✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाटणकर आजोबा..

व
विसोबा खेचर यांनी
Sat, 10/13/2007 - 17:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51974 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

ध
धनंजय Sat, 10/13/2007 - 17:26 नवीन

कोणाच्या हृदयात उरावे

तुमच्या हृदयात, आणि तुमच्या जिव्हाळ्याच्या लेखाकरवी आमच्या आठवणीत ते उरले. अमृतत्व ते हेच.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 10/13/2007 - 17:47 नवीन

झकास!

तात्या! अगदी पुलंची आठवण आली बघ. व्यक्तिचित्र इतके सुरेख उतरलंय की इतका वेळ(लेख वाचत असताना) मी तुम्हा दोघांची ध्वनिचित्रफीत पाहात आहे असे वाटत होते. जियो.तात्या जियो.ह्यापुढे शब्द अपुरे आहेत.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 10/13/2007 - 19:40 नवीन

वा छान

तात्या, व्यक्तिचित्र रंगवायची तुमची हातोटी काय वर्णावी. फार जिवंत चित्र उभे केलेत. वर अत्त्यानंद म्हणतात तसेच ध्वनिचित्रफित पागत आहे असेच वाटले. तुम्हाला अश्या लोकांचा सहवास मिळाला हे भाग्यच. (लेख वाचताना एकिकडे भैरवी ऐकली. ) --लिखाळ. तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 10/13/2007 - 22:27 नवीन

हं

व्यक्तीचित्रे म्हणजे तात्यांचा हातखंडा प्रयोग बघा. नेहमीप्रमाणे यशस्वी. एखाद पान फक्कड जमावं व नेहमी त्याच एका पानवाल्याला ते खावसं वाटाव तस तात्याच व्यक्तीचित्र लिखाणात होत आहे. मस्तच रे तात्या! या लेखणीची कमाल पण अशी की नेहमी अवतीभवती सामान्य असलेली माणस पण एका लेखातून एकदम यादगार व्यक्तीरेखा / वल्ली बनून जातात नाही? >>वारले! अगदी शांतपणे आणि आनंदाने! एखाद्या जिवलग मित्राला भेटावं इतक्या सहजतेने मृत्युला भेटले! >>आहे त्यात आनंद मानायचा, उमेदीने जगायचं आणि आयुष्याचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यायचा हेच त्यांचं धोरण होतं. बाकी परमेश्वरा मला तरी तू असेच जीवन व असेच मरण दे रे, दोन्ही शांतपणे आणि आनंदाने!
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 10/13/2007 - 23:47 नवीन

छान

तात्या व्यक्तिचित्रण मस्तच झाले आहे. आणि सलग एका दमात वाचयला मिळाल्याने फारच आवडले. बाय द वे सालस म्हणजेच अर्चना का हो?..तो भागही पूर्ण करा आता लवकरच.. आम्ही वाट पहात आहोत.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 10/19/2007 - 15:45 नवीन

वा!

तात्या व्यक्तिचित्रण मस्तच झाले आहे. आणि सलग एका दमात वाचयला मिळाल्याने फारच आवडले. कोलबेरशेठशी एकदम सहमत.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
न
नंदन Sun, 10/14/2007 - 00:48 नवीन

'छान पिकत जाणारे म्हातारपण'

पाटणकर आजोबांचे व्यक्तिचित्र आवडले. प्रमोदकाका म्हणतात तशी पुलंची आठवण झाली. त्यांच्याच एका पत्रातली -- "पण तुम्हांला कळविणेस आनंद होतो की , 'हल्लीची पिढी बिघडली आहे' किंवा 'आमच्या वेळचं ते आता राहिलं नाही' यासारखी केवळ कवळीतूनच फुटायला योग्य अशी भाष्यं माझ्या तोंडून चुकूनही निघत नाहीत. हल्लीच्या मोगर्‍यालाही आपले नाक चोंदले नसल्यास कुठल्याही काळातल्या फुललेल्या मोगर्‍याइतकाच चांगला वास येतो." ही वाक्यं आणि पावभाजी खाणार्‍या-उत्तम संगीत ऐकणार्‍या आनंदयात्री आजोबांचं तत्त्वज्ञान यात फार काही फरक नसावा. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 10/15/2007 - 07:34 नवीन

सहमत

आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
स
स्वाती दिनेश Sun, 10/14/2007 - 12:05 नवीन

सुंदर

अतिशय सुंदर! आणि एकाच बैठकीत वाचायला मिळाले याचाही आनंद जास्तच आहे :) व्यक्तिचित्र इतके सुरेख उतरलंय की इतका वेळ(लेख वाचत असताना) मी तुम्हा दोघांची ध्वनिचित्रफीत पाहात आहे असे वाटत होते. अत्त्यानंद म्हणतात त्याप्रमाणेच! आता जरा अधिक मागणी: जरा ते जुने अर्धे "प्रकल्प" पूर्ण कर की ! शिंत्रे गुरुजी,सालस ची आम्ही वाट पाहतो आहोत,:) स्वाती
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 10/14/2007 - 13:05 नवीन

सुरेख...

हे व्यक्तिचित्र इतके छान आहे की सर्व समोर घडत आहे आणि ते आपल्यातीलच एक आहे असे वाटते. मैफल संपल्यानंतर एक सन्नाटा निर्माण झाला. लोकांना टाळ्या वाजवायचं भान नव्हतं! हे वाक्यच त्या मैफिलीची रंगत सांगून जाते. 'पाटणकर आजोबा अगदी एकटे आहेत' अशी निश्चितपणे माझ्या मनात कुठेतरी भावना असणार. तिला सुखद तडा गेला असणार आणि म्हणूनच माझ्या आनंदाश्रूंना वाट मिळाली असणार! एखाद्या व्यक्तीबद्दलची आपुलकी आणि त्यांचे मनातील स्थानच ह्यातून प्रकट होते. पण मनाने ते इतके तरूण होते की आम्हा कुणालाच कधी त्यांच्यात ऑडमॅन दिसला नाही. ते आम्हाला आमच्याच वयाचे, आमच्यातलेच कुणीतरी वाटत. खरे आहे... अशा व्यक्ती फारच कमी. एकंदरीत एका मस्त माणसाला मुकलो हेच जाणवतेय.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 10/14/2007 - 14:04 नवीन

अप्रतिम....केवळ अप्रतिम

वा तात्या, अप्रतिम व्यक्तिचित्रण लिहीले आहेस. हे पाटणकर आजोबा तुला भेटले हे तुझे भाग्य आणि त्यांच्याबद्दल तू येथे एवढे अप्रतिम लिहीलेस हे आमचे भाग्य. अशी माणसे आयुष्यात क्वचित भेटतात आणि भेटली तरी आपल्याला सोडून पुढील प्रवासास जातात. कुठे कुणाच्या घडल्या भेटी | गीत एक मोहरले ओठी || पाटणकर आजोबांच्या स्मृतीला आमचे अभिवादन. आपला, (नतमस्तक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 10/15/2007 - 23:18 नवीन

असेच

असेच वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
प
प्रियाली Sun, 10/14/2007 - 16:40 नवीन

वाह!

खूप दिवसांनी तुमच्या हातचं (किंवा मनातलं) घरगुती, सात्विक व्यक्तिचित्र वाचलं. अर्थातच, आवडलं हे सांगायला नको. शिंत्रे गुरुजी आणि रोशनीही पूर्ण करून टाका.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 10/14/2007 - 21:48 नवीन

टप्पा आणि भैरवी!

दोन्हीही मस्तच आहे. आत्ता फुरसतीत ऐकले. मजा आली.मालिनी बाईंचे गाणे म्हणजे एकदम मनाची पकड घेणारे आणि श्रोत्यांना जागच्या जागी खिळवून ठेवणारे आहे ह्याचा पुन:र्प्रत्यय घेता आला. धन्यवाद तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Mon, 10/15/2007 - 07:55 नवीन

च्या** या तात्याला जमतं लेकाचं!

व्यक्तिचित्र आवडलं. नेहमीप्रमाणेच छान जमलंय!
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Mon, 10/15/2007 - 11:20 नवीन

अप्रतिम

काही काही चेहेरेच असे असतात की 'याचं-आपलं जमणार!' याची खात्री पहिल्या भेटीतच होते. हे अगदी खरं आहे. दोन चार वाक्यातच एकमेकांची तार जुळते. पण विरह दु:ख तरी कुणाला चुकले आहे काय? अभिजित
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 10/15/2007 - 18:33 नवीन

स्मृती जागवली

<<चपला घालून घराबाहेर पडणार तेवढ्यात मागनं आवाज आला, "तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!">> तात्या डोळ्यातून पाणी आलं रे! आपल्या पाटणकर आजोबांप्रमाणे कै. माधव रिसबूड आमचे मित्र. त्यांच्या सहवासातले दिवस आठवले. त्यांच्यावर मनोगत दिवाळी अंकात कदाचित लिखाण येईल. व्यक्तिचित्रातून फलज्योतिष चिकित्सा असा तो विषय आहे, अंनिस वार्तापत्र या ( दिवाळी? ) वार्षिक विशेषंकासाठी हा लेख दोने तिन वर्षांपुर्वी नाकारण्यात आला. कारण काय तर व्यक्तिमहात्म्याकडे झुकणारा आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/15/2007 - 18:48 नवीन

मस्त !

तात्या, व्यक्तिचित्र आवडले. चपला घालून घराबाहेर पडणार तेवढ्यात मागनं आवाज आला, "तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!" हे वाचतांना आमच्याही डोळ्यात पाणी तरळलं ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/16/2007 - 00:28 नवीन

वा तात्या...

अप्रतिम व्यक्तीचित्र... पु.लं.च्या नंतर बहुतेक तुम्हीच...! वाचताना मलाही गहिवरून आलं. - प्राजक्ता.
  • Log in or register to post comments
आ
आर्य चाणक्य Sun, 10/21/2007 - 06:16 नवीन

असहमत

अप्रतिम व्यक्तिचित्र ह्याबाबात काही वाद नाही पण पु.लं.च्या नंतर एकदम तात्याच असे म्हणून असे म्हणून आपण पु.लं.चा काहिसा पाणउतारा करत आहात. जमल्यास पु.लं.चे समग्र साहित्य वाचा आणि मगच आपल्याला आमच्या विधानातील अर्थ कळेल. तात्या व्यक्तिचित्रं उत्तम लिहितात ह्यात काही वादच नाही पण पु.लं.शी तुलना करण्यासाठी त्यांना अजुन बरेच अंतर जावे लागेल असे आम्हाला तरी वाटते. तात्या प्रामाणिक मत आहे समजून घ्यालचं! - चाणक्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विसोबा खेचर Sun, 10/21/2007 - 07:55 नवीन

दीपस्तंभ!

तात्या व्यक्तिचित्रं उत्तम लिहितात ह्यात काही वादच नाही पण पु.लं.शी तुलना करण्यासाठी त्यांना अजुन बरेच अंतर जावे लागेल असे आम्हाला तरी वाटते. तात्या प्रामाणिक मत आहे समजून घ्यालचं! अहो त्यात समजून काय घ्यायचं? आपलं म्हणणं अगदी खरं आहे! पुलं, भीमसेन, कुसुमाग्रज, ही मंडळी फक्त एकदाच होतात! आमचे भीमण्णा नेहमी म्हणतात की गुरू नेहमी इतका मोठा असा असावा की त्याच्यापर्यंत आपण कधीही पोहोचूच शकणार नाही! किंबहुना, अश्याच माणसाला आपण आपला गुरू करावा, गुरू मानावा, तरच आपली थोडीफार प्रगती होऊ शकते! प्राजुच्या मनात पटकन जे आलं तेच तिने लिहिलं आणि त्याचा मी आदरच करतो परंतु भाईकाका माझे गुरू आहेत एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आर्य चाणक्य
व
विसोबा खेचर Tue, 10/16/2007 - 07:57 नवीन

आभार..

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार.. आपल्या सर्वांचे प्रतिसाद मला मोलाचे आहेत.. 'पाटणकर आजोबा' हे व्यक्तिचित्र भाईकाकांच्या चरणी सादर समर्पित! Image removed. काही मंडळींना हे व्यक्तिचित्र वाचताना भाईकाकांची आठवण झाली, या परिस मोठा सन्मान तो कुठला? माझ्यावर त्यांचा असाच वरदहस्त रहावा एवढीच इच्छा आहे! 'व्यक्तिचित्र' हा माझा सर्वात आवडता साहित्यप्रकार. भाईकाकांनी या प्रकाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. मी ष्टुलाबिलावर चढून तिथपर्यंत हात पोहोचतो आहे का ते पाहतो आहे, जेणेकरून तो लाडवांचा डबा माझ्या हाती लागेल! :) परंतु अजून मी फारच तळाशी उभा आहे याची नम्र जाणीव आहे! आजपर्यंत त्यांचंच बोट धरून चालण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यापुढेही करत राहीन! आत्ता फक्त 'सा' लावायला शिकतो आहे, अजून भीमसेन खूप दूर आहेत! तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आर्य चाणक्य Sun, 10/21/2007 - 06:20 नवीन

आवडला

परंतु अजून मी फारच तळाशी उभा आहे याची नम्र जाणीव आहे! तात्या आज पर्यंतचा तुमचा आत्मस्तुतीचा हट्ट पाहाता आपण लिहिलेला हा प्रतिसाद फारच आवडला. आपला लेखनाचा दर्जा आता वाढत जाणार ह्यात आम्हाला काहीही शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
न
नरेंद्र गोळे Tue, 10/16/2007 - 14:08 नवीन

अविस्मरणीय व्यक्तिरेखा साकारणार्‍या ह्या लेखाखातर अभिनंदन !

तात्या, मला ह्या लेखाने आचार्य अत्र्यांची आठवण करून दिली. ते मृत्यूलेखांचे अनभिषिक्त बादशाह होते. ज्या नेहरूंची "संयुक्त महाराष्ट्र" चळवळीदरम्यान त्यांनी यथेच्छ टिंगल केली त्यांच्यावरचा मृत्यूलेख (सूर्यास्त?) अविस्मरणीय ठरला. मला माहित नसलेल्या व्यक्तीरेखेस केवळ मृत्यूलेखानेच परिचित करवून माझ्यासाठी ती आदरणीय ठरवण्याचे तुमचे कसब वाखाणण्यासारखेच आहे. ऐंशीव्या वर्षीही स्वतःचे स्वतः जगणे कौतुकास्पद आहे. हल्ली आपल्याला स्वतःच्या सर्व गोष्टी स्वतः करायच्या म्हटल्या तर केवळ शिक्षा वाटावी एवढे आपले जीवन श्रमविभाजनाच्या आधारे सुरू आहे. आपल्यालाही ऐंशी वयोमान कालवशात प्राप्त व्हावे आणि संपूर्णपणे स्वस्वाधिन, स्वावलंबी आयुष्य जगता यावे हा बोध मला ह्यातून घेण्यासारखा वाटतो. शिवाय त्यांची इतरांबाबत निरपेक्षता आणि कलासक्तताही आपल्याला घेता आली तर सोनिया सुगंधू येईल. तात्या तथास्तू म्हणा! अविस्मरणीय व्यक्तिरेखा साकारणार्‍या ह्या लेखाखातर हार्दिक अभिनंदन !
  • Log in or register to post comments
स
साती Wed, 10/17/2007 - 02:18 नवीन

छान!

तात्या, सुरेख लिहिला आहे लेख. असेच उत्तमोत्तम लेख तुमच्याकडून येथे वाचायला मिळावेत ही अपेक्षा. साती
  • Log in or register to post comments
व
विश्वजीत Wed, 10/17/2007 - 18:55 नवीन

उत्तम व्यक्तिचित्र.

आवडले. आणखीही वाचायला आवडतील. विश्वजीत
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/18/2007 - 07:08 नवीन

पुन्हा एकदा,

गोळेसाहेब, साती, विश्वजीत, आपल्या तिघांचेही आभार... गोळेसाहेब, आम्ही 'तथास्तु' म्हणतो! :) साते, अगो तुझा पत्ता काय? आहेस कुठे? बरी आहेस ना? जावई काय म्हणतात आमचे? :) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट गुरुवार, 10/18/2007 - 16:27 नवीन

मस्त!

तात्या वरील सर्वांशी सहमत आहे. अतिशय उत्तम लेख झाला आहे.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 10/18/2007 - 18:18 नवीन

चांगला

तात्या, लेख आवडला. अजून येऊ द्या. - (चातक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव गुरुवार, 10/18/2007 - 18:21 नवीन

छान

वा तात्या, छान जमलं व्यक्तिचित्र!! अगदी जसच्या तसं डोळ्यासमोर आले आजोबा. आज वेळ झाला आणि एका दमात वाचला लेख. खरोखरच डोळ्यात पाणी आले. असेच लिहीत राहा, आम्ही वाचत राहू. ध्रुव http://www.flickr.com/photos/dhruva
  • Log in or register to post comments
ई
ईत्यादि Fri, 10/19/2007 - 06:44 नवीन

सहज आणि सुखद व्यक्तिचित्र

वेगळाच अनुभव झाला हे व्यक्तिचित्र वाचुन, सहज आणि सुखद असा. ईत्यादि
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/19/2007 - 08:45 नवीन

आभार..

चित्तोबा, कर्ण, धृव, इत्यादी, तुम्हा मंडळींचे मनापासून आभार... तात्या.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 10/19/2007 - 14:16 नवीन

तात्या

व्यक्तीचरीत्र खुपच मस्त लिहिता हो तुम्ही. एकदम फर्मास जमलय.
  • Log in or register to post comments
त
तो Fri, 10/19/2007 - 16:14 नवीन

छान.

व्यक्तिचित्रण व व्यक्तिमत्व दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 10/20/2007 - 01:15 नवीन

फारच सुंदर !

तात्या, जरा उशीराच वाचतोय, त्यामुळे प्रतिसाद द्यायलाही उशीर झाला. फार सुंदर उतरलाय लेख ! इतका, की आपल्यावरही कुणीतरी असा लेख लिहावा, (नंतर, आत्ता नाही :-) असे वाटले. - सर्किट
  • Log in or register to post comments
र
राजीव अनंत भिडे Sun, 10/21/2007 - 14:53 नवीन

सुरेख!

"तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!" तात्या, अतिशय चित्रदर्शी व्यक्तिचित्रण केले आहेस. व्यक्तिचित्रणात आता तुझी चांगलीच पकड जमत चालली आहे यात काहीच वाद नाही. केवळ आंतरजालावरच नव्हे, तर मराठी साहित्यातही अलिकडे अशी तुमच्या-आमच्यातली साधीसुधी व्यक्तिचित्रं अभावानेच वाचायला मिळतात. पाटणकर आजोबांचे व्यक्तिचित्र नक्कीच मनात कुठेतरी घर करून गेले. पुलंची आठवण झाली! अवांतर - आईलाही अतिशय आवडले. आईने मुद्दाम संगणकाजवळ बसून, नीट दिसत नसतानाही हळूहळू वाचले! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.
  • Log in or register to post comments
श
शेणगोळा गुरुवार, 10/30/2008 - 17:52 नवीन

तात्या,

पाटणकर आजोबा खूप भावले मनाला. सर्वांचाच लाडका, शेणगोळा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 10/30/2008 - 18:15 नवीन

काय सुरेख

काय सुरेख लिहिले आहेत तात्या!
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 10/30/2008 - 18:36 नवीन

खुपच सुंदर लिहिले आहे.

तात्या, व्यक्तीचित्रण एकदम खास झाले आहे. पाटणकर आजोबा मनात घर करून गेले . :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 10/30/2008 - 18:44 नवीन

तात्या,

लेका काय रंगवले आहेस रे पाटणकर आजोबा! व्यक्तिचित्राच्या शेवटाला रडायचं नाही असं ठरवून शेवटाकडे जायला लागलो आणि शेवटचं वाक्य संपताना डोळे कधी डबडबून आले समजलं नाही रे. फारच छान! हॅट्स ऑफ!! (खुद के साथ बातां : रंग्या, तू मिपाकर होण्यापूर्वीचे लेखन एकदा सवड काढून वाचावेच लागेल, नाहीतर मोठ्या आनंदाच्या ठेव्याला मुकशील!) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 10/30/2008 - 20:43 नवीन

जिवंत चित्रण

सुंदर आणि जिवंत चित्रण! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Fri, 10/31/2008 - 05:54 नवीन

सुरेख ---

तात्या ,फारच चांगली भट्टी जमली आहे हो. शेवटच्या वाक्यांनी तर डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 10/31/2008 - 06:31 नवीन

सुरेख लेख

तात्याराव, किती सुंदर लिहिता.पाटणकर आजोबा हुबेहुब पाहील्या सारखे वाटतात. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 10/31/2008 - 07:40 नवीन

सहमत!!

सुंदर आणि जिवंत चित्रण!!!! आजोबा मनात घर करून गेले !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 10/31/2008 - 07:54 नवीन

तात्या

तात्या फारच सुरेख लिहले आहे तुम्ही.. :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 11/05/2010 - 00:14 नवीन

सलाम...

आजोबांना आणि तुम्हाला पण..
  • Log in or register to post comments
श
शहराजाद Fri, 11/05/2010 - 08:30 नवीन

स्नेहबंधातला जिव्हाळा

वा, तात्या! उत्तम व्यक्तिचित्र. मोजक्या शब्दांत तुमच्या स्नेहबंधातला जिव्हाळा पुरेपूर उतरला आहे.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 11/05/2010 - 10:51 नवीन

उत्तम लेख...

उत्तम लेख...
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Fri, 11/05/2010 - 14:16 नवीन

हृदयस्पर्षी........

हृदयस्पर्षी........
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sat, 11/06/2010 - 14:16 नवीन

तात्या. फारच छान. ही घ्या दिवाळी भेट.

तात्या. फारच छान. तुम्हाला (आणि इतर सर्व रसिकांनासुध्दा) दिवाळीची भेट. पंडीत भिमसेन जोशी यांची पु.लं.नी घेतलेली मुलाखत. http://www.esnips.com/doc/fd8ac0de-e87d-4dd3-a194-313ee369a92c/Bhimsen-Joshi-aani-Pula आकाशवाणीवर प्रक्षेपीत झाली होती... हा लेख वरती आणणा-या शिल्पा बचे आभार.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा