विजुभाउनी विचारलेली "पानगी "ची रेसिपी.
पानावर थापून करायची ती पानगी.
१ वाटीभरून तांदळाचे पीठ
१/२ टी.स्पून मीठ
२ टी.स्पून साखर
१/२ ते पाऊण वाटी दुध
केळीची पाने
१टे.स्पून तूप
पातेल्यात तांदळाचे पीठ घेऊन त्यात मीठ, साखर वथोडे दुध घालून हाताने कालवावे. हे मिश्रण सैलसर असावे.
त्याचे ३भाग करून, एक भाग केळीच्या पानावर गोलाकार पसरावा. वरून दुसरे पान झाकावे व गॅसवर तवा ठेऊन त्यावर ही तयार केलेली पानगी पानासकट ठेऊन दोन्ही बाजुंनी भाजून घ्यावी. पानगी शिजली कि पानापासून सहज निघून येते. पाने करपतात, काढून टाकता येतात. दोन्ही बाजुंनी भाजून पानगी ताटलीत काढावी. वर थोडे साजूक तूप घालून खाण्यास द्यावी.
वाह! खुपच
फारच सुंदर !
In reply to फारच सुंदर ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
त्यांना काय
In reply to त्यांना काय by सुवर्णमयी
वा!!
वा...
In reply to वा... by प्राजु
हेच
वा!
वा! फार सुंदर.
तरल...
शप्पथ!
कविवर्य ग्रेस व सुधीर मोघे....