बसा दोस्तहो या दारूवर* बोलू काही !
जरा चुकीचे, खूप बरोबर बोलू काही !
बसा दोस्तहो या दारूवर* बोलू काही !
खच्चून घुटके मद्याचे हे घेत रहा तू
मिटले नाहीत डोळे तोवर बोलू काही
बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही !
उभाच पाहून ताठ मला कुजबुजले सारे
पाठ लागू दे भूईस नंतर बोलू काही
बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही !
मिळेल तितके मद्य तुला तर हवेच आहे
साकी लावे खिशास कातर बोलू काही
बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही !
उद्या-उद्याची कशास पर्वा ड्राय डे जरी
खोल बुडूया! तरंगल्यावर बोलू काही
बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही !
`ग्लास' धरी बा डोळ्यावरती चष्मा म्हणूनी
वाट आंधळी! असलो धड तर बोलू काही
बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही !
(*दारूवर म्हणजे दारु या विषयावर नव्हे.. 'over drinks' या अर्थाने.)
-अविनाश ओगले
संदीप खरे यांच्या कवितेचे विडंबन. मूळ कविता येथे उपलब्ध..http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/Laxaneeya/8.htm
वाचने
5548
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
चपखल विडंबन अविनाश!
वा वा...
हा हा हा..
हे हे हे
एकदम मस्त
हेहेहेहे.....
मस्त..
मूळ कविता