणणारे फोन कॉल्स ,जे आपली क्रेडीट कार्ड व कर्ज देण्याकरिता असतात ह्या प्रकारात मोडतात का? त्यात दुसर्‍या प्रकाराची भर पडली आहे. जी नंदन यांनीही सांगितले आहे. नंदन, दुव्यांबद्दल धन्यवाद. मला फिशिंग ह्या प्रकाराबद्दल आधी फक्त ऐकून माहित होते. प्रत्यक्षात ते मी वरील प्रकारे अनुभवले असे मला वाटले म्हणून वाटले की इथे लिहून इतरांचे अनुभव ही लक्षात घ्यावे. कोणाला असे कॉल अजून आले नसतील तर एक उदाहरण म्हणून घेऊ शकतात. जर इतरांना काही वेगळे अनुभव आले असतील तर ते मला ही कळतील, जेणेकरून मला आणखी सावध राहता येईल.

In reply to by देवदत्त

विसोबा खेचर Tue, 10/30/2007 - 01:08
तात्या, आपण लिहिलेले ताप,संताप, वैताग आणणारे फोन कॉल्स ,जे आपली क्रेडीट कार्ड व कर्ज देण्याकरिता असतात ह्या प्रकारात मोडतात का? हो. तात्या.

राजे Mon, 10/29/2007 - 21:36
असे फोन मला आले तर मी दोन गोष्टी करतो.. समोरील व्यक्ती हा पुरुष असेल तर तात्यांची भाषा. समोरील व्यक्ती स्त्री / मुलगी असेल तर.. कुठे भेटणार पासून ते सरळ डिस्क मध्ये येण्याचे निमत्रंण ;} काय तात्या मी बरोबर जात आहे ना ? हा हा,,,, बाकी फिशिंग हा शब्द मला आवडतो... पण त्या पेक्षा जास्त "मासेमारी" आवडतो. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Tue, 10/30/2007 - 01:06
समोरील व्यक्ती हा पुरुष असेल तर तात्यांची भाषा. समोरील व्यक्ती स्त्री / मुलगी असेल तर.. कुठे भेटणार पासून ते सरळ डिस्क मध्ये येण्याचे निमत्रंण ;} काय तात्या मी बरोबर जात आहे ना ? समोरील व्यक्ति स्त्री असेल तर मीही शिव्या देत नाही, की तिला डिस्कलाही बोलावत नाही. थोरले आबासाहेब मध्ये येतात त्यामुळे अजून ती हिंमत होत नाही!! मी फक्त त्या स्त्रीला रागाने 'मला स्वारस्य नाही' असं उत्तर देतो... तात्या.

पोलिसांनी जरी सायबर क्राईम सेल काढला असला तरी यासाठी लागणारी संगणक साक्षरता व सक्षमता ही पोलिसांकडे नाही, त्यामुळे हे गुन्हे संपुर्णपणे पोलिसांनी हाताळावेत ही अपेक्षा लोकांनी करु नयेत. किंबहूना ते पोलिसांकडे देउच नयेत. आयटी सेक्टर च्या मदतीशिवाय ही गोष्ट अशक्य आहे. नाही तर आमचा एखाद्या पोलिस ठाण्याचा इन्स्पेक्टर डेटा चोर शोधायला अमेरिकेला जायचा. मुद्देमाल जप्त करताना मॉनिटर जप्त करायचा.सिम्बोयसिस च्या एका कार्यक्रमात त्यावेळ्चे सीआयडी प्रमुख व आताचे पुण्याचे पोलिस आयुक्त श्री जयंत उमराणीकर यांनी आपल्या हलक्या फुलक्या शैलीत हे सांगितले तेव्व्हा श्रोत्यांमधे हशा झाला. मी स्वतः क्रेडीट कार्ड व नेट बँकिंग करत नाही असे ही त्यांनी सांगितले. प्रकाश घाटपांडे

बेसनलाडू Mon, 11/12/2007 - 23:24
केवळ बँकाच नव्हे तर अन्य टेलिमार्केटिंग कंपन्यांकडून होणारा अशा प्रकारचा ताप थांबवण्यासाठी आपला भ्रमणध्वनी क्रमांक नॅशनल डू नॉट कॉल रेजिस्ट्रीमध्ये नोंदवावा. अधिक माहितीसाठी हे वाचा. सध्यातरी लँडलाइनच्या बाबतीतही ही सुविधा उपलब्ध आहे का, याबाबत या बातमीत काही सविस्तर माहिती नाही. परंतु ग्राहकांच्या हितसंरक्षणाच्या दृष्टीने हे पाऊल उचलले गेले आहे, हे ही नसे थोडके. (ग्राहकहितवादी)बेसनलाडू

ashwini Tue, 11/13/2007 - 11:18
आनावश्यक फोन करुन त्त्रास देनार्या कअम्पन्यान काय् देशिर धदा शिकविला पहिजे, आपन सगल्यानिच या प्रकार् च्या फोन्स ना आजिबातच रेस्पोन्स देऊ नये.

प्रसंग १: वेळ रात्री ८ च्या सुमारास. स्थळ: मी रिक्शातून रेल्वे स्टेशन वरून घरी येतोय. मोबाईल वाजतो. समोरून एका गॄहस्थाचा आवाज. गृ: नमस्कार. देवदत्त का? मी: हो. गॄ: मी xxxx बँकेतून बोलतोय. (फोन नं चेन्नईचा होता म्हणून मी संभाषण पुढे सरकू दिले) आपले जे हे क्रेडिट कार्ड आहे, त्याचे स्टेटमेंट वेळेवर येते का? मी: मागील स्टेटमेंट आले. ह्यावेळचे माहित नाही. गॄ: ठिक आहे. बँकेने आता तक्रार निवारणाकरता फोनवर नवीन सुविधा चालू केली आहे. तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. मी: धन्यवाद. गॄ: तुमचा पत्ता पडताळून पाहायचाय. तुम्ही सांगू शकता का? मी: नाही.

काशीबाई..

विसोबा खेचर ·

सहज Sun, 10/28/2007 - 18:26
तात्या तुला माणसांचा छंद आहे अगदी जाणवते बर का! आवडले. तुझ्या व्यक्तिरेखा एकदम जिवंत वाटतात, जरा नावे बदलून तर आपली काही माणसे आहेत इतकी. अवांतर - तात्या नुस्ता शिवराळ आहे म्हणणार्‍यांनी तात्याची व्यक्तिचित्रे नक्की वाचावीत.

व्यक्तिचित्र रंगवणारा संकेतस्थळावरील एक दादा माणूस म्हणजे, आमचा तात्या ! तात्या, माणसांना वाचतो म्हणून असे लेखन येते. साधना कोळीण असू दे नाही तर, काशाबाई ! ही गणगोतातील माणसे आपल्या आजूबाजुलाच वावरत असतात फक्त त्यांना वाचावं लागतं आणि ते जमतं फक्त तात्यालाच ! म्हणूनच रांगोळी टाकतांना दोन बोटातून सुटणा-या रांगोळीसारखे तात्याचे शब्द सहजपणे येतात आणि सुंदर व्यक्तिचित्र आकाराला येते. तात्या, असेच लेखन येऊ दे ! तात्याच्या लेखनाचा फॅन प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवदत्त Sun, 10/28/2007 - 19:57
मस्त एकदम... तात्या तुम्हाला आलेले लोकांचे अनुभव फार काही सांगून जातात. बहुधा लोकांची आणि मग त्यांच्या मैत्रीची आवड हे कारण असेल. पुढे त्यांचे तुम्ही रेखाटलेले व्यक्तिचित्र छान असते. सुक्ष्म निरीक्षण कला आणि लिहिण्याची कला ह्यांचा उपयोग. :) काशीबाईला रिक्षाने फिरवण्याइतका मी श्रीमंत नव्हतो हे जाणवलं मला! प्रसंग तसे लहानसहानच असतात पण त्या त्या प्रसंगातूनदेखील आपल्याला माणसाच्या स्वभावातले बारकावे कळू शकतात! ह्याबरोबरच असे लहानसहान प्रसंग खूप मोलाच्या गोष्टी शिकवून जातात हे मी ही शिकलो आहे. एखाद्या देखण्या जवान तरतरीत तरुणीसोबत बास्किन रॉबिनसन्सचं आईस्क्रीम खाताना जी मजा येणार नाही ती मजा मला काशीबाईसोबत बर्फाचे गोळे खाताना आली! मस्त एकदम :) आणखी लिहीत रहा.

धनंजय Sun, 10/28/2007 - 21:23
काय सुंदर रंगवले आहे चित्र! गंमत म्हणजे बाळाच्या "सामानाचा रंग" आणि मोठेपणचा गोरेपणा याविषयी मी एका काकूंकडूनच माहिती ऐकली होती. मेजवानीवर तृप्त ढेकर देताना एका गोष्टीबद्दल बोलतो त्याचे फार मानून घेऊ नका. माझ्यासारखी कोकणी माणसे (शिवाय काही महिने पुणे-३० चे पाणी प्यालेली) तुम्हाला भेटलीच असतील तसे मानून घ्या. मुख्य म्हणजे ही टीका ज्याबद्दल आहे तो मुळात तुमच्या लेखनाचा सुगुण म्हणावा की अवगुण याबाबत माझ्या मनातच निश्चिती नाही - तो म्हणजे तुमच्या-आमच्या आवडत्या भाईकाकांचा कमालीचा प्रभाव. "त्या वटवृक्षाच्या छायेखाली" आपले-तुपले मराठी भाषेचे प्रेम वाढले आहे. पुलंचा एकएक शब्द आपण मनात मोत्यासारखा माळलेला असतो. पण त्यांच्या लेखन-शिष्यांनी त्यांचे आभार मानताना अगदी तेच लिहितात तसे लिहू नये असे वाटते. म्हणजे "काशीबाई माझी कुणीच नाही, ना नात्याची ना गोत्याची" वगैरे पुलंची वाक्ये मुळात हृदयाला भिडली असली, तरी ती शाब्दिक "हरकत" अगदी तशीच पुन्हा कोणी वापरली तर कोणास ठाऊक काय म्हणून, मनाला पटत नाही. याबाबतीत पुलंनी खुद्द मते मांडली आहेत. वसंतराव देशपांड्यांच्यावर लिहिलेल्या मृत्युलेखात त्यांनी असे मत मांडले आहे की वसंतराव अमुकसारखे गायचे ती म्हणजे कोणाच्या गाण्याची नक्कल नाही, आणि का नाही. त्यात "अगदी तसेच गाणे" आणि ऋणनिर्देश मधला फरक त्यांनी मांडला आहे. शिवाय हाच विषय "सखाराम गटणे" मध्ये त्यांनी ओझरता हाताळला आहे. पुन्हा सांगतो, की पुलंची उस्तादकी इतकी स्पष्ट लक्षात यावी हा म्हणजे वाहावा करण्यासारखा गुण की अरेरे करण्यासारखा अवगुण, याबाबत माझे मन डळमळीत आहे. पण तरीही तुमचे हे व्यक्तिचित्र, पाटणकर आजोबांचे व्यक्तिचित्र वाचून मनात थोडे वैषम्य वाटत होते, ते सांगितले. तुमच्याकडे शब्द मांडण्याची स्वयंभू प्रतिभा आहे, हे दिसतच आहे. वैषम्यावर फार वाफ दवडली तरी महत्त्वाचे पुन्हा थोडक्यात सांगतो, "मस्त आवडले".

In reply to by धनंजय

कोलबेर Sun, 10/28/2007 - 21:43
तात्या व्यक्तिचित्रण सुंदरच झाले आहे. ते खुलवण्याची तुमची हातोटी बघता तुम्ही आता पुलंच्या कुबड्या फेकुन देऊन स्वतःच्या पायावर पळत सुटावे असे वाटते. "काशीबाई माझी कुणीच नाही, ना नात्याची ना गोत्याची" अशी वाक्ये खरंच गुळगुळीत वाटतात. ती टाळळीत आणि साचा थोडा बदललात तर लोकं 'अगदी पुलंची आठवण आली' न म्हणता 'अगदी तात्यांची आठवण आली' म्हणतील! अर्थातच सगळ्यात महत्त्वाचे "मस्त आवडले". पुढील व्यक्तिचित्रणास शुभेच्छा!

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Sun, 10/28/2007 - 23:33
वरूणदेवा, ते खुलवण्याची तुमची हातोटी बघता तुम्ही आता पुलंच्या कुबड्या फेकुन देऊन स्वतःच्या पायावर पळत सुटावे असे वाटते. त्यांचा माझ्यावर प्रभाव जरूर आहे, परंतु मी त्यांच्या कुबड्या कधीच घेतल्या नाहीत. म्हणजे जाणूनबुजून तरी नक्कीच नाही. मला जसं सुचतं तसंच मी लिहीत जातो. आणि साचा थोडा बदललात तर लोकं 'अगदी पुलंची आठवण आली' न म्हणता 'अगदी तात्यांची आठवण आली' म्हणतील! साचा बदलायचा म्हणजे काय करायचं हे माझ्या लक्षात येत नाहीये. हेच व्यक्तिचित्र आपल्यापैकी इतर कुणी वेगळ्या ढंगात लिहून दाखवल्यास मला ते अधिक आवडेल व साचा बदललेल्या थोड्या वेगळ्या चवीचं माझंच व्यक्तिचित्र मला नव्याने वाचायला खरंच आवडेल! 'अगदी पुलंची आठवण आली' न म्हणता 'अगदी तात्यांची आठवण आली' म्हणतील! अर्थात, एक गोष्ट मात्र स्पष्ट करू इच्छितो की व्यक्तिश: मला तरी 'अगदी पुलंची आठवण आली' असंच म्हटलेलं अधिक आवडेल! म्हणजे त्याचा अर्थ मी 'व्यक्तिचित्र लेखनात मला किमान ३५% इतके तरी गुण आहेत' असा घेईन! :) आपला, (भाईकाकांची इतर व्यक्तिचित्रे तर सोडाच परंतु फक्त एका 'अंतू बर्व्या'करता भाईकाकांना ज्ञानपिठ पुरस्कार मिळायला हवा होता असं वाटणारा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Mon, 10/29/2007 - 00:04
साचा बदलायचा म्हणजे काय करायचं हे माझ्या लक्षात येत नाहीये. तात्या हे जर मला कळत/जमत असतं तर तुमच्या पेक्षा जास्त व्यिक्तिचित्रं मी लिहीली नसती का? :-) एखाद्या पदार्थ अजुन चांगला बनण्यासाठी कोणता बदल हवा हे फार तर आम्ही सांगू शकु पण स्वयपाकघरात हा बदल प्रत्यक्षात कसा आणत येइल हे त्या बल्लवाचार्‍यालाच माहित. आपल्यापैकी इतर कुणी वेगळ्या ढंगात लिहून दाखवल्यास मला ते अधिक आवडेल कल्पना आवडली प्रयत्न करुन बघेन.

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Mon, 10/29/2007 - 00:10
कल्पना आवडली प्रयत्न करुन बघेन. दॅट्स द स्पिरिट...जियो! :) आम्हाला वरूणदेवांच्या उत्तम लेखणीची कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ढंगात रंगवलेली काशीबाई नक्कीच सरस असेल याची आम्हाला खात्री आहे आणि तो आमचा व आमच्या मैत्रिणीचा सन्मानच असेल!:) तात्या.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Sun, 10/28/2007 - 23:22
काय सुंदर रंगवले आहे चित्र! गंमत म्हणजे बाळाच्या "सामानाचा रंग" आणि मोठेपणचा गोरेपणा याविषयी मी एका काकूंकडूनच माहिती ऐकली होती. हा हा हा! :) माझ्यासारखी कोकणी माणसे (शिवाय काही महिने पुणे-३० चे पाणी प्यालेली) तुम्हाला भेटलीच असतील तसे मानून घ्या. अहो सांगा बिनधास्त. मला कोकणी माणसांची सवय आहे!:) मुख्य म्हणजे ही टीका ज्याबद्दल आहे तो मुळात तुमच्या लेखनाचा सुगुण म्हणावा की अवगुण याबाबत माझ्या मनातच निश्चिती नाही - तो म्हणजे तुमच्या-आमच्या आवडत्या भाईकाकांचा कमालीचा प्रभाव. हो, ही गोष्ट खरी आहे. त्यांचा माझ्यावर खूपच प्रभाव आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे व्यक्तिचित्र हा सबंध प्रकारच त्यांनी जितका समर्थपणे हाताळला आहे तेवढा माझ्या माहितीत तरी इतर कुणी हाताळला नाही. नाही म्हणायला, व्यंकटेशतात्यांची , शिरुभाऊंची, आणि दळवींची काही व्यक्तिचित्रे मला आवडतात. म्हणजे "काशीबाई माझी कुणीच नाही, ना नात्याची ना गोत्याची" वगैरे पुलंची वाक्ये मुळात हृदयाला भिडली असली, तरी ती शाब्दिक "हरकत" अगदी तशीच पुन्हा कोणी वापरली तर कोणास ठाऊक काय म्हणून, मनाला पटत नाही. याची नोंद घेतली आहे. तरीही "काशीबाई माझी कुणीच नाही, ना नात्याची ना गोत्याची" हे खरंच आहे आणि म्हणूनच ते तसं लिहिलं गेलं आहे. असो.. पुन्हा सांगतो, की पुलंची उस्तादकी इतकी स्पष्ट लक्षात यावी हा म्हणजे वाहावा करण्यासारखा गुण की अरेरे करण्यासारखा अवगुण, याबाबत माझे मन डळमळीत आहे. तुमची वाहवा किंवा अरेरे, आम्ही दोन्हीही गोड मानून घेऊ आणि भाईकाकांच्या पायावर ठेवू! ते आम्हाला समजून घेतील! :) पण तरीही तुमचे हे व्यक्तिचित्र, पाटणकर आजोबांचे व्यक्तिचित्र वाचून मनात थोडे वैषम्य वाटत होते, ते सांगितले. याचे मात्र खरेच बरे वाटले.... तुमच्याकडे शब्द मांडण्याची स्वयंभू प्रतिभा आहे, हे दिसतच आहे. माझ्याकडे शब्द मांडण्याची स्वयंभू प्रतिभा?? धनंजयराव, आता मात्र तुमचा सखाराम गटणे होतोय हे तुमच्या लक्षात येतंय का? :) वैषम्यावर फार वाफ दवडली तरी महत्त्वाचे पुन्हा थोडक्यात सांगतो, "मस्त आवडले". धन्यवाद शेठ! :) आपला, (भाईकाकांचा शिष्य!) तात्या.

In reply to by धनंजय

धनंजय Mon, 10/29/2007 - 00:25
मी वर उल्लेख केलेला उतारा येणेप्रमाणे : (पु ल देशपांडे यांच्या "आपुलकी" लेखसंचातून, "अब्द अब्द मनीं येतें" मधला परिच्छेद. लेख वसंतराव देशपांडेंबद्दल आहे)
... तसे पाहिले तर दीनानाथरावांची त्याला प्रत्यक्ष अशी नियमित तालीम लाभली नव्हती; पण दीनानाथरावांचा गाण्यातला अंदाज काय असतो ते त्याने नेमके टिपले होते. एखाद्या घराण्याची गायकी नेमकी आत्मसात करणे म्हणजे त्यातील गुरूची नक्कल करणे नव्हे. रागाच्या विस्ताराबद्दल गुरूचे विचार आत्मसात करणे. ही 'नजर', मला वाटते, उपजतच यावी लागते. ती नजर नसलेल्या शिष्यांचे पाठांतर चांगले होते. मेहनती असला किंवा असली तर गायनात सफाई येते. पण ही कारागिरी झाली. नुसताच तरबेजपणा झाला. असले गाणे छापील असते. ते अंगच्या गुणांनी विकसत नाही. ...
तात्या, माझे (आणि बहुतेक वरुणरावांचे) म्हणणे असे, की पुलं जर दीनानाथ, तर तुमच्यात वसंतराव होण्यासारखा अंगचा उपजत गुण आहे. येथे पुलंची, वसंतरावांची दीनानाथांबद्दल पूजाभावना शब्दाशब्दात दिसून येते. पण तरीही गुरूपेक्षा वेगळे, आपले अंगचे गुण उमटवणे किती महत्त्वाचे आहे, हे पुलंनी किती प्रभावी रीतीने पटवून दिले आहे! तुम्ही म्हणता की "काशीबाई माझी कुणीच नाही, ना नात्याची ना गोत्याची" हे वाक्य अक्षरशः खरे आहे, आणि यावेगळे लिहिता येणे शक्य नाही. रावसाहेबांबाबत पुलंच्या मोत्यासारख्या शब्दांची ही माळ आपल्या मनात रुळली आहे, म्हणून आपल्याला वाटते की याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने शब्द मांडणे शक्यच नाही. पण इथे उत्तम-अधम भेद करू नका. तात्या अभ्यंकरांच्या स्वतंत्र शैलीत हे तथ्य कसे म्हटले जाऊ शकते हा विचार करावा. याचे उत्तर तुमचे तुम्हीच देऊ शकता. तुम्ही वरुणरावांना हे वेगळे कसे म्हटले जाऊ शकते, असे विचारले. इथे "तात्या हे वेगळे कसे म्हणू शकतील" त्याचे उदाहरण कसे बरे देता येईल? धनंजय स्वतःच्या शैलीत कसे म्हणेल ते सांगतो - "काशीबाईचे-माझे तसे म्हटले तर काय नाते?" "म्हणावे तर काशीबाईचे माझ्याशी काहीएक नाते नव्हते." "काशीबाई म्हटली तर तिर्‍हाईत, पण...(पुढचे वाक्य जोडून.)" "काशीबाई तशी माझी आवशी ना मावशी." (म्हणजे मनात जर जोरकस यमक साधायचे असेल तर... :-) ) पण हे सगळे पर्याय "धनंजय"च्या शैलीतले आहे, तात्यांच्या लेखनात चांगले दिसणार नाहीत. लेखन माझे असते तर असे अनेक पर्याय मनात मांडून मी माझ्या शैलीला पेलेल असा त्यांच्यापैकीं त्यातल्यात्यात उत्तम निवडला असता. त्याला पुलंच्या शब्दांच्या मोत्याची सर येणार नाही, पण त्यावर माझी अंगची छाप असेल. माझ्या विदेशी छापील मराठीपेक्षा तात्यांचे जिवंत शब्दभांडार मोठे आहे, त्यांना स्वतःच्या स्वतंत्र अंगाचे शब्द माझ्यापेक्षा उत्तम आणि पुलंपेक्षा वेगळे सुचतीलच अशी माझी पैज आहे. तेव्हा तात्या, पुलंचे वरील म्हणणे तुम्हाला पटते का ते बघा. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊ नका, तर त्यांच्या पावलांने आखलेली वाट आपल्या पावलांनी चाला. टीका असली, तरी ही एका चाहत्याची टीका आहे, गोड माना.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 10/29/2007 - 00:57
त्यांना स्वतःच्या स्वतंत्र अंगाचे शब्द माझ्यापेक्षा उत्तम आणि पुलंपेक्षा वेगळे सुचतीलच अशी माझी पैज आहे. आपली ही पैज माझ्या लेखनावरील आपले प्रेम आणि विश्वास दर्शवते. त्याबद्दल धन्यवाद मानून त्यात मी कृत्रिमता आणू इच्छित नाही! आपले मुद्दे पटले, नव्हे ते पटण्यासारखेच आहेत. परंतु मी आत्ताच कुठे लिहू लागलो आहे, सुधारायला थोडा वेळ द्या, माझ्या लेखनात यथावकाश आपल्या आणि वरूणरावांच्या मुद्द्यांची निश्चितपणे नोंद घेतल्याचे आपल्याला दिसून येईल. आता गाण्याचंच उदाहरण दिलंत म्हणून सांगतो, की अण्णांचं अगदी तरूणपणीचं (म्हणजे पन्नासच्या दशकातलं, अण्णांच्या तिशी-पस्तिशीतलं) गाणं हे बरचसं, म्हणजे जवळजवळ ९०% हे अगदी सही सही अब्दुल करीमखा साहेबांच्याच धाटणीतलं होतं. साधारणपणे साठाच्या दशकापासून अण्णा स्वतःचं गाणं गाऊ लागले. सांगायचा मुद्दा इतकाच की मलाही अजून थोडा वेळ मिळावा, जेणेकरून आमच्यावर असलेला पुलंकरिमखासाहेबांचा पगडा थोडा दूर होईल! :) टीका असली, तरी ही एका चाहत्याची टीका आहे, गोड माना. अरे बस काय शेठ! अहो टीका कसली? उलट तुमची आणि वरूणरावांची ही आत्मियता आहे असंच मी मानतो. तात्या.

राजे Sun, 10/28/2007 - 22:51
"अजून हिच्यात इतका गोडवा शिल्लकच कसा? " जो मनाने समाधानी असेल त्याला इतर जागी आपले दुखः उगाळत बसण्याची गरजच भासत नाही, हे माझे मत. लेख जबरदस्त. तात्या, तुम्ही लिहता ते वाचनीय आहेच पण साठवण करुन ठेवण्याजोगे देखील आहे. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

प्राजु Sun, 10/28/2007 - 23:32
तात्या, खरंच .. काय लिहीता तुम्ही..! पु.लं च्या नंतर व्यक्तीचित्र वाचावं तर तुम्ही लिहीलेलं. यापेक्षा आणखी काय सांगू? काशीबाई... तुमच्या लेखातून आम्हालाही आमची "मावशी"च वाटू लागली. - प्राजु. अवांतर : जरा रोशनी आणि शिंत्रे गुरूजींना आधी घ्या लेखणीवर.....!

केशवसुमार Mon, 10/29/2007 - 03:40
तात्या. हे ही व्यक्तीचित्र आवडल.. प्राजु म्हणते तस ते रोशनी आणि शिंत्रे गुरूजींना आधी घ्या लेखणीवर.. केशवसुमार..

In reply to by बेसनलाडू

स्वाती दिनेश Mon, 10/29/2007 - 12:56
हेच म्हणते! लेख सुंदर झाला आहे तात्या,झकास! पण ते जरा अर्धे राहिलेले प्रोजेक्ट...वाट पाहत आहोत आम्ही त्यांची,:) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

प्रियाली Tue, 10/30/2007 - 15:31
लेख वाचायचा राहून गेला होता म्हणून उशीरा प्रतिसाद. लेख नेहमीप्रमाणेच उत्तम! राहिलेले लेखही लवकर पूर्ण करा.

आजानुकर्ण Mon, 10/29/2007 - 08:24
खूप आवडले. याआधीची बरीच व्यक्तीचित्रणे पुलंष्टाईल होती. हे जरा स्वतंत्र आणि खूप चांगले आहे.

नंदन Mon, 10/29/2007 - 08:59
काशीबाईचे व्यक्तिचित्र आवडले. तिची स्वाभिमानी वृत्ती, निरागसपणा आणि आजीची माया छान टिपली आहेस. (अवांतर - भाकरी नि वांगा-बटाट्याची भाजी हे कॉम्बिनेशन मस्त आहे :) ) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

विसोबा खेचर Mon, 10/29/2007 - 09:20
(अवांतर - भाकरी नि वांगा-बटाट्याची भाजी हे कॉम्बिनेशन मस्त आहे :) ) 'बोल तात्या, तुझी शेवटची इच्छा काय आहे?' असं जर मला मरताना यमाने विचारलंन तर मी त्याला एवढंच सांगेन की, 'बाबारे, चिंच-गूळ-दाण्याचं कुट लावून केलेली वांगीबटाट्याची भाजी, मिरचीचा खरडा आणि ज्वारीची गरम भाकरी मला खायला दे आणि त्यानंतर सातारी तंबाखूच्या पिंका टाकत टाकत रेड्यावर डब्बलशीट बसून तुझ्यसोबत तू म्हणशील तिथे मी येईन! :) आपला, तात्या कामत.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण Mon, 10/29/2007 - 09:23
पण तुम्ही आधी मिसळ किंवा इंदौरची मिठाई म्हटला होता ना? चॉईस सारखी बदलत राहिली तर बिचार्‍या यमाला पंधरावीस शेफ तयार ठेवायला लागतील पर्मनंट. ;) (काडीघालू) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

सहज Mon, 10/29/2007 - 09:32
अरे सुरवात "वांगोटा"(वांग-बटाटा) भाजीने मग जरा रेडा इकडन घ्या हो करत करत बरोबर हाजमोला सकट सर्व काही हजम करून यम व तात्या एकत्र मौजेत जातिल ;-) खरं की नाय तात्या? नंतर यमाला वरून आदेश येतील की यापूढे कूठल्याही क्लायंटला "तात्या रूट"ने आणायचे नाही. च्यायला मस्त कल्पना सुचली आहे यम अश्याच एका नाना फडणवीसला घेऊन चाललायं :-)

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Mon, 10/29/2007 - 23:22
'बाबारे, चिंच-गूळ-दाण्याचं कुट लावून केलेली वांगीबटाट्याची भाजी, मिरचीचा खरडा आणि ज्वारीची गरम भाकरी मला खायला दे आणि त्यानंतर सातारी तंबाखूच्या पिंका टाकत टाकत रेड्यावर डब्बलशीट बसून तुझ्यसोबत तू म्हणशील तिथे मी येईन! :) तात्या, प्लीज यमाला असल्या मागण्या करू नकोस ! तुझ्यासोबत भाजी भाकरी खाल्लीच त्याने, आणि आवडली, तर इथे भूतलावरच पर्मनंट मुक्काम ठोकायचा बेटा, रेड्यासकट ! त्यापेक्षा काय ते "तेगार" वगैरे वाचायला सांग त्याला आणि मोकळा हो बघू !! (आणि हो, "त्यांच्या" मनातून मिसळपाव उतरले होते, त्याचे आता काय स्टेटस आहे रे ? त्यांना परत बोलवायला पोष्टमन पाठवू काय ?) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Tue, 10/30/2007 - 01:41
त्यापेक्षा काय ते "तेगार" वगैरे वाचायला सांग त्याला आणि मोकळा हो बघू !! चालेल! :) (आणि हो, "त्यांच्या" मनातून मिसळपाव उतरले होते, त्याचे आता काय स्टेटस आहे रे ? अजूनही तसेच आहे! अर्थात, त्यांची इथे फेरी असते, वाचनही असतं, परंतु ते इथे जाहीर लेखन करत नाहीत! काय करणार बाबा, मनोगताच्या संपादकीय पदावर आता त्यांना बढती मिळाली आहे ना! :) तेव्हा आपल्या मिसळपावसारख्या सामान्य जनांच्या संकेतस्थळावर लिहिणं त्यांच्या साहित्यिक स्टेटसच्या आता आड येत असेल!:) त्यांना परत बोलवायला पोष्टमन पाठवू काय ?) नको, त्याची विशेष गरज वाटत नाही, कारण पोष्ट्याच्या तश्या इथे फेर्‍या असतातच! मिसळपावच्या गुगल एनालिटिक्स प्रमाणे अमेरिकेतील संयुक्त राज्यांपैकी नॉर्थ कॅरिलोनाची विमानं मिसळपाववर बर्‍याच घिरट्या घालत असतात असे कळते! :) आपला, (शि आय डी) तात्या.

सर्किट Mon, 10/29/2007 - 22:29
काशीबाईची सगळी श्रीमंती नजरेसमोर उभी राहिली ! तात्या, मस्त झालेय हेदेखील चित्र ! एक सूचना आहे. तुमच्या प्रत्येक शब्दचित्रासोबत ओंकारशेठने त्यांच्या मनःचक्षूपुढे उभे राहिलेल्या त्या व्यक्तीचे रेखाटन द्यावे ! लगे रहो तात्याभाय ! - सर्किट

विसोबा खेचर Tue, 10/30/2007 - 01:25
काशीबाईची सगळी श्रीमंती नजरेसमोर उभी राहिली ! क्या बात है सर्कीटदेवा! तुझं हे अवघ्या एका वाक्यातलं परिक्षण मला खूप आवडलं. खरं तर मलाही या लेखातून काशीबाई किती श्रीमंत आहे हेच दाखवून द्यायचं होतं! असो, तुझ्या या एका वाक्याच्या चपखल परिक्षणाकरता तुला वसंतरावांचं माझ्या संग्रही असलेलं 'अरे वेड्या मना तळमळसी' नक्की सप्रेम भेट म्हणून देईन. ही दृकश्राव्य ध्वनिचित्रफित एका खाजगी घरगुती मैफलीतली आहे! काय सुरेख गायलंय यार वसंतरावांनी! ही फित पाहताना गाणार्‍या वसंतरावांना एकन एक सूर असा समोर डोळ्यासमोर दिसतो आहे असं वाटतं! क्या बात है.... एक सूचना आहे. तुमच्या प्रत्येक शब्दचित्रासोबत ओंकारशेठने त्यांच्या मनःचक्षूपुढे उभे राहिलेल्या त्या व्यक्तीचे रेखाटन द्यावे ! क्या बात है! पूर्णपणे सहमत आहे. ओंकारशेठकडे ती कॅपॅबिलिटी निश्चितच आहे! तात्या.

आजानुकर्ण Tue, 10/30/2007 - 11:55
मस्त. असेच म्हणतो. ओंकारचा रेखाचित्रांचा उपक्रम थोडा थंड आहे का?

त्यांचा माझ्यावर प्रभाव जरूर आहे, परंतु मी त्यांच्या कुबड्या कधीच घेतल्या नाहीत. म्हणजे जाणूनबुजून तरी नक्कीच नाही. मला जसं सुचतं तसंच मी लिहीत जातो. प्रभाव वजा अभाव =भाव हे प्रत्येकात असंत; ज्याच जे भावेल ते सहजतेने घेतल जातच. ही सहजता प्रेरणेतूनच येते. एके काळी प्रथितयश गायकांच्या व्यतिरिक्त इतर गायकांनी कितिही चांगल गायल तरि ते डुप्लिकेट . श्रोत्यांची ऐकून घेण्याची मानसिकताच नसायची. लगेच आयडॉलशी तुलना व्हायची. पण आता चित्र बदलल आहे. ग्लॅमरने ही किमया घडवून आणली. व्यक्तिचित्रासोबत एखाद रेखाचित्र टाकता आल तर अजून मजा येईल. प्रकाश घाटपांडे

ध्रुव Tue, 10/30/2007 - 13:58
तात्या, खरच काय सुंदर लिहीलं आहे!! मजा आया!! ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

विसोबा खेचर Wed, 10/31/2007 - 09:07
सर्व वाचकांचा आणि प्रतिसाद देणार्‍यांचा मी ऋणी आहे... माझ्या लेखनावर भाईकाकांचा प्रभाव आहे असं बर्‍याच जणांनी म्हटलं आहे आणि ते खरंही आहे! भाईकाकांच्या प्रभावाविषयी, प्रभाव वजा अभाव =भाव हे प्रत्येकात असंत; ज्याच जे भावेल ते सहजतेने घेतल जातच. ही सहजता प्रेरणेतूनच येते. असं घाटपांडेसाहेबांनी म्हटलेलं आहे, तेच मलाही म्हणायचं आहे! सुरवातीच्या वाटचालीमध्ये गुरुचा प्रभाव हा असतोच, त्याचंच बोट धरून चालावं लागतं असं मी मानतो. कालांतराने प्रत्येकाला स्वत:ची वाट सापडते तशी ती मलाही सापडावी हीच इच्छा. तूर्तास मी आमच्या गुरुजींचंच बोट धरून चालण्यात समाधानी आहे, सुखी आहे! :) असो, पुन्हा एकदा सर्व प्रतिसादींचे मन:पूर्वक आभार... आपला, (भाईकाकांचा शिष्य) तात्या.

साती गुरुवार, 11/01/2007 - 09:17
तात्या, लेख आवडला. काशीबाई अगदी डोळ्यासमोर दिसल्या.सगळ्या व्यक्तिचित्रांची सूची इथे एकत्र दिलीत हे चांगले केलेत. साती

प्रमोद देव गुरुवार, 11/01/2007 - 09:37
व्यक्तीचित्र लेखन हे आता तात्याचे वैशिष्ठ्य झालेय ह्यात शंकाच नाही. काशीबाईचे व्यक्तिचित्रही छान उतरले आहे. तरीही तात्या तुझ्या "बुवा" ह्या व्यक्तीचित्राने जी मोहिनी घातली होती त्या मानाने काशीबाईमध्ये काही तरी कमी वाटतंय. आता नेमके काय ते मात्र सांगता येत नाहीये. कदाचित काही तरी "खुसपट" काढायचेच आहे म्हणून, असेही म्हणता येईल.

स्वाती राजेश Fri, 11/09/2007 - 02:16
काशिबाईचे सुंदर व्यक्तिचित्र आहे. आजच वाचले. बाकीची व्यक्तिचित्रे वाचली नाहीत. लवकरच वाचेन. अशीच सुंदर असतील यात शंका नाही.

समिधा Sat, 01/24/2009 - 03:59
फारच सुंदर लिहीलयत हो तात्या. अगदी डोळ्यासमोर काशिबाई आणि तिची परिस्थिती उभी राहीली.

डॉ.प्रसाद दाढे Sat, 01/24/2009 - 15:13
वा तात्या, पुन्हा सिक्सर! खूपच आवडलं हे पण व्यक्तिचित्र.. पुलंचा प्रभाव असणं स्वाभाविकच आहे, त्याचा पुलंप्रेमी॑ना अभिमानच आहे.

संदीप चित्रे Mon, 01/26/2009 - 06:33
>> 'चांदोबा माज्या म्हाह्येरचा, सून मी सुर्व्याघरची!' काय सुरेख व्यक्तिचित्रण आहे रे... च्यायला, अस्संच निघावं आणि तुला भेटून यावं असं वाटतं असं काही वाचलं की !! जियो... अजून खूप खूप माणसं जोड आणि एकसे एक व्यक्तिचित्रणं लिही :)

शितल Mon, 01/26/2009 - 08:46
तात्या, काशीबाईंचे व्यक्तीचित्रण आवडले, खुपच सुंदर झाले आहे. :)

आपला अभिजित Mon, 01/26/2009 - 10:49
तात्या, व्यक्तिचित्रणात तुमचा की-बोर्ड कुणी धरणार नाही! :) बाहेरून सर्वसामान्य दिसणार्‍या व्यक्तींच्या अंतरंगात डोकावण्याचा आपण सहसा प्रयत्न करत नाही. पण डोकावल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सप्तरंग आयुष्य उजळून टाकतात! त्यांच्या व्यथा, वेदनाही कळतात आणि आपली त्यांच्याकडेच नव्हे, तर आयुष्याकडे बघण्याची द्रुष्टीही बदलते. `असेच लिहीत राहा' म्हणणे म्हणजे सूर्याला `रोज उगवत राहा' म्हणण्यासारखेच आहे! असो. माझ्यासारख्या मुखदुर्बळांच्या आयुष्यातल्या काही उलगडलेल्या काही न उलगडलेल्या व्यक्तिमत्त्वांविषयी लिहिण्यासाठी ही आता हात शिवशिवत आहेत! - अभिजित.

प्रभाकर पेठकर Mon, 01/26/2009 - 12:12
तात्या, मी सुद्धा तुमचे हे लिखाण तुम्ही लिहिलेत तेंव्हा वाचले नव्हते. आज वाचनात आहे. 'जसे सुचले तसे, मन रिकामे होईस्तोवर' लिहीणे हा तुमचा स्वभाव आणि हि तुमची लेखनशैली वाखाणण्याजोगी आहे. अभिनंदन. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

लेखनप्रकार
तात्या अभ्यंकरांची व्यक्तिचित्रे आणि गणगोतातील माणसे! १) आबा जोशी २) बुवा ३) पाटणकर आजोबा ४) नेनेसाहेब ५) साधना कोळीण ६)

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५(अ)

स्वाती दिनेश ·

सहज Sun, 10/28/2007 - 19:38
हा भाग देखील तितकाच थ्रीलींग हे सांगायला नकोच. हे असे जेव्हा पहीले अनुभव असतात ना (काही बघीतले, खाल्ले, अनुभवले), तेव्हा असे इतर कूणाला वाटते का हो, की आई-बाबा, भावंड, नातेवाईक, मित्रगण आत्ता बरोबर पाहिजे होते, किंवा ते आले की आता त्यांना इथे नक्की घेऊन येऊया. अमुक व्यक्तिला हे खूप आवडेल. माझे असे होते बॉ.

बेसनलाडू Mon, 10/29/2007 - 03:57
खूप छान. मजा येते आहे वाचायला. येऊ द्या पुढचे! (वाचक)बेसनलाडू

विसोबा खेचर Mon, 10/29/2007 - 08:53
वा! ऍनिमल ऍक्टर सहीच वाटले! अनेक नवनवीन कुतुहलं साद घालत होती,अजून काही पाहूया,अनुभवूया असं मन म्हणत होतं. स्वाती, तुझ्या समृद्ध प्रवासविश्वाचे आणि त्याचा भरभरून आस्वाद घेण्याचे कौतूक वाटते... तात्या.

प्राजु Tue, 10/30/2007 - 00:27
स्वाती, तुझे वर्णन वाचून खरोखर अनुभवत असल्यासारखे वाटते. खूपच छान. येऊदे अजूनही. - प्राजु.

गुंडोपंत Fri, 11/02/2007 - 17:38
वा स्वाती, प्रत्येक लेख छानच उतरला आहे. वाचायला खुप मजा वाटते आहे... परत परत वाचले तरी परत वाचावेसे वाटते आहे. खुप आवडला हा भागही... प्रतिसाद द्यायला उशीर झाला... पण भाग खुप आवडला.. भाग्यवान आहात! इतके विवीध अनुभव घेवू शकलात! आपला गुंडोपंत

स्वाती राजेश Fri, 11/02/2007 - 16:12
स्वाती खरेच सुन्दर लिहिले आहेस. मी आज सकाळी एकदम सर्व भाग वाचले.अगदी जपान ट्रिप केल्यासारखे वाटते. अशीच पुढ्ची ट्रिप सुन्दर होऊ दे.

स्वाती दिनेश Sat, 11/03/2007 - 12:12
अत्त्यानंदजी,सहजराव,धनंजय,राजे,बे.ला,तात्या,प्राजु,गुंडोपंत,स्वाती राजेश लेख आवडला हे आवर्जून सांगितलेत, मनापासून धन्यवाद. स्वाती

3

voip फोन

कौटील्य ·

सर्किट Mon, 10/29/2007 - 23:29
मलाही ह्याविषयी माहिती हवी आहे. - सर्किट

ध्रुव Tue, 10/30/2007 - 14:02
मला काही कळलेच नाही. पण अजुन माहिती जाणून घ्यायला आवडेल. या लेखावर लक्ष ठेवतो. अवांतरः येथील नेटवर्कींग बद्द्ल अधीक माहिती असणार्‍यांनी काही लेख लिहून आम्हालाही थोडं ज्ञान द्यावे ही इच्छा! ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

लबाड बोका Fri, 11/02/2007 - 16:34
मित्रांनो nch.com.au या साइट वर तुम्हाला जे हवे ते मिळेल तेथील बिझिनेस केटेगरीमधे axon हा pbx आहे जो voip चे काम करेल व्हरचुअल मोडेम व एफे्क्सओ आडाप्टर वापरुन pstn जोडता येते हो हा फुकठ आहे काहि मर्यादेपर्यंत मी pstn वापरले नहि पण माझ्या हापिसात अंतर्गत फोन आता voip आहे ४० संगणक टकाटक एकमेकांशी बोलतात इंटरकाम फक्त बाहेर फोन करण्यासाठी बघा http://nch.com.au अवांतरः मी संगणक क्षेत्रात काम करतो पण फक्त भारतीय माणसांसाठी आणि सर्वच कामे पैशासाठी करायची नसतात काहि केवळ आनंद मिळावा म्हणुन केली जातात (संगणक तज्ञ) बोका

मला विंडोजवर चालणारा voip पीबीएक्स ज्याने pstn or ip दोन्हीवर संभाषण करता येउ शकेल व कमीत कमी ४ एक्सटेंशन करता येतील हवा आहे विकत असेल तरि चालेल ओपन सोर्स उत्तम फुकठ अति उत्तम

इंद्रधनुष्य

देवदत्त ·

चित्रे सुंदर आहेत आणि इंद्रधनुष्यच वाटते. पण,या चित्राच्या अगोदर कधी गोलाकार इंद्रधनुष्य आम्ही पाहिले नाही. अवांतर ;) आपण लेखनाला जे काही शिर्षक देता, त्यावरुन आम्हाला वाटले ही कविता असावी, दोनदा तुम्ही आम्हाला एप्रील फूल केले, नोव्हेंबर महिण्यात.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदन Sun, 10/28/2007 - 11:09
छायाचित्र मस्त आहे. इंद्रधनुष्यच वाटते. विकीवर येथे थोडी माहिती आहे, ती उपयुक्त ठरावी. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

नंदनसेठ, माहिती उपयुक्त आहे. पण वर्तुळाकार इंद्रधनुष्याबद्दल काही दिसले नाही. वर्तुळाकार इंद्रधनुष्य कसे असू शकते ? ते तसे दिसू शकत नाही, असे वाटते, अर्थात त्याची शास्त्रीय परिभाषा आम्हाला सांगता येणार नाही,पण आम्ही जरा गोंधळलेलो आहोत.मिसळपावचे कोणी तज्ञ आणि होशी जाणकार याबद्दल खूलासा करतील काय ? ता.क. :- देवदत्त, छायाचित्रे सुंदर आहेत, यात काही वाद नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by नंदन

प्रियाली Sun, 10/28/2007 - 17:02
आकाशात असे गोलाकार रंगीत आकार दिसतात असे विकीवरील माहितीत कळले. येथे आणि येथे पाहा. अधिक आकारही तेथे आहेत. परंतु, आपल्या आकाराला इंद्रधनुष्य न म्हणता इंद्रगोल इ. म्हणणे योग्य. :) (ह. घ्या) अर्थात, दोघांचे गुणधर्म एकच आहेत म्हणून त्याला इंद्रधनुचा प्रकार म्हणता येईल. विकीवरील लेखात म्हटल्याप्रमाणे प्रायमरी आणि सेकंडरी अशी दोन धनुष्ये मी पाहिली आहेत. एकदा वादळात गाडी हाकताना गाडीपुढे पाऊस आणि मागे काही अंतरावर पडलेले स्वच्छ ऊन यांत मला ती दिसली होती. घरी पोहचून कॅमेरा उघडेपर्यंत एकच इंद्रधनुष्य फिकट स्वरूपात बाकी राहिले होते. असा प्रकार पूर्वी कधीही न पाहिल्याने मला आश्चर्यही वाटलं होतं. ते चित्र खाली लावले आहे. प्रायमरी इंद्रधनुष्याची रुंदी बरीच मोठी असल्याचे आठवते. DSC00262 नायेग्राला अशी अनेक इंद्रधनुष्ये पाण्याच्या तुषारांवर दिसतात. HPIM0631

In reply to by प्रियाली

देवदत्त Sun, 10/28/2007 - 18:51
सुरेख छायाचित्रे आहेत. :) माझ्या कॅमेर्‍यात एवढी स्पष्ट चित्रे येत नाहीत हे मी अनुभवले आहे. कदाचित सुर्यावर केंद्रीत छायाचित्रे काढल्याने भिंगावर तर परिणाम नाही ना झाला? :( (आशंकित) देवदत्त

स्वाती दिनेश Sun, 10/28/2007 - 11:46
इंद्रधनुष्य आहे हे! मीना प्रभुंच्या "दक्षिणरंग" मध्ये अशा गोलाकार इंद्रधनुष्याचा उल्लेख आहे.इग्वासुच्या धबधब्याच्या येथे अशी अनेक गोलाकार इंद्रधनुषी वर्तुळे दिसतात त्याचे वर्णन त्यांनी फार सुंदर केले आहे. स्वाती

देवदत्त Sun, 10/28/2007 - 14:58
तात्या, दिलीपराव, धनंजय, नंदन, स्वाती... आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. मी हे इंद्रधनुष्यच मानत आलोय. हे छायाचित्र मी मागील वर्षी बंगळूर येथे घेतले होते. ह्यावर्षी पुण्यातील काही मित्रांनी शंका काढली होती. म्हणून वाटले ह्यावर आणखी मते घ्यावीत. दिलीपराव, माझे मिसळपावावर हेच पहिले लिखाण आहे. बाकी प्रतिक्रियाच होत्या. त्यामुळे आधी कधी एप्रिल फूल केले ते माहित नाही :) असो. आणि हो कविता लिहिणे हा माझा प्रांत नाही हो :( फक्त काही कविता कळल्या/आवडल्या तर प्रतिक्रिया लिहितोच. नंदन, विकीच्या दुव्याबद्दल धन्यवाद. नीट मी सवडीने वाचेन. परंतु त्यात लिहिल्याप्रमाणे It is difficult to photograph the complete arc of a rainbow. म्हणजे ते आम्हाला जमले की :) असो, आणखी एक. फार पुर्वी एक इंग्रजी सिनेमा ओझरता बघितला होता. त्यात दोन लहान मुले इंद्रधनुष्याच्या टोकापर्यंत जाण्याकरिता प्रवास करतात. त्याबाबत काही माहिती मिळू शकेल का? सवड मिळाली की तो चित्रपट पाहण्याची इच्छा आहे. (इंद्रधनुष्याच्या शोधात) देवदत्त

दिनेश५७ Sun, 10/28/2007 - 15:33
इंद्रधनुष्य आणि पाऊस, सूर्यकिरण यांचा संबध असतो. पावसाच्या थेंबातून सूर्यकिरणांचे विकिरण होते, तेव्हा सूर्याच्या विरुध्द दिशेला इंद्रधनुष्य दिसते, (असे काहितरी वाचल्या/शिकल्याचे आठवते.) चन्द्राभोवती दिसणार्‍या या रंगछटा म्हणजे, ज्याला `खळे' म्हणतात, तसे तर नसेल? कारण प्रकाशकिरणांचे विकिरण झाल्याशिवाय रंगछटा दिसू शकणार नाहीत.

In reply to by दिनेश५७

इंद्रधनुष्य आणि पाऊस, सूर्यकिरण यांचा संबध असतो. पावसाच्या थेंबातून सूर्यकिरणांचे विकिरण होते, तेव्हा सूर्याच्या विरुध्द दिशेला इंद्रधनुष्य दिसते. सुर्याची किरणे, सर्व बाजूंनी पाण्याच्या थेंबावर पडले तरच वर्तुळाकार इंद्रधनूष्य दिसू शकते, तसे ते पडू शकत नाही, असे वाटते ! त्यामुळे वर्तुळाकार इंद्रधनुष्याच्या बाबतीत वरील सर्व दुव्यांवर जाऊन आलो तरी समाधान मात्र होत नाही. वर्तुळाकार इंद्रधनुष्याच्या विचाराने अस्वस्थ असलेला. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by दिनेश५७

देवदत्त Sun, 10/28/2007 - 18:47
आपले म्हणणे बरोबर आहे की, इंद्रधनुष्य आणि पाऊस, सूर्यकिरण यांचा संबध असतो. हे इंद्रधनुष्य मी पाऊस पडून गेल्यावरच बघितले. नेहमी पाऊस पडल्यानंतर जर का उन पडले की लगेच इंद्रधनुष्य शोधायला लागतो. त्यातच हे दिसले. फक्त हे सूर्याच्या विरुध्द दिशेला नाही दिसले त्याचाच मी विचार करत आहे.

सहज Sun, 10/28/2007 - 19:13
इंद्र्गोल (गोलाकार इंद्रधनुष्य) असतो पण तो बघायला जमीनीवर नाही तर त्या तुषार व सुर्याच्यामधे पाहीजे. (पुढे तुषार व मागे सुर्य) काही जण ह्याला सोलर हेलो (Halo) म्हणतात. आधीक माहीती साठी दुवा १ दुवा २ दुवा ३

धनंजय Sun, 10/28/2007 - 20:37
देवदत्त यांच्या चित्रात इंद्रधनुष्यातला लाल पट्टा सूर्याच्या दिशेला आहे, आणि जांभळा पट्टा सूर्यापासून दूर आहे. प्रियाली यांचा (आकाशातील) चित्रात जांभळा पट्टा सूर्याच्या दिशेला आहे, आणि लाल पट्टा सूर्यापासून दूर आहे. प्राथमिक, दुय्यम इंद्रधनुष्यांबद्दल ही गोष्ट मी स्पष्टीकरणासह वाचली होती, इथे अक्षरशः एकाशेजारी एक चित्रांत पाहयला मिळाली म्हणून धन्यवाद! ता.क. देवदत्त, सूर्याच्या थेट चित्रांनी कॅमेराचा "सेन्सॉर" जळू शकतो, त्यामुळे पुढच्या वेळेला अशी चित्रे काळजीपूर्वकच काढा! करडी काच, काळा ठिपका असलेली काच वगैरे वापरून कॅमेराला धोका न पोचता अशी चित्रे टिपता येतात.

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/20/2008 - 06:33
हरिश्चंद्रगडावर असलेल्या अंतर्वक्र कोकण कड्याच्या इथे ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ चालू झाला की नेहेमी दिसतो आणि तो देखील सप्तरंगात सुस्पष्ट. वरील सर्व छायाचित्रे मनोहारी. > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

In reply to by सृष्टीलावण्या

इनोबा म्हणे गुरुवार, 03/20/2008 - 12:57
हरिश्चंद्रगडावर असलेल्या अंतर्वक्र कोकण कड्याच्या इथे ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ चालू झाला की नेहेमी दिसतो आणि तो देखील सप्तरंगात सुस्पष्ट. मुंबईत नाही दिसत का?पुण्यात तर दिसतो बॉ! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

विजुभाऊ गुरुवार, 03/20/2008 - 12:36
याला इन्द्रधनुष्य म्हणत नाहीत .....खळे म्हणतात.... सामन्यतः हे चन्द्रा सोबत दिसते. सूर्य प्रकाश जर काही करणामुळे कमी असेल ( तरच आपण मान वर करुन पाहु शकतो)/आकाशात ढग असतील तरीही हे दिसु शकते. यात सामान्यतः तीन पेक्ष जास्त रंग दिसत नाहीत काळसर करडा डॉमिनन्ट असतो.

सुधीर कांदळकर Fri, 03/21/2008 - 19:23
सूर्याभोवती दिसतो तसाच प्रखर दिव्याभोवती देखील दिसतो. पावसाळ्यात रस्त्यावरील प्रखर दिव्याकडे पाहा. देवदत्त, प्रियालीताई, स्वातीताई आणि सहज, प्रकाशचित्राबद्द्ल/दुव्याबद्दल धन्यवाद. सुरेखच प्रकाशचित्रे आहेत. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

कोजागिरीच्या चंद्राच्या छायाचित्रावरून आठवले. मागील वर्षी ३ जुलै ला मी इंद्रधनुष्य बघितला होता. आता तुम्ही म्हणाल की त्यात काय नवीन आहे?

रामसेतूचा वाद

दिनेश५७ ·

दिनेश Sat, 10/27/2007 - 12:31
या किवा अशा विषयांवर मला मत असल्यानेच लिहित आहे,कृपया गैरसमज नसावा. राम----रामजन्मभूमी---- आणि आता रामसेतू! सगळा कोंबड्या (म्हणजे जनता! इथला सदस्य नव्हे.)झुंजवण्याचाच प्रकार.. नवीन काहीच नाही.आत्तापर्यंत अशा गोष्टीत वेळ,पैसा आणि श्रम(जनतेचा आणि राजकारण्यांचाही) वाया दवडला नसता तर खचितच भारताची प्रगती अजून २ स्टेप पुढे गेली असती. परंतु ह्या गोष्टींपेक्षा इतर अनेक गंभीर समस्या भारतासमोर असताना जनतेने (आणि हाटेलात येणार्‍यांनीही)आपला वेळ असे विषय मांडून व्यर्थ दवडू नये ही अपेक्षा. (लोकशाहीत मते मांडण्याचा अधिकार असण्याचे समर्थन करणारा )दिनेश

उदय ४२ Sat, 10/27/2007 - 18:42
दिनेशराव म्हंत्यात त्ये बराबर हाय.आता मोदी बद्द्ल तहलका सुरु आहे.(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

हरिप्रसाद Fri, 11/23/2007 - 20:58
सहज आंतरजालात भ्रमण करत असताना एक मस्त कविता मिळाली. "मिसळपावच्या" रसिकांसाठी साभार ............. जय जय श्री राम श्री राम जी के भक्त है रोम रोम में राम जी बसें है हनुमान नही पर राम भक्त हैं राम हमारे रोम रोम हैं । सच (!) कहते हैं कुछ विद्वान (?) राम नही इतिहास में हैं ! हां, राम इतिहास नही हो सकते ! वो तो सदा बर्तमान रहे हैं । भूत में भी विद्यमान रहे हैं हर इंसां के दिल में रहे हैं । बर्तमान में भी उनका अस्तित्व छाप अमिट आदर्श व्यक्तित्व । भविष्य में भी हर पल रहेंगे हर जीवन के पूज्य रहेंगे । अयोध्या, लंका, पंचवटी, मिथिला,किषकिंधा, जनकपुर, शबरी, अत्रि, मार्कण्डेय आश्रम, धनुषकोटि, चित्रकूट, रामेश्वर । पग - पग पर मिलते राम पग फिर भी कहते राम नही हैं । देख उठा कर भारत भू की मुट्ठी भर मिट्टी यहां की । कण - कण में तुम्हे राम मिलेंगे; फिर भी दिखें न राम तुम्हें तो, आकर सीना चीर के देखो - हर दिल में तुम्हें राम दिखेंगे । राम - राम जप तर गये कितने राम बसा मन पाया स्वर्ग । राम रमा है अखिल जगत में मोक्ष बस राम नाम संसर्ग । राम - सेतु धरोहर अपनी क्यों न करें हम पुनरुद्धार । नवजीवन दे राम सेतु को कर लें अपना भी उद्धार ।

रामराजे Sat, 11/24/2007 - 10:04
राममंदिर किंवा रामसेतु च्या विषयावर वाद उकरुन काढणे म्हनजे पुन्हा ये रे माझ्या मागल्यातलाच प्रकार आहे. असे विषय हे काही लोकांचे राखीव कुरण असल्याने आपण त्याच्यावर काथ्याकुट करुन उपयोग नाही.

रामसेतूवरून उफाळलेला वाद आता संपला आहे, असे दिसते. दसर्‍याच्या आसपास सोनिया गांधींनी कुठल्याशा रामलीलेतल्या राम-लक्ष्मणाची पूजा केली, आणि वाद धुवून टाकला. मग असे वाद आधी उकरण्यामागचे राजकारण कुणी (ज्याला यावर काही मत असेल, तो) समजावून सांगू शकेल का? रामाचे अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न जमून गेला असता, तर, अयोध्येतल्या जन्मभूमीपासून सुरू झालेले प्रश्न गुपचूप मितवता आले असते, असे तर नसेल?