गोळेसाहेब,
आजपर्यंत तुम्ही केलेला हिंदी गीताचा मराठी अनुवादच वाचनात आला. आज प्रथमच एक हिंदी अनुवाद वाचला आणि तो मला आवडला..
मी मराठी आहे, मराठी भाषेचा अभिमान मला आहेच, परंतु हिंदी भाषेवरही माझे अतिशय प्रेम आहे आणि मला ती मराठीइतकीच आवडते! असो..
आपण अजूनही काही मराठी गीतांचा हिंदी अनुवाद करावा ही विनंती...
मूळ 'मराठी' कविता/गाणे अनुवादासोबत प्रसिद्ध केल्यास हिंदी अनुवाद प्रकाशीत करण्यास हरकत नाही.
- मिसळपाव पंचायत
मी व्यक्तिश: पंचायत समितीच्या वरील निर्णयाचे स्वागत करतो...
तात्या.
धन्यवाद मिसळपाव पंचायतन! धन्यवाद तात्या!
अनुवादाच्या कलेचे रहस्य मूळ आणि अनुवाद दोन्हीही सोबत पाहता येण्याने उकलते.
ह्याची फार सखोल जाण आपल्या ह्या अभिप्रायांतून अभिव्यक्त होत आहे.
आपण अजूनही काही मराठी गीतांचा हिंदी अनुवाद करावा ही विनंती...>>
तात्या, "चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा" ह्या मराठी गीताचा
मी हिंदीत आणि प्रवासींनी संस्कृतात केलेला सुरस अनुवाद मनोगतावर अजूनही आढळून येतो आहे,
त्यावर पुन्हा एकदा नजरे करम करा.
स्पष्टीकरण
माझं मत..
धन्यवाद मिसळपाव पंचायतन! धन्यवाद तात्या!