मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी कविता.

अविनाश ओगले · · जे न देखे रवी...
माझी कविता इतक्या सहज भेटणार नाही तुला. माझ्या बोलण्यात माझ्या हसण्यात दिसणार नाही तुला. खोल मनात जळत असते एक अखंड धूनी... इतक्या जवळ येऊ नकोस ..तिची धग सोसणार नाही तुला. -अविनाश ओगले

वाचने 4139 वाचनखूण प्रतिक्रिया 6

'खोल मनात जळत असते एक अखंड धूनी... इतक्या जवळ येऊ नकोस ..तिची धग सोसणार नाही तुल' काय बात आहे अविराव..मस्त शेवटच्या कडव्याचा तर मी एकदम पंखा आहे. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर गुरुवार, 03/06/2008 - 09:30
ओगलेशेठ, कविता ठीक वाटली. कदाचित मला फारशी समजली नसेल.. प्रामाणिक मत, राग नसावा.. असो... और भी आने दो... आपला, तात्या.