✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कुछ तो लोग कहेंगे..

व
विसोबा खेचर यांनी
Sun, 10/14/2007 - 01:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8751 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

ध
धोंडोपंत Sun, 10/14/2007 - 14:26 नवीन

आमचेही

आमचेही अभिवादन. आपला, (खिन्न) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Sun, 10/14/2007 - 14:58 नवीन

कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन !

तात्यासाहेब नमस्कार, अगदी खरे आहे आपले. आणि त्याचेही. कोणी परत करावे, हरपले दिन | हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || धृ || मनोरथांतील महाल, आणि स्वप्नांतील नगर | ज्यांच्यासाठी प्यायलो मी, जीवनाचे ते जहर || आज मी शोधू कुठे, कुठे गेले ते सारे | हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || १ || ह्या गाण्याला त्याने दिलेले संगीतही अफाट आहेच, आणि लताने गायलेले हे पुरूषी गाणेही अफलातून आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 10/14/2007 - 15:08 नवीन

वन एन्ड ओन्ली..

तात्यासाहेब नमस्कार, अगदी खरे आहे आपले. आणि त्याचेही. नमस्कार गोळेसाहेब, तो होताच मुळी.... 'द वन ऍन्ड ओन्ली...'!! असो, मिसळपाववर आपले सहर्ष स्वागत.. आपला, (मनोगतीय सुहृद!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे
व
विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 02:19 नवीन

पत्ता..

मागे कुणीतरी मिपाकराने मला पोष्टकार्ड पाठवून अगदी कळकळीने त्याचा पत्ता विचारला होता. ते पोष्टकार्ड चुकून डिलिट झालं त्यामुळे ही विचारणा कुणी केली होती ते आता आठवत नाही. त्यानंतर बरेच दिवस लिहीन लिहीन म्हणत होतो पण राहून गेलं. आज संध्याकाळी कामधंद्याच्या निमित्ताने अचानक जुहूला जाणं झालं तेव्हा त्याची याद आली म्हणून त्याच्या बंगल्याजवळही थोडावेळ घुटमळलो, मन थोडं उदास झालं! तो माझा वीक पॉईंट होता! १९८७ सालीच मी त्याच्या घरी गेलो होतो ती आठवणही लवकरच लिहीन मिपावर! पुन्हा विसरून जायला नको म्हणून आत्ता इथे त्याचा पत्ता देत आहे. बर्‍याच विलंबाबद्दल मी त्या अज्ञात मिपाकराची माफी मागतो..! पोस्टल ऍड्रेस माहिती नाही, पण तिथे कसं जायचं ते सांगतो.. समुद्रालगत असलेल्या जहू तारा रस्त्यावर जायचं. जुहू कोळीवाड्याकडे जो फाटा जातो तिथनं जवळच त्याचं घर आहे. रस्त्याच्या एका बाजूला सगळे बंगले आणि काही ऑफीसं आहेत तर दुसर्‍या बाजूला समांतर जुहू चौपाटी आहे. जुहू तारा या मुख्य रस्त्यालगतच किंचित एका गल्लीवजा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या तोंडापाशीच त्याचा बंगला आहे! त्या रस्त्याचं नांव - स्वर्गीय किशोरकुमार गांगुली पथ! पण आता त्या बंगल्याकडे बघवत नाही. त्यातला अवलिया तर तिथून केव्हाच उडून गेला आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/04/2008 - 05:51 नवीन

हमे तुमसे प्यार कितना.....ये हम नही जानते.....

माझेही अभिवादन. (किशोरदां चा चाहता) मदनबाण
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 04/04/2008 - 08:06 नवीन

छान लेख..

१.आचल के तुझे मै लेके चलू इक ऐसे गगन के तले... जहॉं गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले.... २. फूलों के रंग से दिलकी कलम से.... ३. वह शाम कुछ अजिब थी.. कोणकोणती सांगावी आणि कोणती गाळावीत... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 13:43 नवीन

ह॑ ....

त्याच॑ आणि माझ॑ नात॑ खुप खुप जुन॑... मी बराच लहान होतो, ७-८ वर्षा॑चा असेन नसेन. घरी 'चलती का नाम गाडी' ची कॅसेट आणली होती..तेव्हापासून ह्या कल॑दराच्या जो काही प्रेमात पडलोय तो आजतागायत सावरलेलो नाही! पहिल्या प्रेमाची हुरहुर त्याच्याच आवाजान॑ 'र॑गीन' झालेली अनुभवली. प्रेमभ॑गाच॑ दु:खही त्याच्या 'दर्दभरे नग्मे' ऐकुन कुरवाळल॑. आन॑दी झालो की त्याची 'मस्तीभरी' एक से बढकर एक गाणी ऐकुन आन॑द शतगुणित केला, पहिली सिगारेट ओढली तेव्हाही 'मै हर फिक्र को धूऍ॑मे उडाता चला गया' म्हणत तोच माझ्याबरोबर होता. प्रेमभ॑गान॑तर सैरभैर झालेल्या अवस्थेतही 'एक भले मानुस को अमानुष बना के छोडा' म्हणत माझ्याशी सहमत होत गेला. मित्र-मैत्रिणी॑बरोबर द॑गा-धूडगुस घालताना 'इय्या इय्या इय्या हे:...देखा ना हाय रे..' म्हणत तोच चौखूर उधळायचा! माझी आयुष्याची साथीदारीण भेटल्यावर तिला 'जीवन से भरी तेरी ऑ॑खे..' आणि 'फुलो॑ के र॑ग से' अस॑ म्हणून खुष कर हे हळूच कानात सा॑गणाराही तोच. कामाच्या रगाड्यात अडकल्यान॑तर ऑफिसातल्या कटकटी॑ना वैतागून मी चिडचिड केल्यावर 'ये जीवन है...इस जीवन का यही है र॑गरुप' अस॑ समजावून सा॑गणाराही तोच...तोच! कोण म्हणत॑य तो आपल्यात नाहीय्ये? अरे, मला तर तो रोज भेटतो. सतत माझ्याच तर बरोबर असतो !!!! -(....) ध मा ल.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 13:49 नवीन

वा!

पहिली सिगारेट ओढली तेव्हाही 'मै हर फिक्र को धूऍ॑मे उडाता चला गया' म्हणत तोच माझ्याबरोबर होता. अरे पण धमाल्या, ही ओळ तरी रफीसाहेबांनी म्हटली आहे! :) माझी आयुष्याची साथीदारीण भेटल्यावर तिला 'जीवन से भरी तेरी ऑ॑खे..' आणि 'फुलो॑ के र॑ग से' अस॑ म्हणून खुष कर हे हळूच कानात सा॑गणाराही तोच. वा! सुंदर लिहिलं आहेस..! पण वाचून समाधान नाही झालं! त्याच्या गाण्यांबद्दल अजूनही लिही, अगदी भरभरून...! आपला, (त्याचा दिवाना!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 14:02 नवीन

अर्र..तिच्यामारी !!!

अस॑ झाल॑ काय? असो, म्हणजे तेव्हा आम्ही ओळखायला चुकलो तर! तर किशोरदेवा, लेकराला माफ कर. आणि रफीसाहेब तुम्हीही! बाकी रफीसाहेबा॑च्या आवाजतली खुमारीही काही औरच होती नाही? -(ओशाळलेला) ध मा ल. ==========================
पण वाचून समाधान नाही झालं! त्याच्या गाण्यांबद्दल अजूनही लिही, अगदी भरभरून...!
ह॑...जरा तयारी करावी लागेल. प्रतिक्रियेपुरत॑ उर्स्फुतपणे लिहिल॑ गेल॑ खर॑, पण एव्हढ्या मोठ्या माणसाच्या गाण्या॑ना आम्ही हात घालायचा म्हणजे फे..फे उडायची लक्षण॑. ठीक ठीक, तुमची ही फर्माईश माझ्यावर उधार राहिली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 14:06 नवीन

छुकर मेरे मन को

छुकर मेरे मन को किया तुने क्या इशारा... किशोरदांना प्रणाम.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा