मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गांधी जी

विकास ·

सर्किट Tue, 10/02/2007 - 11:23
खरंच, ही कढी गेल्या दोन वर्षांपासून तशीच बाहेर ठेवलेली आहे. आता कितीही उकळले तरी तिला ऊत येणार नाही. ताजी कढी बनवतोय. "शत्रूचा शत्रू हा आपला मित्र" ह्या नेताजींच्या शिकवणीनुसार भारताने ओसामा बिन लादन ला भारतरत्न द्यावे म्हणून. नेताजींनी हिरोहिटो आणि हिटलरला रेकमेंड केले असतेच की नाही? - सर्किट

सहज Tue, 10/02/2007 - 11:42
ब्रिटिशांचे शाप लागले म्हणायचे गांधीजींच्या भारताला. असो शिर्षक "२ ऑक्टोबर - उकळी आली कढीला" किंवा "२ ऑक्टोबर - पुन्हा उकळी" विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. ----------------------------------------------------------- सबको सन्मती दे भगवान!

In reply to by सहज

विकास Tue, 10/02/2007 - 21:13
>>>विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. अहो असे आहे की काही असामान्य व्यक्तींचे काही वर्तन पटले नाही म्हणून त्यांची असामान्य होण्यातली जिद्द मला भावते. मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही... "दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल..." वगैरे म्हणणे म्हणजे आचरटपणा आणि इतर स्वातंत्र्यसैनीकांवर राजकीय आणि सामाजीक अन्याय /द्वेषपण वाटतो. तरी देखील गांधीचे पहा, आत्तचा नवीन शब्द "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. बाकी राहीले त्यांनी केलेल्या चुका आणि त्यांची हत्या (का वध? फरक माहीत असेल तर ह. घ्या.) यावर सतत लिहीणे चाल्तेच. ते होऊ नये इतकेच वाटते. अवांतरः कदाचीत एक वेगळा विषय होऊ शकेल, पण अशा असामान्य व्यक्ती ज्यांचे वागणे, भले कधी अपयश आले असले तरी निर्विवाद त्यांच्या कार्यात अचूक होते, ज्यांची वैचारीक ठेवण अतिशय स्पष्ट होती अशा हाताच्या बोटावर मोजता येतील अशाच व्यक्ती असतील - त्यातील मला कायम ज्यांच्या बद्दल आदरयुक्त अचंबा वाटतो त्या म्हणजे शिवाजी, टिळक, विवेकानंद इतक्याच पटकन आठवतात. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते).अमेरिकेच्या बाबतीत लिंकन आणी जेफरसन आहेत. स्वतःच्या राष्ट्राचा स्वार्थ १००% डोक्यात ठेवला आणि स्वतःचा गुडीगुडीपणा नेहेरूंसारखा वापरला पण देशाला मोठे करायला, असे मला क्लिंटनबद्दलपण वाटते (त्याचे इतर उद्योग सोडून द्या).

In reply to by विकास

सर्किट Wed, 10/03/2007 - 00:55
विकासराव, आपले म्हणणे बहुतांश पटले. ते इतके संतुलित आहे, की न पटण्यासारखे काहीच ठेवले नाही तुम्ही. मिट रॉमनीची जागा घ्यायचा विचार आहे का ? (ह. घ्या.) गेली दीड वर्षे क्रांतिकारकांच्या प्रत्येक जयंती पुण्यतिथीला "मानवतेच्या पुजार्‍याची निंदा" हे तेच तेच दळण दळणार्‍या "इतिहासकारांचे" लिखाण वाचल्यावर तर आपला प्रतिसाद इज अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर ! - सर्किट

In reply to by विकास

मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही... पुर्णपणे सहमत. "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. चला एन आर आय ला एक वेगळेच परिमाण दिल्याने या शब्दाकडे पहाण्याचा कुत्सीत देशीपणा जरा सौम्य होईल. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते). सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचल्यावर मात्र तसे वाटत नाही. " ने मजसी ने परत मातृभूमीला" ऐकताना मात्र त्यांच कवित्व भावतं. प्रकाश घाटपांडे

शिळी कढी म्हणजे नक्की कोणची? - उत आणणे याचा अर्थ पुनरुज्जीवन करणे असा घेतला तरी चव कशी लागते हे मह्त्वाचे. आमचेकडे रारापोब ( राज्य राखीव पोलिस बल गट [क्र. १ व २ पुण्यात] ) S R P F मध्ये मेस मधील आमटी वा भाजी बराकीत 'तडका' ( इन्स्टंट फोडणी )देउन खाल्ली जाते. तरच ती खाणे सुसह्य होते. बलगटा ला आम्ही 'बैलगट' म्हणत असू. ( उतलेली शिळी कढी आवडणारा) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट Tue, 10/02/2007 - 12:05
कालची शिळी कढी आज छान लागते. पण दर जयंती, पुण्यतिथीला तीच तीच शिळी कढी खाता येईल का? बुरशी देखील आली आहे तिला आता. पोलिसांना देखील ती खाणे सुसह्य होणार नाही. मग कितीही तडका द्या. असो, एक वचन आठवले: कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. कारण त्यामुळे हे कर्तृत्व आपल्यालाही करणे शक्य आहे, हा विश्वासच नाहीसा होतो. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. गांधींकडे आपण 'माणुस' म्हणून न पहाता 'महात्मा 'म्हणुन पहातो. "माणूस" म्हणुन पाहिले तर ते महान वाटतात. भले त्यांच्य विचारांशी सहमत असो वा नसो. प्रकाश घाटपांडे

विकास Tue, 10/02/2007 - 16:49
गांधींच्या ऐवजी कढी वरील भाष्ये वाचून ही "कढी जयंती" आहे असे वाटले! अहो हा ड्राय डे आहे तेंव्हा कढी साठीपण ड्राय डे च केला :) गांधींचे नाव आले की फाळणी, हिंदू-मुसलमान, नथूराम,इत्यादी तत्कालीन विषयांवर चर्चा होते. राऊत यांचा अग्रलेख वाचताना तो वेगळ्या पद्धतीने लिहीलेला असल्याने त्याबाबत काय वाटले ते विचारले होते! बाकी सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात.

In reply to by विकास

सर्किट Tue, 10/02/2007 - 23:28
सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात. हे वचन हार्वर्ड विद्यापीठातील चार्ल्स विली ह्यांचे आहे. डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ह्यांच्या संदर्भात त्यांनी म्हटले होते: By idolizing those whom we honor, we fail to realize that we could go and do likewise. As I have said on many occasions, honoring Martin Luther King Jr. would be dishonorable if we remember the man and forget his mission. For those among us who believe in him, his work now must become our own. - सर्किट

प्राजु Tue, 10/02/2007 - 18:58
कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. हे अगदी खरे आहे. हा लेख वेगळ्या संदर्भाने लिहिला आहे यात काही शंकाच नाही. लेखही चांगला आहे. पण मी गांधी वादी नाही. अहिंसेच्या मार्गाने जाणारे तत्वज्ञान सांगून गांधीजीनी भारतीय नागरिकाला बुळा बनवला... समोरच्याचा उगारलेला हात रोखता येण्याइतकी हिम्मत त्यांच्या तत्वज्ञानातून नाही मिळाली. उलट एका गालावर मारले तर दुसरा पुढे करणे हिच शिकवण सर्वसामान्यांना मिळाली आणि म्हणूनच कदाचित जे आधी होऊ शकले असते ते होण्यासाठी १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस उजाडावा लागला... नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते. हे माझे स्वतःचे मत आहे.... - प्राजु.

In reply to by प्राजु

सर्किट Wed, 10/03/2007 - 01:04
"ट्रिव्हियलायझेशन ऑफ हिस्टरी" या वृत्तीचा उत्कृष्ह्ट नमुना म्हणजे हा प्रतिसाद. इतिहास हा नेहमी सरळ रेषेतच जात असतो अशी बाळबोध भावना मनात असली, की ही वृत्ती निदर्शनास येते. - सर्किट

In reply to by प्राजु

नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते. हे माझे स्वतःचे मत आहे.... ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

टग्या Wed, 10/03/2007 - 10:36
>वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर??? मुळात असा प्रयत्न तरी केला होता काय??? प्रतिसाद आवडला!

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:09
वैचारिक प्रतिवाद कोण करतो ? ज्याचा स्वतःच्या विचारांवर ठाम विश्वास असतो तो. जेव्हा स्वतःच्या विचारावरचा विश्वास संपतो, तेव्हा मानव हिंसेची कास धरतो. गांधीजींनी अहिंसेचा मार्ग धरला, कारण त्यांचा त्यांच्या विचारांवर विश्वास होता, म्हणून. - (वैचारिक) सर्किट

आजानुकर्ण Wed, 10/03/2007 - 11:14
पण हिंसा हाच ज्यांचा विचार आहे त्यांनी हिंसा केली तर त्यांचा त्यांच्या विचारावर असलेला विश्वास अधिकच दृढ होत नाही का?

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:36
हिंसा हाच विचार असणारे मानवी मानसशास्त्रात मनोरुग्ण ठरतात. नथूराम मनोरुग्ण होते, असे आपल्याला म्हणायचे आहे काय ? - सर्किट

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास Wed, 10/03/2007 - 16:09
>>>ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. याबाबत सावरकरांच्या तोंडचे एक वाक्य वाचल्याचे आठवले. त्यांना गांधीहत्येत गोवले होते, तेंव्हा ते म्हणाले होते की, "(स्वतंत्र भारतात) माझा विरोध हा मी बॅलेट ने नोंदवीन बुलेटने नाही." त्याच बाबतीत त्यांनी नंतर गैरवापर होवू नये म्हणून स्वतःच "अभिनव भारत" चा सांगता समारोप करून बंद करून टाकला. गांधीजींनी पण तेच काँग्रेसच्या बाबतीत म्हणले होते पण आपण सर्व पाहातोच आहोत की काय झाले...

लबाड बोका Tue, 10/02/2007 - 19:07
बौध्द आणि गांधी यांनी भारताचे जे नुकसान केले त्यापुढे मुस्लीम व ब्रिटीशांनी केलेले घाव काहिच नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील लढण्याची उमेद हिरावुन घेणा-या अहिंसेच्या पुजा-यांना नमस्कार (कोपरापासुन)

In reply to by लबाड बोका

तो Wed, 10/03/2007 - 13:22
तुम्हाला गौतम बुद्ध म्हणायचे आहे का? काय नुकसान केले ते कळले तर बरे वाटेल. तो उगाचच 'भारत' काही शेहे वर्षे बौद्धधर्मिय होता अशा भ्रमात आहे. (म्हणजे बहुसंख्य बरे! भारत जसा हिंदूंचा देश असू शकतो, तसा.)

राजे Tue, 10/02/2007 - 23:35
गांधी, ही व्यक्ती नेता अथवा नायक म्हणून किंवा वयक्तीक जिवनामध्ये कशी ही असो पण एक मात्र ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळे जरुर होते की करोडो संख्येने त्यांचे अनुयायी त्याच्या एका आवाजावर रस्त्यावर येत ही व परत जात ही. ह्यांचे महत्व किती अथवा ह्यांनी काय केले ह्या पेक्षा जास्त महत्वाचे आहे की आजच्या दिवशी ह्यांचा उपयोग कोणी व कसा केला ह्या बद्द्ल लिहण्याचा, कारण आम्ही तुम्ही ज्या समाजामध्ये वावरलो त्यामध्ये गांधीला महात्मा तर बनवले गेलेच पण आपले नशिब की त्यांना विष्णूचा अवतार मानून पुजा चालू केली गेली नाही. पण आपली जी येणारी पिढी आहे ती सर्व गोष्टीचे नित विष्लेशन करुन मग ठरवेल की कोण योग्य होते व कोण नाही, आज तुम्ही आम्ही जितके जमेल तितके लेखन करत राहू, उद्याची जी पिढी आहे ती व्यवस्थीत सर्व काही वाचेल व मगच निर्णय घेईल हा नुस्ताच आशावाद नाही आहे तर विश्वास आहे, कारण जितके आम्ही तुम्ही गांधी विरोधात लिहतो वाचतो आहोत इतके भाग्य आपल्या मागील पिढीला नव्हते हे सर्वजण मान्य करतील. राजे (*हेच राज जैन आहेत)

विकास Wed, 10/03/2007 - 00:08
आजचा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून जाहीर केला आहे. (अर्थात त्याला सर्व राष्ट्रांनी अनुमोदन दिलेले नाही!). त्या निमित्ताच्या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजानीक सभेपुढे भारतसरकारच्या अधिकृत प्रतिनिधी म्हणून सोनीया गांधींचे भाषण असणार होते. भारतसरकार तर्फे "सोनीयाजी आणि राहूलजी" हे गांधीजींचे नाव रोशन करायला न्यू यॉर्क मधे आले आहेत. त्यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्री "प्रणव मुखर्जीजी" आणि "आनंद शर्मा जी" पण आलेले आहेत. (मला टूलबार दिसत नसल्यामुळे संपूर्ण लिंक खाली चिकटवत आहे.) http://news.google.com/news/url?sa=t&ct=:ePkh8BM9EwLbwQq0w4CFGFsy8wCSUwbJ/0-0&fp=4702e8778ac19172&ei=o48CR4nCA6GkqwOl8fx3&url=http%3A//timesofindia.indiatimes.com/Sonia_raises_disarmament_issue_at_UN_meet/articleshow/2422950.cms&cid=1121373298&sig2=Ksz7bCjNwFgYifqzNSqUCg

आग्या वेताळ Wed, 10/03/2007 - 00:42
गांधीबाबाला शिव्या घालताय व्हय?कुनी पायतानानं हानत न्हाई म्हनून कायबी कोकलतायसा काय रं? तिच्यायला, बामनांननी माजोरी घातलीया.त्यात हमेशा कोकनी बामनं लई फुडं.. आरं, गांधीबाबा खरा हिंदू व्हता.त्येला कळ्ळं व्हतं खरा हिंदू म्हंजे काय ते. तुमी म्हंतायसा त्यो हिंदू पैल्यापासूनच अहिंसावादी व्हता रं,लेकाच्यांनो. बाबानं फकस्त त्येला तत्त्वज्ञान बनिवलं. त्येला काय खुळा समजता काय रे? तुमच्या सावरकरानं काय क्येलं?बकबक करून काय मिळ्ळं?"हिंदूहृदयसम्राट". कसलं काय?काय बी झालं न्हाई तेच्या हातनं. बोला महात्मा गांधी की जय नाद करायचा न्हाई --------------- मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत

In reply to by आग्या वेताळ

विकास Wed, 10/03/2007 - 01:01
आग्या वेताळ राव, आपल्या प्रतिक्रीयेतील शाब्दीक हिंसा आणि आपण धारण केलेलेे नाव पाहून "हेची फळ काय मम तपाला" असेच त्या महात्मास वाटेल! या चर्चेची सुरवात करताना श्री. भारतकुमार राऊत यांचा जो लेख दिला होता तो याच संदर्भात होता. पण आपण कुठल्याशा कृष्णधवल चष्म्यातून जग पाहात आहात असे दिसतयं.. अशाच वृत्ती पाहून कुसुमाग्रजांची कविता परत परत आठवते ज्यात शिवाजी, टिळक, आंबेडकर, फुले आणि गांधीजी यांचे पुतळे मध्यरात्री आपापल्या व्यथा व्यक्त करायला भेटतात. शिवाजी म्हणतो की मला फक्त मराठ्यांचे समजले जाते, टिळक म्हणतात मला ब्राम्हण, फुले म्हणतात मला फक्त माळ्यांचा तर आंबेडकर खंत व्यक्त करतात की मला फक्त दलीतांचा... गांधीजी बिचारे गप्प असतात. त्यांना इतर पुढारी जेंव्हा विचारतात तेंव्हा ते म्हण्तात, तुम्ही नशिबवान आहात, तुमच्या मागे तुमच्याअ तथाकथीत जाती तरी आहेत, माझ्या मागे फक्त सरकारी भिंती...

In reply to by आग्या वेताळ

राजे Wed, 10/03/2007 - 01:24
तुम्ही नाव देखील आपल्या कार्याला साजेल असेच घेतले आहे, अभिनंदन. तुम्ही आपल्या मुला-बाळाच्या समोर व स्त्रींच्या समोर समाजामध्ये कसे वागत असाल ह्याची शक्यतो तुम्ही चुणुक दाखवली आहे. तुमचे विचार व लेखन पध्दती पाहता तुम्ही एकमेव आहात जो गांधीजींच्या विचारांचा वारसा पुढेच नाहीतर युगे न युगे लोकांच्या समोर मनोगत पासून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही जे कोणी आहात तुमच्या सारखा महत्वाचा व्यक्ती येथे नव्हता ह्याचा आनंद आज संपला. मिसळपाव वर व्यक्तीस्वातंत्र आहे हे वाचून होतो पण येथे शिव्या व इतर शब्दांचा वापर देखील मुक्तपणे कोणी ही करु शकतो हे पाहून अत्यंत आनंद झाला. तुमचे देखील स्वागत आहे. ..... दम असेल तर सरळ स्वतःच्या नावाने लेखन करु दाखवा. असे माझ्या सारखे लिहणारे अनेक जण तुम्हाला भेटतील येथे पण तुम्ही कोणाच्या नादी न लागता असेच लोकप्रिय लेखन चालू ठेवावे ही विनंती, सर्कीट साहबांना तुमचा आयपी सापडलाच असेल , काही प्रतिसाद, लेखन अजून करा तुमचा संपुर्ण पत्ताच येथे कोणी ना कोणी ठेवेल ही आशा. राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by आग्या वेताळ

सर्किट Wed, 10/03/2007 - 06:15
हिंदू म्हणजे गांधीबाबाला जे कळले, ते तुमच्या आग्याशब्दांत सांगाल का ? गांधींनी हिंदू ह्या शब्दाची काय व्याख्या केली ? ती प्रचलित व्याख्येला कितपत सहमत होती ? सावरकरांनी असे काय केले, की त्यांना हल्लीचे घरगुती क्रांतीवीर हिंदुहृदय सम्राट म्हणतात ? असे सगळे छान लिहा. - (देशस्थ-ऋग्वेदी-ब्राह्मण-हिंदुहृदयसम्राट) सर्किट

In reply to by आग्या वेताळ

प्रमोद देव Wed, 10/03/2007 - 07:54
मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले.

In reply to by प्रमोद देव

शिव्या आढळल्यामुळे प्रतिसाद संपादित केला हे ठिक झाले , पण काही तास तरी सन्माननीय मिसळप्रेमीने काय लिहिले हे वाचकाला कळू दिले पाहिजे असे वाटते ! अर्थात मिसळपाव पंचायतीने घेतलेला निर्णय योग्यच असेल आणि आम्ही त्याचे (निवडणूकीपर्यंत)समर्थन करतो. पण गावकरी लोकांनाही कळू द्या राव ! गावातल्या कोणता कच-याची विल्हेवाट लावली आहे म्हणून ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रमोद देव

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:12
श्री. वेताळ ह्यांचा मूळ प्रतिसाद मी वाचला होता. त्यात मला तरी आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही, म्हणजे "आयमायच्या" शिव्या नव्हत्या. तरीही हा प्रतिसाद संपादित झाला ह्याबद्दल खेद होतो. निवडणुकातील उमेदवारांना असे प्रतिसाद आपण संपादित कराल का, असा प्रश्न विचारायला हवा. - सर्किट

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर गुरुवार, 10/04/2007 - 00:46
खरे आहे. वेताळ यांचा प्रतिसाद वाचला नसला तरी तो संपादित झाला याबद्दल खेद वाटतो. वेताळाचा प्रतिसाद काय होता हे मलाही माहिती नाही, पण काय रे आजानुकर्णा, वेताळचा प्रतिसाद तू वाचला नाहीस ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? ज्या अर्थी तो संपादित झाला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात काहीतरी आक्षेपार्ह वाटले असणार म्हणूनच तो संपादित केला गेला ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? तू स्वतः पंचायत समितीवर आहेस आणि असं असताना पंचायत समितीपैकीच (इतर चौघांपैकी कुणीतरी) तो प्रतिसाद संपादित केला असताना सदर प्रतिसाद संपादित केल्याबद्दल जर तू 'खेद वाटतो' म्हणून जाहीर गळे काढत असशील तर पंचायत समितीवरील इतर चौघांवर तुझा विश्वास नाही असंच म्हणायला हवं! 'खेद वाटतो' असं जाहीरपणे म्हणण्याआधी पंचायत समितीवरील तुझ्या इतर चौघां सहकार्‍यांना एक साधा व्य नि पाठवून, विश्वासात घेऊन सदर प्रतिसाद का व कुणी संपादित केला असं तुला विचारावंसं वाटलं नाही?? '+१ करून खेद वाटतो' असं म्हणणं खूप सोप्प आहे!! माझा पंचायत समितीवर पूर्ण विश्वास आहे आणि 'ज्या अर्थी त्यांनी हे पाऊल उचलले आहे त्या अर्थी त्यात त्यांना नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार असंच मी विश्वासाने म्हणेन!! असो.. तात्या.

सर्किट Wed, 10/03/2007 - 12:08
एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे. - (खजील) सर्किट

एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे. हेच म्हणतो ! (खजील आणि शिव्या वाचून बधीर झालेला ) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे Wed, 10/03/2007 - 17:09
तुमचा उप-प्रतिसाद वाचला नव्हता क्षमा असावी. *प्रतिसाद पुन्हा लिहला आहे * राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर गुरुवार, 10/04/2007 - 00:56
मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले. प्रमोदकाका, मूळ प्रतिसाद आपण वाचलेला नसताना संपादनाचा शेरा पाहून आपल्याला आश्चर्य कसं वाटलं हे कळेल का?? ज्या अर्थी वेताळाच्या प्रतिसादातला काही भाग संपादित झालेला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार ना?? असो.. (पंचायत समितीवर पूर्ण विश्वास असलेला) तात्या.

In reply to by आग्या वेताळ

मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत कारण मूळ विषय बाजूला राहतो व चर्चा इतकी भरकटते कि मूळ पदावर येणे अवघड होते. प्रकाश घाटपांडे

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

गांधीजींना अशा संपादनाबाबत नेमकं काय वाटलं असतं? हा खरंच हायपोथेटिकल निबंधाचा विषय असू शकतो. प.वि. वर्तकांनी गांधीजींच्या आत्म्याला बोलावून हा प्रश्न विचारायला हरकत नाही. प्रकाश घाटपांडे

राजे गुरुवार, 10/04/2007 - 03:01
गांधीजी चे उत्तर असे असून शकेल "ज्याने लिहले आहे, त्याला आवडले ना ? मग, आपल्याला काही हरकत नसावी, पण हिंसेला हिंसा हेच उत्तर नाही तसेच अपशब्दांना अपशब्द हे देखील उत्तर नाही, कोणी तुमच्या आयाबहीणींना शिव्या घालत असेल तर तुम्ही शिव्या न देता, त्याला प्रेमाने समजावून सांगा" बघा माझा वरील आग्या वेताळ ह्यांना दिलेला प्रतिसादामध्ये मी शब्दशः गांधी अहिंसेचे समर्थन केले आहे . [ येथे शब्दशः हा शब्द महत्वाचा आहे, कारण येथे महाजालावर हिंसा करता येत नाही व शाब्दीक हिंसेवर माझा विश्वास नाही, सरळ पकडा, मारा व पुन्हा आपटुन मारा ह्या बाण्यावर पुर्ण विश्वास आहे... ;}] राजे (*हेच राज जैन आहेत)

चित्रा Wed, 10/03/2007 - 01:24
>>आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. पहिले म्हणजे राऊतांचा लेख चांगला आहे, विचार करायला लावणारा आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे गांधीजी राहिले असते तर काय झाले असते ते राऊतांना वाटले तसे त्यांनी मांडले आहे. ते खरेही आहे. पण दोष केवळ एका राजकिय पक्षाचा नाही, गांधीजींच्या शिकवणुकीचाही नाही. सावरकरांनीही माझ्या माहितीप्रमाणे आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे, कदाचित गांधी त्यात कमी पडले असावेत. दोष असला तर तो गांधींची /किंवा कोणत्याही नेत्याचीच भूमिका समजून घेण्यात, त्यांना प्रश्न विचारण्यात, त्यातील योग्य/कमी अपायकारक गोष्टी उचलण्यात आणि अयोग्य/जास्त अपायकारक टाकून देण्यात भारतीय कमी पडले याचा आहे (अजूनही पडतात). दोष असला तर तो ज्याप्रकारे आपण नागरिक सत्तेपासून दूर राहण्यात भूषण मानत गेलो त्याचा (हा त्या काळाच्या निरागसपणाचा/ वेडेपणाचाच/का नेत्यांच्या शिकवणुकीचाच एक भाग होता - अंधविश्वास?). ही बहुतेक शिळी कढी ठरू नये - निदान "इथे" तरी.

प्रियाली Wed, 10/03/2007 - 03:29
भरतकुमार राऊत यांचा लेख आवडला. प्रतिसादांतील गांधीविरोधी मुक्ताफळांविषयी न बोलणे उत्तम!

In reply to by प्रियाली

सर्किट Wed, 10/03/2007 - 06:11
स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते. गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे. अशा प्रकारे आपण लिखाण करू शकू का? - सर्किट

सहज Wed, 10/03/2007 - 06:55
>>गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे. मला देखील तेच वाटते. कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. पण ते आजकालच्या राजकारण्यांकडून, वृत्तप्रत्रातून राजकीय (पक्षीय) विचारसरणी पसरवणार्‍या जेष्ठ पत्रकारांकडून नाही तर स्वतःचे स्व:ताच. त्यांची मत जरूर ऐका पण जे कोणी "मोठी" लोक जे काही लिहतात ते तसेच्या तसे १००% मानणे, घेणे म्हणजे स्वतःच स्वःताच्या बुद्धीला कमी लेखणे आहे.

In reply to by सहज

टग्या Wed, 10/03/2007 - 09:23
> कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. मोठे व्यक्तिमत्त्व तर निश्चितच! किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता. काहीही होवो, आणि कोणीही काहीही म्हणो, तरीही आपल्याला पटलेल्या मार्गाशी, तत्त्वांशी एकनिष्ठ राहून, आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची आणि ते जनतेच्या गळी उतरवण्याची हिंमत आणि ताकद या माणसात होती. 'बन्दे में था दम' हे खरेच! शिकण्यासारखे म्हणाल, तर म्हटले तर बरेच आहे, पण त्यासाठी लागणारी ती स्वयंएकनिष्ठतेची पातळी आपल्यापैकी बहुतांश जणात नसावी. या माणसाला शिव्या देणे सोपे आहे, आणि या माणसाची सगळीच मते, सगळेच विचार पटलेच पाहिजेत असा आग्रहही नाही, परंतु पटलेल्या आणि पत्करलेल्या मार्गापासून कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता कार्य करत राहणे ही सगळ्यांच्याच "बस"ची बात नाही. आणि तात्त्विक पातळीवर या माणसास हरवू न शकलेली - किंबहुना त्या पातळीच्या जवळपासही पोहोचू न शकलेली - मंडळीच अशा व्यक्तीच्या हत्येचा विचारसुद्धा करू शकतात. त्या महान टग्यास या लहान टग्याकडून भावपूर्ण आदरांजली!

कोलबेर Wed, 10/03/2007 - 09:35
अगदी खरंय.. आणि त्यामुळेच 'लगे रहो' चा मी जाम फ्यान आहे. गांधीजींची टींगल टवाळी करुन टाळ्या आणि शिट्टया वसूल करणे सोपे आहे पण अगदी पीटातल्या प्रेक्षकांकडून सुद्धा गांधीजींच्या 'विचारांवर' टाळ्या आणि शिट्ट्या वसूल करणे मला नाही वाटत कुणाच्या कल्पनेत तरी बसले असते का. त्यामुळेच ह्या चित्रपटाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.. माझ्या मते हीच गांधीजींच्या विचारांना वाहिलेली सर्वात मोठी आदरांजली आहे. - (लगे रहो फ्यान) कोलबेर

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:16
गांधीजींच्या जीवनाविषयी, त्यांचे लेखन, आणि वक्तव्य हे मी आजवर जे काही वाचले आहे, त्याबद्दल "महान टग्या" हे विशेषण अत्यंत योग्य, आणि आदरार्थी आहे. लहान टग्याच्या क्रिएटिव्हिटीचे अत्यंत कौतुक करावेसे वातते !!! - सर्किट

तो Wed, 10/03/2007 - 13:46
गांधी बहोत बडा भाई था. उसने अंग्रेजोंकी वाट लगा दी थी. वगैरे वर्णन लगे रहो मध्ये ऐकल्यासारखे वाटते. टगोबांच्या क्रिएटिव्हिटीवर त्याच्या प्रभाव असणे शक्य आहे. अर्थात स्वतःही टगे असण्यात क्रिएटिव्हिटी आहे ती आहेच.

तो Wed, 10/03/2007 - 13:23
किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता.

प्रियाली Wed, 10/03/2007 - 08:36
>>स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते. खरंय! पण जगातल्या सर्व मठ्ठांना सत्यासत्यता दाखवायचा मक्ता घेतलेला नाही मी. गांधींवरती वाट्टेल ती शस्त्रं सोडली म्हणून त्यांचे महत्त्व तसूभर कमी होत नाही आणि होणारही नाही तेव्हा करू दे कंठशोष! >>सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. मुक्ताफळे उधळणार्‍या व्यक्तींसाठी आय डोण्ट केअर अ xxx! ये अपुनकी शैली है! (कृपया ह. घेणे)

आजानुकर्ण Wed, 10/03/2007 - 09:57
अवचटांनी लिहिलेला हा लेख सुंदर आहे. विशेषतः"गांधी ही वृत्ती" व "बुळा बनवणे" या वाक्प्रयोगांसंदर्भात.

In reply to by आजानुकर्ण

अजानुकर्णा तुझ्या समयसूचकतेला सलाम रे बाबा! अत्यंत योग्य वेळी योग्य लेख लोकांच्या समोर आणलास. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना Wed, 10/03/2007 - 11:03
भरतकुमारांच्या वैचारीक कडबोळ्यापेक्षा हा लेख कितीतरी पटीने स्पष्ट आहे. गांधीजी या व्यक्तीला समजून घेण्यासाठी अवचटांचा हा लेख फारच उपयुक्त वाटला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नंदन Wed, 10/03/2007 - 12:30
म्हणतो. अचूक टायमिंग आणि प्लेसमेंट :). अवचटांचा लेख सुरेख, अप्रतिम वगैरे विशेषणांच्या पलीकडचा आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:28
आजानुकर्णा, अवचट ह्या माणसाने, गांधींना नुसते दैवत बनवून ठेवलेले नाही, तर त्यांना नीट समजून घेतले आहे, ह्याची प्रचिती आली ह्या लेखांतून. मुरलिधर देविदास आमटे, ह्या व्यक्तीविषयीही माझे असेच मत झाले आहे. गांधींविषयी लिहिलेले वाचावे, तर अशा व्यक्तींचे विचार. - सर्किट

आजानुकर्ण Wed, 10/03/2007 - 11:32
+१ युरोपियन माणसाने म्हटलेले "गांधीजी काय फक्त तुमचेच होते का?" हे वाक्य वाचल्यावर गळा दाटून आला.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:38
हेच एखाद्या ब्राह्मणाने एखाद्या दलिताला म्हटले असते, तर आणखीच गळा दाटून आला असता. - सर्किट

खरंच गदगदलो. अजानुकर्णाला धन्यवाद यासाठी की योग्य वेळी, योग्य ठिकाणी ,योग्य लेख पुरवला म्हणुन. प्रकाश घाटपांडे

प्रियाली Wed, 10/03/2007 - 16:37
लेख फारच सुंदर. गांधींना इतकं समजून लिहिलेले अद्याप वाचले नव्हते. सर्किटशेट, कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले. भूमिगत राहून मूठभर इंग्रजांचे खून करून १९४७ पूर्वीच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे वेडे स्वप्न पाहणार्‍यांपेक्षा, त्यांच्यासमोर उभा राहून आपले दात तोडून घेणारा नेता मला नेहमीच आवडला आहे. ---- अस्मादिकांनी येथे सोनाराने कान ओढावे असे लिहिले होते. त्यावर खरडवहीतून आमचेच कान ओढले गेले. हल्ली सगळे कान टोचल्यापेक्षा ओढलेलेच दिसतात त्याला काय करावे? हा दोष त्या लंबकर्ण अजानुचा!

In reply to by प्रियाली

सर्किट Wed, 10/03/2007 - 22:13
कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले. अगदी खरे आहे. आम्ही ऐरण आणि घण घेऊन बसलो होतो :-) म्हणजे " सौ लुहार की आणि एक सुनार की" असं उल्टंच योग्य म्हणताय तर ! - (लोहार) सर्किट

In reply to by आजानुकर्ण

सहज Wed, 10/03/2007 - 16:01
ह्याला म्हणतात लेख. सोप्या शब्दात, आपल्याला समजू, लागू पडेल, उपयोग होईल असे. तोवरची चर्चा म्हणजे ती शिळी कढीच. नुस्ते राजकीय भाषण, पुस्तकी छापील वक्तव्य. तेच आरोप.. प्रत्येकाने माझे सत्याचे प्रयोग जरूर (परत) वाचा. त्या पुस्तकाने माझ्यावर खूप प्रभाव केला आहे. अवचटांनी काय योग्य शब्दात मर्म सांगीतले आहे. अजून काही बोलयची गरज नाही आहे.

In reply to by आजानुकर्ण

विकास Wed, 10/03/2007 - 23:16
हा लेख फारच चांगला आहे. त्यांच्यावर (गांधीजींवर) अंबरीश मिश्र यांचे "गंगे वरती गगन निवळले" हे पुस्तक वाचताना त्यांच्यातील जे अनेक गुण कळले तसे वाटले - अवचटांची शैली आवडत असल्याने जास्तच वाटले. फक्त राहून राहून गांधीजींच्या बाबतीत एक प्रश्न पडतो की ते राजकारणी होण्याऐवजी केवळ समाजधुरीणच झाले असते तर ते त्यांच्या साठी आणि देशासाठी अधीकयोग्य झाले असते का?

In reply to by आजानुकर्ण

चित्रा गुरुवार, 10/04/2007 - 00:40
अवचटांचे सर्व लिखाण उत्तम असते तसाच हा लेख आहे, आवडला. आभारी आहे, आजानुकर्ण.

In reply to by आजानुकर्ण

राघव गुरुवार, 09/11/2008 - 14:21
सुंदर लेख. विकास यांनी दिलेला भारतकुमारांचा लेखही चांगला. पण आजानुकर्णांनी दिलेला अवचटांचा लेख त्याहून छान. दोघांसही धन्यवाद. :) मुमुक्षू

राजे गुरुवार, 10/04/2007 - 03:47
गोंडसे व गांधी दोन वेग-वेगळी मते, दोन वेगळे विचार व दोन अत्यंत टोकाचे आपल्या मतावर ठाम असलेल्या व्यक्ती. गोंड्से ह्यांच्या जवळ सबळ कारण होते की गांधी हत्या का केली, तर गोंडसे अथवा इतर कोणी हत्या करावी इतकी अहींसा पुजा गांधीजीं नी केली होती. शक्यतो, आजच्या घडिला विचार करणे जरा विचित्रच वाटते की गोंडसे ह्यांनी हत्या का केली असावी, जर गांधीजी एक महान व्यक्तीत्व असे न समजता, अथवा त्यांची महात्मा ही पदवी जरा थोडा वेळ बाजूला ठेवली तर लक्षात येते की खरोखर गोंडसे बरोबर होते. काही मुद्दे जेथे गांधीजीच्या चुकांची किमत इतकी मोठी होती की अनेकांची घरेदारे उधवस्त झाली अनेक देशोधडीला लागली, गांधीजींना मोठे केले ते इंग्रजांनी काय कारण असावे ? जरा विचार केला तर टिळक मृत्यू नंतर कोणी सशक्त असा संपुर्ण देशात नेता कोणीच नव्हता, व काही चांगल्या प्रयत्नामुळे / कार्यामुळे गांधी हे नाव अल्प वेळातच देशातील जनतेच्या तोंडी बसले व इंग्रजांनी त्याचा पुरेपुर फायदा करुन घेतला, जेव्हा भगत सिंग काळ चालू झाला होता तेव्हाच गांधी ह्यांच्या प्रतिमेला व विचारांना धक्का बसला होता कारण एखाद्या नेत्याची संपुर्ण ताकत ही त्याच्या आसपास असणा-या समर्थकांच्यावर अवलंबून असते पण आझाद व भगत सिंगमुळे त्यांच्या समर्थकांमध्येच कुजबुज वाढली व त्याच वेळी गांधीजींनी भगत सिंग ह्यांचा संपुर्ण स्वातंत्र्य हा नारा आपलासा केला व आपल्या नावावर खपवला. मुस्लीम समाजाला नको तितकी मदत करुन त्यांना डोक्यावर चढवले ते गांधी जींनी. जिना ह्यांच्या डोक्यात पाकीस्तानचे खुळ कोठून आले हे सर्वांना माहीतच आहे पण त्याला खतपाणी दिले ते गांधी ह्यांनी. मोठ मोठी आंदोलने शुल्लक गोष्टींसाठी मागे घेतली व त्यामुळे समाजावर पडणारा भार अथवा कमजोर होणारी लढाई ह्यांच्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. त्यांनी फक्त नेहरु साठी आपला स्पेशल अजेंडा चालवला हे सगळ्या जगाला माहीत आहे, गरज नसताना पंजाब मधील हिंदूना मुस्लिम मारत आहेत तर मारु देत तुम्ही शस्त्र हाती घेऊ नका हा सल्ला दिला व स्वत: कलकत्तामध्ये जाऊन मुस्लिम समाजाला समजवण्याचे नाटक चालू केले व उपासाला बसले, वीस लाखाच्यावर लोकांना बसलेला विभाजनाचा तडाका त्यांना दिसला नाही मात्र काही मुस्लिम मारले जाताच ह्यांच्या पोटात कळ आली हे विरोधा भास दिसत नाहीत ? जिना ह्यानी न मागताच ५० कोटी दिले व त्याचा उपयोग आपल्याच देशा विरुध्द केला गेला हे सर्वांना माहीत आहे १९४७-४८ ची भारत-पाक लढाई त्याच पैश्याच्या जोरावर पाकिस्तान ने लढली. ह्यांच्या उपासामुळे काय झाले हे कधी कळाले नाही पण सुभाष बाबू सारखे नेते मात्र देशा पासून दुर जाऊन लढाई चा मार्ग शोधू लागले, जर तोच कालावधी सुभाष बाबूंचा येथे आपल्या देशात संघटन, लढाई मजबुत करण्यात लागला असता तर विभाजन न होता भारत आझाद झाला असता. एक मानव म्हणून गांधी खरोखर महान आहे ह्यात वाद नाही पण एक नेता म्हणून ते अपयशीच ठरतात, काय केले हे महत्वाचे नसून काय झाले हे महत्वाचे आहे. त्यावेळी आपल्या पैकी कोणी सर्व समजेल इतका समजूतदार नसावा [जो अनिल अवचटांचा लेख दिला आहे त्यात ते देखील लिहतात की ते त्यावेळी चार वर्षाचे होते... क्या बात है.. त्यांच्या स्मरणशक्तीची दाद द्यावयास हवीच] अथवा नसावाच. राजे (*हेच राज जैन आहेत)

सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 14:43
लेख आवडला. विचार सगळे संतुलित आहेत. गांधीजीचे विचार चांगले आहेत. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

लेखनप्रकार
आज गांधी जयंती. गांधीजींच्या बाबतीत कायमच टोकाचे दोन्हीकडून बोलणे ऐकायला मिळते. त्यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणार्‍यांनी खरा गांधीवाद कधी पाळल्याचे दिसले नाही. (अर्थातच नियमाला अपवाद असतील). असो. म.टा.च्या भारतकुमार राऊत यांचा खालील लेख वाचनात आला, समतोल वाटल्याने आवडला (तोच जर "सुमार साहेबांनी " लिहीला असता तर त्यात हिंदूत्व, संघ, भाजप वगैरेंना शिव्या आणि महात्म्याच्या ऐवजी सोनीयाच्या ओव्या वाचायला लावल्या असत्या!). आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. शिळी कढी म्हणजे नक्की कोणची?

नसलेले गैरसमज कशाला निस्तरायचे? (लघुतम कथा)

धनंजय ·

धनंजय सेठ, बरं चालू आहे बॉ तुमचं ! : ) कोणाचा तरी झालेला गैरसमज दुर करण्यासाठी सुंदर कथा प्रसंग टाकला रे ! ( ह.घे )
आज अहिंसा दिन आणि ड्राय डे असल्यामुळे बापुंना वाईट वाटेल असे आम्ही काहीही करणार नाही !

सहज Tue, 10/02/2007 - 09:39
नाईस लिटील कथा. लोक स्टिरीओटाइपगीरी करणारच. कारण अफ्टरऑल कोणी महान व्यक्ति म्हणून गेले आहे की "एक लडका और लडकी कभी दोस्त नही बन सकते" :-) The world is yet to grow up! मेरी आधी तस म्हणाली तिला तिचीच विद्या शिकवायची म्हणून टाकलेली रिर्टन सर्व्हीसपण असू शकेल ना? बोलबच्चन मंडळी ऑलवेज गिव्ह बॅक. ;-)

विसोबा खेचर Tue, 10/02/2007 - 10:21
वा धन्याशेठ! मस्त लिहिलं आहेस... 'कामदेवाची ताजी शिकार' हे शब्द फार आवडले..:) तात्या.

मी लगेच तिला वेडावले. "उगाच नसलेला गैरसमज निस्तरण्यासाठी एवढा काय आटापिटा?" तिने माझ्याकडे डोळे वाटारले. आणि आम्ही दोघे एकदम खळखळून हसलो. मी लगेच तिल शहाणावले." मुद्दामून असलेला समज विस्तारण्यासाठी इवलीशी काय सहजता?" तिने माझ्याकडे डोळे वाटारले आणि आम्ही दोघे एकदम खळखळून हसलो. प्रकाश घाटपांडे

सर्किट Tue, 10/02/2007 - 11:19
गूढ विषय... सहज सोपा अनुभव.. विचारात टाकणारा.. सुंदर कथा... (जितकी लघु तितकी वाचनीय..) - सर्किट

जुना अभिजित Wed, 10/03/2007 - 14:20
जगजीतची एक गझल आठवली या विषयावरून.. बेसबब बात बढाने की जरूरत क्या थी हम खफा कब थे मनाने की जरूरत क्या थी.. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

धनंजय Wed, 10/03/2007 - 16:56
रोषणाईच्या दारूचा एक प्रकर आहे. हा 'अनार' जमिनीवर ठेवतात, तो पेटवला की झाडासारखी रोषणाई होते.

In reply to by धनंजय

जुना अभिजित Wed, 10/03/2007 - 17:20
समजला. आम्ही झाड म्हणायचो त्याला. शब्दयोजना अचूक आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

नंदन Wed, 10/03/2007 - 15:51
'लोकापवादो बलवान मतो मे' चे सौम्य रुप दाखवणारी, सहज लघुकथा आवडली. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय Sat, 10/20/2007 - 01:18
रामायणातला लोकापवाद म्हणजे आपण एकदम उत्तरकांडात जातो - रामाने सीतेला टाकली तेव्हा. पण खुद्द राम-लक्ष्मण-सीतांच्या वनवासात सुद्धा थोडासा गमतीदार लोकापवाद प्रसंग झाला, त्याबद्दल हे वाचले-ऐकले : कौन तुम्हारे लागत कुंवर सांवर गोरे सकुची, सुनायो सिया, देवर गोरे मोरे रामरंग सैयां सांवरे अरण्यात लोक सीतेला लक्ष्मणाबद्दल विचारतात की हा तुझा कोण लागतो, तर ती संकोचून त्यांना उत्तर देते, असा तो प्रसंग आहे. नंतरच्या प्रसंगापेक्षा त्या मानाने खूपच हलका-फुलका, नाही का?

देवदत्त Sat, 10/20/2007 - 23:10
इथे नसलेला गैरसमज म्हणता येईल .. तरीही प्रत्यक्षात भरपूर वेळा असेच होत असेल.

लेखनविषय:
लेखनप्रकार
शुक्रवारी संध्याकाळी मेरीचा फोन आला. म्हणे "उद्याची काय गंमत आहे, माहितीए? ते चित्रकार विल्यम ब्राउन आहेत नं? ते आपला स्टूडियो आपल्या चाहत्यांसाठी उघडा ठेवणार आहेत. अरे आपल्याला थोडीच परवडताएत त्यांची चित्रं, पण कलाकारासमक्ष त्यांची कला अनुभवायची काय नामी संधी!" मी म्हटले, "वा, सुंदर!" "पण तुझा मित्र राजेश, बथ्थडासारखा टेनिस खेळायला जातोय म्हणतो." "बयो, राजेश आधी तुझा नवरा, मग माझा मित्र आहे. त्याच्या रुक्षपणाचा जाब मला नको विचारूस." "ए राजेश! आयडिया!" मला फोनवर लोंबकाळत ठेवत ती ओरडली. "तू जा टेनिस खेळायला. मी जाईन स्टूडियोत तुझ्या या मित्राबरोबर.

शेअर्स, म्युच्युअल फंड व इतर

व्यंकट ·

विसोबा खेचर Tue, 10/02/2007 - 07:52
येथे शेअर्स व म्युच्युअल फंडांबद्दल काही माहिती मिळू शकेल काय? येथे आम्ही जमेल तसे (सवडीनुसार) शेअर्सवर माहिती देण्याचा प्रयत्न करू..तो आमचा धंदाच आहे! :) तात्या.

सागर Fri, 10/05/2007 - 17:34
तात्या, सध्या कोणते शेअर्स विकत घेणे फायद्याचे आहे? जेणेकरुन पुढील २-३ महिन्यांत ते विकून फायदा मिळवता येईल तसेच कोणते शेअर्स घेऊन १-२ वर्षांनी विकले तर दुपटीपेक्षा जास्त नफा देतील? चेन्नईच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने २०० कोटी रुपये कमावले त्यातील ६८ कोटी शिर्डीला दान केले अशी बातमी अलिकडेच ऐकली. त्यामुळे मलाही या उद्योगात उडी घ्यावी असे वाटू लागले आहे :) (फाश्ट मनी फॅन) सागर

In reply to by सागर

विसोबा खेचर Mon, 10/08/2007 - 08:35
सध्या मला तरी नव्याने कुठले समभाग खरेदी करावेत असं वाटत नाही. त्यातल्या त्यात दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीकरता १४० च्या आसपास SRF व ८०-८५ च्या आसपास Visaka Industries घेऊन ठेवायला हरकत नाही असे वाटते... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर Mon, 10/08/2007 - 12:33
First Leasing ४५-४६ च्या आसपास, Omax Auto ६४-६५ च्या आसपास, Oriental Bank of Commerce २२२-२२३ च्या आसपास घेऊन ठेवायला हरकत नाही. वर्षभराच्या कालावधीत ३०/४० टक्के परतावा मिळायला हरकत नाही.. आपला, (फण्डामेन्टल एनालिष्ट!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर Wed, 10/10/2007 - 11:04
Oriental Bank of Commerce २२२-२२३ च्या आसपास घेऊन ठेवायला हरकत नाही. OBC घेतले असल्यास आज विकायला हरकत नाही.. २३९ चा भाव सुरू आहे. दोन दिवसात ७/८ टक्के परतावा काही वाईट नाही! :) आम्ही २२२ च्या भावाला घेतले होते, काल २१७ च्या भावालाही घेतले होते ते सर्व आज विकले. च्यामारी पैशे भेटले! आजचा बुधवार मजेत जाईल! :)) अर्थात, OBC ही कुणा टिपर अथवा खबरीलाल तिवारीची टीप नसून आमची स्वतःचीच टीप होती. जे समभाग आम्हाला फंडामेन्टली मजबूत आणि खरेदी करण्याच्या भावाचे वाटतात तेच आम्ही घेतो आणि लोकांनाही घ्यायला सांगतो. 'फलाना लेलो, सौ रुअया बढेगा', 'फलाना लेलो, डबल हो जाएगा' असं सांगणारे पुष्कळ टीपर आम्ही बघितले. त्यांच्या टीपा त्यांनाच मुबारक..! आता 'अभी सेन्सेक्स २०००० जाएगा, २२००० जाएगा' अश्या बातम्या येत आहेत! चांगलं आहे! २२ काय ३०००० सुद्धा जाऊ देत. आम्हाला आनंदच आहे. आम्ही मात्र अशी घातक तेजी जेव्हा संपते तेव्हा लोकांना १५व्या मजल्यावरून उड्या मारताना बघितले आहे! आपला, (अनुभवी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सागर गुरुवार, 10/11/2007 - 17:03
Oriental Bank of Commerce २२२-२२३ च्या आसपास घेऊन ठेवायला हरकत नाही. मनापासून धन्यवाद तात्या, आजच घेतलेत हे शेअर्स. ३०-४० टक्के म्हणजे मोठी कमाई वाट पहायची तयारी आहे माझी (फाश्ट कमाईभक्त) सागर

In reply to by मनिष

सागर Fri, 10/12/2007 - 15:59
मनीष, एकदम सहमत आहे तुमच्या मताशी. आत्ताच इंटरनेटवर पाहीले सेन्सेक्स लुढकला आहे १८७६६ वरुन थेट १८३४६ पर्यंत कोसळला. एकदम ४२० अंकांनी मला तरी असे वाटतेय की सेन्सेक्सचा एवढा आकडा मुद्दाम फुगवलेला आहे. लवकरच सेन्सेक्स १५ ते १६ हजारापर्यंत कोसळेल असे वाटत आहे. बहुतेक दिवाळीपर्यंत ही तेजी राहील. नंतर फुगवलेला फुगवटा फुटेल असे वाटते. मला शेअर बाजारातले फारसे (जवळ जवळ काहीच ) कळत नाही. पण उगाचच मला असे वाटत आहे की असे होईल. कदाचित सिक्स्थ सेन्स का काय म्हणतात ना ते असेल. जाणकारांनी त्यांचे मत दिले तर खूप आनंद होईल कारण माझ्याबरोबर इतर अज्ञानींच्या ज्ञानात भर पडेल :) (शेअरबाजार कोसळायची वाट पाहणारा... ) सागर (...खरेदी करायची आहे ना....)

जुना अभिजित Mon, 10/08/2007 - 13:33
हा लेख पहा http://moneytoday.digitaltoday.in/7-blunders-of-the-mf-world-7.html सातही गोष्टींशी सहमत. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

व्यंकट Tue, 10/09/2007 - 01:13
येत्या काही दिवसात करेक्शन अपेक्षीत आहे का? असल्यास किती? मार्केट पडल्यास कोणते शेअर्स घ्यावेत? सरकार पडल्यास नवी लोकसभा अस्तित्वात येस्तोवर मधल्या काळात अजून मार्केट पडेल काय? तेव्हा गुंतवणूक करावी का ? अश्या काळात म्युच्युअल फंडांच्या स्ट्रॅटजी काय असतात?

सागर गुरुवार, 10/11/2007 - 17:07
म्युच्युअल फंड ही काय भानगड आहे हे कोणी सांगेल का? आणि गॅरंटीड नफा देणारे म्युच्युअल फंड कोणते हे कसे ओळखावे? ते टेम्पल्टन का काय ते फंड मला बोगस फार्सच वाटतात. (म्युच्युअल फंडचा अज्ञानी) सागर

In reply to by मनिष

सागर Fri, 10/12/2007 - 15:45
मनिष, आत्ताच ही माहीती पाहीली. मनापासून धन्यवाद. मी नक्कीच या ३ पैकी एका फंडात गुंतवणूक करेन. पण म्युचुअल फंड ही काय भानगड आहे हे फारसे कळाले नाही. मी याबाबतीत १००% अज्ञानी आहे. एकदम थोडक्यात कल्पना दिलीत तरी चालेल. मनापासून धन्यवाद, - सागर

In reply to by वाटाड्या...

सागर Fri, 10/12/2007 - 15:39
तात्या, आजकाल तशा बर्‍याच ब्रोकर्सच्या वेबसाईट्स आहेत जसे. http://www.hdfcsec.com/ बँकेची असली तरी पण चांगली आहे. खरेदी विक्री करण्यासाठी तसेच http://www.moneycontrol.com/ ही साईट पण चांगली आहे आणि http://www.sharekhan.com/ ही पण मला बरी साईट वाटते याव्यतिरिक्त अजून कोणाला माहीत असेल तर मला पण माहिती करुन घेण्यात रस आहे (मायाजालावरच्या शेअर्सखरेदीच्या मोहात अडकलेला) सागर

In reply to by सागर

सृष्टीलावण्या Mon, 03/24/2008 - 21:55
शहाणे असाल तर कोटकच्या वाटेला पण जाऊ नका. त्यापेक्षा सुरीने स्वत:चे नाक कापून घेणे सुद्धा परवडले... त्यावरचा आंतरजालीय व्यापार तर भीषणच. ती साईट एक दिवसही धड-भली चालत नाही. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

धोंडोपंत Mon, 10/15/2007 - 10:35
युनिटेक, जी एम आर इन्फ्रा, पुंज लॉईड या तीन कंपन्यांचे समभाग आता घ्या. हो आत्ताच. याच इंडेक्सला. आणि दिड पावणेदोन वर्षात दुप्पट पैसे झाले की आम्हाला स्कॉचने अभिषेक करा. जोक्स अपार्ट. पण युनिटेक, जी एम आर इन्फ्रा आणि पुंज लॉईड यातील गुंतवणूक किमान ५० ते ७५ % परतावा एका वर्षात करेल. आपला, (माहितगार) धोंडोपंत आम्हीही त्या सॉफ्टवेअर इंजिनीयर सारखे पैसे कमावले असते पण काय सांगणार?????? इश्क़ ने निकम्मा कर दिया 'ग़ालिब' वर्ना हम भी आदमी थे कुछ कामके || आपला, (छंदीफंदी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मित्रहो, येथे शेअर्स व म्युच्युअल फंडांबद्दल काही माहिती मिळू शकेल काय? म्युच्युअल फंड चे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते काय आहेत? कशात उत्तम रिटर्न्स मिळतात? सध्या कोणते फंडस गुंतवणुकीस चांगले आहेत? पगारातून खर्च वजा जाता, वर्षाला शिल्लक पडणार्‍या रकमे पैकी किती टक्के गुंतवणूक स्थावर जमिन, घर, सोने, स्टॉक्स, म्युच्युअल फंड, इंश्युरंस, सरकारी बाँड वैगेरे मध्ये प्रत्येकी करावी? व्यंकट

लोहगड विसापूर प्रकाशचित्रे

जुना अभिजित ·

धनंजय Mon, 10/01/2007 - 19:21
सगळीच चित्रे ए-वन भिंतीवर टांगण्यासारखी आहेत. एक खास म्हणजे खासच लक्षात राहील ते पिवळ्या फुलांना मुख्यभागात घेऊन विंचूकाट्याला पार्श्वभूमीत टाकलेले. एखादी बाब ओझरत्या धूसर उल्लेखाने अधिक ठसा उमटवते, ही छायाचित्रातली शुद्ध कविता आहे, कविता. ते रोडक्या गुराचे चित्र काहीही गाजावाजा न करता मोठी गोष्ट सांगून जाते. आता गप्प बसतो, कारण एकेका चित्राची प्रशंसा करायला लागलो तर मिसळपावाचे मेगाबाईट संपतील.

In reply to by धनंजय

आजानुकर्ण Mon, 10/01/2007 - 20:32
त्या चित्राचा विशेष उल्लेख मीदेखील केला होता. :) सर्व चित्रे सुंदर आली आहेत. लोहगडाच्या मानाने विसापूर अधिक रांगडा आणि अवघड आहे. लोहगडावर मंदिर, दरवाजे, गुहा वगैरे बांधकामे जास्त तर विसापूरची तटबंदी अप्रतिम आहे. पेशव्यांच्या काळात लोहगड हा लुटलेल्या खजिन्याचे कोठार तर विसापूर हा कैदखाना होता असे कळले. मीदेखील स्वतंत्रपणे गणेशविसर्जनाच्या दिवशी जाऊन आलो. अभिजितने लिहिले नाही तर माझे लिखाण सहन करावे लागेल.

In reply to by धनंजय

सर्किट Mon, 10/01/2007 - 21:43
ते चित्र (पिवळी फुले) खरंच सुंदर आहे. प्रचंड आवडले. - (आनंदित) सर्किट

प्रियाली Mon, 10/01/2007 - 19:59
फोटो मस्त आहेत पण जरा लेख लिहा की वेळ मिळाला की. फोटोंची वर्णनेही तेवढीच मस्त असतील असे वाटते. ;-)

विसोबा खेचर Tue, 10/02/2007 - 08:14
अभिजिता, अतिशय सुरेख चित्रे आहेत. क्या बात है..'फुलराणी इथेच तर नसेल ना खेळत.' या चित्राने तर मन वेडावून टाकलं. ढगाळलेल्या सूर्याचं चित्रंही मस्त! घनमेघांनी भास्कररावांची प्रखरता साफ निष्प्रभ करून टाकली आहे! :) कार्यबाहुल्यामुळे लेख लिहीता येत नाहिये. पण तोपर्यंत ह्या प्रकाशचित्रांवर नजर फिरवा. लेखाचीही वाट पाहात आहे रे अभिजिता! लोहगडाच्या पायथ्याशी भाजे गावात कडक मिसळ खाऊन आलेला अभिजित. आहाहा! हे वाचून मात्र तुझा हेवा वाटला रे अभिजिता!:) तात्या.

चित्रा Tue, 10/02/2007 - 09:52
फुलांची प्रकाशचित्रे चांगलीच आहेत पण गडाच्या भिंतीची चित्रे जास्तीच आवडली. लेखही लिहा लवकरच.

स्वाती दिनेश Tue, 10/02/2007 - 13:03
कितीतरी वर्षांपूर्वी केलेल्या लोहगड,कार्ले भाजे च्या ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या,सुंदर चित्रे! सवड मिळाली की लेख टाकाच ! स्वाती

जुना अभिजित Wed, 10/03/2007 - 09:42
अजून हातपाय दुखायचे थांबले नाहीत तोवर लेख लिहून घेतो. :-) सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल धन्यवाद. लोहगडाच्या पायथ्याशी भाजे गावात कडक मिसळ खाऊन आलेला अभिजित.

ध्रुव Wed, 10/03/2007 - 11:53
मस्त छायाचित्रे!! पुढे फुले आणि मागे विंचूकाटा छानच आहे. लोणावळ्याजवळचा परिसर वेगवेगळ्या किल्ल्यांनी नटलेला आहे. प्रत्येक किल्ला काहीतरी वेगळेपण दाखवतो. फुले आणि हिरवाईने नटलेला हा भाग आपली एक वेगळीच आठ्वण ठेवून जातो.येथील काही किल्ले (लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, घनगड, राजमाची, तैल-बैला, कोराई, नागफणी) माझे करून झाले आहेत. काही राहीलेले (ढाक, मोरगिरी) आहेत ते करायला कोणी येत असेल तर कळवावे, कधीतरी जाउ. जमेल तेव्हा लिहायचा प्रयत्नही करीन. तोपर्यंत टाटा ध्रुव

जुना अभिजित Wed, 10/03/2007 - 17:50
http://picasaweb.google.com/abhijit.yadav/KilleLohgad/photo#5088015881608025874 हे चित्र मोठे करून पाहिल्यास बरीच माहिती मिळेल. रविवारी फक्त मिसळ मिळते अशा श्री मिसळ नारायण पेठ येथे नियमित मिसळ खाणारा अभिजित

कालच्या रविवारी लोहगड आणि विसापूर किल्ल्यांवर जाऊन आलो. लोणावळ्याजवळ मळवली ठेसन आहे तिथून जवळच आहेत हे किल्ले. कार्यबाहुल्यामुळे लेख लिहीता येत नाहिये. पण तोपर्यंत ह्या प्रकाशचित्रांवर नजर फिरवा. लोहगड-विसापूर इतर माहिती इथेच प्रतिसादांमध्ये येईल हळू हळू. लोहगडाच्या पायथ्याशी भाजे गावात कडक मिसळ खाऊन आलेला अभिजित.

कसं शोधायचं?

माधवी ·

माधवी Mon, 10/01/2007 - 15:00
गुगलून पाहिलय. पण मला मी ज्या ज्या साईट्सला भेट देते त्या त्या साईट्स ची माहिती सापडते. पण जो लॉग तयार होतो त्या लॉगला कसं शोधायचं आणि डिकोड करायचं याची माहिती हवी आहे.

दिगम्भा Mon, 10/01/2007 - 15:36
हा लॉग "हिस्टरी" नावाच्या प्रकाराच्या सहाय्याने पहाता येतो. आपण इंटरनेट एक्स्प्लोरर वापरत असल्यास कंट्रोल्+एच दाबा (किंवा मेनूमधून व्ह्यू - एक्स्प्लोरर बार - हिस्टरी) , म्हणजे हिस्टरी शीर्षकाचा उभा रकाना डावीकडे उघडेल त्यामध्ये आपल्या संगणकावरील हा अहवाल दिसतो. याचा वापर करून एक तर आपण लहान मुले जालावरची कुठली कुठली पाने पहात आहेत ते पाहू शकता किंवा आपण कुठली पाने पाहिली ते इतर कोणी पाहू शकते. अर्थात या नोंदी खोडून टाकण्याची सोयदेखील आहे. त्यासाठी टूल्स - इंटरनेट - ऑप्शन्स - जनरल येथे जाऊन हिस्टरी किंवा तात्पुरत्या बनलेल्या फाइल्स काढून टाकता येतात. सर्व सोयी आहेत, उपयोग किंवा दुरुपयोग करणे आपल्यावर आहे. - दिगम्भा

'मला उत्तर हवय ' या मोहन आपटे लिखित साखळीतील संगणक हा विषय असलेले पुस्तक घ्या. उपयुक्त माहिती आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर Tue, 10/02/2007 - 07:58
'मला उत्तर हवय ' या मोहन आपटे लिखित साखळीतील संगणक हा विषय असलेले पुस्तक घ्या. उपयुक्त माहिती आहे. थोडक्यात काय, तर 'दमड्या खर्च करा म्हणजे बरीच उत्तरं मिळतील!' असं प्रकाशरावांना सुचवायचं आहे बरं का माधवीजी! :) तात्या.

मराठीत या विषयावर दिपक शिकारपूर, अच्यूत गोडबोले, माधव शिरवळकर यांची पुस्तके उपयुक्त आहेत इथे पण माधव शिरवळ्कर प्रश्नोत्तर रुपात भेटतील. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

यन्ना _रास्कला Mon, 06/08/2009 - 09:43
दिली म्हनुन घाट्पान्डे सायबाला धन्य्वाद. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

गुंडोपंत Tue, 10/02/2007 - 09:00
पुर्वी विन९८ मध्ये आय इ (इन्टरनेट एक्सप्लोरर) सी ड्राईव्ह वर सिस्टीम्स की प्रोग्राम्स फोल्डर मध्ये एक टेम्प नावाचे फोल्डर बनवत असे. त्यातल्या अगम्य नावांच्या इतर फोल्डर्स मध्ये हे सेव्ह होत असे. आजही एक्स पी मध्ये ते टेम्प फोल्डर बनते पण ते आता जास्त लपवलेले आहे असे वाटते. चटकन सापडत नाही. मला तरी नाही सापडले. पण शांतपणे शोध घेतल्यास या फाईल्स नक्की सापडू शकतात. गुगल च्या प्रॉडक्टस वर विश्वास असेल तर, गुगल डेस्कटॉप सर्च वापरूनही या फाईल्स शोधता येवू शकतील असे वाटते. इतरही अशी सर्च टूल्स नेटवर शोध्ल्यास सापडतील असे वाटते. आशा आहे या माहीतीचा उपयोग होईल. आपला गुंडोपंत

आपण आपल्या संगणकावरून ज्या ज्या वेगळ्या वेगळ्या वेबसाईट्स पाहतो, कधी मित्र मैत्रिणींशी वेगवेगळ्या माध्यमाद्वारे चॅट करतो. या सगळ्या गोष्टींचा विदा (डेटा) संगणकावर साठवला जातो. हा डेटा कसा शोधता येतो? याची माहिती कोणी संगणक शास्त्री येथे असतील तर देतील का?

मुक्काम पोष्ट बेजींग

कोलबेर ·

गुंडोपंत Mon, 10/01/2007 - 09:34
छोटाच पण मस्त लेख! आवडला.. चिंग मिंग राजघराण्यांचे "चंगु मंगु" हे रुपांतर तर लैच भारी! बाकी विंचुच्या फोटोत विंचू दिसत नाहीयेत... सी हॉर्स वाटले! (माझ्या चष्म्याचा परिणाम म्हणू का;)) ) इथल्या सामान्या माणसांवर, त्यांचे आयुष्य यावर अजून एक भाग आला तरी चालेल असे वाटले! शिवाय जुन्या बिजींग शहराविषयी, परंपरां विषयी वाचायला आवडेल. आपला गुंडोपंत चीनी ज्योतिष शास्त्राविषयीपण प्रचंड कुतुहल आहे. (माहीती मिळाल्यास कळवा!)

In reply to by गुंडोपंत

कोलबेर Mon, 10/01/2007 - 09:45
>>बाकी विंचुच्या फोटोत विंचू दिसत नाहीयेत... सी हॉर्स वाटले! अहो ते दोन्ही बाजूला काडीवर एकएकटे बसले आहेत ते सी हॉर्स आहेत पण त्यांच्या मधल्या काड्यांवर विंचू आहेत. >>इथल्या सामान्या माणसांवर, त्यांचे आयुष्य यावर अजून एक भाग आला तरी चालेल असे वाटले! फारच धावता दौरा होता हो त्यामूळे काही फारशी माहिती मिळाली नाही. प्रतिसादा बद्दल धन्यवाद!!

In reply to by कोलबेर

राजे Fri, 10/05/2007 - 19:52
वा ... क्या बात है... बस अजून काय हवे डिश मध्ये... ह्म्म्म एका झुरळाची कमी आहे पण त्या अळ्या ते काम पुर्ण करतीलच. काय कोलबेर साहेब एकटे एकटेच डिशवर ताव मारता होय... आम्हाला ही थोडी टेस्ट घेऊ द्या.. आम्ही ही सांग्गू की आमच्या येणा-या मुलाबाळांना की आम्ही काय काय खल्ले ते ;} राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

सहज Mon, 10/01/2007 - 09:54
छायाचित्रे असली की कसा सूंदर दिसतो लेख. मस्तच. तुमच्या "स्टीम बोटचा" (हॉट पॉट) पण एक टाकायचा की फोटो. हे कच्चे मास साठी "शेजवान" सॉस मागायचा की भलेभले गारद होतात त्या तिखट तर्री पूढे. पूढच्यावेळि स्टीमबोट कम हॉट प्लेट मागा. मग विंचू चावला की नाही? माझा एक चायनीज मित्र म्हणतो, जे हालचाल करतय, श्वास घेतय ते सगळ आम्ही (चायनीज ) खातो. :-) अवांतर ह्या नव्या बिजींगच्या जरा बाजूला गेले की दिसते भकास, बकाल वस्ती. जागतीककरणाच्या रेट्यात त्यांची वस्ती शहराच्या बाहेर टाकली आहे. पण तसेच व्हायला पाहीजे म्हणा. टोलेजंग इमारती च्या मधेच झोपड्या कसे कोण चालून घेईल बघा अगदी माओवादी देखील नाही. ते चालवून घेणारे फक्त मतलालची समाजवादीच.

In reply to by सहज

गुंडोपंत Mon, 10/01/2007 - 09:57
ते चालवून घेणारे फक्त मतलालची समाजवादीच. ही भारीच पिंक दिली टाकुन सहजराव!! आता अचानक समाजवाद्यांवर का घसरलात? (तुम्हाला ही वस्ती नकोशी वाटते ते ठीक हो... पण आपणच जेव्हा त्या वस्तीत असतो तर मग काय ?) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

कोलबेर Mon, 10/01/2007 - 23:06
हु टाँग असे इथल्या गल्ली बोळांना म्हणतात. सहजराव म्हणता आहेत तशी झोपडपट्टी बादालिंगला जाताना पहायला मिळाली. आमच्या ड्रायवर ने शॉर्ट कट मारण्यासाठी गाडी अश्या बोळांमधून काढली आणि रस्त्यावरचे खड्डे त्यात साचलेले पाणी असा प्रकार देखिल पहायला मिळाला. ह्या हु टाँग मधून सायकल रिक्षातून फिरवणार्‍या काही खास टूर्स देखिल असतात. अरूंद रस्ते असल्यामूळे मोठ्या गाड्या जाऊ शकत नाहीत पण सायकल रिक्षा सहज जाते आणि आरामात रमत गमत जुने बेजींग बघायला मिळते. आमची ही सफर देखिल हुकलीच. :-(

सर्किट Mon, 10/01/2007 - 10:06
ह्यापूर्वी आमचे मित्र खिरे ह्यांनी शांघाईची अंगडाई हा चीनचा परिचय करून देणारा आणि एका क्रांतिकार्‍याने चीनचे अतिरंजित वर्णन करणारा लेख लिहिला होता. त्यापेक्षा ही लेखमाला वास्तववादी व्हावी हीच अपेक्षा. - सर्किट त्से तुंग

'अमुक तमुक ह्यांचे ९२व्या वर्षी निधन झाल्याने आज शाळा भरणार नाही' अशी 'सुचना' दिल्यावर आमच्या मनाची जी स्थिती व्हायची पुन्हा एकदा अगदी तशीच झाली च्यामारी एकेकाळी कदाचित आपल्या पेक्षा दरिद्री असलेल्या ह्या देशात फिरताना पण आता 'फारिन' ला आल्यासारखेच वाटत होते. पण नुसत्या फॉरबिदन सिटीतच ५६ वेळा हा उल्लेख झाल्यावर मात्र आम्ही ह्या चंगू-मंगुचा नाद सोडून दिला. भारीच सफर घडवून आणलीत पुर्वी त्याला पेकींग म्हणायचे ना! कलकत्त्याला कोलकता, मद्रास ला चेन्नई, सिलोनला श्रीलंका अन ते सयामला का काय हो पुलंच्य पुर्वरंग मध्ये आहे? प्रकाश घाटपांडे

नंदन Mon, 10/01/2007 - 14:11
लेख आणि चित्रे आवडली. चिनी खाण्याविषयी जमला तर एखादा लेख नक्की लिहा. चिंग-मिंग बरोबर कुंग (पाओ) सुद्धा येऊ देत :) बाकी, तिआनामेन स्क्वेअर बद्दल वाचून टाइम मासिकाने 'अननोन रेबेल' म्हणून विसाव्या शतकातील शंभर सर्वोत्कृष्ट छायाचित्रांत समाविष्ट केलेले हे छायाचित्र आठवले. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

सर्किट Mon, 10/01/2007 - 21:48
चीन मध्ये आता मिसळपाववर बंदी येणार. पण खरंच, हे चित्र लोकशाही च्या कठीण वाटेची खातरजमा करणारे आहे. हे चित्र पाहून मला "उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया" ह्या ओळी आठवतात. (ता. क. ह्या रिबेलची चीनच्या तुरुंगात सरकारने हत्या केली.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Mon, 10/01/2007 - 23:09
..चीनमध्ये ब्लॉगस ब्लॉक केलेलेच आहेत. इतकेच नव्हे तर विकिपीडिया देखिल उघडता येत नाही...अहो जिथे तुम्हाला मुलं किती हवीत देखिल सरकर ठरवणार तिथे विकिपीडियाची तक्रार कोण करणार? :-)

प्रियाली Mon, 10/01/2007 - 23:43
लेख वाचायला थोडा उशीर झाला वाटतं. >> मी आपलं सरळ भरपूर शेंगदाणे घालून केलेला चिकनवर ताव मारल अमेरिकेत कंग-पाओ चिकन म्हणून शेंगदाणे घातलेले चिकन मिळते अर्थात, अमेरिकन चायनीज हा एक भारतीय चायनीजसारखा "अस्सल" प्रकार असावा. चीनमध्ये मिळणे कठिणच असावे. >>पण ह्या फॉरबिडन सिटीच्या मागे असलेली 'एंप्रेस गार्डन' मात्र भारी आहे हा. अशा ठिकाणांचा इतिहास नाही तरी विशेष तरी सांगा. फॉरबिडन सिटीचा लावलेला फोटो पाहताना शांघाई नाईट्सची आठवण झाली. अवांतरः >>तिथे फारच (अजानुकर्ण टाईप) हौशी असाल तरच पायी चढून जावे अन्यथा डायरेक्ट भिंतीवर नेऊन बसवणारी केबल कार आहे. अजानुकर्ण बहुधा भिंतीवर पायी चढून जातील. ;-)

विसोबा खेचर Tue, 10/02/2007 - 07:50
उत्तम लेख.. तुझी लेखणी झकास सुरू आहे. औरभी लिख्खो..चित्रंही छान आहेत.. नंदन म्हणतो तसं चिनी खाण्यावर येऊ द्या काहीतरी! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चित्रा Tue, 10/02/2007 - 10:19
तुझी लेखणी झकास सुरू आहे. औरभी लिख्खो..चित्रंही छान आहेत.. नंदन म्हणतो तसं चिनी खाण्यावर येऊ द्या काहीतरी! :) चांगले चाललेय. लिहीत रहा.

बेसनलाडू Tue, 10/02/2007 - 08:49
वर्णन आवडले. बेजिंगची सफरच घडली. चित्रेही मस्त. खाण्यावरील लेखाबद्दल नंदनशी सहमत आहे. लिहाच! एक शंका - "फॉर्बिडन सिटी" हे नाव कसे पडले, याबद्दल काही माहिती मिळाली का? (जिज्ञासू)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

कोलबेर Tue, 10/02/2007 - 21:37
साधारण १९२० पर्यंत फॉरबिडन सिटीत सामन्य माणसाला प्रवेश प्रतिबंधीत होता. ७२० चौ.मि. चा परिसर म्हणजे जणू एक गावच आणि त्यात राजा राणी, राजाची अंगवस्त्रे आणि हिजडे ह्या खेरिज कुणालाही आत प्रवेश नसल्याने ह्याचे नाव 'फॉरबिडन सिटी'. सामान्य जनतेच्या अतोनात पिळवणुकीला वैतागुन अखेर गावकर्‍यांनी बंड केले. उत्तरेकडून आलेल्या त्यांच्या फौजांनी (पेसंट अपरायजींग) फॉरबिडन सिटीवर कब्जा केला आणि सात आठशे वर्षे बंद असलेली फॉरबिडन सिटीची दारे उघडली.

राजे Tue, 10/02/2007 - 23:52
मस्तच. अजून काही अनूभव लिहला लवकर. राजे (*हेच राज जैन आहेत)

मीनल Sun, 02/24/2008 - 03:44
अहो काय काय म्हणून सांगू .?मी तिथे ५ वर्ष राहिले आहे.मी १० -१२ लेख सकाळ मधे लिहिले आहेत. आता अमेरिकेत आल्यावरही मी ते आयुष्य विसरणार नाही . विचारा का काय ते.जमल तर उत्तर देते.

In reply to by मीनल

अहो जे काही चांगले वाईट अनुभव असतील ते बिनधास्त लिहा. आता बघा कसे आहे, आलम दुनियेला आकर्षण असलेली अमेरीका मला मात्र फारशी भावली नाही मनाला. तसे ते त्या बिजींग मधे जे काही चांगले वाईट असेल ते मि.पा.कराना कळवा. पुण्याचे पेशवे

चतुरंग Sun, 02/24/2008 - 10:19
छोटेखानी, सुंदर सफर घडवलीत. प्रकाशचित्रेही सुंदर. तिथे म्हणे जिवंत साप तुमच्यासमोर सोलून लगेच फ्राय करुन देतात असं काही मिळालं का पहायला? चतुरंग

सुधीर कांदळकर Sun, 02/24/2008 - 10:43
'भरले मांजर' अथवा 'पीठ पेरलेली डासांची अंडी' ही कल्पना सुरेख. बेजींग शहर हे कांद्या सारखे अनेक पापुद्र्यांनी बनलेले आहे. अतिभव्य तिआन्नमेन चौक हा त्याच्या मध्याभगी असून त्याच्या भोवतीचे पापुद्रे म्हणजे अनेक वर्तुळाकार 'रिंगरोड' आहेत. हे वर्णन छान. चंगूमंगू हि कल्पना तर अफलातून. पुढील भाग लौकर येऊ द्यात.

शिकागो एअरपोर्टचे युनायटेड एअरलाइन्सचे टर्मिनल. आम्हा पाच जणांचा कंपू बेजींगच्या नॉनस्टॉप फ्लाइटच्या प्रतीक्षेत. इतक्यात सर्व प्रवाश्यांना रांगेत उभे करून त्यांच्या व्हिसाची तपासणी सुरू केली.

कोकणचा सुपुत्र हरवला..

विसोबा खेचर ·

सहज Mon, 10/01/2007 - 08:09
मला मालवणी/कोंकणी समजत नसून टीव्हीवर मच्छिंद्र कांबळी यांचा कार्यक्रम मात्र आवडीने बघायचो. तसे लवकरच गेले म्हणून जास्त वाईट वाटते आहे. इथे भरपूर दु:ख असताना देखील परमेश्वर लोकांना रमवणार्‍या मंडळींना का बरे लवकर नेतो? देवालापणा दु:ख आहेत वाटते. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

राजे Mon, 10/01/2007 - 08:17
विनम्र आदरांजली! परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. राजे (*हेच राज जैन आहेत)

मालवणी नाटकाचो बादशाहो गेलो...! या बातमीने जरा धक्काच बसला ! मालवणी रंगभुमी आणि भाषा म्हटले की, मच्छिंद्र कांबळीच आठवतात ! कोकणच्या पुत्राला आमची विनम्र आदरांजली !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Mon, 10/01/2007 - 08:25
आत्ता ही बातमी वाचली आणि धक्का बसला... माझ्याकडूनही विनम्र आदरांजली.

प्रमोद देव Mon, 10/01/2007 - 08:28
मालवणी भाषा ही अतिशय गोड भाषा आहे आणि तिचा लहेजाही तितकाच चित्तवेधक आहे. मला ही भाषा तितकीशी कळत नसली तरी तिची ओळख मात्र "वस्त्रहरण" पासूनच झाली आणि ऐकायला खूप आवडते.. मच्छींद्र कांबळींना माझीही आदरांजली. नंदनला एक विनंती की त्याने मालवणी भाषेत ह्या "तात्या सरपंचाला(मच्छींद्र कांबळींना)" एक छानसा लेख लिहून श्रद्धांजली वाहावी.

In reply to by प्रमोद देव

नंदन Mon, 10/01/2007 - 14:18
मच्छिंद्र कांबळींना माझीही विनम्र श्रद्धांजली. धनंजयरावांनी म्हटल्याप्रमाणे मालवणीच्या कक्षा महाराष्ट्रात आणि राज्याबाहेरही रुंदावण्याचे काम त्यांच्या नाटकांनी केले. पटकथांत विशेष दम नसलेली अनेक नाटकेही त्यांनी आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने पेलून धरली होती. (प्रमोदकाका, एखादा लेख लिहिण्याइतपत माझ्याकडे खरंच माहिती नाही. एखाद्या वृत्तपत्रीय लेखाच्या अनुवादाचा प्रयत्न करतो.) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय Mon, 10/01/2007 - 08:33
मालवण नागपुरापर्यंत नेणारा गुणी कलाकार! एकसष्ट म्हणजे किती लहान वय हे. प्रथमावताराच्या प्रत्येक घासाबरोबर मच्छिंद्र आमच्या आठवणीत राहातील.

In reply to by धनंजय

सर्किट Mon, 10/01/2007 - 10:02
मालवण नागपुरापर्यंत नेणारा गुणी कलाकार! अगदी अचूक बोललात धनंजय ! फार्स ची व्याख्या म्हणून वस्त्रहरणाकडे बोट दाखवता येईल. यदाकदाचित हे कालपरवाचे हिट नाटक हिट का झाले याचा खुलासा वस्त्रहरणातून होतो. - (दु:खी) सर्किट

गुंडोपंत Mon, 10/01/2007 - 09:38
मोठा धक्का बसला! त्यांच्या जीवनकार्यावर येथे जाणकारांकडून एक सविस्तर लेख येईल ही अपेक्षा. आपला गुंडोपंत

माधवी Mon, 10/01/2007 - 14:48
मच्छिंद्र कांबळींना माझी आदरांजली. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

जेष्ठ रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी यांना मिसळपाव परिवारार्फे विनम्र आदरांजली! आमच्या कोकणचा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र हरवला! तात्या.

निवडणूका, फिल्डींग लावणे, लोकप्रिय (लेखक) बनणे इत्यादी

सहज ·

स्वाती दिनेश Sun, 09/30/2007 - 19:17
(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे) हे मस्तच! निवडणूकीचा धुरळा उडवायला सुरूवातच केलीत की! आता तात्याला लवकरच निवडणुका घ्याव्या लागणार? सल्ला मागायला हवा आता तुमच्या 'सहज कन्सलचंट'कडे..:) स्वाती

विकास Sun, 09/30/2007 - 20:12
सहजराव, हा ही लेख मस्त आहे. एक अजून कल्पना: इच्छूक उमेदवारांची "वादविवाद" स्पर्धा ठेवली पाहीजे. त्यात मधे डेमोक्रॅट्स ना जसे यूट्यूब वरून प्रश्न विचारले गेले तसे किंवा कसेतरी प्रश्न विचारले गेले पाहीजेत. त्यात परराष्ट्रीय धोरणचर्चेत इतर संकेत स्थळांशी कसे संबंध ठेवले जातील, कोण कोणाचा (शोधून पण न मिळणारा)बिन लॅडन, कोण कुणाचा मोहम्मद अहमदेनीजाद आहे - थोडक्यात घरातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला बाहेर कोणाला झोडपणार आहे - ते पण कळणे महत्वाचे वाटते!

सहजराव ! तुम्हाला काय सुचेल त्याचा काय नेम राहिलेला नाही. एक तर निवडणूकीचा विषय काढून तुम्ही थेट मुद्यालाच हात घातला. लवकर म्हणजे आठ एक दिवसात निवडणूक आयोगाने अधिसुचना जाहिर केली पाहिजे,असे आम्हासही वाटू लागले आहे ! इच्छूक पॅनेलप्रमुखांनी आपले चार उमेदवार जाहिर करावे आणि आपला मिसळपावचा जाहिरनामा जाहिर करावा, बाकी मतदारराजांसाठी काय काय करावे तुम्ही सांगितले असल्यामुळे मतदारांकडे उमेदवार मोठ्या आशाळभूत नजरेने पाहात असेल.सहजराव, आपले लेखन आणि आपले लेखन कौशल्य संकेतस्थळावरील काही क्षण आनंदात घालवतात हे मात्र नक्की ! आपण असेच लिहित राहा, काही प्रसंग वाचून मात्र ह्सून हसून पुरेवाट झाली बॉ ! जसे ''लोक म्हणतात तो मुर्श्ररफपण असेच करतो पण सूत्र मात्र......अबे चूप, निवडणूक आयोग काम करतोय. जरा दम धराल की नाय..'' अवांतर ;) सामान्यजन म्हणून जगण्याचा आमचा हक्क आम्ही कोणाला हिरावू देणार नाही ! क्या बात है !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्किट Mon, 10/01/2007 - 10:12
निवडणुकीची अधिसूचना लवकरच जाहिर केली जाईल. तोवर पंचायत समितीला वेगवेगळे नियम करण्याचा हक्क असेल. त्यानंतर तो हक्क निवडणुकीपर्यंत रद्द करण्यात येईल. - (टी. एन.) सर्किट शेषन

विसोबा खेचर Mon, 10/01/2007 - 00:00
च्यायला इथे राज्यसभा असती तर काय मजा आली असती, फक्त अंगभूत हुशारीवर सन्माननीय सदस्य म्हणून वर्णी लागली असती ह्म्म! चांगली कल्पना आहे. पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या तरी त्यानंतर पंचायतीला विश्वासात घेऊन एखाद दोन सन्माननीय सदस्यांची नेमणूक करायला हरकत नाही! :) ५) भोकराचे लोणचे किंवा असेच विस्मरणात गेलेले पदार्थ ताबडतोब आपल्या आई, आज्जी यांना विचारून काढा व वरचेवर उल्लेख करत रहा. म्हणजे जी नॉस्टेलजीक मतदारपेठ आहे ती तुमचीच समजा. मिलिंदा, ऐकतो आहेस ना? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Mon, 10/01/2007 - 10:14
मिलिंदा, ऐकतो आहेस ना? :) ऐकतोय तात्या ! निवडणुक आयोगाला दिलेले टोमणे सहन करण्यात येणार नाहीत. पण एनीवे, भोकराचे लोणचे काही छचोर लोकांना "विस्मरणात गेलेले पदार्थ" वाटत असतील. आम्ही ते रोजच खातो. विस्मरणात कसे जाईल ? - (निवडणुक आयुक्त) सर्किट

राजे Mon, 10/01/2007 - 01:17
सहज राव काय सहज पणे लिहता हो.... " संगणकदुरूस्ती करा, लोकांची काशी, गंगासफर करवा, बाबाजींची प्रवचन करा" ;} मस्त. कधी जिवनामध्ये विचार केला नव्हता ही असे देखील कधी वाचावे लागेल ह्यांची . खरोखर कमाल केलीत तुम्ही आज. एकदम शतक ? क्या बात है ? खरोखर. * जबरा... ह्यांचे अधिकार भोमेकाकांच्याकडे राखीव आहेत ह्यांची नोंद घ्यावी. राजे (*हेच राज जैन आहेत व ह्यांचा दुसरा कोणताही आई डी नाही आहे ह्याची खात्रीच आहे, खात्री नसेल तर नसेल तर साब को पुछो ..)

सहज Mon, 10/01/2007 - 07:49
आभार आभार त्रिवार आभार! स्वातीताई दिनेशराव - बाकी अस जॉइंट अकाऊंट मतदानाला उपयोगी नाही तुमचे "एकमत" असले तरी तरी तुम्ही २ मताधीकारी असून एक अकाऊंट एक मत होते. लवकरात लवकर दिनेश स्वाती असे अकाऊंट काढावे. जर का दिनेश असे खाते असेल तर ते रहीत करून दिनेश स्वाती करायलाच लावावे. स्त्रीवाद ताजा आहे म्हणून थोडे ऍडीशनल स्वगत :- (प्लीज झेला जरा) आपल्या नावापूढे नवर्‍याचेही (लग्न झाले नसल्यास तात्याच्या भाषेत "आवडते पुरूष"चे) नाव लावणार्‍या अनेक असतील पण आपल्या नावापूढे बायकोचीही नाव लावणारे पुरूष आहेत का? (टाळ्या) विकासराव खरे आहे ह्या निवडणूकीच्या एकेका घटकावर असेच लेख लिहता येतील. तुम्ही पण बघा काय जमते का? पण तुम्ही सत्ताधारीतले घटकपक्ष आहात तेव्हा आचारसंहीता भंग होणार नाही त्याची काळजी घ्या. प्रा.डॉ.सर तुमचे कौतुक असे चविष्ट आहे की केवळ त्याकरता लिहावे असे वाटते, जसे आज्जीने रेवडी, सुकामेवा, लेमनची गोळी द्यावी म्हणून तिला स्तोत्र, कवीता, ए,बी,सी, डी. म्हणून दाखवावे तसे आमचे होते आता. खेचरजी - म्हणजे ज्याची खेचायला मजा येते असे जी, आमच्या बाललीला सहन करता म्हणून तुम्ही आमचे आवडते काका! राजेसाब - आता कॉलनीत नाटक बसवले तर भूमीका करणारे कॉलनीतलेच ना म्हणून तुम्हीपण आलात. अफ्टरऑल हम पंछी एक डाल के खरे की नाही महाराज?) पंत - फायलींचा निचरा काढल्यावरच सर्फींग करायचे बर का? :-) तुमच्या डोळ्याला त्रास होतो म्हणून आधीच कमी काम करू देत आहोत. ---------------------------------------------------------------------------------------- मी पक्षःपाती नाही. मी भेदभाव करत नाही. मी तुम्हा सर्वांचा समानतेने तिरस्कार करतो.

In reply to by सहज

स्वाती दिनेश Mon, 10/01/2007 - 12:22
सहजराव,दिनेश चा वेगळा अकाऊंट मि पा वर आहे हो, तेव्हा २ मतांची काळजी नको,त्या तिथे पलिकडे,मनोगतावर जेव्हा अकाऊंट उघडला तेव्हा दुसरी कोणी एक स्वाती असल्याने मला स्वाती पुढे दिनेश लावावे लागले,मग आता तेच नाव जालावर घेतले.(सारखे आय डी बदला बिदला नाही हो झेपत!:)) आणि आपल्या नावापुढे बायकोचे नाव लावणारे काही आय डी आहेत त्या तिथे पलिकडे,ती मंडळी मिपावर आली आहेत की नाही हे माहित नाही बॉ.. स्वाती

कोलबेर Mon, 10/01/2007 - 09:16
सहजराव, हा लेख म्हणजे तुमचेपण कँपेनींग समजायचे काय? 'कार्ल रोव्ह' आणि 'भोकराचे लोणचे' हे खासच!! :-)

In reply to by कोलबेर

सहज Mon, 10/01/2007 - 09:18
वाचली नाही का? निवडणूकीत, नेमणूकीत आम्हाला रस नाही. सामान्यजन म्हणून जगण्याचा आमचा हक्क आम्ही कोणाला हिरावू देणार नाही.

यनावाला Mon, 10/01/2007 - 14:26
( ही प्रतिक्रिया केवळ एकाच वाक्याविषयी आहे. लेखातील आशयासंदर्भात नाही.) ................................................................................... श्री.सहज लिहितात :(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे) . ................................................................................... इथे असे लिहिणे म्हणजे "सार्वजनिक ठिकाणी मी उघडाबंब फिरणार. कुणाला ते बरे दिसत नसेल तर त्या व्यक्तीने मला कपडे घालावे." असे म्हणणे आहे. उत्तम प्रकारचे ,चांगल्या रंगसंगतीचे, अंगाला व्यवस्थित बसणारे, कडक इस्त्रीचे कपडे घालणे (म्ह.काटेकोर व्याकरणशुद्ध लिहिणे ) प्रत्येकालाच जमेल असे नाही हे खरे.पण चार लोकांकडे पाहून, कुणाला विचारून,,स्वच्छ धुऊन (म्ह. लिहिलेले तपासून ) बर्‍यापैकी नीट नेटके कपडे घालणे प्रत्येकाला शक्य असते. ते सोडून उघड्या अंगाने हिंडू लागले तर काही टारगट टाळ्या वाजवतील. पण ते शिष्टसंमत नव्हे. आपल्या घरी कांदापोहे खाताना अंगावर अर्धी चड्डी असणे ठीक .(म्ह. खाजगी बोलणे लिहिणे अशुद्ध चालेल ).पण चारचौघां परिचितांत बसून मिसळपाव खायला हॉटेलात यायचे तर अंगावर ठाकठीक कपडे असणे शिष्टाचाराला धरून होईल.

In reply to by यनावाला

सहज Mon, 10/01/2007 - 14:48
चवीला मीठ चिमूटभर मागे पुढे एवढाच अर्थ आहे. आचार्य, मला कृपया सांगा हा लेख उघडाबंब आहे की बर्‍यापैकी झाकला गेलेला, चालेल असा आहे? बाकीचे नंतर.

In reply to by यनावाला

"सार्वजनिक ठिकाणी मी उघडाबंब फिरणार. कुणाला ते बरे दिसत नसेल तर त्या व्यक्तीने मला कपडे घालावे." आपन तर कापडं घाल्तो ती सोताच उन थंडी वारा पाउस या पासून संरक्शन व 'इतरांच' लज्जा रक्शन. आमच्या साळंत प्वॉर बिटान तुटल कि टाक 'टाका' मंग लईच फाटली किंवा ईरलि कि डायरेक सोमवार्च्या बाजारात जाऊन जिथं फाटलं आसनं तिथून च बंडी काढायची. मंग नवी बंडी चढवायची. मंग आंघुळ्या करुन घ्यायच्या. प्रकाश घाटपांडे

यनावाला Tue, 10/02/2007 - 21:40
श्री. सहज यांच्या लेखाच्या प्रारंभी असलेले वाक्य वाचल्यावर माझा समज झाला की व्याकरणाचे सर्व नियम झुगारून अनियंत्रित लेखनाचा पुरस्कार करण्याचा हा प्रयत्न असावा. कारण त्या वाक्यात श्री. सहज यांनी अनेक चुका हेतुतः केल्या होत्या. तेव्हा पुढचा लेख न वाचताच मी प्रथम प्रतिक्रिया लिहून निषेध नोंदविला. नंतर पूर्ण लेख वाचला तेव्हा लक्षात आले की लेखातील व्याकरण दोष अगदी नगण्य आहेत. लेख उत्तम जमला आहे. काळकर्ते शि. म. परांजपे यांच्या वक्रोक्तिपूर्ण लेखन शैलीची आठवण व्हावी इतका चांगला आहे. पूर्ण लेख वाचल्याविना प्रतिक्रिया लिहायला नको होती असे आता वाटते. पण "ही प्रतिक्रिया केवळ एका वाक्यापुरती आहे ." एवढे लिहिण्याची दक्षता घेतली आहे. कोणी व्याकरणनियम धुडकावले की मी जरा उद्विग्न होतो. तरी श्री. सहज यांनी राग मानू नये. ....... यनावाला

सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 14:51
सल्ले चांगले आहेत. पुन्हा निवडणुक केव्हा आहे? ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

सुनील Sun, 01/11/2009 - 18:12
मस्त लेख. नजरेतून निसटला होता. गटण्याच्या उत्खननामुळे वाचायला मिळाला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहजराव, हल्ली लेखणी का हो गुंडाळून ठेवली आहेत? पण जमाना बदल गया है। एकाची दाद दुसर्‍याला दिलीत तर हे लोक चटकन ओळखतात. पर्सनलाइज्ड दाद द्या. अजून काही दिवसांनी प्रतिक्रिया लिहिण्याचे 'काटे क्लासेस' नाही निघाले म्हणजे मिळवलं! अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

गोगोल Mon, 01/12/2009 - 01:00
"त्यासाठी आत्ताच रोमींग आय.पी., ब्लॉक ऑफ आय.पी. विकत घ्या. " गरज नाही...ऑनियन राउटिंग करा की राव :)

शंकरराव Mon, 01/12/2009 - 05:09
सहजराव कमाल केली लेख लक्षात राहील. असा वाचून सोडून देता येणार नाही. सहज कन्सलचंट. आमची अन्यत्र शाखा नाही. हे आवडले. ईस्टेट ब्रोकर नाहीत तर :-) शेवटी गटण्याच्या उत्खननामुळे वाचायला मिळाला. असेच म्हणतो प्रेषक सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness Freedom gives you happiness to do the things you like

(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे) आपण कधीकाळी निवडून येऊ! असे कल्पनेत देखील विचार न केलेली मंडळी, आता मात्र जरा विचारमग्न होऊ लागली आहेत. कारण विचारताय? अहो ह्या गणपतीत, एक नवीन हॉटेल नाही का सूरू झालेय. आपल्या पंसदीचे खाणे पुरवणारे क्षुधाशांतीगृह, च्यामारी कूठेच नव्हते. आता रात्री २ वाजता जर का भूक लागली. काहीतरी चमचमीत खावेसे वाटले तर म्हणे "आत्ता बंद आहे, उघडल्यावर या". चक्क शटर डाऊन करून हो! साध पाणी पण नाही दिल. एकदम पुणेरी** पध्दतीने असे कटवले. तेव्हाच ठरवले, साला २४ तास चोचले पूरवले जातील असे हॉटेल काढतो की नाय बघा.

गणेशस्तोत्र (संस्कृत रचना)

अशोक गोडबोले ·

विसोबा खेचर Mon, 10/01/2007 - 00:05
गोडबोलेसाहेब, आपल्यासारखा संस्कृत विद्वान इथे आहे ही मिसळपावकरता अभिमानाची गोष्ट आहे. अजूनही लिहा. जी मंडळी 'आपली' होती ती इथे राहिली, जी 'आपली' नव्हती ती येथून चार आठ दिवसातच मन उडाल्यामुळे निघून गेली ते बरेच झाले! तात्या.

प्राजु Sat, 10/06/2007 - 01:16
संस्कृतमधून काव्य निर्मिती करणारे माझ्या परिचयात आपणच पहिले आहात. आपलं काव्य आवडलं.. खूप शिकायला मिळेल आपल्याकडून..... - प्राजु.

पुष्कर Mon, 11/12/2007 - 10:21
श्रीमान् अशोक महोदय:, भवता रचितमिदम् स्तोत्रम् अतीव मधुरम्| भवतः रचनायाम् पदलालित्यमपि सुंदरमस्ति| अधुना वयम् भवत: संस्कॄतभाषायाम् रचितानि काव्यान्यपि पठितुमिच्छाम:| भवतः, संस्कृतकाव्याभिलाषी -शंतनु:

In reply to by पुष्कर

सर्किट Mon, 11/12/2007 - 23:46
वा ! पदलालित्य विशेष आवडले. अवांतरः पद म्हणजे पावले, ह्या पासूनच पद म्हणजे दोन ओळींची कविता/कडवे हे आले असल्याने, येथे पदलालित्याला श्लेष म्हणावे की नाही ? अति अवांतर खोडसाळपणा: "अधुना वयम भवतः", म्हणजे "आताशा वय झाले.." का ? ;-) - सर्किट

स्वाती राजेश Mon, 11/12/2007 - 15:31
काव्य छान केले आहे. आपल्या सारखे इथे संस्कृत पंडित असले तर भरपूर शिकायला मिळेल.

धनंजय Tue, 11/13/2007 - 03:23
या बाबतीत काही शंका मी गोडबोले सरांना विचारल्या होत्या (संदेश पुढे दिला आहे). कार्यबाहुल्यामुळे म्हणा, त्यांचे उत्तर आले नाही. येथील दुसर्‍या कोणाला त्यांचे निरसन करता आले तर आभार मानेन. (गोडबोले सरांना माझा संदेश. माझे काही टंकनदोष सुधारून.) ------------------------------------------------------------------- विषय: स्तोत्रातले काही शब्दप्रयोग कळले नाहीत दिनांक: सोम, 2007-10-01 18:40 गोडबोले सर, तुमच्या गणेश स्तोत्रात काही शंका होत्या त्या येथे विचारतो आहे. घाईघाईत बहुतेक काहीतरी नीट वाचले नाही, असे असेल, पण तरी समजावून द्याल, अशी आशा आहे. > देव त्वं हि गणाधीश I कवीनां कविपुंगव I > ईशावास्य महामंत्रे I मनीषी कविरुच्यते II २ II इथे जर "तूच गणाधीश आहेस, कविपुंगव आहेस" असे म्हणायचे असेल तर बिनासंबोधनाची प्रथमा विभक्ती लागेल असे वाटते. कारण सर्वच संबोधने लावलीत तर "त्वम् हि" चे अन्वयार्थ वाक्य काय ते कळत नाही. पुढे "उच्यते" चा अन्वय/संदर्भ लागत नाही. "तू म्हटला जातोस" असा काही अर्थ असेल तर "उच्यसे" अपेक्षित असेल असे वाटते. 'तुला "कवि" असे त्या मंत्रात कोणीतरी म्हणतो' असे कर्तरि असेल तर 'उच्यते'तील कर्मणि ठीक नाही वाटत. > भयं कृतान्तकालस्य I एकदन्ताग्रविग्रहात् I > विघ्नान्तकाय शान्ताय I प्रणवाय नमोनम: II ५ II अर्थ "कृतान्तकालाचे भय" तर "कृतान्तकालात्" असे हवे. भयकारक जे काही असते ते अपादान असते. शिवाय पहिल्या भागात एक क्रियापद कुठेतरी दडले आहे, ते चटकन लक्षात येत नाही आहे. "विघ्नान्तकाय शान्ताय प्रणवाय नमोनम: ।" हे स्वयंपूर्ण वाक्य आहे, त्यातले "नमः" आदल्या भागाला लागू नाही असे वाटते. ज्ञानाग्निनर्तनालोके I धृवं विश्वार्तिनाशनम् I मूलमध्याग्रपश्यन्तौ I सूक्ष्मोन्मेषाक्षिणौ तव II ६ II "आलोक" मुळे "नाशन" होते आहे का, की माझा अर्थ चुकला? जर "आलोक" "नाशना"चे कारण असेल तर ते केवळ "भावलक्षण" नाही. तसे असता "आलोके" इथे सति सप्तमी तितकी पटत नाही. "गोषु दुग्धासु गतः" वगैरे पुस्तकात शिकवलेल्या सति सप्तमीच्या उदाहरणांत एकीकडे गाई दुहल्या जात आहेत आणि त्याच काळात तो गेला, असा अर्थ कळतो. गाई दुहल्याचे कारण असेल तर "गवां दोहनात् गतः", किंवा "गाः दोग्धुम् गतः" असे प्रयोग होतील असे वाटते. > वक्रतुण्डेन देवेश I वक्रताखण्डनं कुरु I वा! वा! छान. > स्निह्यासि टंकनदोष? > अवात्मजगदाकारं टंकनदोष? या द्वितीया विभक्तीचा वाक्यात अन्वय लागत नाही. अक्षराणां अकारस्त्वं I आराध्यं ज्ञानिनां प्रभो I विदुषां वेदसारस्त्वं I मन्दानां भक्तवस्तल II १२ II "प्रभो" चे संबोधन ठीकच आहे. "अकारः त्वम्" येथे बिगरसंबोधनाची प्रथमा ठीक आहे. तसेच "वत्सल" इथे हाकेपेक्षा वेगळे संदेशन होते आहे - तू 'अमुक अमुक' परिस्थितीत वत्सल आहे' असे मला वाटते. हा अर्थ चुकला का? कारण तसा अर्थ असला तर "अकारः"सारखीच बिगरसंबोधनाची प्रथमा अपेक्षित आहे. 'अमुक अमुक' परिस्थिती म्हटली कारण ती परिस्थिती नीट समजली नाही. सर्व मंदांसाठी "भक्तवत्सल" आहे का? मग मंदानाम् अशी षष्ठी का? का मंदलोकांत त्याला "भक्तवत्सल" असे नाव आहे? "मंद-भक्तांचा" वत्सल आहेस असे म्हणायचे आहे का? तसे म्हणायचे असल्यास "भक्त-वत्सल" असा समास पहिले करता येत नाही - समर्थः पदविधि:. असो, हे नीट समजले नसल्यामुळे मला शंका निर्माण झाल्या असतील. > गणेशपादपद्मेषु I भृंगोऽहं रसलोलुप: II १४ II दोनच पाय :-) "पद्मयो:" पाहिजे असे वाटते. छंद टिकवण्यासाठी काही वेगळ्या रूपकाची/शब्दाची सोय करावी लागेल. > प्रीतया रचितं स्तोत्रं I यत्नकामांग चेतसा > प्रमादोन्मादमोदाय I क्षमस्व परमेश्वर II १५ II अर्थात त्याला सर्वच अर्पित वस्तू प्रिय आहेत :-) प्रीतया - टंकनदोष? "प्रीत्या" म्हटले तर छंदोभंग होतो, वेगळी शब्दयोजना करावी. "प्रमादोन्मादमोदाय" या समासाची फोड कळली नाही, आणि चतुर्थी विभक्तीचा अन्वय लागत नाही. प्रमादोन्मादमोद - हे बहुव्रीही की तत्पुरुष? तत्पुरुष असले तर उत्तरपदप्रधान असते. म्हणजे कुठल्यातरी प्रकारच्या "मोदा"विषयी कवी क्षमा मागतो आहे. प्रमादाच्या उन्मादाचा मोद कवीला होतो आहे हे पटत नाही. "मोदाच्या उन्मादामुळे प्रमाद" होतो आहे त्याबद्दल बहुधा कवी क्षमा मागतो आहे. असे असल्यास "प्रमाद" हे पद सर्वात शेवटचे, उत्तरपद असे, यायला पाहिजे. संस्कृतात तुमचा अधिकार दांडगा आहे, त्यामुळे माझ्या शंका "लहानाच्या तोंडीचा मोठा घास" अशा धर्तीचे दोषदर्शन मानू नका. किंवा "लहानाच्या तोंडीचा" असेच मानून चिरचिर्‍या लहान मुलाला लाडाने समजावून सांगतात तसे मला समजावून सांगा. नम्र, धनंजय

In reply to by धनंजय

अशोक गोडबोले Sun, 07/06/2008 - 12:46
प्रिय धनंजय, सप्रेम नमस्कार. आपन माझे स्तोत्र वाचून एवढ्या आत्मीयतेने मला प्रश्न विचारलेत म्हणून मला खूप आनंद झाला. आपली शंकारत्नमाला मला आवडली. माझ्याकडे संगणक नसल्यामुळे लवकर उत्तर देऊ शकलो नाही तसेच आपले पत्र विस्मृतीत गेले होते म्हणून क्षमस्व. मी संस्कृत भाषेचा पंडित नाही पण संस्कृतप्रेमी व अभ्यासक आहे. 'निरंकुशा: कवय:' असे जरी म्हटले असले एखादा अपवादात्मक अपाणिनीय प्रयोग वगळता संस्कृतकाव्य हे व्याकरणशुद्धच असले पाहिजे असेच माझे मत आहे. काव्याचा अर्थ नीट समजण्यासाठी काव्यचरणांचा योग्य अन्वय लावणे गरजेचे आहे. असो! आपल्या शंकांकडे वळू. १) देव त्वं हि गणाधीश I कवीनां कविपुंगव I ईशावास्य महामंत्रे I मनीषी कविरुच्यते अन्वय - 'हे कवीनां कविपुंगव, गणाधीश देव, त्वं हि कविर्मनीषी' इति ईशावास्य-महामंत्रे उच्यते 'ऋषिणा वा ऋषिभि:' असा अन्वय आहे. संदर्भ - १) 'कविर्मनीषी' - ईशावास्योपनिषद् २) त्वं हि कविर्मनीषी - भाष्य-पाद ९ वा गणेशस्वरूपचिकित्सा. २) भयं कृतान्तकालस्य I एकदन्ताग्रविग्रहात् I विघ्नान्तकाय शान्ताय I प्रणवाय नमोनम: अन्वय - कृतान्तकालस्य एकदन्ताग्रविग्रहात् भयं विद्यते - असा येथे अन्वय आहे. कृतान्तकालाचे भय अशी कल्पनाच नाही. शुकस्य मार्जारात् भयं प्रमाणे कृतान्तकालाला एकदन्ताग्रविग्रहाचे भय असा विचार मांडलेला आहे. आणि अशा एकदन्ताग्रविग्रह - विघ्नात्नकाय, शान्ताय प्रणवाय नमोनम: असा अन्वय आहे. भामहाने अशा प्रकारच्या अन्वयास विशेषणपूर्णकरनामान्वयवृत्ति: असे म्हटले आहे. ३) ज्ञानाग्निनर्तनालोके I धृवं विश्वार्तिनाशनम् I मूलमध्याग्रपश्यन्तौ I सूक्ष्मोन्मेषाक्षिणौ तव येथे सतिसप्तमीचा प्रयोग मुळातच नाही. (हे देव,) तव मूलमध्याग्रपश्यन्तौ सूक्ष्मोन्मेषाक्षिणौ ज्ञानाग्निनर्तनालोके विश्वार्तिनाशनम् ध्रुवं इति सत्यं अवलोकयत: असा अन्वय आहे. ज्ञानरूपी ज्वालांच्या नर्तनाच्या तेजस्वी प्रकाशात विश्वाची दु:खे निश्चित नष्ट होतात हे सत्य उत्पत्तिस्थितिलयावस्था बघणारे तुझे सूक्ष्मज्ञाननेत्र बघतात.. ४) अवात्मजगदारं हा टंकनदोष आहे. अनात्मजगदाकारं असे हवे. संदर्भ - अनात्मजगदाकारं प्रकृतिविलासमेव विद्धि I - श्रीभाष्य - अन्वय - त्वं अनात्मजगदाकारं पाहि I त्व शरणागतान् पाहि I तथा च समाधिमग्नासिदेभ्यो ब्रह्मात्मदर्शनं देहि II ५) अक्षराणां अकारस्त्वं I आराध्यं ज्ञानिनां प्रभो I विदुषां वेदसारस्त्वं I मन्दानां भक्तवस्तल ह्या श्लोकाचा अर्थ थोडा क्लिष्ट आहे हे प्रांजळपणे कबूल करतो. अन्वय - हे भक्तवत्सल प्रभो, त्वं अक्षराणां अकार:, ज्ञानिनां तथा च मन्दानां आराध्यं = आराध्यदैवतं, विदुषांच वेदसार : ------- आराध्यं - संदर्भ "आराध्यं मन्दानां" - भारवी आराध्यं - आराध्यदैवतं इत्यर्थ: अत्र विशेषणपदलाघवविलास: I ६) गणेशपादपद्मेषु हे 'गुरुचरणारविन्देषु' प्रमाणे आदरार्थी बहुवचन वापरले आहे. त्यामुळे पादपद्मयो: असे लिहिण्याचे कारण नाही. सम्यगादरभावप्रकटीकर्तृं बहुवचनप्रयोग: 'समुरावित्थेर्णङशित्' - वार्तिक - कात्यायन ७) प्रमादोन्मादमोदाय - येथे समासविग्रह पुढीलप्रमाणे - प्रमादात् उद्भूत: उन्माद: प्रमादोन्माद: = मध्यमपदलोपी प्रमादोन्माद: मोदस्वरूप: प्रमादोन्मादमोद: = असा रूपककर्मधारय करतात. संदर्भ १) समासचक्रविवरण - श्री दातारशास्त्री. २) तसेच स्वरूपकर्मधारयत्रभेदा: - शब्देन्दुशेखर भाष्य. माझ्या अल्पमतीनुसार मी शंकासमाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या पाणिनीच्या सूत्रांच्या माध्यमातून सिद्ध केलेल्या संस्कृत व्याकरणाचा (देववाणी भाग १ ले. श्री नवरे) मी इंग्रजी अनुवाद करीत आहे. आपण प्रश्न विचारल्यामुळे पूर्वाभ्यासाची थोडी उजळणी झाली. मी केकावलीचा संस्कृत अनुवाद केला आहे व मेघदूताचाही समश्लोकी अनुवाद केला आहे. जमेल तसे पुन्हा लिहीन. आपणास शुभेच्छा. आपला हितैषी, अशोक गोडबोले.

सागर Tue, 11/13/2007 - 15:21
गोडबोलेसाहेब, सर्वप्रथम संस्कृत रचना केल्याबद्दल आपले अभिनंदन... संस्कृत भाषेत आजच्या काळात कोणी काव्य करु शकतो हीच मुळी मोठी गोष्ट आहे माझ्यासारखे संस्कृत भक्त अनेक आहेत हो या जगात, पण लिहायचे म्हटले की डोक्याची मंडई होऊन जाते असो...अशाच संस्कृत मधे रचना करीत रहा आजच्या काळात तुमच्यासारख्या विद्वान रचनाकारांची खूप गरज आहे. तुमच्यासारखे जिज्ञासू संस्कृत अभ्यासक आज खूपच दुर्मिळ होऊ लागले आहेत. शाळेत संस्कृत शिकून झाले की आज-कालची पोरे इंग्रजीत फाडफाड बोलायच्या प्रेमात पडतात. देवांच्या भाषेचा विचार कोण करतो हल्ली? कालाय तस्मै: नमः नि काय? (संस्कृत भाषा व्यवहारात जागतिक होण्याची स्वप्ने पाहणारा) सागर

लिंबू टिंबू Sun, 07/06/2008 - 11:56
काका, संस्क्लुत भाषा मला समजत नाही, पण तुमचे श्तोत्ल आवद्ले. मी पण घली लोज शुभंकलोती म्हंतो, पण त्याचा पेक्षा हे श्तोत्ल छान आहे.

यशोधरा Sun, 07/06/2008 - 19:53
संस्कृतात लिहू शकता? भाग्यवान आहात! स्तोत्र, त्यावरील विचारलेले प्रश्न, शंकानिरसन, सारेच उत्तम! शिकायला मिळाले. धन्यवाद.

मदनबाण Sun, 07/06/2008 - 20:05
व्वा गजाननावर स्तोत्र रचल्याबद्दल आपले अभिनंदन..... (स्वानंदवासी गजाननाचा भक्त) मदनबाण.....

Taxonomy upgrade extras
काही दिवसांपूर्वी संस्कृत भाषेत एक स्तोत्र रचले होते ते येथे देत आहे. ओमित्येकाक्षरं ब्रह्म I निर्गुंणारंभमूलकम् I पूर्णात्मरूपबोधाय I ओंकाराय नमोनम: II १ II देव त्वं हि गणाधीश I कवीनां कविपुंगव I ईशावास्य महामंत्रे I मनीषी कविरुच्यते II २ II गणेशोऽपि गुणेशस्त्वं I विराट गणनायक I सर्वसिद्धिफलस्वामिन् I ऋद्धिसिद्धिविनायक II ३ II मगलाचरणं नित्यं I वैदिकानां परम्परा I कार्यादौ स्तुवते त्वां च I ऋषयो मूलकारणम् II ४ II भयं कृतान्तकालस्य I एकदन्ताग्रविग्रहात् I विघ्नान्तकाय शान्ताय I प्रणवाय नमोनम: II ५ II ज्ञानाग्निनर्तनालोके I धृवं विश्वार्तिनाशनम् I मूलमध्याग्रपश्यन्तौ I सूक्ष्मोन्मेषा

चांदोबा

आजानुकर्ण ·

कोलबेर Sat, 09/29/2007 - 20:11
>>जयमल्ल, श्वानकर्णी, बिडाली, वीरबाहू, विक्रमार्क हा हा सहीच!! मला मात्र लहानपणी ठक ठक सगळ्यात जास्त आवडायचे कारण ते जास्त मराठमोळे वाटायचे..(अजुन ठक ठक येते का?) चांदोबा दाक्षिणात्य आणि चंपक (बहुदा) बरेचसे हिंदी अनुवादित असायचे.

धनंजय Sat, 09/29/2007 - 21:20
काय मस्त आठवण करून दिलीत कर्ण! दर महिन्याला आमच्या घरी आईबाबा चांदोबा आणि किशोर एकाच दिवशी विकत घेऊन येत. (म्हणजे दोघा मुलांमध्ये "मी आधी वाचणार" असे भांडण होऊ नये. पण ज्याच्या हाती येत, म्हणजे माझा भाऊ किंवा मी, दोन्ही अंक लंपास करून ठेवत. मग भांडणे होतच. आमचे आईबाबा बालमानसशास्त्राच्या बाबतीत तसे तज्ज्ञ नव्हते असे माझे प्रांजळ मत आहे.) त्या धूमकेतूचे शेवटी काय झाले कोणास ठाऊक...

In reply to by बेसनलाडू

भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 01:49
आंघोळीनन्तर ओले केस पिंजारून मी आणि माझा भाऊ एकमेकांना भल्लूक मान्त्रिक म्हणत काठीने खेळत असू... धुमकेतू...

प्राजु Sat, 09/29/2007 - 22:12
जाग्या केल्यात आपण. लहानपणी हा चांदोबा तेव्हा अक्षर ओळख नसल्यामुळे मी आजोबांकडून वाचून घ्यायचे. त्यामधील रंगीत चित्रांमुळे मला त्या पुस्तकाबद्दल विलक्षण आकर्षण वाटायचे. आणि मग सगळी कामं आटोपून माझे आजोबा मला त्यातील गोष्टी वाचून दाखवायचे.. आज आजोबा हयात नाहीत.. पण या गोड आठवणी मात्र अजूनही ताज्या आहेत... धन्यवाद. - प्राजु.

प्रियाली Sun, 09/30/2007 - 01:05
>>का रे अजून चांदोबा वाचतोस का? असे प्रश्न आणि कोण विचारणार? ;-) चांदोबाची आठवण पुन्हा करून दिल्याबद्दल धन्यवाद. चांदोबा अद्याप निघतो हे ही माहित नव्हते. आमच्या घरात किशोर येई. चांदोबा पिताश्रींना आवडत नसे. काय त्यात जादू बिदूच्या गोष्टी असतात म्हणून ते उडवून लावत. त्यामानाने चंपक आणून देणे त्यांना आवडे. शेजार्‍यांकडे चांदोबा वाचून आम्ही क्षुधाशांती करत असू.

जयमल्ल, श्वानकर्णी, बिडाली, वीरबाहू, विक्रमार्क अशा नावांमध्ये पुन्हा गुंग होऊन गेलो. चांदोबा उगाचच इतके दिवस बंद केला. परत वाचायला सुरुवात केली पाहिजे.>> मला विरुपाक्ष ची आठवण येते. त्याच्या कानातून बाहेर येणारे केस मनावर कोरले आहेत. आमच्या विभागातील ३०२ जाधवला ( ३०२ कलमाने बायकोच्या खुनाचा गुन्हा ज्यावर दाखल झाला आहे असा तो एक स्टोअरमन) त्याच्या कानातील केसामुळे मी आमच्या वर्तुळात 'विरुपाक्ष' हे नाव पाडले होते. प्रकाश घाटपांडे

चांदोबाची आठवण करुन दिली आणि जून्या आठवणी चाळवायला लागल्या ! कर्णा, चांदोबा ज्याच्या घरात त्यांना जरा प्रतिष्ठीचे वाटायचे, आमच्या घरी मुलांसाठी चांदोबा घेतो ही कधीतरी अभिमानाचीही गोष्ट होती. काहीतरी हटके विषय घेऊन येणार नाही तो कर्ण कसा ! :) असेच वाचायला येऊ दे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रा Sun, 09/30/2007 - 08:36
छान आठवणी आल्या. अर्थात चांदोबा मासिकाबद्दल एवढी माहिती नव्हती. >>चांदोबात २५-३० वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली कथा पुन्हा वाचताना ती तितकीच ताजी वाटायची. या कथांचे मराठी अनुवाद कोण करतो देव जाणे. अगदी असेच. माझ्या एका चुलत आजोबांच्या घरी चांदोबा येई. त्यांच्या लहानशा घरात त्यांनी असंख्य पुस्तके (त्यात जुनी पंचांगे पण असत) ठेवली होती. चांदोबाचे गठ्ठयाने अंक असत. त्यांच्याकडे असलेले खूप जुने म्हणजे माझ्या आत्यांच्या लहानपणचे अंकही मी त्यांच्याकडे गेले की वाचत असे.

विसोबा खेचर Sun, 09/30/2007 - 09:11
तेव्हापासून अगदी आवडीने वाचतो आहे. आजही मध्येच अधनंमधनं विकत घेऊन वाचतो.. वा कर्णा, चांदोबाच्या सुखद आठवणी चाळवल्यास त्याबदल तुला चांदोबाचा एक अंक बक्षिस देईन हो! :) आपला, (चांदोबाप्रेमी) तात्या.

आजानुकर्ण Sun, 09/30/2007 - 09:47
अरे वा! इतके सगळे चांदोबाप्रेमी पाहून फार आनंद वाटला. लेखाच्या मस्त जेवणानंतर आता माहितीची बडीशेप चावा. चांदोबाची वार्षिक फी आता १५० वरून १८० रुपये केले आहे. आणि त्याबदल्यात ८ रंगीत पाने प्रत्येक अंकात जास्तीची. :)) सप्टेंबरच्या अंकात जगपाल साहू नावाच्या एका वाचकाचे पत्र आले आहे. त्यांच्याकडे १९७५ वर्षापासूनचे चांदोबाचे सगळे अंक आहेत. :) याशिवाय दीपांकर दत्त नावाचे एक वाचक चांदोबाचे गेली ५० वर्षं वाचक आहेत. :)) तात्या, चांदोबाचा अंक घेण्यासाठी पुणे-ठाणे प्रवास गृहीत धरला तर पुण्यात चांदोबा स्वस्त मिळेल ;).

स्वाती दिनेश Sun, 09/30/2007 - 13:47
काय मस्त आठवण काढली? चांदोबा,किशोर आणि कुमार माझ्या जास्त आवडीची मासिके होती.त्यामानाने चंपक आणि ठकठक मी विशेष वाचत नसे.किशोर आणि कुमार आमच्या घरी येत असत्,चांदोबा शैलाताई कडे.मी ३रीत असतानाच आईने शैलाताई बेडेकरच्या मनोरंजन वाचनालयात माझे नाव लहान मुलांच्या विभागात घातले होते,आणि तिच्याकडून पुस्तक घेऊन घरी येतानाच वाचत वाचत येत असे, आणि ते कोणीतरी घरी सांगितल्यावर ओरडाही मिळाला होता. शाळेत असताना ९ वीत बहुदा, किशोरच्या दिवाळी अंकात माझा एक लेख प्रसिध्द झाला होता आणि त्याचे मानधन म्हणून २५ रु चा चेक ही मिळाला होता, काय त्याचं अप्रूप तेव्हा वाटलं होतं! आता परत एकदा चांदोबा,किशोर,कुमार चाळली पाहिजेत. स्वाती

प्रमोद देव Sun, 09/30/2007 - 14:23
चांदोबा वाचण्यासाठी आम्ही भावंडे देखिल खूप धडपडत असायचो. स्वत: खरेदी करून वाचण्याची क्षमता नसल्यामुळे आम्ही ती वाचनालयात जाऊनच वाचत असू. नवी-जूनी जी हाताला लागतील ती वाचून काढत असू. तसेच किशोर,कुमार आणि अमृत,विचित्र-विश्व वगैरे मासिकेही वाचत असू. चांदोबातील चित्रे तर खासच असायची. त्यांची रंगसंगती देखिल विलक्षण आकर्षक असायची. मात्र चांदोबा मध्ये एकदा बंद पडल्यानंतर पुन्हा जेव्हा सुरु झाला तेव्हापासून त्यातले आकर्षण कमी झाले. त्याला कारण त्याचा पूर्वीचा रूबाब राहिला नाही असे मला मनापासून वाटते. तसेच आता अमरचित्रकथा आणि अशाच प्रकारचे नवे प्रकार बाजारात आल्यामुळे देखिल चांदोबाचे महत्व कमी झालेय असे वाटते. तरी देखिल चांदोबा ही जून्या पिढीतील लोकांची "मर्मबंधातली ठेव" आहे असे खात्रीने म्हणता येईल.

यनावाला Tue, 10/02/2007 - 22:03
मासिकासंबंधीचा श्री. आजानुकर्ण यांचा सचित्र सुंदर लेख आणि त्यावरील अनेक सदस्यांच्या प्रतिक्रिया वाचून मला वैषम्य वाटले. सर्वांचा हेवा वाटला. कारण ज्या खेडेगावात माझे लहानपण गेले, तिथल्या शाळेत पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अन्य कोणतेही पुस्तक मला वाचायला मिळाले नाही. शाळेला वाचनालय नव्हतेच. ते असते हे पुण्यात आल्यावर समजले. तोवर चांदोबा वाचायचे दिवस निघून गेले होते. घरी चांदोबा किंवा दुसरे कोणतेच नियतकालिक मागवण्याचा प्रश्नच नव्हता. असो. पुढे थोडे फार वाचले. पण त्या वयात वाचायला मिळाले नाही याची खंत वाटते.(विशेषतः हा लेख वाचून आपण अशा वाचनापासून वंचित राहिलो हे प्रकर्षाने जाणवले.)

देवदत्त Tue, 10/30/2007 - 23:13
मस्त वाटले वाचून. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद :) विक्रम वेताळ हे तर छानच होते. त्याचबरोबर इतर कथाही छान होत्या. तुम्ही फक्त चांदोबाबद्दल लिहिले आहे परंतु त्याचबरोबर इतरही लिहावेसे वाटते. मी ही लहानपणी चांदोबा, किशोर, चंपक, ठकठक भरपूर वाचायचो. तसेच हिंदीमधील सुमन सौरभ ही. ह्या सर्वांत चांदोबा उठून दिसत असावा त्यातील रंगीत पानांमुळे. आणि चांदोबा हे पुस्तक असे की सर्व वयोगटात कोणीही घेऊन वाचू शकतो. आणखी ही पुस्तके होती बहुधा आता आठवत नाही. सर्व वाचायला मजा यायची. शिवाय डायमंड कॉमिक्स ही भरपूर. आमच्याकडे एवढी पुस्तके झाली होती की ३ मित्रांनी मिळून मग आमच्या कॉलनीत वाचनालयच सुरू केले होते. २ २१/२ वर्षे चालविले ते. :) गेल्या वर्षी बंगळूर मध्ये एका मित्रा सोबत ह्याच पुस्तकांबद्दल चर्चा झाली होती. मग काय लगेच गेलो बुक स्टॉल वर आणि विचारले चांदोबा, चंदामामा आहे का? नव्हते. पण चंपक मिळाले. (ह्या सर्व पुस्तकांच्या शोधात) देवदत्त

देवदत्त गुरुवार, 05/15/2008 - 22:47
:) नुकत्याच आलेल्या विपत्रातून चंदामामाच्या संकेतस्थळाचा पत्ता मिळाला. :( इथे सध्या नवीन कथा इंग्रजी, तमिळ व तेलूगू ह्याच भाषेत आहेत :) परंतु जुने अंक ( जुने म्हणजे किती जुने हो ? हिंदी: १९४९ ते १९६१, इंग्रजी: १९५५ ते १९८५ इत्यादी इत्यादी) उपलब्ध आहेत. :( मराठी नाहीत हीच खंत. :) मी सप्टे. १९६१ ची प्रत डाऊनलोड केली आहे. पाहीन वाचून

छोटा डॉन गुरुवार, 05/15/2008 - 23:26
आजानुकर्णा, काय आठवण काढलीस रे चांदोबाची , एकदम लहानपण आठवले ... साधारणाता आमचे लहानपण हे "चांदोबा, ठकठक, चाचा चौधरी" वाचण्यात, गोट्या / आंब्याच्या कोया [ उच्चारी कुया ] खेळण्यात, झालच तर आईचा मार खाण्यात गेले ... आईचा मार खायचे मेन कारण असायचे चांदोबा, कारण पुस्तक एक आणि वाचणारे ३ जण, त्यात मोठा मी आणि माझ्या २ लहान बहिणी. मग मी पुस्तक बळकावयाचो आणि बहिणी तक्रार घेऊन आईकडे जायचा व मला मग पडती बाजू घ्याय्ला लागायची. मग ती गेल्याव्र पुन्हा चांदोबावर माझा कब्जा [ सुज्ञांच्या लक्षात आलेच असेल की माझी "डॉनगिरी " ही तेव्हापासूनची बरं का ! ] माझा एक आत्तेभाऊ होता, त्याच्याकडे "ठकठक" यायचे. मग २-३ महिन्यात आमची जेव्हा एकमेकाकडे चक्कार व्हायची तेव्हा "चांदोबा आणि ठकठक" ची अदलाबदल हमखास . ... तेव्हा "एका चांदोबामागे २ ठकठक " असा रेट पडायचा ... आजही जर कुठे मिळाले तर वाचायला जरूर आवडेल ... चांदोबाचा व्यवहार करणारा छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

मदनबाण Fri, 05/16/2008 - 04:45
मलाही चांदोबा वाचायला फार आवडत असे.....विक्रम-वेताळाची गोष्ट तर मला फार आवडत असे..... चंपक आणि ठकठक पण वाचायचो...ठकठक मधील दिपू दी ग्रेट या व्यक्तीरेखेचा मी जबरदस्त पंखा होतो..... (बालपणीच्या रम्य आठवणीत रमलेला) मदनबाण.....

ईश्वरी Fri, 05/16/2008 - 00:06
वा, वा मस्त आठवण करून दिलीत. विक्रम वेताळ माझ्याही आवडीची गोष्ट असायची. त्यातल्या त्यात वेताळाचा कूट प्रश्न आणि त्याचे विक्रमाने चतुराईने दिलेले उत्तर हे वाचायला छान वाटायचे. किशोर ही माझ्या खास आवडीचे पुस्तक होते. तुम्ही ते विक्रम वेताळ चे चित्र टाकून लेखाची रंजकता वाढवली आहे. चांदोबाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. एक प्रश्नः तमीळ / तेलगू भाषेतील चांदोबाचे नाव काय होते? ईश्वरी

ॐकार Fri, 05/16/2008 - 01:41
चांदोबा, ठकठक, चंपक, किशोर याचबरोबर अबब हाती, छावा चे अंकही वाचायचो. आम्ही ३-४ मित्र मिळून प्रत्येक जण एकेक अंक विकत घेत असे( म्हणजे आई वडील आणून द्यायचे) आणि मग आम्ही अदलाबदल करून वाचत असू. राजू आणि छोटी खार अजूनही आठवते!

मुक्तसुनीत Fri, 05/16/2008 - 01:55
"हे राजा ....या प्रश्नांची उत्तरे ठाऊक असूनही .........शकले उडतील !" - पंचतंत्र (कृतप्रणाश , अकृतागम वगैरे शब्द इथे पहिल्यांदा वाचले) -तिळ्या बहिणी चांदोबांच्या अर्कचित्रांची एक शैली होती. सर्व राजे मिशीवाले , ब्राम्हण लांबच लांब शेंडीवाले असायचे ....

विजुभाऊ Fri, 05/16/2008 - 13:01
कृतप्रणाश हा शब्द असा नसुन तो लब्धप्रणाश असा आहे. पंच तंत्रापैकी एका तंत्राचे हे नाव आहे. विष्णुशर्मा ने मित्र लाभ , मित्र भेद , काकोलुकीय , लब्धप्रणाश ,( पाचवे नाव आठवत नाही) अशी एकुणपाच तंत्रे लिहीली आहेत. करटक ,हिडींबक , दमनक अशी नावे या प्रकारणात येतात.

कलंत्री Fri, 05/16/2008 - 20:20
यनावालांच्या लिखाणात लिहिल्याप्रमाणे आजही खेड्यात वाचनाचे सूख मिळत नाही. त्यासाठी आपण आपल्या / कुटुंबियांच्या वाढदिवसाला या अंकाची भेट गरिबमुलांना वार्षिक अंकाच्या निमित्त्याने नक्कीच देऊ शकतो. बाकी लेख अप्रतिमच आहे आणि सचित्र असल्यामूळे रंगत काही वेगळीच झाली आहे. मित्रा आजानुकर्णा : असे लेख वर्तमानपत्रात आले पाहिजे.

काही दिवसांपूर्वी हे कोडे लिहिल्यावर "का रे अजून चांदोबा वाचतोस का?" असं कुणीतरी मला विचारलं होतं. त्यावेळी उगाचच चांदोबाची आठवण येऊन पिसं उधळल्याप्रमाणं झालं. खरंच लहानपणी एका वेगळ्याच दुनियेत नेणार्‍या या अद्भुत पुस्तकाबद्दल अजून कोणी कसं बरं लिहिलं नाही?